हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी

Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21

गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्मलादेवींच्या आवाजात
>>>
आजचे राज रोहित असा रोल करतील का?
>>>
याच निर्मलादेवींच्या मुलानी काही वर्षांपूर्वी राज बनून भाज्या चिरल्या होत्या...
उगाच नाही त्याला 'हीरो नं.१' म्हणत...

अब के सजन सावन में , आग लगेगी बदन मे, घटा बरसेगी , नजर तरसेगी
मगर मिल ना सकेंगे दो मन
एक ही आंगन मे
शू शू,
सर्वात आवडलेल भाग म्हणजे, ओमप्रकाश, त्याचं ते उगाच, दाराजवळ येउन बघणं, केक उचलून ठेउन देण, हेहेहे किती गोड.

त्या निर्मलादेवी नाही रे गोन्द्याची आइ नर्मदा. असे मला वाट्ते हा.
>>

मामी...
निर्मलादेवीच गोंद्याची आई...
क्लासिकल सिंगर...

नर्मदा म्हणजे गोंद्याची पोट्टी...

निर्मलादेवी गोंद्याची आई...

आता एक नवीन गाणे इथे लिहितो..... घुंघ्ट की आड से दिलबरका........... अतिशय सुंदर... जुही आमीर... तो पांढरा किल्ला... नदीम श्रवण... सगळ्यानाच क्रेडिट..

नदीम श्रवणच्या चाली , विशेषतः मधले मुजिक पिसेस ( इन्टरलुड) छान असतात... गाणी ऐकताना मधले संगीत सुद्धा गुणगुणावेसे वाटते... इन्टरलुडच्या बाबतीत नदीम श्रवण नक्कीच टॉप टेन मध्ये आहे.... सगळे जुने नवे अगदी रेहमान हिशोबात धरला तरीही..... राज्,आशिकी,हम है राही प्यार के, दीवाना.... यातली गाणी बर्‍याचदा खास इन्टरल्युडसाठी ऐकावीशी वाटतात....

हिना (कोणाला आठवतोय तरी का?) मधले एक गाणे आहे - 'चिठ्ठीये हिरिये' असे काहिसे. ऐकायला तसे ठिकठाकच आहे पण त्याचे चित्रीकरण अप्रतीम आहे. झेबा जंगल सदृष्य भागातून जात असते. पानगळीचा मौसम आहे आणि सगळी पाने गळून पडली आहेत. सगळे वातावरण उदास मूड निर्माण करते पण त्याच बरोबर तो पानगळीचा पिवळा / बदामी रंग इतका सुंदर दिसतो की निव्वळ त्या गाण्यामुळे मला तो चित्रपट बघितल्याचे दु:ख सहन झाले होते.

'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए' सिलसिला मधले हे गाणे अजुनही तितकेच ताजे वाटते. यश चोप्रांनी त्या नंतर अनेक (बहुतेक सगळ्याच) चित्रपटातून निसर्गाचे सुंदर दर्शन घडवले पण ह्या गाण्याची सर पुढे कशालाच नाही आली. ह्या गाण्यात ती ट्युलीपची शेते, आमिताभ, रेखा, किशोर, लता आणि शिव-हरी सगळेच कसे जूळून आले होते.

माधव, दोन्ही गाण्याना अनुमोदन.
चिट्ठीए गाण्याला पंजाबी ठेका सुन्दर आहे. झेबा फार गोड दिसते.

जामो प्या अनुमोदन. जुही ची वेष भूषा सुन्दर आहे.

हिना (कोणाला आठवतोय तरी का?) >> आठवतेय ना.. आश्विनी भावे चे , आजा रे माही.. गाणे पण झकास आहे..

'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए' >>> सही आहे गाणे

मार डाला...

चित्रपट : देवदास
गीत : प्रकाश कपाडिया आणि नसरत बद्र
संगीत : इस्माईल दरबार
गायक : कविता सुब्रमण्यम, के के

शब्दशः मार डाला! माधुरीच्या सर्वोत्क्रुष्ट अभिनयांपैकि एक... अजुन काय लिहिणार या गाण्याबद्धल; तुम्हिच ठरवा...

http://www.youtube.com/watch?v=S5_E_s7IGb0

मामी मस्त गाणी!

केजोने दिलेलं बेस्ट रोमॅन्टिक गाणं म्हणजे 'सुरज हुआ मद्धम.. चांद जलने लगा' मला आवडतं याचं चित्रिकरण, चाल, शाहरुख, काजोल, त्यांचे कॉस्च्युम्स,मेकअप सगळंच. अ‍ॅक्चुअली बेस्ट सिडक्टिव सॉन्ग म्हणायला हवय हे.

मामी, ते भोर आयी, म्हणजे एक मास्टरपीस आहे. (राग बहुदा भटियार ) यात उषा किरण आणि दूर्गा खोटे पण नाचल्यात. शिवाय हरिंद्रनाथ चटोपाध्याय आहेतच. याच सिनेमात, मन्ना डे चेच, तूमबिन जीवन कैसा जीवन, ( बहुदा शिवरंजनी ) असे व्याकूळ करणारे गाणे आहे. पण चित्रीकरण सोसो आहे. नायिका नाचाच्या स्वर्धेत जिंकायलाच हवी, अश्या अट्टहासाने, लताच्या, मेरे नैना बहाये नीर ची मात्र वाट लागलीय.

माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढीची दिल कि धडकन, हेलन होती. तिच्या काही गाण्यासंबंधी.

गुमनाम ची कथा, माहित असेलच. ( एक श्रीमंत व्यक्ती मृत झाल्यावर, तिच्याशी संबधित सर्व व्यक्तिना, एका बेटावर फसवून आणले जाते. मनोज कुमार, नंदा, प्राण, हेलन, धुमाळ, तरूण द्त्त, वगैरे. तिथे त्यांच्या सेवेला मेहमूद असतो. मग रोज एकेकाचा खून होत जातो. प्रत्येक खूनानंतर जिवंत राहणारे एकमेकांवर संशय घेत राहतात ) ज्यावेळी मनोजकुमार, नंदा, प्राण आणि हेलन एवढेच उरतात. त्यावेळी हेलनला एक गाणे आहे.
इस दुनियामे जीना हो तो सुनलो मेरी बात
गम छोडके मनाओ रंगरेली, और मानलो जो कहे किट्टी केली.

हे गाणे लताला का दिले हे गूढ आहे ( हेलन आणि लता हे कॉम्बिनेशन मग इंतकाम मधे पण झाले )
किट्टी केली, हे हेलनचे सिनेमातले नाव. कथेतला तणाव दूर करण्याचे हे गाणे करते. या नाचात ती पांढर्‍या जांभळ्या स्विमसूट मधे आहे. गाण्यात ती बाकीच्या तिघाना पण ओढते. या गाण्याचे शब्द, लताचा मस्त मूड आणि तिचा खेळकरपणा जमून आलाय. गाणे अगदी टिपेला गेल्यावर टाळ्यांचा र्हीदम मस्त आहे.
याच सिनेमात, मेहमूदच्या "खयालो मे, हम काले है तो क्या हुवा, दिलवाले है " वर पण ती मस्त नाचलीय. चक्क मराठमोळ्या वेषात नाचलीय.
हेलन आणि वैजयंतीमालाची जुगलबंदी, प्रिंस सिनेमात बघायला मिळाली. मुकाबला हमसे ना करो, असे लता, आशा आणि रफी चे गाणे आहे. यात वैजयंती मालाने अनेक भारतीय तर हेलनने पाश्चात्य नृत्यप्रकार सादर केलेत. वैजंयती मालाने, मोहिनी अट्टम पण सादर केलेय ( हा प्रकार आपल्या कनक रेळे सादर करत असत ) दोघींची तूलना करणे शक्यच नाही, इतके सुंदर नृत्य आहे ते.
मराठी सिनेमात, कीचकवध मधे पण ती गोपीकृष्ण बरोबर नाचलीय. असा केसात माळून मरवा, असे गाणे आहे, चाल मास्टर कृष्णराव यांची आहे. आणि गायलय, लता आणि सुधीर फडके यांनी, हेच गाणे याच चालीवर हिंदीत पण आहे. याच सिनेमातले, धुंद मधुमति रात रे, पण त्याच चालीत हिंदी सिनेमात आहे.
पुढे हेलन, आणखी एका मराठी सिनेमात नाचली होती. त्या सिनेमाचे नाव, शांतता खून झाला आहे. गाण्याचे शब्द पण हेच होते.

हेलनची मराठी गाणी आहेत हे माहित नव्हतं!
>>>अब के सजन सावन में
आशू अगदी अगदी. माझंही अत्यंत आवडतं गाणं. ओमप्रकाश बेस्ट्च!
बाकी, तो 'मिस चमको' वाला सिनेमा कोणता? नाव विसरले. त्यातल्या 'प्यार मोहोब्बत प्रणय लगावट' गाण्याचं शूटींगपण सही आहे.
दिल्लीचं शूटींग काय मस्त केलंय त्यात. मस्त रुंद रस्ते...जावसं वाटतं दिल्लीला ते पाहून

तो 'मिस चमको' वाला सिनेमा कोणता? <<<<चश्मेबद्दूर Happy
चश्मेबद्दूर ची गाणीही छान होती. येसुदास आणि हेमंती शुक्ला हे कॉम्बिनेशन जमून गेले. अर्थात सई परांजपे टच विसरता येणार नाही.

केजोने दिलेलं बेस्ट रोमॅन्टिक गाणं म्हणजे 'सुरज हुआ मद्धम.. चांद जलने लगा' मला आवडतं याचं चित्रिकरण, चाल, शाहरुख, काजोल, त्यांचे कॉस्च्युम्स,मेकअप सगळंच. अ‍ॅक्चुअली बेस्ट सिडक्टिव सॉन्ग म्हणायला हवय हे.>> अगदी अगदी अगं कालच तो सिनेमा इथे लागला होता. काजोलचा गेट्प सुन्दर आहे.
एस्प. शारुख तिच्या गळ्याभोवती हात फिरवतो एकदम किलर. त्या गाण्याच्या आधी शारुख तिला बांगड्या पहनवितो तेन्वाचा ड्वायलॉक पण अति रोमॅनटिक आहे.

सिनेमॅटिकली या गाण्याचा फॉलोअप म्हण्जे गुझारिश. ऑफ गझनी. तसेच love and longing.

मराठी सिनेमात, कीचकवध मधे पण ती गोपीकृष्ण बरोबर नाचलीय. असा केसात माळून मरवा, असे गाणे आहे,

अतिशय सुंदर नाच आहे ह्या गाण्यात. गोपिकृष्णाच्या तोडीस तोड नाचलीय हेलन यात आणि दिसलीय पण खुप गोड.

मला युटुबवर मिळाले नाही कुठे. कोणाकडे असल्यास कृपया दुवा द्या.....

खुबसुरत मधलं सुन सुन सु दिदी तेरे लिये... हे एक अत्यंत उत्तमरित्या चित्रित केलेलं गाणं.
रेखा दोन वेण्या आणि मिडीमध्ये सुरेख दिसलिये... Happy जोडीला डेव्हिड....

sun_sun.jpg

"रोजा" मधलं 'दिल है छोटासा'
"१९४२ लव्ह स्टोरी" मधलं 'ना उदास हो मेरे हमसफर'
"डॅडी" तलं ' आईना मुझसे मेरी पहलीसी सूरत मांगे'

अमीर खान ची बहूतेक गाणी ट्रेंड सेटर आहेत..

कयामत से कयामत तक... यातले ' पापा केहेते है.. ', एव्हरग्रीन गाणे.. अमीर चे गीटार घेत गाणे म्हणणे, उदित नारायण चा आवाज, जतिन-ललित चे संगीत Happy

हे गाणे जवळ जवळ सगळ्या कॉलेज सेन्ड्-ऑफ पार्टीचे शेवटचे गाणे असते.. आणि अजूनही राहिल, यातच सर्व काही आले..

दूसरे म्हणजे गुलाम मधिल 'आती क्या खंडाला',
आमीर चा आवाज, टपोरी लुक, राणी चा खंडाला गर्ल ड्रेस, आणि शेवटचा जीभेवरती काडी विझवायचा सीन.. एक नंबर सगळेच.. Happy

जतिन-ललित चे संगीत
>>
केद्या... कयामत से कयामत तक ला आनंद मिलिंद चं संगीत आहे...
आती क्या खंडाला ला जतिन ललित आहेत...

आपण करुन दाखवतोय, तसाच अभिनय करायचा असा बहुदा व्ही. शांताराम
यांचा दंड्क असावा. अनेक कलाकार त्याला बळी पडले. सर्वात जास्त शिकार
झाली ती, संध्या. नवरंग मधे, जमुना आणि मोहिनी दोन्ही भुमिकांत तिच
होती. मोहिनीच्या रुपात हास्यास्पद अभिनय करणारी, जमुनाच्या भुमिकेत
मात्र नैसर्गिक रित्या वावरलीय.
आज आठवण काढतोय ती, तिच्या जल बिन मछली (नृत्य बिन बिजली)
या सिनेमातल्या एका नाचाची. हा सिनेमाच फ़ारसा कुणी बघितला नसणार
आणि त्यातले लताचे, कजरा लगाके, बिजुरि सजाके, मै तो आयी रे, मोहे
लायी मिलन धून पिया की. (या सिनेमात पहिल्यांदा स्टीरिओ साऊंड वापरला
होता. ) हे गाणेही बघण्यातले नाही. या नाचातही तिच्या चेहर्‍याचा मेकप
विचित्रच आहे. पण या गाण्यात ती एका नागिणीच्या वेषात आहे. अगदी
तंग असा काळा चमकता ड्रेस आहे तिचा.
एका गरूड पक्ष्याचा नागिणीने घेतलेला सुड, अशी या गाण्याची थीम आहे.
आणि संध्याने जे सादर केलेय ते खरेच विस्मयकारक आहे. नागिणीची
सळसळ तिने ज्या प्रकारे दाखवलीय, ती खरेच बघण्यासारखी आहे.
तिने तशी कबूतराची फ़डफ़ड, मान वेळावणे, हे प्रकार, सेहरा मधल्या, लताच्याच
पंख होते तो उड आती रे (राग भूपाली) या गाण्यात दाखवलीय. (या गाण्यात
तिच्या बरोबर मुमताज पण आहे.) पण लताच्या गायनापुढे तो नाच फ़िका
वाटतो. कदाचित आधी गाणे ऐकले असेल, तर त्यावर कबूतराची वगैरे प्रतिमा
डोळ्यासमोर उभी रहात नाही.

तीन तीन हिट चित्रपट देऊनदेखील, विस्मरणात गेलेल्या, ग्रेसी सिंगच्या, लगान
मधल्या, गाण्याची पण आठवण काढायला हवी. आशाचे, राधा कैसे ना जले, हे
ते गाणे. एरवी, सुमार वकुबाचे गायक गायिका असतील, तर रेहमानचा र्‍हिदम
त्यांचा गळा दाबुन टाकतो. पण आशाच्या आवाजाची धार बघता, त्याने या
गाण्यात अगदी सॉफ़्ट ताल दिलाय. (गाण्याच्या आधी तोच वाजतो). तरीपण
या गाण्यातले शेवटचे दोन आलाप आशाचेच आहेत का, याची मला जरा शंका
आहे.
गाण्याचे चित्रीकरण मात्र लाजबाब. मशालींचा उजेड, सर्व कलाकारांचे, त्या काळाशी
सुसंगत असे, पिवळ्या केशरी रंगाचे कपडे, आणि अगदी नैसर्गिक वाटतील, अश्या
हालचाली. नकळत मातीचा गंध यायला लागतो, हे गाणे बघताना.
या गाण्यातला लटका राग, आशाने अगदी नेमका दाखवलाय, आणि ग्रेसीच्या चेहर्‍यावरचे
भाव देखील, त्याच्याशी अगदी सुसंगत आहेत.

दिल अपना प्रीत पराई, मधली हिरॉईन मीना कुमारी आणि तिचे प्रेम राजकुमारवर, राजकुमारचे लग्न होते ते नादीराशी. या लग्नानंतर, लताचे, अजीब दास्ताँ है ये, कहाँ शुरु कहाँ खतम, हे सुंदर गाणे आहे. गाणे
एका मोठ्या होडीत बसून मीनाकुमारी म्हणतेय. नवीन लग्न झालेले जोडपे समोर आहे. या गाण्यात राजकुमारच्या चेहर्‍यावर नेहमीप्रमाणेच, "बुलावा आया है" टाईप भाव आहेत. पण यात मजा आणलीय ती मीनाकुमारी, नादीरा आणि शम्मी यानी. गाण्याचे शब्द फारच उघड आहेत. (किसीका प्यार लेके तूम, नया जहाँ बसाओगे, ये शाम जबभी आयेगी, तूम हमको याद आओगे )
मीना कुमारी त्याच्या नजरेला नजर न देता गाणे म्हणतेय. नादीराला त्या गाण्याचा अर्थ लागल्याने, तिच्या चेहर्‍यावर तिखट भाव आहेत. या गाण्यात शम्मीचा एक लूक, मस्त खट्याळ आहे. याच गाण्यात कोरसचा वापर पण छान आहे, आणि त्यावेळी सगळ्यांच्या चेहर्‍यावर फिरलेला कॅमेरा पण एका लयीत फिरलाय.
याच सिनेमात लताची आणखी तीन छान गाणी आहेत. त्यातही कोरसचा छान वापर आहे, पण मीनाकुमारी मात्र नाचताना अवघडलीय.
ती ३ गाणी अशी
१) शीशा ए दिल, इतना ना उछालो
२) अंदाज मेरा मस्ताना, मांगे दिल का नजराना, तकालीना
३) मेरा दिल अब तेरा ओ साजना, कैसा जादू फेरा ओ साजना

दिनेशदा, राधा कैसे ना जले गाण्यातला शेवटचा आलाप वैशाली सामंतने गायला आहे असं वाचलं होतं मी

Pages