गेले दोनेक दिवस आमच्या मुंबईत अगदी गबरू थंडी पडली आहे. म्हणजे दुपारच्या भरगच्च उन्हातही बोचरे गारे वारे अंगापिंडाला टोचत आहेत.
या रविवारी सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे ऊठून सहपरीवार सहकुटुंब मॉर्निंग वॉकला गेलो. कपडे तेच आपले हलकेफुलके आणि स्टायलिश. कारण स्वेटर वा तत्सम जाडजूड कपडे मुंबईत कसली डोंबलाची थंडी म्हणत केव्हाच लाईफस्टाईलमधून हद्दपार झाले आहेत. त्यामुळे बाहेर पडल्यावर जेव्हा गारठलो तेव्हा मॉर्निंग वॉक एका जागीच दाटीवाटीने बसून साजरा होऊ लागला. बागेत गेल्यावर मास्क काढावा हा शिरस्ता पाळत सर्वांनी तो काढला, पण खिश्यात न टाकता कानावर चढवला. आणि त्या जागी हात खिश्यात टाकले. पण तरीही नारियलपाणीवाला दिसताच सवयीने ते प्राशन करायला खिश्यातले हात बाहेर आले. पोरं सोबत असल्याने घरी परतताना आईसक्रीमचाही एक राऊंड झाला. त्यानंतर मग व्हायचे तेच झाले...
सकाळी कानातून चोरमार्गाने शिरलेली थंडी रात्र होता होता नाकातून बाहेर पडू लागली. म्हणून सोमवारी कसलाही आगाऊपणा न करता खास थंडीचा लुत्फ उचलायला म्हणून सुट्टी टाकली. पण सकाळचा गरमागरम पोहे मिसळीचा नाश्ता झाल्यावर पुढे काय करायचा हा प्रश्न पडला. पावसाळ्यात चहा - कांदाभजी - चहा - समोसे - चहा - बटाटाभजी - चहा थालीपीठ - चहा यांव आणि त्यांव असे राऊंड घेता येतात. पण थंडीचे सुट्टी टाकून करतात काय हा प्रश्नच पडला. मग दुपारी मस्तपैकी दारे खिडक्या पडदे फॅन लाईट वगैरे सारे काही बंद करून मस्त चादर ओढून ताणून दिली.
थोडावेळ छान झोप लागली. पण त्यानंतर चादरीतही थंडी शिरू लागली. मग पाय जवळ ओढून घेतले. चादर गच्च लपेटून घेतली. पण तरीही जेव्हा असह्य झाले तेव्हा ताडकन ऊठलो आणि पाहतो तर काय... पोराने सवयीने एसी चालू करून ठेवलेला. आता त्याला बिचार्यालाही थंडी हा सीजन नवीनच. त्याचा तरी काय दोष. तरीही आलेला राग शांत करायला चार वर्षाच्या पोराला जितके बदडणे अलाऊड असते तितके त्याला बुकलून काढले. त्याने तो गरम झाला. पण माझी थंडी मात्र रात्र होत आली तरी जायचे नाव घेत नव्हती. उलट रात्री पुन्हा गारठू लागलो तसे मग वेळ घालवायला भूतकाळातल्या थंडीच्याच आठवणी काढून गरम होऊया म्हटले. यही मौका है, यही दस्तूर है, और बंबई की थंडी है भाई.. क्या पता, कल हो ना हो
तर थंडी म्हटले की मला सर्वात पहिले माझगावच्या आमच्या चाळीतील दादरावर पेटवली जाणारी शेकोटी आठवते. आहाहा, छोटीशी होळीच म्हणा ना.. ते कॅम्पफायर वगैरे ईंग्लिश शब्द मला फार उशीरा कळले. जेव्हा कळले तेव्हाही डोक्यात हेच पहिला आले, अरे ही तर आमची शेकोटी
म्हणजे नारळाच्या सुक्या करवंट्या, ज्या तेव्हा चाळीतील दर दुसर्या घरात सापडायच्या. अगदी आमच्या दारातही एक ड्रम भरून असायच्या. सोबत जमेल तसा लाकूडफाटा, जसे की आब्याच्या पेट्यांची फळकुटे वगैरे,. एक मोठठाला परातीईतका तवा, त्यात हा सारा लाकडी ऐवज जमा करायचा. आणि रॉकेल टाकून पेटवून द्यायचा. तेव्हा स्टोव्हच्या जमान्यात रॉकेलही प्रत्येक घरात सापडायचे. फार नाही, कपभर पुरायचे. दररोज हा कप आळीपाळीने एकेका घरातून यायचा. जेवणखान झाले की साधारण दहा-साडेदहाला शेकोटी पेटायची ते रात्री एकदिडलाच विझायची. तोपर्यंत आमच्यासारखे रातकिडे अखेरपर्यंत तिला सोबत द्यायचे. कधी मूड आला तर गाणीही व्हायची. पण खरी धम्माल शेकोटीवरील गप्पांची. आणि चाळीसारख्या जागी गप्पांच्या विषयाला कमी कधीच नसायची.
याच थंडीच्या सीजनमध्ये मग नाताळही यायचा. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत सांताक्लोजला जाळून करायची पद्धत होती आमच्यात. पाशवी प्रथाच म्हणा ना. अगदी साग्रसंगीत फटाक्यांसह हा जाळण्याचा कार्यक्रम पार पडायचा. ती सुद्धा एक शेकोटीच म्हणू शकतो. पण जाळण्याआधी ती बुजगावणी ख्रिसमसपासून बिल्डींगच्या कॉमन गॅलर्यांना लटकावलेली असायची. थोडीथोडकी नाही तर तब्बल दहाबारा बुजगावणी बनायची. ते बनवायला लागणारे सुके गवत तेव्हा भायखळा भाजीमार्केटमध्ये मुबलक आणि फुकटात मिळायचे. रस्त्यात पडलेले असायचे. गोणी गोणी भरून आणायचो. बरेचदा शेकोटीत त्यातलेच गवत जाळले जायचे. असा हा शेकोटी, नाताळ, थंडीचा सण जवळपास किमान महिनाभर तरी साजरा व्हायचा. आजच्या मुंबईत राहणार्या पिढीचा यावर विश्वास बसणे अवघडच.
मग मोठे होता होता ती थंडी हरवलीच. नाही म्हणायला कधीतरी जगाच्या पाठीवर बर्फ पडला तर वाहत्या वार्यांसोबत एखादी थंडीची लाट मुंबईत अवतरते. तेवढ्या काळात आम्ही मुंबईकर रजनीकांतचा फ्रिज उघडा राहिलाय वगैरे पांचट जोक मारून घेतो. झाल्यास पुण्याच्या गुलाबी थंडीचीही खिल्ली उडवायचा प्रोग्राम पार पडतो. पण बालपणीच्या थंडीच्या आता आठवणीच उरल्या आहेत. तुमच्याही असतील तर उगाळा याच धाग्यावर. तेवढेच त्या आठवणींच्या शेकोटीची ऊब..
- ऋन्मेष
ते पुस्तक कदाचित सूज्ञ
ते पुस्तक कदाचित सूज्ञ माणसाने तर नाही ना लिहीलेले ?
सर म्हणतात मुंबईत बर्फ पडले तर पडले. याला विरोध करू नका.
पण सर विरोध न करणा-यांबाबत त्या धाग्यावर आक्रोश करून राहीले ना बाप्पा !
थंडीचे काय कौतुक असायचे?
थंडीचे काय कौतुक असायचे? हातपाय आखडून घेत चेहरा कोरडा , हातापायाना भेगा पाडण्याऱ्या थंडीचे कसले कौतुक... काहीही असतंय
सराना विरोध - सर प्रसन्न.
सराना विरोध - सर प्रसन्न.
सरांची बाजू घेणे - सर क्रोधित.
नुसते क्रोधीत नाही
नुसते क्रोधीत नाही
थेट अबोलाच धरतात
संत महात्मे लहान मुलांसारखे निरागस असतात असं म्हणतात ते काही खोटे नाही
थंडीचे काय कौतुक असायचे?
थंडीचे काय कौतुक असायचे? हातपाय आखडून घेत चेहरा कोरडा , हातापायाना भेगा पाडण्याऱ्या थंडीचे कसले कौतुक... काहीही असतंय
>>>>>
तसे तर पावसाळ्यातही चिखल होतो, कपड्यांची वाट लागते, कुठे छत्रीशिवाय जायची सोय नसते, पावसाळा सोबत कैक आजार घेऊन येतो...
पण तरीही पावसात भिजायची आणि भिजल्यावर गरमागरम भज्या खायची आपलीच एक मजा असते, लोकं मौजमस्तीसाठी खास पावसाळी सहली काढतात, लोकं कश्याला मायबोलीही वर्षाविहार आयोजित करायचीच.
सजा असो वा मजा, दोन्ही बाजू उन्हाळा पावसाळा हिवाळा प्रत्येक मौसमात आहेच. सजेबाबत दूषणे देऊया, नो प्रॉब्लेम, पण मजेबाबत कौतुकही करूया की थंडीचे
फेसबुकवर सर सर बरेच वाचले
सजेबाबत दूषणे देऊया, नो प्रॉब्लेम, पण मजेबाबत कौतुकही करूया की थंडीचे>>>> सरजी, मला थंडी आवडत नाही त्याबद्दल लिहिलेय.
तुम्ही कौतुक करा त्याबद्दल काही म्हणणे नाहीये. थंडीचे कौतुक माझ्याच्याने होणार नाही.
सजा असो वा मजा, दोन्ही बाजू
सजा असो वा मजा, दोन्ही बाजू उन्हाळा पावसाळा हिवाळा प्रत्येक मौसमात आहेच. सजेबाबत दूषणे देऊया, नो प्रॉब्लेम, पण मजेबाबत कौतुकही करूया की थंडीचे
सरांचे विशाल हृदय आणि त्यांचे विचार ऐकून डोळ्यात टचकन पाणी च आले
कोण आजकाल इतका विचार करते दुसऱ्याचा
थंडी मध्ये आवडन्यासारखे काय
थंडी मध्ये आवडन्यासारखे काय आहे ? >> हा तुमचा मूळ प्रश्न/प्रतिसाद होता
अहो, तुम्हाला पर्सनली केलेला
अहो, तुम्हाला पर्सनली केलेला नव्हता प्रश्न. बोलण्याच्या लिहिण्याच्या ओघात उद्गारवाचक चिन्हाऐवजी प्रश्नचिन्ह वापरले गेले इतकेच.
हो, पर्सनली घेतलाच नव्हता
हो, पर्सनली घेतलाच नव्हता प्रश्न
बोलण्याच्या लिहिण्याच्या ओघात उद्गारवाचक चिन्हाऐवजी प्रश्नचिन्ह वापरले गेले इतकेच. >>> याने वाचतानाचा टोन बदलला ईतके मात्र खरे कारण त्याने ते तुमचे वैयक्तिक मत न वाटता दुसर्याच्या मतावर दिलेली प्रतिक्रिया वाटली. नो प्रॉब्लेम
विरोध करा किंवा नका करू. सर
विरोध करा किंवा नका करू. सर तुमच्या मुखी वाक्ये घुसडून त्यावर प्रतिवाद करणार. यातूनच आम्हीही शिकत आहोत. पण सर वैतागले ! :दु:खी:
अरेरे! प्रतिसाद संपादित
अरेरे! प्रतिसाद संपादित करायची वेळ निघून गेली. नाहीतर केला असतात एडिट .
नो प्रॉब्लेम >>> धन्यवाद सर
पावसाळ्यात भिजल्यावर
पावसाळ्यात भिजल्यावर ‘निमकराच्या खानावळीतली डुकराची तळलेली भजी‘ बरी लागेल का??
ईथली लोकं कसल्या कसल्या
ईथली लोकं कसल्या कसल्या पुस्तकातले संदर्भ देतात ते सारे डोक्यावरून जाते. हे डुक्कराची भजी खरी की खोटी, की आणखी कसला गभित संदर्भ लपलाय यात..
पुलं देशपांडे यांच्या
पुलं देशपांडे यांच्या खुर्च्या या लेखातील तो संदर्भ आहे
ओके धन्यवाद. खुर्च्या लेख आहे
ओके धन्यवाद. खुर्च्या लेख आहे का. तरीच त्या दिवशी मी पुस्तक आहे का विचारल्यावर लोकं हसलेले. तरी मी त्या आधी गूगल सर्च केलेले खुर्च्या पण नेमके हवे ते सापडले नव्हते.
डोंगर कसा जाळायचा नेमका?
डोंगर कसा जाळायचा नेमका?
सांगतील की ते.. जरा अजून
सांगतील की ते.. जरा अजून प्रतिसाद येऊ द्या.. सरांची इज्जत का सवाल है! नाहीतर नवा धागा लिहितील.. लिहीतही असतील कदाचित आत्ता
सरांना नोकरी देताना
सरांना नोकरी देताना मुलाखतकाराला घाम फुटला असेल. नेमक्या प्रश्नांना फाट्यावर मारले असेल सरांनी.
हायला डोंगर!
हायला डोंगर!
सरांना नोकरी देताना
सरांना नोकरी देताना मुलाखतकाराला घाम फुटला असेल. नेमक्या प्रश्नांना फाट्यावर मारले असेल सरांनी.>>>
यावरही एक लेख यायला हवा सर
पण त्या आधी डोंगर जाळणे प्रकरण यायलाच हवे
काही सुचत नसेल तर आता वेळ आहे तर काही दाक्षिणात्य सिनेमे बघून घ्या सर त्यात भरपूर मसाला असतो
शेकोटीच्या नादात डोंगर
शेकोटीच्या नादात डोंगर जाळल्याचा किस्सा मायबोलीवर आधी लिहिला आहे. शोधला पण सापडला नाही. कदाचित माझ्या धाग्यावर न लिहिता प्रतिसादात लिहीला असावा. वेळ मिळाल्यास पुन्हा शोधतो. पण एकच किस्सा पुन्हा लिहावासा वाटत नाही. त्याने आयुष्यात घडलेल्या ईतर किस्स्यांवर अन्याय होतो असे वाटते. तरी मूड आल्यास जरूर लिहेन. सध्या पेंडींग लिखाण बरेच आहे. त्याला आधी न्याय द्यावा लागेल. तरी उत्सुकतेबद्दल धन्यवाद. समजून घ्याल आणि प्रतीक्षा कराल अशी अपेक्षा आहे _/\_
सर प्रतीक्षा तर जन्मभर करू
सर प्रतीक्षा तर जन्मभर करू आम्ही
तुम्ही लिहिपर्यंत रोज आठवण करून देत जाऊ
एवढी उत्सुकता वाढवून ठेवली आहे तर त्याला साजेसा किस्सा असणारे तो
अगदी तपशीलवार लिहा सर
पण एकच किस्सा पुन्हा लिहावासा
पण एकच किस्सा पुन्हा लिहावासा वाटत नाही. >> शाखा सरांचे माबोवरचे दुकान बंद पडते काय ?
सध्या पेंडींग लिखाण बरेच आहे.
सध्या पेंडींग लिखाण बरेच आहे. त्याला आधी न्याय द्यावा लागेल.>> बघा सर, तुमचं हे असं आहे. हळुच पुडी सोडुन देता आणि मग चाहते मागे लागले की मग अबोला धरता.
जाई धन्यवाद... मी पु ल
जाई धन्यवाद... मी पु ल देशपांडे यांचे एकही पुस्तक वाचलेले नाही त्यामुळे कळले नसतेच....
सुंदर ललित लेख
सुंदर ललित लेख
थंडी संपत आली तरी सरांचा
थंडी संपत आली तरी सरांचा डोंगर काही पेट घेईना
लिहा की ओ सर
थंडी संपत आली तरी सरांचा
थंडी संपत आली तरी सरांचा डोंगर काही पेट घेईना
सरांनी दुसर्या धाग्यांचा रतीब सॉरी (एस ओ आर आर इ) डोंगर पेटवलेला दिसतोय. पार अजिबातच प्रतिसाद नसलेले धागे शंभरी पार एकदम.
तुमचं इंग्रजी अगदीच लो आहे बर
तुमचं इंग्रजी अगदीच लो आहे बर का ठिगळे मास्तर
सॉरी चे स्पेलिंग एस डबल ओ आर इ
Pages