आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा Biggrin

पण आता तिच्या त्या एक्स-नवर्‍याचा प्रॉब्लेम काय आहे, त्यानंच सोडलं ना अरुला?

ती धुलिवंदन पार्टी फारच लेम होती.

वरून अजून तिला निर्लज्जपणे म्हणतोय नाही नाही हे संजनाला सांगू नको मी असा घुसल्याचं,,,, अरे काय चाललंय? मी तर लाथ मारुन हाकलले असते मला दिसल्या दिसल्या ‌,, पण अरु मात्र फक्त तोंडाची वाफ दवडते, हात पाय नाही चालत तिचे. हा आता सभ्यपणे दाखवायचं ना तुम्हाला मग निदान पोलिस बोलावलेले तरी दाखवायचं, ते पण नाही.

लास्ट टाईम पण ती म्हातारी आणि अन्या तिला चारित्र्यावरुन हिणवत होते, तेव्हाही पोलिसांच नाव काढलं नाही.

"मुलगा समोर आहे, नाहीतर थोबाडीत दिलं असतं."

मुलालाच सांगायचं त्याला बुकलून काढ.
तो कोणत्या तोंडाने घरी जाऊन सांगणार की मुलाने मला मारलं?

तेच तर, situation चं advantage घेता आलं नाही मूर्ख यश आणि अरुला.

तिच्या त्या एक्स-नवर्‍याचा प्रॉब्लेम काय आहे, त्यानंच सोडलं ना अरुला?>>> त्याला तिला न सोडता संजना हवी होती. संजनाशी लग्न केल्यावरही ती घरात राहून आई-वडिलांची सेवा करत होती तेही त्याला हवे तसेच होते. पण आता अशुतोष आल्यापासून ती बाहेर जायला लागल्यामुळे त्याला ते आवडत नाही आणि तिच्यावर अशुसारखा सिंगल, व्यापारी, पैसेवाला, फॅारीन रिटर्न मित्र फिदा आहे म्हणून संजनाही जळते व अन्यालाही भडकवते.

त्याला तिला न सोडता संजना हवी होती. संजनाशी लग्न केल्यावरही ती घरात राहून आई-वडिलांची सेवा करत होती तेही त्याला हवे तसेच होते. पण आता अशुतोष आल्यापासून ती बाहेर जायला लागल्यामुळे त्याला ते आवडत नाही आणि तिच्यावर अशुसारखा सिंगल, व्यापारी, पैसेवाला, फॅारीन रिटर्न मित्र फिदा आहे म्हणून संजनाही जळते व अन्यालाही भडकवते. >>>>>> अगदी अगदी. आणि वरुन कान्चन आणि अभि आहेच आगीत तेल ओतायला.

ती कोणाला म्हणाली? अप्पान्ना?>>>नाय Lol अन्याला >>>>>> ऑ? खुप लवकर कळल सन्जनाला.

त्यावरून ती त्याला तुला फक्त हिरवाच रंग दिसतो असे म्हणत होती >>>>>>> कोणाचा? अरुच्या साडीचा कि आशुतोषच्या कोटचा?

काल फ्लॅशबॅकमधली अरुंधती बरीच वेगळी वाटत होती. मी गेले एक वर्षं भरच मालिका पाहतोय. ही दबलेली, घाबरलेली वाटत होती.
मधुराणीने बदल चांगले दाखवलेत. >>>>>> सहमत. पण अजूनही ती काही ठिकाणी दबलेली, घाबरलेली असते.

शुभ प्रभातः

अन्या रात्रीतून पळपुट्यासारखा परत येतो व विचार करतो. हे काय चालू आहे काम शोधले पाहिजे. माझे हे अधःपतन घरच्यांना कळले तर मी त्यांच्या नजरेतून उतरेन.

सकाळ होत आहे. अप्पा अनघा योगासने. अनघा पॉजिटिव नॉलेज ट्रानसफर मोड. अन्या बाहेर चहा पीत बसला आहे. यश आल्यावर सांग कोणा ला काय सांगायचे ते मी काही चुकीचे केले नाही यश इग्नोअर मारून निघतो. संजनाला आज खूप खूप काम आहे ती अनघाला ब्रेफा बनवायला सांगते व तयार व्हायला जाते.

अरु उठलेली आहे व काल रात्रीच्या प्रसंगावर विचार मंथन करत आहे. नवरा विकृत व भयानक होत चालला आहे हे त्याचे खरे रूप आहे.
बेल वाजते तर यश असेल् म्हणते. संगीत वाला एक बारका पॉझिटिव्ह पीस फेकतो.

संजना ते कॉलेज सेकंड इअरवाला स्कर्ट बिलोज घालुन अन्याला इवेंटला ये ये म्हणून पिच्छा करत आहे. मी अ‍ॅरेंज केलेला पहिला इवेंट म्हणे.
मी तर लेकीच्या प्रिमीअर्स ना पण जात नाही. काम ते काम. ही परत अन्याला डिवचते व खूप काम खूप काम करून निघते. मला अश्या फटाकड्या नेहमी भेटतात. कामाचे सोंग निव्वळ.

इकडे आई आली आहे व भाउ बरोबर. सर्पराइज व्हिजिट. अरू लगेच उसासाहसु टाकते. आईला घर आवडते मग सु अरू सु मोड मध्ये आई तुझे पाय इकडे लागले म्हणजे घराची खरी पूजा झाली करून नमस्कार करते( शॉट्स प्लीज) आता आईला तिथे डंप करून भाउ उंडारण्याच्या मोड मध्ये आहे. आईचे गूळ पाटणॅ संवाद चालू आहेत शेजारी कोण वगैरे. अरु लगेच चहा करायला धावते. अजून एकटे पणा जाणवत नाही.
भाउ दार झोपताना लावुन घ्यायला सांगतो. आई यशला बोलावोन घे म्हणतो. उकड करते म्हण ते आईला पण आई मी करते म्हणते. आता ही तयार होउन येइस्परेन्त आई पंचपक्वां नाचा डबा तयार करून हातात ठेवि ल. आशूला वड्या बनवून देइल. बहुतेक.

कट टू ऑफिस. आशू काहीतरी कामास दृश्य बोलत आहे. संजना इंग्रजीत काही काही कामा टाइप बोलत आहे. मीटिन्ग आहे. प्रिपरेशन फॉर्
इवें ट. नित्या पण आहे. यश पण आहेच. इवेंट नंतर डिनर आहे. एंकरिन्ग संजना करणार आहे पण आरु अनघाचे नाव सुचवते. अभीची बायको. अनघाचे मराठी छान आहे. हे मराठी गाण्यांचे कार्यक्रम आहे. संजनाचे नाक नीटच कापले कारण आशू नाही म्हणणार नाही.

प्रोमो मध्ये अवी अन्याला काय काल रात्रीचे उपद्व्याप म्हणून धारेवर धरतो आहे. व इकडे आई पाठीला मसाज करताना एकटी कशी राहशील.
आशूचे अजून प्रेम असेल( म्हणजे बॅटरी संपली तरी अजून चार्ज असेल तर बघू म्हणून आपण रिमोट मध्ल्या ब्याटर्‍या चार दिवस पुढे चालवतो तसे) तर लग्नाचा विचार करा असे वळसे देत आहे.

एकटीला राहूच का देत नाहीत?! धिस इज नॉट रिअल लाइफ. मला तर पंधरा वर्शात कोणी कधी च अशा प्रश्न विचारलेला नाही. लेक कधी मधी चिडवते आता डेटिन्ग करायला लाग म्हणून. बघू आय अ‍ॅम लुकिन्ग फॉर अ गोल्डन रिट्रीवर पपी. पन घरातले खाष्ट म्हातारी स्वीटी काही कोणी अ‍ॅडिशन खपवून घेणार नाही. एकटे राहायचे सुख अनुभवल्याशिवाय कळत नाही हेच खरे. व्याख्या विख्ही वुखू.

आशूचे अजून प्रेम असेल( म्हणजे बॅटरी संपली तरी अजून चार्ज असेल तर बघू म्हणून आपण रिमोट मध्ल्या ब्याटर्‍या चार दिवस पुढे चालवतो तसे)
Rofl

Lol
यश आईच्या घरी - लॅच, बायोमेट्रिक लॉक लावायची , लोक तिच्या घरावर नजर ठेवून आहे असे सांगतो, त्यावरून संजनाला अनिरुद्धचा संशय येतो असे कालच्या प्रोमोत दाखवले होते. ते नाही दाखवले का?

कालचा यशने कॉल केल्यावर धावत येऊन दार उघडण्याचा सीन आणि अनिरुद्धने तिथेच कोचामागे लपून बसणे अगदीच पोरकट दिग्दर्शन.

यश काल आउट ऑफ कॅरॅक्टर वागला. नेहमी तो आधी मारतो आणि मग विचारतो. काल असं करायची गरज होती तर उलट केलं.

अन्याचं क्यारेक्टर भरकटायला लागलंय. फक्त त्याला व्हिलन बनवून ठेवायचं म्हणून हे असलं? आणि परत त्याने लावलेले दिवे घरी का सांगायचे नाहीत? म्हातारीला आणि संजनाला कळूदे की हा न्यू बी म्हातारा काय गूण उधळतोय ते. परत कशाला ती लपवालपवी? आशु -इशाचा सीन आवडला पण काही केल्या त्या आशुची छाप पडेनाच. कास्टिंग जामच चुका है इधर.

एकटीला राहूच का देत नाहीत?! धिस इज नॉट रिअल लाइफ.>>> हो. तरुण वयात डिवोर्स/विधवा झालेल्या मुलींना पण कुणी इतक्या लगेच ऊठसुट असं बोलत बसत नाही. ही तर २५वर्ष संसार अनुभवलेली ४५ ची बाई. अशा गोष्टींना काही काळ जाऊ द्यावा लागतो. ईथुन निघाली की पाटी कोरी करुन लगेच दुसर्याचा विचार करता येत नसतो हे लेखकाला कळत नाही का?
आशु अरू स्वतः समजुन उमजुन एकमेकांकडे आकर्षित झाले असं दाखवतील तर ते जास्त बरं.
हे लोक तर, अमा तुम्ही म्हणता तसं, इन लोगा तो गलेईच पडते

अशा गोष्टींना काही काळ जाऊ द्यावा लागतो. ईथुन निघाली की पाटी कोरी करुन लगेच दुसर्याचा विचार करता येत नसतो हे लेखकाला कळत नाही का?>> ती लेखिका जाम डिम बल्ब आहे. आज मला इंडिगोची मेल आलेली आहे फुकेत च्या फ्लाइटि सुरू झालेल्या आहेत. येता का कोणी सिंगल गर्ल्स टूर काढू . एपमध्ये/ मे मध्ये.

इन लोगा तो गलेईच पडते>> नक्को बावा किरकिरी कायकु साथमे.. बीच जाना बोले तो इन्हे साडी पैनके आएंगी, पावांपडेंगी, हूटर्स लेके गै तो चक्कर आके गिरेंगी.

आज अनुपमा पाहिलं
आजी अनुपमा ला निक्षून सांगते एकवेळ आई म्हणून दुसरं लग्न खपवून घेतलं असतं पण आता आजी लग्न करतीये हे शक्य नाही,(तिथली अंघा प्रेग्नंट आहे वाटतं)
अनुज ला नाही म्हणून सांग म्हणे

अजून झालं नाही का तिथे लग्न? दिवाळीच्या भागात तिथल्या कांचनने आशुतोषला अल्टिमेटम आणि कुंकवाची डबी दिली होती. आताच्या आता लग्न कर.‌ एपिसोड त्या शॉटवर संपला

बीच जाना बोले तो इन्हे साडी पैनके आएंगी,>> चांगले आहे कि मग सात्विक नायिकेसारखी इक प्यार का नग्मा है असे काही गाणे म्हणेल ती. : )

एकटीला राहूच का देत नाहीत?! धिस इज नॉट रिअल लाइफ.>>> हो. तरुण वयात डिवोर्स/विधवा झालेल्या मुलींना पण कुणी इतक्या लगेच ऊठसुट असं बोलत बसत नाही. ही तर २५वर्ष संसार अनुभवलेली ४५ ची बाई. अशा गोष्टींना काही काळ जाऊ द्यावा लागतो. ईथुन निघाली की पाटी कोरी करुन लगेच दुसर्याचा विचार करता येत नसतो हे लेखकाला कळत नाही का?
आशु अरू स्वतः समजुन उमजुन एकमेकांकडे आकर्षित झाले असं दाखवतील तर ते जास्त बरं.
हे लोक तर, अमा तुम्ही म्हणता तसं, इन लोगा तो गलेईच पडते >>>>>>>>>>> अगदी अगदी. हे फक्त सिरियल आणि सिनेमामध्येच चालत. तो एक राणी मुर्खजीचा 'बाबुल' , जाम त्रास दिला होता अभिताभने राणीला ' दुसर लग्न कर, दुसर लग्न कर' बोलून. तिची इच्छा नसते दुसर लग्न करण्याची तरीही सासर्याच 'पुनर्विवाह' पुराण चालूच!

शुभ प्रभातः

मीटिन्ग चालू आहे. संजनाला सर्व गप्प बसवत आहेत. संजना च्या आय मेकप साठी नक्की बघा. लैच भारी व केसाची स्टाइल पण केली आहे.
ती मीटिन्ग मध्ये अरू ला गप्प करायचा खाली दाखवायचा प्रयत्न करत असते पण तिला सर्व प्रोफेशनल मध्ये गप्प बसवतात.

इथे आजी आबा भांडण चालू आहे. एकदम शेखर आला आहे व बरोबर यडचाप निखिल लगेच दंगल चालू झाली आहे. हा निखिल ला सोडायला आला आहे. म्हातारीला लगेच डोके गरगरत आहे. निखिल आईला डोके चेपून देइन म्हणतो.

अरु घरी आली आहे आईने घरी कपाटे आवरून ठेवली. आईला क्रोशाचे सामान सापडले. मजा आहे अरूची. आईने स्वयंपाक करून ठेवला आहे.
हे सिरीअल मधले लोक हपिसातून आले की हात पाय धुणे बाथरूमला जाणे केस पुसणे कपडे बदलून गाउन नाहीतर शॉर्ट टीशर्ट घालत नाहीत. तसेच आपले फ्रेश कारण त्यांना हा एक सीनच असतो.

आता आई इथे तिला मान दुखत आहे म्हणून मान मसाज करून देते व आशुतोष मध्ये किती बॅटरी शिल्लक आहे चार्ज ते चाचपून घे. आम्ही काय कधी पण ऑफ होउ तू तुझी पुढची सोय बघ अशी प्रेमळ सुचना देते.

इथे अन्या आईला शोधत येतो व अवि काम करत आहे. अवी अन्याला पर्वर्ट म्हणून फार शिव्या देतो भांडण चालू आहे. ग्रोन मेन फाइट.
अरु आईला आपली बाजू समजावुन देत आहे. आई चिकाटीने जुनीच बँड एड चिकटवत आहे. मैत्री मैत्री खेळत आहे अरू. नाते- = अपेक्षा
ब्ला ब्ला मी नोकरी करते पैसे मिळवते ( वा!!! ) मुलांक डे पण लक्ष देते एकदम सडनली वर्किन्ग वुमन एथिक्स बोलून दाखवते. किती तास झाले हिला नोकरी करून. पटकथा लेख न किती सोपे आहे.

अरु एकदम आशूला फ्रेंड झोन केले आहे. स्वार्थी निव्व्वळ बघू नंतर गरज पडलीतर विचार करू म्हणते. हाउ कनिन्ग. मध्ये फक्त काही दिवस ही एकटी ने जगायचे विथ फॅमिली अस्तर सुख भोगुन घेणार.
अपुर्‍या पगारावर दूर नोकरी कर णार्‍या खरी आर्थिक जबाब्दारी असणार र्‍या. लोकल मध्ये सेकंड क्लासात व्ही टी डोंबिवली नाहीतर चर्चगेट विरार करणा र्‍या बायकांची दु:खे लेखिकेलाच माहीत नसतील तर अरू ला कुठून कळतील. तिला प्लेट मध्ये फ्रुट सालाड सारखे सुखाचे दुसरे चां दणे वाढून दिले गेले आहे.

प्रोमो मध्ये शेखर डायलॉग बाजी, नवे बॅनर आले आहेत. अरु आशूचे फोटो मस्त प्रसिद्धी ते बघून संजना बाईंचे पापड इंगर्जीत मोडले आहेत.

इकडे अवि अन्या मेजर फाइट चालू आहे. अवी परत असे केलेस तर पोलिसा तच देइन अशी धमकी देतो.

अरु क डे इशा यश गौरी( डिझायनर साडी घेउन) अनघा आले आहेत आजी ला भेटायला. गुलाब जाम व आइसक्रीम घेउन आले आहेत.
ही आईला ग्वाही देते की सर्व माझ्या बरोबर कायम आहेत. वा वा घ्या घ्या गुलाबजांबू घ्या.

अविनाश आणि अरुबंधूच्या आधी अनघाचा नंबर लागला केळकरांच्या उद्योगात. नेपोटिझम !
उद्या केळकरांच्या बिझिनेसचं नाव बदलून केळकर- जोगळेकर- देशमुख कन्सर्न असं ठेवावं लागेल.

काल अप्पा कसलंसं आसन करताना मागे पडतील असं वाटत होतं.

अपुर्‍या पगारावर दूर नोकरी कर णार्‍या खरी आर्थिक जबाब्दारी असणार र्‍या. लोकल मध्ये सेकंड क्लासात व्ही टी डोंबिवली नाहीतर चर्चगेट विरार करणा र्‍या बायकांची दु:खे लेखिकेलाच माहीत नसतील तर अरू ला कुठून कळतील. तिला प्लेट मध्ये फ्रुट सालाड सारखे सुखाचे दुसरे चां दणे वाढून दिले गेले आहे. >>>>>>>>>>>>खरे आहे , रिलेट झाले।

अन्याचे पराक्रम अविला कसे कळतात?

नवीन Submitted by प्राजक्ता on 23 March, 2022 - 01:51
>>>>>>>>>>>यांच्या घरात कुठलीही गोष्ट सिक्रेट नसते, पेपर मध्ये पण छापून आली तरी नवल वाटू नये .

यश सांगतो.
स्वार्थी निव्व्वळ बघू नंतर गरज पडलीतर विचार करू म्हणते. हाउ कनिन्ग>>> पण तिने त्याला स्पष्ट सांगितले आहे की मला तुझ्याशी प्रेमात, लग्नात काही रस नाही. ४०+ माणूस आहे तो. त्याच्या लग्न-संसाराची किंवा कोणतीही जवाबदारी तिची नाही. त्यालाच आयुष्यभर तिच्या अवतीभवती नाचन्यात परमानंद मिळत असेल तर तिला का दोष द्यावा.
तसेच उद्या ती (कॅरॅक्टरला सोडून) बोलली कि २५वर्ष मन लाऊन संसार केला तरीही तो तुटला. त्यामुळे लग्न करण्यात मला रस नाही. आपण लग्न न करता एकत्र राहू अन नाही पटले तर वेगळे होऊ. तरीही तीच वाईट ठरेल का?

Pages