Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि एक सुंदर, दुर्लक्षित
आणि एक सुंदर, दुर्लक्षित गाणे.... शारुख, जुही.... येस बॉसचे टायटल साँग................ कधीतरी गुणगुणावीशी वाटणारी चाल.. यमन कल्याणचीच...
सहीच धागा आहे हा! जॉनी मेरा
सहीच धागा आहे हा!
जॉनी मेरा नाम मधले 'पलभर के लिये कोई हमे प्यार करले' मधली खिडक्यांची धमाल जबरी. विजय आनंद सारखा गाणि चित्रित करणारा दुसरा दिग्दर्शक झाला नाही, होणार नाही.
उदा. तिसरी मंझिल मधल्या 'ओ मेरे सोना रे' मधली बॅग आणी तिच्या पट्ट्याची गंमत!
माझे अजून एक आवडते म्हणजे 'राजू बन गया जंट्लमन' मधले 'सीने ने दिल है' केमीस्ट्री केमीस्ट्री म्हणतात ती ही!
दिनेशदा, मेरे साजन है उसपार साठी विशेष धन्यवाद, नितांतसुंदर गाणे आणि सिच्युएशन
बिमलदांचा अजून एक मास्टरपीस म्हणजे 'मधुमती' आणि खासकरुन त्यातले 'बिछुआ'. या गाण्यात एका सीनमधे दिलीपकुमार कॅमेर्याला पुर्ण पाठमोरा जातो आणि त्यावेळचे वैजयंतीमालाचे भाव, जबरदस्त!!
मला फिजा मधलं ह्रितिक, नेहाचं
मला फिजा मधलं ह्रितिक, नेहाचं 'आजा माहिया' आणि त्याहीपेक्षा जोधा अकबर मधलं 'ख्वाजा मेरे ख्वाजा' फार फार आवडतात. ख्वाजा चे बोल, अर्थ संगीत एवढं अपीलींग आहे की नकळत अकबर सारखं गोल फिरत तल्लीन वाल्यासारखं वाटतं.
केहेना है क्या... चित्रपट :
केहेना है क्या...
चित्रपट : बाँबे
गीत : ???
संगीत : ए आर रेहेमान
गायीका : चित्रा
http://www.youtube.com/watch?v=MqhxVhkib74
या गाण्याचं प्रथम तामीळ version मी ऐकलं (thanks to my Tamil friends). भाषा समजत नव्हती पण गाणं एकदम ह्रदयाला भिडलं. रेहेमानची ती नुकतीच सुरुवात होती (रोजा, रंगीला वै.).
But he was arrived, and the rest is history!
श्रद्धादिनेश, " मुझे कब्र में
श्रद्धादिनेश, " मुझे कब्र में बुलालो.."![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
"मला चुकीची ऐकू आलेली गाणी " मध्ये का नाही टाकलं हे इतक्या दिवसांत?
रच्याकने ते " मुझे स्वप्न में बुलालो " असं आहे. ( चित्रपटाचा काळ मध्ययुगीन असल्यामुळे सपनों में ऐवजी स्वप्नमें असावे.)
चित्रपट : १९४२ a love
चित्रपट : १९४२ a love story.
गीत : कुछ ना कहो...
मनिषा कोईराला इतकी सुंदर कधीच दिसली नाही. अनिल कपूर इतका क्यूट कधीच दिसला नाही आणि मला वाटतं की, that's the most romantic song i hv ever seen.
अस्मानी. मी पन इथे हेच गाणं
अस्मानी. मी पन इथे हेच गाणं लिहिणार होते... सेटपण सुंदर होता!!
अबके बरस भेज.. हे आशाने गायलेलं गाणं असलं अफलातून "दिसतं" डिव्हीडीवर बघताना इतकं प्रभावी जाणवतं मग पडद्यावर कसले दिसले असेल ते!!
(हे जुने पिक्चर परत का रीलिइज करत नाहीत???)
मुगल्-ए-आझम मधील सगळीच गाणी
मुगल्-ए-आझम मधील सगळीच गाणी नितांतसुंदर .. त्यातही "मोहे पनघट पे" .. मधुबाला अशक्य सुंदर दिसलेय..
मधुबन मे राधिका.. काय महान म्हटलयं.. कोणाला चित्रपटाचे नाव माहीत आहे का?
दिलिपकुमार आणि त्या नर्तिकेची जुगलबंदी आहे बहुतेक..
शुभा मुद्गलांचे "अबके सावन ऐसे बरसे" हे चित्रपटातील नसले तरी फारच ऊत्क्रुष्टरित्या चित्रित केलेय अगदी त्यांच्या आवाजाला सार्थ असे..नुसतं पाहिलं तरी मनसोक्त पावसात भिजल्याचा आनंद मिळतो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मधुबन मे राधिका.. काय महान
मधुबन मे राधिका.. काय महान म्हटलयं.. कोणाला चित्रपटाचे नाव माहीत आहे का?
>> कोहिनूर!!
कोहिनूरमधले आणखी एक सुंदर
कोहिनूरमधले आणखी एक सुंदर गाणे... जरा मन कि तिवडिया तो खोल सैय्या तेरे द्वार खडे.... देस रागातील अतीशय सुंदर गाणे..... दिलीप्-रफी-नौशाद ..... मास्टरपीस गाणे..
मोर पनघट पे? चिंगी ते 'मोहे'
मोर पनघट पे?
चिंगी ते 'मोहे' आहे.
मला फ़क्त जूनीच गाणी आवडतात
मला फ़क्त जूनीच गाणी आवडतात असे नाहि.
"हम दिल दे चुके सनम" मधले निंबूडा निंबूडा पण माझे आवडते गाणे, संगीतकार
ईस्माईल दरबार ने सर्वच गाणी छान दिली आहेत. हे गाणे कविताने गायलेही छान.
ऐश्वर्या सुंदर दिसलीय आणि नाचलीय पण सुंदर.
एकतर तिच्या ड्रेसचा वेगळाच आकाशी रंग. सिनेमातल्या नाचाच्या वेळी तो क्वचितच
दिसतो. तसेच बाकी नर्तिकांच्या ड्रेसचे रंग पण नेहमीच्या मारवाडी भडक रंगापेक्षा फ़ारच
वेगळे आहेत. तसेच पुरुष नर्तकांच्या फ़ेट्याचे रंद देखील. बाकी कलाकारानी बसून काही
बोल म्हणणे आणि ऐश्वर्याने नाचणे, हा एक वेगळा प्रकार. या नाचासाठी वरुन घेतलेली
काहि दृष्ये पण छान आहेत. यातल्या काहि स्टेप्स फ़ारच वेगळ्या आहेत. या गाण्याच्या
चित्रीकरणावेळी तिच्या पायाला दुखापत झाल्याचे ऐकले होते. (एका ठराविक दृष्यानंतर
तिच्या पायाचा क्लोजप नाही)
हे गाणे राजस्थानी लोकगीतावर आधारित आहे, आणि ऐकायला सोपे वाटले तरी गायला
फ़ार कठीण आहे.( फ़ाल्गुनी पाठकने, ते गायचा अयशस्वी प्रयोग केला होता, मस्कतला. )
कविताचा आवाज फ़ार टिपेला गेलाय. (शीर्षक गीतात पण तो फ़ार टिपेला गेलाय. असे
गाऊन तिला त्रास होईल, अशी काळजी लताने व्यक्त केली होती). मला नाही वाटत निंबूडा
हा शब्ददेखील यापुर्वी हिंदी चित्रपटगीतात आला होता.
याच सिनेमातली बाकीची गाणी खास करुन, ढोली तारा ढोल बाजे, आखोंकी गुस्ताखिया
पण छान चित्रीत झालीय.
तक्षक मधले, रंग दे, हे गाणे पण माझे आवडते. आशाने ते फ़ार मस्त गायलेय. मोहे
रंग दे, किंवा मैने रंगली आज चुनरीया, अश्या रचना प्राचीन संतांनी देखील केल्या
आहेत. (मराठीतही शालू माझा रंगाने भिजला, सारखी गवळण आहेच ) या गाण्याला
पण तसा संदर्भ आहे.
या गाण्यात तब्बू सुंदर दिसलीय. तिचा लाल ड्रेसपण छान आहे. नाचलीय छान. शेवटी
तिने हाताच्या आणि पोटाच्या छान हालचाली केल्या आहेत. काही काळे नर्तक, हे
या गाण्याचे वेगळेपण. आशा जेव्हा गाण्याचा कळस गाठते त्यावेळी नृत्य जोरकस
न होता, हालचाली एकदम बदलतात.
याच सिनेमात, एका प्रसंगात, तब्बूचे भरतनाट्यम आहे. त्यावेळी गाणे नाही, पण
तो नाचही फ़ार सुंदर आहे. एरवी तब्बूची उंची तिचा नाच फ़ारसा बघणीय होऊ देत
नाही, पण या दोन्ही नाचात, तसे वाटत नाही.
चायनागेट मधले आपल्या उर्मिलाने सादर केलेले, छम्मा छम्मा पण असेच जमून आलेय.
त्यात ती पाहुणी कलाकार आहे. (नायिका आहे, ममता कुलकर्णी, पण तिला सिनेमात शोधावे
लागते )
या सिनेमात प्रचंड हिंसाचार आहे. पण हे गाणे मात्र रिलिफ़ देते. सिनेमात समीर सोनी
सोडला, तर तरुण नायक नाही. त्यामुळे उर्मिलाने स्क्रीनवर राज्य केलेय. तिचा मरुन रंगाचा
ड्रेस आणि रष्टिक दागिने, तिला शोभून दिसलेत. एका ऒळीवर ती नुसतीच थिरकलीय. आणि
त्यावेळी सगळा पडदाच थरथरल्यासारखे वाटते. तिचे ठुमके, मुरके सिनेमातील जेष्ट कलाकारांप्रमाणे
आपल्याला देखील पागल करतात.
फिर भी दिल है हिन्दुस्तानी
फिर भी दिल है हिन्दुस्तानी मधे जुहीचे पिवळ्या साडीतले एक गाणे आहे. त्याची चाल आणि कोरीओग्राफि ग्रेट शिवाय त्या दोघांचे, तेरा जोगी, त्याची चाल आणि नाच पण छान ( जुहिचा ग्रे ड्रेस )
उसने कहा था, सिनेमात लता आणि तलत चे, आजा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये, असे गाणे आहे.
सलील चौधरीचीच चाल आहे. पडद्यावर नंदा आणि सुनिल दत्त आहेत. या गाण्यातला झिंगर, हा शब्द पण कानाला खुप गोड वाटतो. याचे चित्रीकरण खास आहे. झोपाळ्यावर नंदा आणि तिला झोका देणारा सुनिल, यावेळी कॅमेरा कायम नंदाच्या चेहर्यावर आणि सुनिल आउट ऑफ फोकस होत जातो, येतो. तो प्रकार छान वाटतो. या गाण्यात शेवटी लताचे, उच्च्च पट्टीतले आलाप आहेत. खरे तर या दोघांची पट्टी वेगळी, तरी त्या दोघानी एकसूर गायलेय. आणि आत्ता पाऊस पडणार आहे, असा फील कायम येत राहतो या गाण्यात.
असेच झोपाळ्यावरचे गाणे म्हणून मला, सुनो सजना पपीहेने, कहा सबसे पुकारके, संभल जाओ चमनवालो, के आये दिन बहारके असे लताचे बहार रागातले गाणे आहे. पडद्यावर आशा पारेख आणि धर्मेद्र आहेत. तिचा मेकप नेहमीप्रमाणेच बटबटीत आहे. महाबळेश्वरच्या उत्तम निसर्गाला खोट्या फुलांची ठिगळे लावलेली आहेत. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला लावते ते, याचे चित्रीकरण आणि गायन.
या गाण्याच्या चालीत चार पाच अक्षरांचे यति केलेले आहेत, आणि संपुर्ण गाणे एका सुंदर लयीत आहे.
यातल्या एका कडव्यात ती झोपाळ्यावर झोके घेत आहे. मग तो तिच्या शेजारी बसतो आणि एका क्षणी झोपाळा आडवा झुलू लागतो. तो क्षण आणि ती लय. ग्रेट.
नंदा बहुदा रडक्या भुमिकातच असायची, पण तिचे ये समा, समा है ये प्यार का, किसीके इंतजार का, छान चित्रीत झालेय. शिकार्याचा सेटच आहे तो, पण छान आहे. तिचा आडवा बांधा असूनही तिच्या मुव्हमेंट्स सेन्सुअल वाटतात. तिच्यापेक्षा शशि कपूर गोड दिसतो.
या गाण्यात तब्बू सुंदर
या गाण्यात तब्बू सुंदर दिसलीय. तिचा लाल ड्रेसपण छान आहे.>>> सोनेरी ड्रेस आहे ना तिचा???
पिया बावरी हे खुब सूरतमधले माझे सर्वात आवडते गाणे.. चित्रीकरण अर्थात खास आहे. रेखा (कधी नव्हे ती) एकदम गोड दिसते. तिच्यासमोर राकेश रोशन तिचा कारकून वाटतो..
"रुठ के हम से कभी" :- 'जो
"रुठ के हम से कभी" :- 'जो जिता वही सिकंदर.
खुपच हळुवार गाणं आणि चित्रिकरणसुद्धा.
फिर भी दिल है
फिर भी दिल है हिन्दुस्थानी............ ते गाणे... तु यार तुही दिलदार तेरा दिल मे है दरबार... कर दो एक बार बेडा पार, के बेकार फिरु मै बनके तेरा जोगी....... मधमाद सारंग रागात आहे... माझे पण आवडते गाणे आहे.... शेवटचा आलाप छान आहे.... ओ यार तेरा मेरे दिल मे दरबार.....
अस्मानी, ते चुकीचं आहे तेच
अस्मानी, ते चुकीचं आहे तेच माहिती नव्हतं...बाकी मी पण स्वप्नमें च ऐकलं पण खात्री नव्हती. पण एकुण त्या एका शब्दाने हे एवढं सुंदर गाणं डिस्टर्बड झाल्यासारखं वाटलं.
>>तिचा आडवा बांधा असूनही
>>तिचा आडवा बांधा असूनही तिच्या मुव्हमेंट्स सेन्सुअल वाटतात. तिच्यापेक्षा शशि कपूर गोड दिसतो. >> इन फॅक्ट शशी कपूर तिचा लहान भाऊ वाटतो....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आखोंकी गुस्ताखिया आणि निबुडा
आखोंकी गुस्ताखिया आणि निबुडा ऑल टाइम फेवरेट्स. बाकी हा आणि तो चुकीच्या गाण्यांचा बाफ सुरु केल्याबद्दल केपी आणि दिनेशदांना धन्यवाद. जुन्या गाण्यांच्या सीड्या काढुन ऐकते आहे रोज गाडीत. इतकी नितांत सुंदर गाणी एक एक.
रच्याकने, माझ्याकडे एक आर्डीची सीडी आहे ज्यात तब्बसूम आणि कोणीतरी त्याची मुलाखत घेताएत आणि कधी आर्डी स्वत: गाणी गातोय, गाण्यांच्या आठवणी सांगतोय तर कधी त्याच्या बरोबर काम केलेल्या लोकांच्या कमेंट्स आहेत. कुणाला हवे असेल तर सांगा, पाठवते.
राजू बन गया जंटलमनमधलं
राजू बन गया जंटलमनमधलं 'लवेरिया हुआ' गाणं मस्त आहे. पिवळा टॉप आणि ब्राऊन स्कर्टमधली जुही काय छान दिसते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिंडे, मला जाम आवडेल
सिंडे, मला जाम आवडेल ऐकायला.
कयामत से कयामत तक... त्या काळातला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडलेला सिनेमा... सुंदर गाणी, क्युट आमिर आणि जुही.. सगळीच गाणी सुंदर्..गजबका है दिन इतक सुंदर दिसत बघायला.. आहहाहा आमिर खानला त्यात पहात रहाव.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जयाप्रदा पण माझी आवडती नटी.
जयाप्रदा पण माझी आवडती नटी. सरगम हा ऋषी कपूरबरोबरचा पहिला चित्रपट असला तरी
त्यापूर्वीच्या तिच्या तेलगू सिनेमातल्या भुमिका मी बघितल्या होत्या. ती त्यावेळी जरा स्थूल
होती, पण तिचे नृत्यकौशल्य वादातीत होते. सरगम नंतर ती अनेक फ़ूटकळ सिनेमात आली.
तोहफ़ा, मकसद सारख्या सिनेमातले तिचे नाच अजिबात बघणीय नव्हते. तिचा खरा कस
लागला तो, सूरसंगम सिनेमात. गुरु शिष्य़ेच्या नात्याची हि कथा आधी तेलगू मधे, शंकराभरणम
नावाने आली होती. त्यात मंजू भार्गवी हि नटी होती. या सिनेमापूर्वी ती दाक्षिणात्य सिनेमात
बिंदू टाईप भुमिका करत असे. पण या सिनेमाने तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यातली
शंकराभरणमू आणि तानम रागम पल्लवी गाणी फ़ारच सूंदर होती. ( शंकराभरणम गाणे इतके
सुंदर आहे, कि दूरदर्शनवर किर्ती शिलेदारला पण ते गायचा मोह आवरला नाही. तिने दूरदर्शनवरच्या
एका कार्यक्रमात ते इतके उत्तम सादर केले कि, तिला त्या गाण्याची ध्वनिफ़ीत काढावी लागली.)
हा सिनेमा हिंदीत, सूरसंगम नावाने आला. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल होते. पंडीत राजन
साजन मिश्रांनी, यातली गाणी गायली होती. लताचे पण बागेश्री रागातले, मईका पिया बुलावे,
असे छान गाणे होते. पण सिनेमातल्या प्रसंगानुसार, तिला यात एक वर्जित असलेला सूर लावावा
लागलाय.
हिंदी सिनेमात गुरुच्या भूमिकेत गिरिश कर्नाड आणि शिष्य़ेच्या भूमिकेत जयाप्रदा होते. (तबस्सुम,
सचिन, खुषबू, भारती आचरेकर पण यात होते ) यात सूर का है सोपान सुरीला आणि आये सूर
के पंछी आये, हि मिश्रांनी गायलेली गाणी आहेत. या दोन्ही गाण्यांवर जयाप्रदाने, उत्तम नृत्याविष्कार
केला आहे.
यात तिने भरतनाट्यम बरोबरच कथ्थक आणि ओडीसी चे नमूने पेश केलेत. प्राचीन देवळांच्या
पार्श्वभूमीवर हि गाणी चित्रीत झाल्याने, नेत्रसुखद झाली आहेत. ओडीसी हा प्रकार हिंदी सिनेमात
क्वचितच दिसलाय (मराठीत निवडूंग सिनेमात, अर्चनाने तो सादर केला आहे )
पांढर्या वेषातले कथ्थक आणि हिरव्या साडीतले ओडीसी, इतके सुंदर आहेत, कि तिची त्या वेषातली
पोष्टर्स पण त्याकाळी खुप लोकप्रिय झाली होती. याच सिनेमात, आयो प्रभात सब मिल गाओ,
असे एक गाणे आहे, या गाण्यावर तिने पिवळ्या साडीत, समुद्रकाठी नाच केलाय. ज्या रेतीत
आपल्याला चालणे कठीण होते, तिथे तिने तो अवघड नाच लिलया केलाय.
पण पुढे तिने आपले करियर सिरियसली घेतले नाही. ती राजकारणात शिरली, श्रीकांत नहाटा
प्रकरण झाले. ती शेवटची दिसली ती विवेकानंदांच्या चरित्रपटात. (या सिनेमात सर्वमदन बॅनर्जी
मुख्य भूमिकेत होता तर मिथुन चक्रवर्ती, रामकृष्ण परमहंसाच्या भुमिकेत. यात जयाप्रदाबरोबर
हेमामालिनी, राखी, तनुजा, मिनाक्षी शेषाद्री, देबश्री रॉय अशी नट्यांची फ़ौज होती ) जयाप्रदा
नर्तिकेच्या भुमिकेतच होती, पण ती परत स्थूल झाली होती. ती नंतरही काही सिनेमात होती,
पण मी बघितले नाहीत ते. पण सूरसंगम ची मात्र सिडी संग्रही आहे माझ्या.
दिल चाहता है मधले आपल्या
दिल चाहता है मधले आपल्या सोनालीताईंचे गाणे, (वो लडकी है कहा ) आणि त्यात तिने आणलेली सोंगं (गीताबाली, आशा पारेख आणि माधुरी ) मस्तच आहेत. त्यातल्या प्क्ष्यासारखे उडणार्या हालचाली पण युनिक होत्या. त्यातलेच अक्षय खन्नाचे स्वप्नगीत पण छान जमलेय.
माधुरीच्या अनेक गाण्यांबद्द्ल
माधुरीच्या अनेक गाण्यांबद्द्ल लिहिता येईल. पण आता खलनायक मधल्या, चोली के पीछे क्या है, बद्द्ल लिहितो. हे गाणे किंवा त्यातले शब्द पहिल्यांदा बरेच वादग्रस्त ठरले होते. या गाण्यावर बंदी आणायची हवा होती. पण त्याचे प्रोमो यायला लागले, ते पण जरा जास्तच वाईट होते. प्रत्यक्ष सिनेमात मात्र ते गाणे संयमाने चित्रीत झालेय. माधुरीची जादू आहेच पण ते नृत्य तिने बीभत्स होऊ दिलेले नाही.
केशरी घागरा चोळीमधली तिची पाठ उघडी असली तरी त्यावर कॅमेरा फारसा रेंगाळलेला नाहि. तिच्यापेक्षा नीना गुप्ता चे हावभाव, जास्त चावट आहेत. पुढे ते गाणे खुप लोकप्रिय झाले.
या गाण्याच्या दोन भ्रष्ट नकला झाल्या, एक करण अर्जून मधे. ममता कुळकर्णी आणि एक वयस्कर नटी ( या नटीला तिच्या तरुणपणी एका मराठी सिनेमात बघितल्यासारखे वाटते ) गाण्याचे शब्द होते, गुपचुप गुपचुप. पण ते अजिबात जमले नव्हते. दुसरे होते चित्ता नावाच्या सिनेमातले. गाण्याचे शब्द कुकुड कू, का असेच काहितरी होते. त्यावर अश्विनी भावे आणि जयश्री टी (तळपदे) या मराठमोळ्या नट्या नाचल्यात. पण काहि जमलं नाही बाप्पा !!!
रंग दे, वर सोनेरी ड्रेस होता का ? बघायला हवा परत !!!
१९४२ अ लव्ह स्टोरी मधली सगळीच
१९४२ अ लव्ह स्टोरी मधली सगळीच गाणी छान चित्रीत झालीत. गाण्याच्या चाली संथ असूनही, पडद्यावर ती संथ वाटत नाहीत. इक लडकी को देखा मधल्या तर जवळ जवळ प्रत्येक ओळीतल्या कल्पनेला चित्ररुप दिलेय. या गाण्याच्या सुंदर दिसण्यात संकलन कलेचा वाटा मोठा आहे ( बहुतेक राधा सलूजा )
खुप साधेपणाने चित्रीत झालेल
खुप साधेपणाने चित्रीत झालेल पण मनाचे तार छेडणार हे गाण (गजल)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्याशीवाय ऊत्तम रीत्या हे गाण चित्रीत होऊ शकत नाही अस मला तरी वाटत
http://www.youtube.com/watch?v=g03wdoTXxgc
दिनेश, छान माहिती सांगताय. एक
दिनेश,
छान माहिती सांगताय. एक छोटीसी दुरुस्ती:
राधा सलुजा नाही, रेणू सलुजा. विधु विनोद चोप्राची पहिली बायको. हिंदी चित्रपट जगतात संकलनामधे 'last word'.
२००० मधे कॅन्सरने गेल्या.
अरे जो जीता वोही सिकंदर मधलं
अरे जो जीता वोही सिकंदर मधलं " पहला नशा..." का विसरतोय आपण?
हो अंजली , रेणू सलुजा. राधा
हो अंजली , रेणू सलुजा. राधा सलूजा नावाची एक अभिनेत्री होती. !!!
दिन्या दिन्या अरे कुठे ठेउ
दिन्या दिन्या अरे कुठे ठेउ तुला. काय मस्त गाणी आहेत गान्यांच्या चॉइस बद्दल १०१ % अनुमोदन. वेगळे लिहायची गरजच पड्त नाहीये. मी वाचुन नुस्ते हो हो म्हणतेय.
मेहबूबा मधील हेमा मालिनीचा नाच असलेले गोरी तोरी पैजनीया. अप्रतीम.
खुषबू - बेचारा दिल क्या करे.
आनंद - कहिं दूर जब दिन ढ्ल जाये. ( टिशूsssssssss)
हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले. राजेश झीनत
आराधना - कोरा कागज था - राजेश हसतोय. निळे आकाश, पिवळी फुले, वर्ल्डस मोस्ट रोमॅन्टिक फ्रेम.
खामोशी - वोह शाम कुछ अजीब थी. राजेश वहीदा.
जिद्दी - रात का समां झूमे चन्द्रमा आशा पारेख.
लव इन टोकियो - कोइ मतवाला आया मेरे द्वारे.
बावर्ची ; भोर आयी गया अंधियारा. राजेश अगेन.
हे गाणे माझ्या साठी इन्डिया इन अ कॅप्सूल आहे. पहिले राजेश भांडी घासतो आहे. आजचे राज रोहित असा रोल करतील का? मग गाणे सुरु. नंतर असरानी चा पीस छान आहे. मग म्हातार्बुवा येतात.
मग दोन अप्रतीम दोन लायनी आहेत. आइ पनिया भरन की बेला. लागा जमुना के तट पर मेला.
मिलके भर लो जी भरलो सजनी गगरी ................... येह घुन्गरू अकेला. ( निर्मलादेवींच्या आवाजात)
ब्रिटनी स्पीअर्स ला सात जन्मात असे सूर लावता येणार नाहीत.
अनुरोध : आते जाते खूब सूरत आवारा सड्कोंपे.
पुकारता चला हु मै.
खोया खोया चान्द.
हम दोनो - मै जिन्दगी का साथ निभाता चला गया.
कन्या दान - आज उनसे पहली मुलाकात है.
मेरे जीवन साथी: सगळी गाणी. राजेशवाली
प्रेमरोगः भवरे ने खिलाया फूल , येह गलिया ये चौबारा.
ओ मेरे दिल के चैन ( कशातले आहे बरे)
सत्यम शिवम सुन्दरमः भोर भये पनघट पे. यशोमतीमैया पण./ सैया निकस गये पण.
यशोमती मैया च्या शेवटी एक किस आहे त्यावेळी लताचे आलाप टेरीफिक सिम्पली.
पान खाये सैया हमारे, सजन रे झूट मत बोलो. वहिदा अप्रतीम दिसते. ( एक मेकाना मीता म्हण्तात
ओह सो रोमॅन्टिक. )
Pages