गेले दोनेक दिवस आमच्या मुंबईत अगदी गबरू थंडी पडली आहे. म्हणजे दुपारच्या भरगच्च उन्हातही बोचरे गारे वारे अंगापिंडाला टोचत आहेत.
या रविवारी सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे ऊठून सहपरीवार सहकुटुंब मॉर्निंग वॉकला गेलो. कपडे तेच आपले हलकेफुलके आणि स्टायलिश. कारण स्वेटर वा तत्सम जाडजूड कपडे मुंबईत कसली डोंबलाची थंडी म्हणत केव्हाच लाईफस्टाईलमधून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यावर जेव्हा गारठलो तेव्हा मॉर्निंग वॉक एका जागीच दाटीवाटीने बसून साजरा होऊ लागला. बागेत गेल्यावर मास्क काढावा हा शिरस्ता पाळत सर्वांनी तो काढला, पण खिश्यात न टाकता कानावर चढवला. आणि त्या जागी हात खिश्यात टाकले. पण तरीही नारियलपाणीवाला दिसताच सवयीने ते प्राशन करायला खिश्यातले हात बाहेर आले. पोरं सोबत असल्याने घरी परतताना आईसक्रीमचाही एक राऊंड झाला. त्यानंतर मग व्हायचे तेच झाले...
सकाळी कानातून चोरमार्गाने शिरलेली थंडी रात्र होता होता नाकातून बाहेर पडू लागली. म्हणून सोमवारी कसलाही आगाऊपणा न करता खास थंडीचा लुत्फ उचलायला म्हणून सुट्टी टाकली. पण सकाळचा गरमागरम पोहे मिसळीचा नाश्ता झाल्यावर पुढे काय करायचा हा प्रश्न पडला. पावसाळ्यात चहा - कांदाभजी - चहा - समोसे - चहा - बटाटाभजी - चहा थालीपीठ - चहा यांव आणि त्यांव असे राऊंड घेता येतात. पण थंडीचे सुट्टी टाकून करतात काय हा प्रश्नच पडला. मग दुपारी मस्तपैकी दारे खिडक्या पडदे फॅन लाईट वगैरे सारे काही बंद करून मस्त चादर ओढून ताणून दिली.
थोडावेळ छान झोप लागली. पण त्यानंतर चादरीतही थंडी शिरू लागली. मग पाय जवळ ओढून घेतले. चादर गच्च लपेटून घेतली. पण तरीही जेव्हा असह्य झाले तेव्हा ताडकन ऊठलो आणि पाहतो तर काय... पोराने सवयीने एसी चालू करून ठेवलेला. आता त्याला बिचार्यालाही थंडी हा सीजन नवीनच. त्याचा तरी काय दोष. तरीही आलेला राग शांत करायला चार वर्षाच्या पोराला जितके बदडणे अलाऊड असते तितके त्याला बुकलून काढले. त्याने तो गरम झाला. पण माझी थंडी मात्र रात्र होत आली तरी जायचे नाव घेत नव्हती. उलट रात्री पुन्हा गारठू लागलो तसे मग वेळ घालवायला भूतकाळातल्या थंडीच्याच आठवणी काढून गरम होऊया म्हटले. यही मौका है, यही दस्तूर है, और बंबई की थंडी है भाई.. क्या पता, कल हो ना हो
तर थंडी म्हटले की मला सर्वात पहिले माझगावच्या आमच्या चाळीतील दादरावर पेटवली जाणारी शेकोटी आठवते. आहाहा, छोटीशी होळीच म्हणा ना.. ते कॅम्पफायर वगैरे ईंग्लिश शब्द मला फार उशीरा कळले. जेव्हा कळले तेव्हाही डोक्यात हेच पहिला आले, अरे ही तर आमची शेकोटी
म्हणजे नारळाच्या सुक्या करवंट्या, ज्या तेव्हा चाळीतील दर दुसर्या घरात सापडायच्या. अगदी आमच्या दारातही एक ड्रम भरून असायच्या. सोबत जमेल तसा लाकूडफाटा, जसे की आब्याच्या पेट्यांची फळकुटे वगैरे,. एक मोठठाला परातीईतका तवा, त्यात हा सारा लाकडी ऐवज जमा करायचा. आणि रॉकेल टाकून पेटवून द्यायचा. तेव्हा स्टोव्हच्या जमान्यात रॉकेलही प्रत्येक घरात सापडायचे. फार नाही, कपभर पुरायचे. दररोज हा कप आळीपाळीने एकेका घरातून यायचा. जेवणखान झाले की साधारण दहा-साडेदहाला शेकोटी पेटायची ते रात्री एकदिडलाच विझायची. तोपर्यंत आमच्यासारखे रातकिडे अखेरपर्यंत तिला सोबत द्यायचे. कधी मूड आला तर गाणीही व्हायची. पण खरी धम्माल शेकोटीवरील गप्पांची. आणि चाळीसारख्या जागी गप्पांच्या विषयाला कमी कधीच नसायची.
याच थंडीच्या सीजनमध्ये मग नाताळही यायचा. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत सांताक्लोजला जाळून करायची पद्धत होती आमच्यात. पाशवी प्रथाच म्हणा ना. अगदी साग्रसंगीत फटाक्यांसह हा जाळण्याचा कार्यक्रम पार पडायचा. ती सुद्धा एक शेकोटीच म्हणू शकतो. पण जाळण्याआधी ती बुजगावणी ख्रिसमसपासून बिल्डींगच्या कॉमन गॅलर्यांना लटकावलेली असायची. थोडीथोडकी नाही तर तब्बल दहाबारा बुजगावणी बनायची. ते बनवायला लागणारे सुके गवत तेव्हा भायखळा भाजीमार्केटमध्ये मुबलक आणि फुकटात मिळायचे. रस्त्यात पडलेले असायचे. गोणी गोणी भरून आणायचो. बरेचदा शेकोटीत त्यातलेच गवत जाळले जायचे. असा हा शेकोटी, नाताळ, थंडीचा सण जवळपास किमान महिनाभर तरी साजरा व्हायचा. आजच्या मुंबईत राहणार्या पिढीचा यावर विश्वास बसणे अवघडच.
मग मोठे होता होता ती थंडी हरवलीच. नाही म्हणायला कधीतरी जगाच्या पाठीवर बर्फ पडला तर वाहत्या वार्यांसोबत एखादी थंडीची लाट मुंबईत अवतरते. तेवढ्या काळात आम्ही मुंबईकर रजनीकांतचा फ्रिज उघडा राहिलाय वगैरे पांचट जोक मारून घेतो. झाल्यास पुण्याच्या गुलाबी थंडीचीही खिल्ली उडवायचा प्रोग्राम पार पडतो. पण बालपणीच्या थंडीच्या आता आठवणीच उरल्या आहेत. तुमच्याही असतील तर उगाळा याच धाग्यावर. तेवढेच त्या आठवणींच्या शेकोटीची ऊब..
- ऋन्मेष
सामो, तुम्ही भारतात आलात आणि
सामो, तुम्ही भारतात आलात आणि शालींची आवड असेल तर मी तुम्हाला शिमल्यातल्या एका दुकानाचा पत्ता देईन. तिथे जरूर भेट द्या. नेपाळी शाली मिळतीलच, तिबेटी शाली पण मिळतात तिथे. लेह लडाखला गेला असाल / जाणार असाल तर प्रश्नच नाही.
( मला डिस्कीट मधल्या स्थानिकांकडून चार शाली सत्कार म्हणून मिळाल्या होत्या. . बाकीच्या अगदी थ्रो अवे प्राईस मधे मिळाळ्या होत्या. त्यामुले मार्केट प्राईस मला सांगता येत नाही. )
नक्की शामा. लक्षात ठेवन.
नक्की शामा. लक्षात ठेवन. धन्यवाद.
वॅाव सामो, शालीचा रंग मस्तच
वॅाव सामो, शालीचा रंग मस्तच आहे
अरे वाह सामो सुंदर शाल. मलाही
अरे वाह सामो सुंदर शाल. मलाही लहानपणी शालीची प्रचंड आवड होती. मी नक्षत्रांची शांती लेखमालेतील पहिल्या भागात उल्लेख केलेल्या त्रंबेकेश्वर किस्स्यात मी तिथे शाल लपेटूनच फिरायचो. शाल भारी आणि स्वेटर वगैरे बचकांडे असे तेव्हा मला वाटायचे
ऋन्मेष खरं मजेशीर आहे हे.
ऋन्मेष खरं? मजेशीर आहे हे.
म्हाळसा धन्यवाद. केशरी रंग जीव की प्राण आहे माझा.
काय जॉयस, जॉयफुल, आनंदी आणि अशादायक रंग आहे. उगवत्या सूर्यनारायणाचा.
ऋन्मेष खरं? Happy मजेशीर आहे
ऋन्मेष खरं? Happy मजेशीर आहे हे.
>>>>
हो, तिथलाच प्यारा कॉपीपेस्ट करतो ईथे
........नाही म्हणायला मी तिथे थंडीपासून बचाव करायला वापरायचो ती भगवी शाल आठवतेय. जी अंगावर लपेटली की भावंडे मला कौतुकाने स्वामी विवेकानंद म्हणायचे. कदाचित तितका रुबाबदार मी आयुष्यात पुन्हा दिसलो नसेन. कारण दिसण्यावरून मला मिळालेली यापेक्षा बेस्ट कॉम्प्लीमेंट दुसरी आठवत नाही........
आणखी एक म्हणजे आमच्या चाळीतील सण समारंभांना स्थानिक राजकीय नेत्यांना बोलावून त्यांचा शाल देऊन सत्कार केला जायचा. त्यामुळेही शाल म्हणजे भारी पेहराव असा समज होता.
आई ग्ग!! तुम्हीही भगवीच शाल
आई ग्ग!! तुम्हीही भगवीच शाल हाहाहा!!
सेम हियर.
स्वेटर आवडू लागले ते
स्वेटर आवडू लागले ते शाहरूखच्या मै हू ना आणि मोहोब्बतेपासून ... त्या माणसाच्या ड्रेसिंग सेन्सच्या पहिल्यापासूनच प्रेमात होतो.
मुंबईत फक्त तीनच घरे असल्याने
मुंबईत फक्त तीनच घरे असल्याने नेत्यांचा सत्कार करायची वेळ तुमच्या सारख्या मध्यमवर्गीयावर आली असेल. अन्यथा त्यांनीच तुमचा सत्कार केला असता सर.
स्वेटर आवडू लागले ते
स्वेटर आवडू लागले ते शाहरूखच्या मै हू ना आणि मोहोब्बतेपासून ... त्या माणसाच्या ड्रेसिंग सेन्सच्या पहिल्यापासूनच प्रेमात होतो.+++1
याला म्हणतात खरा फॅन
तुम्ही भारतात आलात आणि
तुम्ही भारतात आलात आणि शालींची आवड असेल तर मी तुम्हाला शिमल्यातल्या एका दुकानाचा पत्ता देईन. >> शामा , द्या पत्ता. मी जाणार आहे पुढच्या महिन्यात.
शिमला शाल एम्पोरियमच्या
शिमला शाल एम्पोरियमच्या बाजूला अनिल सूद यांचे ट्रॅव्हल्सचे दुकान आहे. त्यांचा रीजवरच्या काचेच्या प्रदर्शन केंद्रात स्टॉल असतो तेव्हां स्वस्तात दर्जेदार उत्पादने मिळतात. तिथे अनिल सूद असे विचारले तर सांगतात. माझ्याकडचे त्यांचे व्हिजिटिंग कार्ड हरवले आहे. ते शिमला मनाली कार पुरवतात आणि मनालीत स्वस्तात चांगली हॉटेल्स बुक करून देतात.
यानंतर लक्क्ड बाजार मधे एक फक्त शालींचे दुकान आहे. इथेही शाली चांगल्या आणि स्वस्तात मिळतात.
शिमला शाल एम्पिरोयममधे सुद्धा उत्तम शाली आहेत. पण किंमत महाग आहे. त्यापेक्षा कुलूला थोडा वेळ थांबून शाली घेतल्या तर स्वस्तात पडतील.
माझ्या लहानपणीच्या थंडीच्या
माझ्या लहानपणीच्या थंडीच्या आठवणी आई बाबा आणि आजोबांचे एकत्र मद्यपान आणि गप्पा अशा आहेत. लहानपण ची आठवण म्हणजे पुण्यातली जोरदार पुर्वीची नोव्हेंबर डिसेंबर ची थंडी आहे. संध्याकाळची वेळ आहे. बाबांनी कुठलीतरी भारतीय व्हिस्की आणि सोडा मिसळला आहे. आजोबा दररोजच्या शिरस्त्या प्रमाणे फिरुन आले आहेत. बाबांनी त्यांचे आणि आईचे ग्लासेस तयार केले आहेत. मग ते घेत घेत गप्पा. कधी माणूस मधे आलेल्या लेखावर गप्पा, कधी पेपर मधे आलेली बातमी, राजकारण, साहित्य, समाजकारण, कधी काही family issues वर dicusssion तर कधी काहीही. त्या गप्पा फार बोरिंग वाटायच्या (कळायच्या च नाहीत तर काय!) पण माझ्यासाठी प्लस पॉइंट म्हणजे बुधानीचे वेफर्स!! व्हिस्की आणि गप्पांचा बेत असला की बुधानी पाहिजेच. ते कधीतरीच आणले जायचे त्यामुळे मोठ्यांचा plan असला की आपण लई खुश!! सिनियर कॉलेजला गेल्यावर मलाही एका नोव्हेंबर मधे त्यांना join honyachi offer झाली. मग घरातील वडीलधाऱ्या लोकांच्या साक्षीने पहिले तीर्थपान झाले तेव्हा वय पण असे होते की त्यांच्या गप्पा समजू लागल्या होत्या. मग आपल्या पांचट पिंका टाकायला सुरवात झाली. पण मोठ्यांनी कधी अक्कल काढली नाही (जरी मी तसा स्कोप य वेळा दिला) दुसरे म्हणजे दारु कडे बघण्याचा एक perspective set झाला. एक तर दारु चे नाविन्य राहिले नाही. "हे नको करुस, हे खाऊ नकोस, हे पिवू नकोस" अस ऐकाव लागलं तर तेच खावस प्यावस वाटतं. तसे झाले नाही. दारु पिणे end goal नसतो दारु एक catalyst आहे हे नक्की कळलं. लई भारी गोष्ट म्हणजे चर्चा ऐकून भाग घेऊन थोडे तरी समाजवादी संस्कार झाले. त्यांच्या "सर्कल" मधे माझे initiation थंडीच्या साक्षीने घडले म्हणून थंडी प्रेमाची. आता मागे पाहताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात. व्हिस्की आणि गप्पांचा बेत असेल तर cooking quick असायचं. म्हणजे रॉयल काहीतरी चिकन मटण ई नाही. Something that could be cooked with minimal supervision. उदा मुगाची खिचडी आणि पापड. म्हणजे सगळ्यांना एकत्र गप्पा मारायला बसता येईल असे. ते पण आई च करेल असे नाही in fact बाबांनी खिचडी कणभर जास्त पॉप्युलर होती डिस्कशन नेहमी गोड गुलाबी असायचे असे नाही. काही वादळी डिस्कशन आठवतात. नंतर कधीतरी आई बाबांकडून समजले की तेव्हा खूप तावातावाने बोललो तरी the bottomline was - put everything on the table, nothing is beyond discussion. (माझा गेस आहे थोडे inhibitions कमी करायला अल्कोहोल ची मदत होत असणार.) या बाळकडूचा आता खूप फायदा होतो. सर्कल मधले initiation अजूनही कामी येते. मोठे झाल्यावर "गुलाबी गुलाबी" थंड्या तर बऱ्याच आल्या पण मोठे करणारी थंडी मात्र एकच.
आवड तर एक नंबर आहे.
आवड तर एक नंबर आहे.
उत्तम संस्कार आहेत. डूख धरणे आणि फेक प्रोफाईल बनवून स्कोअर सेटल करायचै संस्कार पण थंडीतच झाले का?
आता रात्रीचे पावणेचार वाजता
आता रात्रीचे पावणेचार वाजता एका पुण्याच्या मैत्रिणींशी गप्पा मारत असताना थंडीचा विषय निघाला.. तिथे इतकी आहे की थंड पाण्याने तोंड धुता सर्दी असे ती म्हणत आहे.. आणि इथे आम्ही मुंबईकर एसी पंखा दोन्ही लाऊन चादर न घेता झोपलो आहोत.. त्यात मध्येच तो मुलगा उठून एसी पोवर्फुल मोड वर करत आहे.. डोक्याला त्रास नुसता.. पण मुंबईत पहिल्याची थंडी राहिली नाही खरे हे तिला सांगताना शेकोटीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि हा धागा आठवला
पुण्यातही पहिल्याची थंडी
पुण्यातही पहिल्यासारखी थंडी राहिली नाही, हे पण तितकेच खरे. मी पुण्यात होतो तेव्हा थंडीत बोलताना अक्षरशः तोंडातून वाफा निघत आहेत असे वाटायचे कधी कधी. आता तितकी थंडीच नसते.
आज तर इथे चक्क गरम होत आहे..
आज तर इथे चक्क गरम होत आहे.. उघडे झोपायची वेळ आली आहे...
नवीन वर्षाचे स्वागत पावसाने केले तर नवल नाही...
हो, काही ठिकाणचे त्या
हो, काही ठिकाणचे त्या बुजगावण्याला बुढ्ढा असेही म्हणायचे आणि खिश्यात दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे वगैरे ठेवायचे. म्हणजे तो एक व्यसनी बुड्ढा असायचा. वाईट सवयींना आणि दुर्गुणांना जाळले जायचे.
तसेच जुन्या वर्षाचे प्रतीक म्हणून जाळा असेही असू शकते. काही ठिकाणी त्यावर नेत्यांची नावेही लिहीली जायचे तर कुठे भ्रष्टाचार, महागाई वगैरे पाट्या लावल्या जायच्या. __________लहानपणी पाहिलंय आताशा कुठे नाही दिसलं असं काही। बाकी त्याला बुढ्ढाच म्हणत।
हो, हिंदीत बुढ्ढा..
हो, हिंदीत बुढ्ढा म्हणायचे बरेच ठिकाणी..
पांढरी दाढी.. सांताचा मास्क..पोटात फटाके
लहानपणी पाहिलंय आताशा कुठे
लहानपणी पाहिलंय आताशा कुठे नाही दिसलं असं काही। बाकी त्याला बुढ्ढाच म्हणत।>>> हो बुढ्ढा किंवा ओल्ड मॅन म्हणतात. भांडूप ईस्टला अजूनही वर्षा अखेरीस बुढ्ढा जाळतात.
Pages