गिलमन पॉइंटला ९:३० ला फक्त मीच पुढे उहूरुपर्यंत जाऊया म्हणून उत्साहात होते, बाजूला रिम दिसत होते आणि खुणावत पण होते. निलाद्री आधी उत्साहात दिसला पण नंतर नको म्हणाला. परांजप्यांनी अख्खा ट्रेक गाऊटमधला ग सुद्धा उच्चारला नव्हता, पण तरी ते ही नको म्हणाले. शक्य असते तर मी त्यांना "You too Brutus ?" म्हटले असते. या क्षणीसुद्धा डेविड आणि वॉलेस यांची पुढच्या वेळेबद्दल आणि अंतराबद्दल एकवाक्यता नव्हती. तरी फार तर १ दीड तास अजून . माध्यान्हीच्या आधीच तिथे पोहोचले असते. परत यायला २ तास, किबो हट पर्यंत उतरायला २-३ तास. पुढे होरोम्बोला १२००० फुटांपर्यंत उतरेपर्यंत अजून ३ तास. रात्री ८:३० पर्यंत का होईना मुक्कामी पोहोचलो असतो. एका क्षणात मनात हिशोब झाला पण सगळेच स्थिरावले होते. डोंगरमाथ्याला पोहोचलो आहोत तर कुणाचाच पाय अजून पुढे उहूरुपर्यंत रेटेना. अदिती आणि मिहीर सोडले तर उरलेले ४ जण माझ्यापेक्षा बरेच मोठे. Age does take toll on you. आता call माझा होता, मी एकटीच guide बरोबर जाते म्हटले तर शक्य होते पण कच खाल्ली, group बरोबर रहायचे ठरवले. गाईडसुद्धा अजिबात प्रोत्साहन देत नव्हते. ७:३० - ८ लाच गिलमन पॉइंटला पोहोचलो असतो तर निश्चित पुढे गेले असते. इतके हळूच जायचे होते तर रात्री १२:३० च्या ऐवजी १० लासुद्धा चढायला सुरु करण्याची माझी तयारी होती. guides च्या अतीव ढिसाळपणाने आणि माझ्या वेळेच्या बाबतीतल्या ignorance ने ही वेळ आणली. त्यांनी सर्वांना एकाच अतिसंथ वेगाने चालवले. ज्यांना शक्य होते किमान त्यांना तरी पुढे जाऊ द्यायला हवे होते. आमच्या group मधल्या सगळ्या analysts नी ही time management इतक्या lightly कशी घेतली याचे वैषम्य वाटले. guides च्या मूर्खपणाचा, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकल्याने स्वतःचाच चिक्कार राग आला. पाय -फुफ्फुस आणि instinct सगळे तयार असताना शेवटच्या २ तासांसाठी - २०० मीटरसाठी हा जिंकत आणलेला डाव थोडक्यासाठी हरले अशी भावना झाली.
१९००० cross केले नाही तरी १८६५२ फूटही वाईट नाही. आई -बाबा, आनंद - मिहीर आता आपलाच विचार करत असतील या कल्पनेने छान वाटले. या सगळ्यात काही ना काही प्रकारे सामील असणारे Orlando चे सगळे मित्रमंडळ एकदमच आठवले. मावेन्झी हट ला केलेले Parody song म्हटले - mood जरा light झाला. सभोवार बर्फच बर्फ होते आणि भीषण शांतता. गिलमन पॉइंटचे ते काही क्षण जरा जड अंत:करणाने का होईना पण साजरे केले.
उपाध्ये मंडळींकडे १२ वर्ष सोबत असणारी त्यांची कुत्री त्यांचा प्रवास सुरु व्हायच्या अगदी आदल्या दिवशीच वारली होती. त्यांनी तिच्या फोटोसह तिथे फोटो काढले. म्हणजे - हे सगळे दु:ख मनात ठेऊन गेले ७-८ दिवस ही मंडळी प्रवास करत होती या कल्पनेने काटा आला. DS , निलाद्रीपण शांत होते. परांजपे तर दिसलेच नाहीत, बहुदा खाली उतरायला लागले होते. प्रत्येकालाच तिथे काहीतरी वेगळी अनुभूती मिळत असणार.
परतीचा प्रवास चालू केला. आता ridge वरून स्कीईंगसारखे घसरत खाली यायचे होते. थोडे समाधान, थोडा राग, थोडी शांती अशा संमिश्र भावनेत ते ridge उतरायला सुरुवात केली. भुसभुशीत मातीवर sticks रुतवत भसाभस ridge उतरू लागले. १९००० फूट क्रॉस न केल्याने मनात साचलेल्या रागाला उतरताना मुक्तद्वार मिळाले. रडू येईल असे वाटले पण आले नाही. गेल्या काही वर्षांत पूर्ण समर्पित होऊन, तन मन अर्पण करून इतक्या इर्षेने काही केले नव्हते, पण आता तसे काहीसे घडून गेले असे क्षणभर वाटले. ७-८ महिने वाट बघून, एक रात्र प्रसववेदनेत काढून एक जन्म घ्यायचा - द्यायचा आणि जन्मलेले क्षणातच विरून गेल्यावर लगेच निर्लेप, सगळ्यापासून अलिप्तसुद्धा व्हायचे असा काहीसा मनाचा प्रवास झाला. असेच अलिप्त होत होत आधी किबो हट , तिथून होरोम्बो हट आणि मग उरलेला सगळा परतीचा प्रवास झाला.
असो, या ब्लॉगच्या निमित्ताने हा प्रवास मनातल्या मनात पुन्हा एकदा करून झाला. हळूहळू या स्मृती विरळ होतील तत्पूर्वी पंचेंद्रियांनी आणि त्याच्या पल्याड जे जे काही अनुभवास आले ते जमेल त्या शब्दांत पकडायचा यत्न केला, ते बरेच झाले असे वाटते. दुर्गाबाई भागवत लेखन संपले की जो अनुभव येतो त्याबद्दल लिहिताना म्हणतात तसे सर्व काही आवरून तृप्त मनाने सुपारी चघळत भिंतीला टेकून बसले आहे - यानंतर पुढे कोणत्या अनुभवांचे ताट येणार आहे याची स्वप्ने पहात. इति किलीमांजारो अध्याय सुफळ संपूर्ण ।
८ इति किलीमांजारो अध्याय सुफळ संपूर्ण
Submitted by वाट्टेल ते on 3 February, 2022 - 09:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मजा आली वाचताना. इथे शेअर
मजा आली वाचताना. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
तुमचे भाग एकदम परफेक्ट साईझचे होते. प्रसन्न शैलीत, भवतालाचं वर्णन आणि मनातील आंदोलने असं एकामागोमागएक येत गेल्याने आणखी आवडलं. शेवटी गोडी अपूर्णतेची!
सगळे भाग एकदमच वाचून काढले.
सगळे भाग एकदमच वाचून काढले. मस्त वाटलं. शैली छान आहे. मध्ये मध्ये गाण्याचे references पण छान वाटले.
शेवट सुद्धा मस्त एकदम!
शेवट सुद्धा मस्त एकदम!
>>>>>>>>. प्रत्येकालाच तिथे
>>>>>>>>. प्रत्येकालाच तिथे काहीतरी वेगळी अनुभूती मिळत असणार.
आहाहा!!
फार फार सुरेख!! तुम्हाला शाबासकी, कौतुक सर्व काही.
वा. वाचकाला खिळवून ठेवणारं
वा. वाचकाला खिळवून ठेवणारं लिखाण. सगळे भाग एका दमात वाचले.
पूर्ण झाली पण? तुमचा
पूर्ण झाली पण? तुमचा लिहिण्याचा वेग अफाट आहे, अजून मी पहिला भाग वाचून सवडीने एकेक भाग घ्यावा म्हणत होतो तोवर लेखमाला पूर्ण ही
लैच सुसाट ग्रुप मधल्या आहात तुम्ही
अरे संपली पण !!
अरे संपली पण !!
मस्त लिहिलय. अजून डिटेल चाललं असतं आणि मुख्य म्हणजे अजून फोटो हवे होते.
आता इंका ट्रेलबद्दल पण लिहा.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
आशुचॅम्प - हे सगळं ट्रेकनंतर लगेच काही दिवसांत लिहिलं होतं , आता नुसतं कॉपी पेस्ट केलं इतकंच. तुमचं गोएचलाबद्दल वाचून अचानक आठवलं आणि शेअर करावंसं वाटलं म्हणून तुम्हाला खास धन्यवाद.
इंका ट्रेल - बघू ! पण यंदा mont blanc करण्याचा मानस आहे, झालं तर लिहीन.
सुंदर लेखमाला. आवडली. तुमच्या
सुंदर लेखमाला. आवडली. तुमच्या इतर ट्रेक्स विषयी पण वाचायला आवडेल.
छान लेखमाला.
छान लेखमाला.
इंका ट्रेल जास्त चांगला वाटला की हा ट्रेल?
अमितव +१
अमितव +१
आधी केलेल्या ट्रेक्स बद्दल लिहिलेले अजून काही असेल तरी वाचायला आवडेल
पुढच्या ट्रेक्स करता शुभेच्छा !
खूपच छान झाली ही लेखमाला! मजा
खूपच छान झाली ही लेखमाला! मजा आली वाचायला. अमितवने म्हटलंय तसं, भवतालाचं वर्णन आणि मनातली आंदोलनं दोन्ही वाचायला आवडलं.
आवडली कथामाला भटकंतीमाला.
आवडली कथामाला भटकंतीमाला.
एक भाग आणखी गाईड लोकांचा टाका. ते काय करतात, त्यांची आवड काय,एकदोन फोटो इत्यादी. थंडी किती म्हणजे तापमान निरनिराळ्या लेवलला 1,2,3,..5 हजार मिटर्सला काय असते. पक्षी,प्राणी असले तर किती उंचीपर्यंत दिसतात?
जबरदस्त आणि मस्तच! अनुभव
जबरदस्त आणि मस्तच! अनुभव लिहून शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
काल दिवसभरात वेळ मिळेल तसे
काल दिवसभरात वेळ मिळेल तसे सर्व भाग एका पाठोपाठ वाचून काढले. हा भाग संपल्यावर उगाच रिकामं रिकामं वाटू लागलं.
वर इतरांनी म्हटल्याप्रमाणे आणखी जास्त माहिती वाचायला आणि फोटो पहायला आवडतील. हे सर्व लिखाण इथे टाकताना तुम्हाला बरेच काही आठवले असेल ते लिहून काढा आणि इथे प्रसिद्ध करा.
माचूपिच्चूच्या ट्रेकबद्दल देखील सविस्तर ( आणि लवकर ) लिहा
सगळे भाग वाचून काढले पण खूप
सगळे भाग वाचून काढले पण खूप काहीतरी राहिलं असं वाटत राहील
कदाचित मला पसरट लिहायची सवय असल्याने कदाचित पण अजून सविस्तर वृत्तांत वाचायला आवडला असता
ट्रेक साठी काय काय तयारी केली, खर्च, बाकी गियर्स याबद्दल पण लिहा ना
लिहिताना स्वतःपुरतेच असे
लिहिताना स्वतःपुरतेच असे लिहिल्याने अनेक गोष्टी सुटून गेलया खरे, पण अजून काही :
खर्च - फक्त ट्रेकचा खर्च - all inclusive साधारण $१९०० च्या आसपास. शिवाय विमान, इतर २-३ दिवस राहणे, खाणे, टीप, सफारी वगैरे
गिअर्स - हायकिंग shoes, बॅगपॅक , walking sticks, thermal होते. crampon REI मधून घेतले, चांगले रेन जॅकेट नव्हते माझे नाहीतर पॉन्चोपासून सुटका झाली असती . गेटर्स आणि समिटसाठी खास जॅकेट भाड्याने घेतले जे अत्यंत आवश्यक होते. sleeping बॅग नेहमीच्या चालत नाहीत, आम्ही इथेच -३० C तापमानाला चालतील अशा विकत घेतल्या ~$३०० आणि घेऊन गेलो. आमच्या टूर operators नी त्या आमच्याकडून विकत घेतल्या - तसेच ठरवले होते. त्यामुळे आम्हाला कोऱ्या मिळाल्या. नाहीतर त्या भाड्याने मिळतात. बहुतेक मोठ्या ट्रेकसाठी या सर्व गोष्टी त्या त्या ठिकाणी भाड्याने मिळतात, अर्थात नेहमी वापरणार असाल तर विकत घ्यायच्या किंवा borrow. Balaclavas ( टोपी ) was a good buy for summit - स्वस्त होती. कानात कायम कापसाचे बोळे पण उपयोगी पडले.
ibuprofen - डोकं जड झालेलं आणि त्याहीपेक्षा inflammation साठी घेतलं, उंचीसाठी नाही. याबद्दल एक सांगायचं राहीलं - उंचीचा त्रास होऊ नये म्हणून हिमालयात वगैरे कापूर हुंगतात. मी कापूर घेऊन गेलेले - १७००० नंतर काही वेळा वापरले आणि छान वाटले. निश्चित कारण माहीत नाही पण फायदा झाला. गाईडना विचारलं की त्यांचं काही लोकल औषध आहे का पण तसे काही नव्हते. माचूपिचूचे गाईड बकरीने पाला खावा तशी Coca leaves खायचे, तिथे ते खूप खाल्लेलं altitude sickness साठी. मी कोका चहा घेऊन गेले होते पण इथे त्यांना त्याची माहिती नव्हती, मग उगीच वेगळा प्रयोग नको म्हणून नाही वापरला. अजून तयारी म्हणजे नेहमीच्या ट्रेकसारखीच
गाईड - माझा इन्काचा गाईड जास्त चांगला होता, त्याला वेग \ वेळ\ अंतराचा perfect अंदाज असायचा. शिवाय तो इंकासाम्राज्य इतिहास वगैरे सांगताना इतका गढलेला असायचा की आम्ही त्याला पेरुव्हिअन हरितात्या म्हणायचो. किलीचे गाईड त्यामानाने जरा ठीक ठाक. पण एकूण सर्वच गाईड अत्यंत गप्पिष्ट, फ्रेंडली आणि त्यात नवल नाही. बहुतेकांचे जोडधंदे होते - शेती, मॅकेनिक किंवा अजून tourism शी related. पोर्टरचे तसेच. पण पोर्टरशी गप्पा मारणे अवघड होते कारण त्यांना इतर भाषा बहुदा येत नसते आणि ते जरा लाजतात - विशेषतः बायकांना. परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते या विचाराने trail वर पोर्टरच्या बाजूने चालताना अवघडल्यासारखे होते. इंकावर एक पोर्टर ६५ -७० चा होता हे म्हणजे विक्रमच झाला पण एरवी तरुण असतात, थोडे पैसे मिळवून अन्य काही करायचे असेच असते. भलतेच तयारीचे असतात. इंकावर एक तरुण पोर्टर आम्ही हाफहूफ करत चढत असताना १३००० फुटाला मजेत बासरी वाजवत होता !
तापमान - मोशीमध्ये गावात डिसेंबरमधल्या मुंबईसारखंच होतं पण डोंगरात गेल्यावर ८-१० पासून कमी होत होत summit ला जाईपर्यंत -२०C वगैरे होतं आता नीट लक्षात नाही https://www.mountain-forecast.com/peaks/Mount-Kilimanjaro/forecasts/5963 वरच बघत होतो.
प्राणी पक्षी - अगदी कमी , १४००० ला वगैरे तरी तो उंदीर कसा आला हे आश्चर्यच होतं. पण इंका trail वर उंचीवर पण लामा पुष्कळ दिसले. आणि तिथे summit असे नाही पण तशा स्पॉटला ~ १३८०० फूट एक लामा जमिनीवर उलटा पडून चारी पाय, लाथा हवेत झाडत होता ( तापमानात बदल झाले की म्हणे असे करतात ) हे याची डोळा बघायला मिळाले.
इंका आणि mount Whitney बद्दल सांगण्यासारखे आहे, लिहिण्याचा प्रयत्न करेन. श्वासाचे गणित जमले तर किलीमांजारो अजिबात अवघड नाही असे आता वाटते. EBC जास्त कठीण आहे. it is more of a game of patience like marathon running. मला स्वतःला इंका जास्त challenging वाटला व आवडला.
ही लेखमालिका फार म्हणजे फारच
ही लेखमालिका फार म्हणजे फारच सुरेख उतरलीये. शेवटचे ते थोडेसेच उरलेले अंतरही गाठीशी बांधले गेले असते तर .... असं वाटून गेलं. पण असो. अपूर्णतेतही माधुरी असते.
प्रत्येकवेळच्या तुमच्या मनातील भावनांचं चित्रणही फार सच्चं लिहिलं गेलंय. ते भावलंच.
इंका ट्रेकच्या लेखमालिकेची वाट बघते. अजूनही असे अनेक ट्रेक्स घडोत अश्या शुभेच्छा.
मला हवी ती माहिती दिल्याबद्दल
मला हवी ती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
एकट्याने जाता येईल का हा विचार असतो.
जबरदस्त लेखमालिका!
जबरदस्त लेखमालिका!
सुरेख झाली आहे लेख मालिका!
सुरेख झाली आहे लेख मालिका! सलग वाचल्यामुळे छान वाटलं. तुम्ही पेरलेले साहित्यवेचे फार आवडले. अत्यंत प्रसन्न शैली आहे तुमची. अजून भरपूर वाचायला आवडेल. इंका/माचुपिचु बद्दल आणि इतरही आधीच्या ट्रेकच्या आठवणी जरुर स्वतंत्र लेखमालेत लिहा!
पुढील लेखमालिकेच्या प्रतिक्षेत!
मस्त झाली आहे मालिका. तुमच्या
मस्त झाली आहे मालिका. तुमच्या लिहिण्याच्या स्टाईलमुळे ट्रेक कठीण असावा असं वाटलं नाही.
ट्रेक कठीण असावा असं वाटलं
ट्रेक कठीण असावा असं वाटलं नाही>>> असणारे तो कठीण नक्कीच
19हजार फूट म्हणजे दमछाक करणारे असणार नक्कीच
त्यामुळेच सॉलिड आदर निर्माण झालाय त्यांच्याबद्दल