प्रत्येकाची आपली लाईफस्टाईल असते. कुणी कुणाच्या लाईफस्टाईलला दोष देऊ नये. सगळे आपल्या कमफार्ट झोन मधे मस्त असतात.
आमचा कमफार्ट भारी तुमचा लो लेवलचा असा अॅटीट्यूड डोक्यात जातो. पण मी दुर्लक्ष करतो. गर्लफ्रेण्डमुळे मला अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करता येते. ती माझ्या जीवनात आल्यापासून तुझंच खरं या मंत्राने माझं लाईफ सुखी झालं आहे.
तर ही गफ्रे एकदा म्हणाली कि वाचत बिचत जा काहीतरी.
मी एकदम बावचळलो. म्हटलं "का?"
तर म्हणाली कि त्याने आपली बुद्धी वाढते.
यावर आमचं अर्धा दिवस डिस्कशन झालं. शेवटी नेहमीप्रमाणे मीच माघार घेतली.
तिने कमी वाचन असणार्या आणि वाचन नसणार्यांवर सडकून टीका केली.
हाच रिकी पॉईण्टाचा मुद्दा आहे.
कमी वाचणारे लोक टॉलरेन्ट असतात. ते वाचणार्या लोकांचा आदर करतात.
पण वाचणारे लोक नेहमी कमी वाचन असणार्या / नसणार्या लोकांना तुच्छतेने बघतात. त्यांचा द्वेष करतात.
पण मला एक प्रश्न पडला कि जर प्रत्येक जण फक्त वाचतच राहिला तर जग कसे चालणार ?
भाजी कोन विकणार ? राज्य कोण चालवणार ? रिक्षा, बस, ट्रेन कोण चालवणार ?
डॉक्टर जर म्हनले की राहूदे ऑपरेशन मी लायब्ररीत चाललो तर ?
जे जे मोठे लोक होऊन गेले ते काय वाचत बसले का ? आजपर्यंत पुस्तकी किड्यांकडून काही काम झाले आहे का ? जगात जेव्हढे उठाव झाले त्यात या वाचन एके वाचन वाल्यांचं योगदान काय आहे ? ( मी वाचत नाही त्यामुळे कुठले उठाव हे विचारू नये. उठाव झालेत हे पुष्कळ आहे.) १८५७ च्या बंडातल्या सैनिकांचे काय वाचन होते ? दांडीयात्रेत जे सैनिक गांधीजींच्या मागे निघाले त्यांचे काय वाचन होते ? पण त्यांच्यामुळे झाली की नाही क्रांती ?
नुसतं वाचत बसलं तरी ते दुसर्याला सांगणार कधी ? वाचनातच वेळ गेला तर लिहीणार कधी ?
तिकडे शाहरूखचे पिक्चर्स करोडोचा धंदा करतात. त्याने बाजारात उलथापालथ होते. यातले कोण अर्थशास्त्र वाचते ? त्याचे पिक्चर लिहीणारे काय दांडगी पुस्तके वाचतात का ?
तरी जे काही पण कचरा वाचत बसतात ते निष्क्रीय होऊन जे वाचत नाहीत त्यांना न वाचण्याचे दुष्परिणाम सांगतात.
कुठल्याही गोष्टीच्या दोन किंवा जास्त बाजू असतात.
जर वाचन न करण्याचे दुष्परिणाम असतील तर फायदे पण असणारच.
तसेच वाचनाचे पण दुष्परिणाम असणारच.
सहमत असाल तर सांगा.
पुस्तकं बेजबाबदारपणे बालू देत
पुस्तकं बेजबाबदारपणे बालू देत नाहीत..! बोलण्याआधी थोडं थांबून पहायला सांगतात...! >>> हे छान आहे.
पुस्तकं भाषेचं प्रगाढ सौंदर्य वगैरे शिकवतात..! परंतु त्यामुळे बऱ्याचदा आपलाच कॉन्फिडन्स जातो..! आणि हे करताना जबरदस्ती वगैरे अजिबातच करत नाहीत..! >>> भाषेचं सौंदर्य आनंदासाठी वाचावं. ते व्यवहारात वापरू नये हा माझा सल्ला आहे. व्यवहारात रोखठोक असावं लागतं. चालू भाषा यायला लागते. नाहीतर आपण ऑड वन आउट बनतो. वेळेला माणसं कामी येतात. माणसं पण जमवता आली पाहीजेत. पुस्तकं पण. जास्त वेळ माणसांना द्यावा.
नातेवाईकांसारखी बोकांडी बसत नाहीत ..! 'घ्यायचं तर घे, नायतर जा' म्हणतात.! त्यामुळे आणखीनच अडचण होते. >> नातेवाई़कापेक्षा पुस्तकं मोठी नाहीत. पुस्तकं छंद आहेत. माणसं जमवणं ही गरज आहे. मी माणूसघाणा आहे. पण ते बरोबर नाही. गावाकडे गेलो कि त्यांच्या अंधश्रद्धांना मी विरोध करत नाही. त्याचा फायदा होतो.
बाकीचे मुद्दे वाचायला गोड
बाकीचे मुद्दे वाचायला गोड आहेत. पण व्यवहारात अशी साहीत्यिक भाषा चालत नाही.
गारंबीचा शारुक, पूर्वी
गारंबीचा शारुक, पूर्वी माणसाला खूप म्हणजे प्रचंड शारीरीक मेहनत करावी लागे तेव्हा वाचत बसणं शक्यच न व्हतं पण आता, विज्ञानामुळे, रोगांना आळा बसतो, आयुष्मान वाढते. त्यात आधुनिक उपकरणांमुळे, वेळच वेळ वाचतो. अशा वेळी मनाला सकारात्मक, विधायक कार्यात गुंतविणे म्हणुन पुस्तकांचा खूप उपयोग होतो - हा झाला अगदी mundane, सरधोपट उपयोग.
पण वाचनामुळे जो आनंद मिळतो, मेंदूत जी काही केंद्रे लिट अप होत असतील/नसतील, संप्रेरके स्त्रवत असतील त्यांचाही विधायक परीणाम असेलच की आयुष्यात. माणसाला छंद हवा हे तर तुम्हाला मान्य आहे?
<<<हाहा. मामा पण सहमत झाले
<<<हाहा. मामा पण सहमत झाले म्हणून आभार. वाचन करू नये असे कुठे म्हटलेय ?>>>
वाचन करणारे फक्त वाचन करत बसतात दुसरं काही करत नाही अशा अर्थी तर लिहीलंय ना.
<< पुस्तकं छंद आहेत. >>
<< पुस्तकं छंद आहेत. >>
बरोबर, कुणाला वाचनाचा छंद असतो, कुणाला सोशल मीडियावर वेळ वाया घालवायचा छंद असतो, तर कुणाला इतर कुठला. यात चूक किंवा बरोबर असा प्रश्न कुठे आहे? मी पुस्तकं वाचतो कारण त्यामुळे माझा वेळ चांगला जातो, इतर कुणाला त्रास होत नाही आणि वाचनामुळे काहीतरी शिकायला मिळतं मला. इतकं सोपं आहे ते.
<< आपण वाचत नाही हे अभिमानाने सांगता यायला हवे ठणकावून >>
Education...has produced a vast population able to read but unable to distinguish what is worth reading - George Macaulay Trevelyan
आइडी नाव आणि फोटो आवडला.
आइडी नाव आणि फोटो आवडला.
वाचनाने मथ्थडपणा येतो.
पाच पाटील एक नंबर प्रतिसाद.
पाच पाटील एक नंबर प्रतिसाद.
अतिरेक कोणताही चांगला नाही.
अतिरेक कोणताही चांगला नाही. वाचनाचे अतिवेड माणसाला एकलकोंडा बनवते. व्यवहारात माणसे ओळखण्याचे तंत्र हे त्यांच्यात राहूनच समजते. यशस्वी होण्यासाठी ते गरजेचे असते. त्याच प्रमाणे अजिबातच वाचन नाही हे पण चांगले नसते. ज्यांचा नाईलाज आहे त्यांची गोष्ट वेगळी. ज्याला शक्य आहे त्याने पुरेसे वाचावे. व्यक्तिमत्व विकासासाठी वाचावे. विचारात सुस्पष्टता येण्यासाठीही वाचावे.
ज्यांचा व्यवसाय शिक्षकी पेशा आहे किंवा लेखक, कवी असा आहे त्यांच्यासाठी पुरेसे वाचनाचे मापदंड वेगळे असतील. इतरांसाठी वेगळे. वेळात वेळ काढून आनंदासाठी ज्याला शक्य आहे तो वाचतोच. हल्ली मात्र सोशल मीडीयात लिहीण्यासाठी लोक वाचतात असे वाटते. (कोणतीही कृती सोशल मीडीयात समजली पाहीजे असे वाटणे पहायला मिळते)
वाचनाला शिस्त असावी. समतोल साधणे सर्वात उत्तम.
पुरेसे वाचावे हे
पुरेसे वाचावे हे व्यक्तीसापेक्ष झालं
पुरेसे म्हणजे किती याला काहीही मापदंड नाही
व्यक्तीसापेक्षच आहे.
व्यक्तीसापेक्षच आहे.
शाहरूखला एकेकाळी वाचनाचे फार
शाहरूखला एकेकाळी वाचनाचे फार वेड होते
पण शिल्पा शेट्टी एकदा त्याला म्हणाली, बेट्या पुस्तके खूप वाचली असशील, पण एखादा चेहरा वाचला आहेस का कधी?
त्यावर तो हो म्हणाला. नजरे नजरेत लयं वाचलीत म्हणाला.
मी सुद्धा ऑफिसहून ट्रेनमधून येताना मग तेच करायचो. चालत्या गाडीत पुस्तके वाचून डोके गरगरवून घेण्यापेक्षा ईथे तिथे नजरा भिडवायचो
म्हणूनच तुमचं असं झालं सर
म्हणूनच तुमचं असं झालं सर
शारूकने नजरेला नजर भिडवली इथे
शारूकने नजरेला नजर भिडवली इथे तिथे नाही ओ
Pages