प्रत्येकाची आपली लाईफस्टाईल असते. कुणी कुणाच्या लाईफस्टाईलला दोष देऊ नये. सगळे आपल्या कमफार्ट झोन मधे मस्त असतात.
आमचा कमफार्ट भारी तुमचा लो लेवलचा असा अॅटीट्यूड डोक्यात जातो. पण मी दुर्लक्ष करतो. गर्लफ्रेण्डमुळे मला अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करता येते. ती माझ्या जीवनात आल्यापासून तुझंच खरं या मंत्राने माझं लाईफ सुखी झालं आहे.
तर ही गफ्रे एकदा म्हणाली कि वाचत बिचत जा काहीतरी.
मी एकदम बावचळलो. म्हटलं "का?"
तर म्हणाली कि त्याने आपली बुद्धी वाढते.
यावर आमचं अर्धा दिवस डिस्कशन झालं. शेवटी नेहमीप्रमाणे मीच माघार घेतली.
तिने कमी वाचन असणार्या आणि वाचन नसणार्यांवर सडकून टीका केली.
हाच रिकी पॉईण्टाचा मुद्दा आहे.
कमी वाचणारे लोक टॉलरेन्ट असतात. ते वाचणार्या लोकांचा आदर करतात.
पण वाचणारे लोक नेहमी कमी वाचन असणार्या / नसणार्या लोकांना तुच्छतेने बघतात. त्यांचा द्वेष करतात.
पण मला एक प्रश्न पडला कि जर प्रत्येक जण फक्त वाचतच राहिला तर जग कसे चालणार ?
भाजी कोन विकणार ? राज्य कोण चालवणार ? रिक्षा, बस, ट्रेन कोण चालवणार ?
डॉक्टर जर म्हनले की राहूदे ऑपरेशन मी लायब्ररीत चाललो तर ?
जे जे मोठे लोक होऊन गेले ते काय वाचत बसले का ? आजपर्यंत पुस्तकी किड्यांकडून काही काम झाले आहे का ? जगात जेव्हढे उठाव झाले त्यात या वाचन एके वाचन वाल्यांचं योगदान काय आहे ? ( मी वाचत नाही त्यामुळे कुठले उठाव हे विचारू नये. उठाव झालेत हे पुष्कळ आहे.) १८५७ च्या बंडातल्या सैनिकांचे काय वाचन होते ? दांडीयात्रेत जे सैनिक गांधीजींच्या मागे निघाले त्यांचे काय वाचन होते ? पण त्यांच्यामुळे झाली की नाही क्रांती ?
नुसतं वाचत बसलं तरी ते दुसर्याला सांगणार कधी ? वाचनातच वेळ गेला तर लिहीणार कधी ?
तिकडे शाहरूखचे पिक्चर्स करोडोचा धंदा करतात. त्याने बाजारात उलथापालथ होते. यातले कोण अर्थशास्त्र वाचते ? त्याचे पिक्चर लिहीणारे काय दांडगी पुस्तके वाचतात का ?
तरी जे काही पण कचरा वाचत बसतात ते निष्क्रीय होऊन जे वाचत नाहीत त्यांना न वाचण्याचे दुष्परिणाम सांगतात.
कुठल्याही गोष्टीच्या दोन किंवा जास्त बाजू असतात.
जर वाचन न करण्याचे दुष्परिणाम असतील तर फायदे पण असणारच.
तसेच वाचनाचे पण दुष्परिणाम असणारच.
सहमत असाल तर सांगा.
सहमती / असहमती, परिणाम /
सहमती / असहमती, परिणाम / दुष्परिणाम इत्यादी सांगण्यासाठी तरी आपण लिहिलेले भारूड वाचावेच लागेल ना? कि न वाचताच प्रतिसाद द्यावा?
भक्तांची चंगळ आहे. जुन्या
भक्तांची चंगळ आहे. जुन्या देवांचा राजीनामा दिला की आपल्या भक्तीत रुजू होऊ.
चमत्कार मात्र जुन्या देवांपेक्षा सॉलीड पाहीजेत !!
(लिहीत असताना न वाचणे हा एक चमत्कार नोटला आहे).
प्रतिसाद वाचणार की नाही?
प्रतिसाद वाचणार की नाही?
<<सहमत तर सांगा>>> इनफिनिटी
<<सहमत तर सांगा>>> इनफिनिटी % सहमत! वाचनात वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा धागे काढून वेळ सत्कारणी लावणे श्रेष्ठ आणि उदात्त आहे.
अगदी खरंय आणि आपण वाचत नाही
अगदी खरंय आणि आपण वाचत नाही हे अभिमानाने सांगता यायला हवे ठणकावून
शाहरूखवर माझा कॉपीराईट आहे.
शाहरूखवर माझा कॉपीराईट आहे.
अॅडमिन लक्ष द्या, प्रताधिकाराचा भंग होतोय ईथे
पाठिंबा
पाठिंबा
पाठीम्बेसे डर लगता है
पाठीम्बेसे डर लगता है
हमे नही, सर को.
सरांनी प्रताधिकाराचा विषय काढून मोठ्या खुब्याने लक्षात आणून दिले की हा शारूक आहे. आणि तो ही गरीबांचा नसून गारंबीचा आहे.
भक्ती करावी कि नाही याबाबत भक्तांत गोंधळ.
कुणी सत्यदेव म्हणा कुणी
कुणी सत्यदेव म्हणा कुणी सत्यनारायण म्हणा
कोणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा
कुणी अल्ला म्हणा कुणी येशू म्हणा
कुणी स्ट्रेनजर म्हणा कुणी एक्स मॅन म्हणा
भक्तांना देवाची सारी रूपे सारखीच
खरं आहे. पण एकदा हा नाद
खरं आहे. पण एकदा हा नाद व्यसनाच्या लेव्हलला गेला की आपण काही करू शकत नाही.
१. म्हणजे पुस्तकांवर समजा अधूनमधून राग काढला की ''साल्यांनो तुमच्या नादी लागून मी महत्वाची वर्षं ऑलरेडी खराब केली आहेत..! तुम्ही मला पार बरबादच करून सोडणार आहात काय आता?''
तर पुस्तकं असल्या नाटकांचीही सवय करून घेतात..! ती काही वाद-बिद घालत नाहीत..! लय लबाड असतेत..!
शिवाय पुस्तकांवर आपण काढलेला सगळा राग आपल्यावरच माघारी उलटून येतो, असाही अनुभव आहे..!
२. पुस्तकं लपाछपी खेळतात..! 'क्रश'चा पिच्छा पुरवावा तसा त्यांचा पिच्छा पुरवावा लागतो..! हजार नखरे सहन करावे लागतात..! जुन्या बाजारांतून चवड्यावर बसून पुस्तकांचे ढीग उलथे पालथे करावे लागतात..!
पुस्तकांचे दुकानदार, लायब्रऱ्या, वाचणारे ओळखीचे लोक, अशा बऱ्याच ठिकाणी गळ टाकून ठेवावे लागतात...! खूप दिवस वाट बघून कधीकधी आपण कंटाळून नाद सोडून दिला, की मग असंच कधीतरी या भुलभुल्लैय्यातून मार्ग काढत आकस्मिकरीत्या प्रकट होतात..! तोपर्यंत बसा बोंबलत..!
३. बाकी पुस्तकं म्हणजे काही निव्वळ छापलेला कोरडा मजकूर नसतो, हे एक आहेच.! वाचताना समजा त्यातल्या अक्षरांवर, शब्दांवर बोट फिरवून पाहिलं तर त्यातली थरथर जाणवते, जी कधीकधी फारच जिव्हारी लागणारी असू शकते..!
४. पुस्तकं बेजबाबदारपणे बालू देत नाहीत..! बोलण्याआधी थोडं थांबून पहायला सांगतात...! पुस्तकं भाषेचं प्रगाढ सौंदर्य वगैरे शिकवतात..! परंतु त्यामुळे बऱ्याचदा आपलाच कॉन्फिडन्स जातो..! आणि हे करताना जबरदस्ती वगैरे अजिबातच करत नाहीत..! नातेवाईकांसारखी बोकांडी बसत नाहीत ..! 'घ्यायचं तर घे, नायतर जा' म्हणतात.! त्यामुळे आणखीनच अडचण होते.
५. काही पुस्तकं समजा थोडी वाचून बाजूला ठेवून दिली की हे मनाला चिकटत नाहीये म्हणून...! तर अशी अर्धवट वाचून बाजूला ठेवून दिलेल्या पुस्तकांना चुपचाप पडून रहायला काय होतं..! पण नाही..! ती उगाच अधूनमधून डोळे मिचकावतात...! खाणाखुणा करतात..!
६. शिवाय काही आतल्या गाठीच्या पुस्तकांचे आणखी वेगळेच लाड असतात..! ती त्यांच्या आई बापांवर म्हणजे लेखक/लेखिकेवर गेलेली असतात..! ही फार हट्टी जात..! आपला संपूर्ण फोकस त्यांच्याकडे द्यावा लागतो.! स्वतःहून पोहत पोहत अंतर कापत त्या एकाकी बेटांकडे जावं लागतं..!
तरीही ती सहजपणे आपल्या जवळ येत नाहीत..! तू आमच्या योग्य झालास तरच आम्ही तुझा विचार करू म्हणतात..! बाकी मग एकदा आपली आणि त्यांची ओळख पटली की मग अशा काही अस्सल गोष्टी ही पुस्तकं सांगतात की ज्या जगात इतरत्र कुठेही कुणीही सांगणार नाही..! पण तरीही ह्या कामात पेशन्स फारच ठेवावा लागतो बुवा, ही तक्रार आहे.
७. आपण काहीच लपवू शकत नाही त्यांच्यापासून...! तसा प्रयत्नही करण्यात अर्थ नसतो..! आपल्या मनातले सगळे झोके, फडफड, पिरपिर, कालवाकालव, पडझड, ओसाड भावनाप्रदेश, खुशीची गाजरं, गहन सन्नाटे हे सगळं त्यांना आधीच कळलेलं असतं..! त्याबाबतीत पुस्तकं आपले 'गुन्ह्यातले साथीदार' असतात..! आणि साथीदारांची गुपितं सांभाळत बसावं लागतं मग उगाच..! तशीच पद्धत असते.
पाचपाटील मुस्काडफोड!
पाचपाटील मुस्काडफोड!
मस्त प्रतिसाद पाचपाटील.
मस्त प्रतिसाद पाचपाटील.
सुंदर प्रतिसाद, पाचपाटील!
सुंदर प्रतिसाद, पाचपाटील!
पाचपाटील, उत्तम प्रतिसाद!
पाचपाटील, उत्तम प्रतिसाद!
छान प्रतिसाद पाचपाटील.
छान प्रतिसाद पाचपाटील.
वाचक आहेत म्हणून लेखकही आहेत, आणि माझ्यासारखे धागाकर्तेही आहेत. कारण धागाकर्विते शेवटी वाचकच असतात.
कागदी वाचू नये... झाडे वाचवा.
कागदी वाचू नये... झाडे वाचवा...
डिजिटल वाचावे... किंडल वरती...
सध्या इंग्रजी आणि हिंदी साहित्य वाचतोय... मराठी फक्त मायबोलीवर...
सहमती / असहमती, परिणाम /
सहमती / असहमती, परिणाम / दुष्परिणाम इत्यादी सांगण्यासाठी तरी आपण लिहिलेले भारूड वाचावेच लागेल ना? कि न वाचताच प्रतिसाद द्यावा? >> हाहा. मला उपहास कळला. पण वाचूच नका हा विषयच नव्हता. वाचल्याशिवाय प्रतिसाद कसा देणार ?
प्रतिसाद वाचणार की नाही? >>
प्रतिसाद वाचणार की नाही? >> जिज्ञासा, वाचणार आणि प्रतिसाद पण देणार.
इनफिनिटी % सहमत! वाचनात वेळ
इनफिनिटी % सहमत! वाचनात वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा धागे काढून वेळ सत्कारणी लावणे श्रेष्ठ आणि उदात्त आहे. >> हाहा. मामा पण सहमत झाले म्हणून आभार. वाचन करू नये असे कुठे म्हटलेय ? हा वेळ वाया जाऊ शकतो याबद्दल मतमतांतरे असणारच. पाहीजे तर आपण सर्व्हे घेऊ. जे सोशल मीडीयात नाहीत आणि ज्यांना १२ तास कष्ट करावे लागते त्यांना पण विचारू.
पाचपाटील ! एक नंबर प्रतिसाद.
पाचपाटील ! एक नंबर प्रतिसाद. पण मी तुम्हाला नंतर सविस्तर उत्तर देईन.
सध्या बिझी आहे.
पाचपाटिल, वेगळा धागा
पाचपाटिल, वेगळा धागा काढण्यासारखा प्रतिसाद आहे.
त्यातले चौथ्या क्रमांकातील दुसरे वाक्य आणि या धाग्याचा लेखक ( किंवा त्याचे प्रेरणास्थान) यांची कट्टर दुष्मनी आहे. त्यामुळेच ते वाचनाचे दुष्परिणाम शोधत आहेत.
वाहवा पाटील काय सुंदर लिहलं
वाहवा पाटील काय सुंदर लिहलं आहे तुम्ही
अक्षरशः काळजात भिडणारे
खूप काळाने मायबोली वर इतकं सुंदर काही वाचायला मिळालं
पाचपाटील, सुंदर प्रतिसाद !
पाचपाटील, सुंदर प्रतिसाद !
पाचपाटील मस्त प्रतिसाद
पाचपाटील मस्त प्रतिसाद
पाचपटील , नेमका प्रतिसाद
पाचपटील , नेमका प्रतिसाद
पाचपाटील, सुरेख प्रतिसाद!
पाचपाटील, सुरेख प्रतिसाद!
कागदी वाचू नये... झाडे वाचवा... डिजिटल वाचावे... किंडल वरती...>> हे म्हणजे मेरी अंँटोनेट सारखे विधान झाले! ब्रेड नसेल तर केक खा! झाडे रिन्युएबल रिसोर्स आहे पण किंडलचा फूटप्रिंट कागदापेक्षा कितीतरी जास्त आहे. किंडल वर वाचा पण it's not greener than reading a physical book.
Nearly 4 billion trees
Nearly 4 billion trees worldwide are cut down each year for paper, representing about 35 percent of all harvested trees.
म्हणजे पुस्तकांवर समजा
म्हणजे पुस्तकांवर समजा अधूनमधून राग काढला की ''साल्यांनो तुमच्या नादी लागून मी महत्वाची वर्षं ऑलरेडी खराब केली आहेत..! तुम्ही मला पार बरबादच करून सोडणार आहात काय आता?'' >>> ही स्टेज यायच्या आधीच सावध व्हावं. पुस्तकी किडा होऊ नये. व्यवहारज्ञान येत नाही. माझा मित्र इस्टेट एजंट आहे. त्याला माणूस बघितला की काय बोलायचं कळतं. धंद्याला जे लागतं त्या कायद्यांचं वाचन त्याचं १००% आहे. त्याच्या कडं येणा-या सुशिक्षितांना ७/१२ कसा काढायचा, वाचायचा हे पण माहिती नसतं. हे लोक त्याच्यावर इंप्रेशन मारायला साहीत्यिक डायलॉग्ज मारतात. तो ते शांततेत ऐकून घेतो. आणि जमिनीचे कायदे विचारतो. नाही सांगता आले की मग मी सांगतो ते ऐका असं म्हणतो. रोजच्या व्यवहारात लागतं ते ज्ञान पण वाचायला पाहीजे. ते पुस्तकात नसतं. त्यासाठी खेटे मारावे लागतात. अशा लोकांनी आता सुशिक्षितांसाठी हे ज्ञान पुस्तकात लिहीलं आहे. पण अशी पुस्तकं वाचणं प्रतिष्ठेचं समजत नाहीत.
गाडी कशी रिपेअर करावी , घरातलं वायरींग कसं करावं, फॉल्ट्स कसे दूर करावेत अशी पुस्तकं पण आहेत. व्हिडीओ आहेत. ते ज्ञान गरजेचं असतं. मग वर्षं खराब होत नाहीत.
पुस्तकं लपाछपी खेळतात..!
पुस्तकं लपाछपी खेळतात..! 'क्रश'चा पिच्छा पुरवावा तसा त्यांचा पिच्छा पुरवावा लागतो..! हजार नखरे सहन करावे लागतात..! जुन्या बाजारांतून चवड्यावर बसून पुस्तकांचे ढीग उलथे पालथे करावे लागतात..!
पुस्तकांचे दुकानदार, लायब्रऱ्या, वाचणारे ओळखीचे लोक, अशा बऱ्याच ठिकाणी गळ टाकून ठेवावे लागतात...! खूप दिवस वाट बघून कधीकधी आपण कंटाळून नाद सोडून दिला, की मग असंच कधीतरी या भुलभुल्लैय्यातून मार्ग काढत आकस्मिकरीत्या प्रकट होतात..! तोपर्यंत बसा बोंबलत..!
>>>>> एखादा डॉक्टर आहे. हार्ट स्पेशालिस्ट आहे. त्याने त्याच्या क्षेत्रातलं एखादं विशिष्ट पुस्तक मिळवण्यासाठी असं पॅनिक होणं समजू शकतं. अपडेट राहणे ही अशा लोकांची जितकी गरज आहे तितकी त्यांच्यावर अवलंबून असणार्या रुग्णांची पण असते. त्याला सवड काढून आनंदासाठी वाचायला तितका वेळ पाहीजे.
बाकी पुस्तकं म्हणजे काही
बाकी पुस्तकं म्हणजे काही निव्वळ छापलेला कोरडा मजकूर नसतो, हे एक आहेच.! वाचताना समजा त्यातल्या अक्षरांवर, शब्दांवर बोट फिरवून पाहिलं तर त्यातली थरथर जाणवते, जी कधीकधी फारच जिव्हारी लागणारी असू शकते..! >>> असं काही नसतं. हे भास असू शकतात. पुस्तकात लिहीलेलं सगळं खरं नसतं. मोठमोठ्या लोकांची आत्मचरित्र पण सगळं खरं कधी सांगत नाहीत. आनंदासाठी पुस्तक वाचणं आणि पुस्तकांच्या आहारी जाणं यात फरक आहे असं मला वाटतं.
Pages