पोपट झाला रे

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 January, 2022 - 01:21

आयुष्यात कधी तुमचा पोपट, फजिती, पचका झाला असेल तर न लाजता ईथे लिहा आणि त्या आठवणींना पुन्हा उजाळा देत स्वत:वरच हसून घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्र्र्र्र एकदा नशीब फक्त नवर्‍यापुढेच पोपट झालेला. मी 'अल्टिरीअर मोटिव्ह' च्या जागी 'इन्टिरीअर मोटिव्ह' म्हटलेले Sad

चला, किस्से येऊ लागलेत. आपणही धागा पुढे नेऊया.

पहिल्या किश्याशी सिमिलर किस्सा आयुष्यात कैक वर्षांपूर्वी घडलेला. आणि तो जास्त भयानक होता Happy

तेव्हा मी अकरावीला किर्ती कॉलेजला होतो. शैक्षणिक कारकिर्दीत खालसा, किर्ती, विजेटीआय, एसपी, वालचंद, पुन्हा विजेटीआय... एखाद्याने जॉब बदलावे तसे माझे बरेच कॉलेज बदलून झालेत Happy तेव्हा जरी मी किर्तीला असलो तरी खालसाला पडीक असायचो. त्यामागचे कारण पुन्हा कधीतरी. स्वतंत्र धाग्याचा विषय मी असा प्रतिसादात वाया घालवणार नाही Wink

पण सांगायचा मुद्दा असा, किर्तीला माझा एकही मित्र नव्हता. अकरावीला तरी नव्हता. नाही म्हणायला एक पोरगा होता, पण तेव्हाच्या लँडलाईनवर फोनाफोनी व्हावे असा काही याराना नव्हता. माझ्या माणूसघाण्या स्वभावाला ते साजेसेच होते. माझी त्या कॉलेजमधील हजेरीसुद्धा जवळपास शून्य टक्के होती. आणि मला पाहिल्या घटकचाचणीतही जवळपास शून्य मार्क्स पडले होते. बायोलॉजीच्या पेपरला तर काहीच येत नसल्याने किडनीचे आणि एका फूलाचे चित्र काढून आलेलो. गंमत म्हणजे किडनीतही काय काढावे हे न समजल्याने त्यातही फूलाफुलांचे डिजाईन काढले होते. परीणामी शून्य मार्क्सच मिळाले होते. कारण चित्रांतील एकाही भागाला नाव दिले नव्हते. कारण तेवढे ईंग्लिश तेव्हा यायचेही नाही Happy

तर अशी अकरावीची सुरुवात झालेला मी मराठी मिडीयमचा मुलगा जेव्हा पहिल्या सेमीस्टरची एक्झाम जवळ आली तेव्हा काय दिवे लावणार होतो हे माझे मलाच कळत नव्हते. नेमकी तारीख आठवत नाही पण समजूया साधारण ७ सप्टेंबरला परीक्षा सुरू होणार होती. अशी हवा होती की परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे. मुळातच काही अभ्यास न झाल्याने आणि करायची ईच्छाही नसल्याने परीक्षा पुढे ढकलली जाईलच या आशेवर मी होतो. मनाशी निश्चय केलेला की ती फायनल तारीख समजल्यावरच अभ्यासाला सुरुवात करायची. सुदैवाने परीक्षा पुढे ढकलली गेली. ७ ची तारीख २१ झाली. म्हणजे तब्बल १४ दिवस मिळाले म्हणत मी खुश झालो. आणि आनंदात टाईमटेबल उतरवून घेतला.

त्यात पहिलाच पेपर गणपतीच्या दुसर्‍या की तिसर्‍या दिवशी होता हे आठवतेय. तो मराठीचा असल्याने फारसा अभ्यासही केला नव्हता. तसा पुढच्यांचाही काही केला नव्हता म्हणा. कारण गणपती म्हणजे आमच्याकडे फार मोठा सण. परीक्षा पुढे जात गणपतीत पेपर आले यानेच डोक्याला मोठा शॉट लागलेला. आता जे होईल ते होईल गणपती बाप्पा मोरया म्हणून निर्धास्त होतो. कारण घटक चाचणीपेक्षा वाईट आयुष्यात काही होणार नाही हा विश्वास होता. तसेच शून्य मार्काचे पेपर शिक्षकांच्या नजरेला नजर मिळवून स्विकारल्याने अंगी एक कोडगेपणाही आला होता.

तेव्हा आमचा घरचा गणपती नुकतेच मोठ्या काकांकडे अंधेरीला बसवायला सुरुवात झालेली. आम्ही सारी चुलत भावंडे तिथेच जमायचो. तेव्हा मी त्या सगळ्यांमध्ये एक हुशार मुलगा म्हणून ओळखलो जायचो. कारण चौथी आणि सातवीत स्कॉलरशिपमुळे वर्तमानपत्रात फोटो वगैरे आलेला. त्यामुळे पेपरच्या आदल्या दिवशीही अभ्यास न करता मी गणपती एंजॉय करताना बघून लोकांना वाटले की हा खरा हुशार मुलगा. आधीच अभ्यास आटोपून मजा करतोय. आता त्यांना काय माहीत ईतक्या लहान वयातच मी आयुष्यात ईतके सारे चढ उतार पाहिले होते Happy

असो, तर तिथून दुसरे दिवशी बाप्पांच्या पाया पडून मी कॉलेजला निघालो ते आणखी काही शून्ये आपल्या बायोडाटामध्ये जोडायला...

येनी गेसेस??? काय पोपट झाला असावा???

आदल्या रात्री Lol
उल्कावर्षाव बघायला म्हणून खास नोव्हेंबरच्या थंडीत ताम्हिणीला गेले होते ग्रुपबरोबर. झालाच नाही उल्कावर्षाव! एरवी कुठल्याही रात्री दिसतात तशा दोनतीन उल्का दिसल्या जेमतेम!

काय पोपट झाला असावा???

पोपट झाला असावा हे पुरेसे नाही का? आता काय पोपट झाला हेही सांगायचं म्हणजे सर तुम्ही फारच परिक्षाबघून राहिले राव

शाळेत पहिल्यांदा भाषण द्यायला गेलो. भाषणही मीच तयार केलं होतं. सुरवात: "आज गांधी जयंती आहे हे आपणा सर्वास ठाऊक आहेच. त्यानिमित्ताने मी चार शब्द बोलणार आहे".

पण एक पंचाईत खाली माझ्या भाषणा आधीच एकाने दोन शब्द बोलणार आहे आणि एकाने चार शब्द बोलणार आहे असे भाषणात म्हटले.

मग माझा नंबर आल्यावर मी स्टेज वर जाऊन म्हणालो "आज गांधी जयंती आहे हे आपणा सर्वास ठाऊक आहेच. त्यानिमित्ताने मी चार आठ शब्द बोलणार आहे".

हे ऐकताच स्टेजवरील शिक्षक मंडळींना हसू आवरले नाही, सगळे मोठ्याने हसले. त्यातील एकांना तर अजिबात रहावले नाही. "सगळे चार शब्द म्हणताहेत... म्हणुन या आठ शब्द... हॅ हॅ हॅ!"
मग सगळे मुलंही हसायला लागले.
मग मी स्टेजवरून पळून गेलो.

मित्र मला नंतर आठ शब्द म्हणुन चिडवायचे. ते पुढे मी एकदा वादविवाद स्पर्धेत उत्स्फूर्त भाषण देइ पर्यन्त.

आठ शब्द Lol

बाई दवे, तुम्ही पोस्टमध्ये तुमच्या भाषणात चार शब्दच लिहिले आहे ते आठ शब्द करा

येनी गेसेस??? काय पोपट झाला असावा???

येस्स, जेव्हा कॉलेजला पोहोचलो तेव्हा सगळीकडे शुकशुकाट. दूरदूरपर्यंत फक्त दोनच माणसे दिसली. दोघेही वॉचमन. त्यातल्याच एकाला विचारले,

आज परीक्षा होती ना?
तो चक्रावला... म्हणाला कॉलेज बंद आहे. मलाच वर विचारले, कुठल्या कॉलेजचा तू?
मला अगदी गदगदून आले, अपने ही कॉलेज मे पराया कर दिया वगैरे..
म्हटले, मामा अहो याच कॉलेजचा. अकरावी सायन्सचा. आजपासून परीक्षा सुरू होणार होती ना??
त्याने नोटीस बोर्डाकडे हात दाखवून तम्बाखू मळायला घेतली.

मला नोटीस बोर्डावरचा टाईम टेबल वाचताना वेगळेच टेंशन. परीक्षा पुढे ढकलली गेलीच नव्हती का? ती या चौदा दिवसात गणपतीच्या आधीच जुन्या टाईमटेबलनुसार संपली का? आपले शून्य मार्क बुडाले का??

पण तसले काहीही नव्हते. परीक्षा पुढेच ढकलली गेली होती. पण ७ सप्टेंबरची २१ सप्टेंबर न होता २१ ऑक्टोबर झाली होती. परीक्षा १४ दिवसांनी नाही तर १ महिना १४ दिवसांनी पुढे ढकलली गेली होती. तेव्हा नोटीस बघताना परीक्षा ईतकी पुढे ढकलली जाईल हे माझ्या डोक्यातही नव्हते. मला अक्षरशः हसावे की रडावे कळले नाही. अ‍ॅक्चुअली हसलोच असेन तेव्हा. कारण आंधळा मागतो एक डोळा, देव देतो तीन असे माझे झाले होते.

पण आता वेगळेच टेंशन. ते माझ्या काकांच्या घरी जमलेल्या माझ्या नातेवाईकांना काय सांगायचे. या हुशार मुलाला परीक्षेचे योग्य वेळापत्रकही माहीत नव्हते...
मग जाऊन सांगितले की कॉलेजनेच आयत्यावेळी म्हणजे आदल्या दिवशीच टाईमटेबल पुन्हा बदलले आणि आम्हाला आजच ते कॉलेजला गेल्यावर कळले. सगळी मुले आनंदात परत गेली. मी मात्र वैतागलो, कारण माझा अभ्यास झाला होता.... माझी ईमेजच अशी होती की सगळ्यांना हे पटलेही. आणि ज्या शिव्या मला पडणार होत्या त्या कॉलेजच्या व्यवस्थापनाला पडल्या. आज या निमित्ताने माझाच पोपट झालेला हे कबूल करताना किर्ती कॉलेजचीही माफी मागतो Happy

माझाच पोपट झालेला हे कबूल करताना किर्ती कॉलेजचीही माफी मागतो>> सर अशी माबोवर माफी मागुन कॉलेजपर्यंत पोहचेल का?

तेव्हा जरी मी किर्तीला असलो तरी खालसाला पडीक असायचो. त्यामागचे कारण पुन्हा कधीतरी. स्वतंत्र धाग्याचा विषय मी असा प्रतिसादात वाया घालवणार नाही>> हायला, मी पण खालसात नव्हते पण तीथेच पडिक असायचे (२००४-२००७).. त्यामागचे कारण तुमच्या येणाऱया धाग्यातच लिहीन..इथे प्रतिसाद वाया का घालवा

पोपट झाला असावा हे पुरेसे नाही का? आता काय पोपट झाला हेही सांगायचं म्हणजे सर तुम्ही फारच परिक्षाबघून राहिले राव>>हसून हसून डोळ्यात पाणी आलं

सरांच्या धाग्यावर शाहरुख हे ट्रोलिंग असेल तर सरांना धक्का बसेल. सर तर खंडोबाच्या धाग्यावर पण शाहरुख ला लीलया बोलवतात.
मानवजी मैने आपको क्या समझा था, और आप क्या निकले?
आप ने तो जिंदगी से सांस ही छीन ली Sad

हायला, मी पण खालसात नव्हते पण तीथेच पडिक असायचे (२००४-२००७)
>>>
मी २००६ साली शेजारच्या विजेटीआयमधून डिग्री पास आऊट झालो.. पण तेव्हा खालसाचे चक्कर नसायचे. तुम्ही कोणत्या कॉलेजला होता? त्या विजेटीआय मागचा म्हणजे युडीसीटीच्या बाजूचा झेरोक्सवाला, म्हात्रे चाय समोसावाला, या कट्ट्यावर कधी फिरत फिरत यायचा का? येत असाल तरी ओळखणे अवघड आहे म्हणा. किमान २५ हजार मुलींना पाहिले असावे तिथे सहा वर्षात चहा पिता पिता Happy

एकदम गरमागरम ताजाताजा किस्सा आहे..अगदी दोन मिनिटांपूर्वीचं झालाय पोपट.. नुकतेच बाहेर वॅाकला जाऊन आले..घराजवळ येत असताना नेहमीप्रमाणे गाणी ऐकत आणि व्हॅाट्सॲप चॅट करत करतच येत होते.. घराचा दरवाजा उघडला आणि बघते तर घरका पूरा नक्षाईच बदल गया था बॅास..दोन घर सोडून तिसऱ्याच घरात घुसले होते Lol

त्या विजेटीआय मागचा म्हणजे युडीसीटीच्या बाजूचा झेरोक्सवाला, म्हात्रे चाय समोसावाला, या कट्ट्यावर कधी फिरत फिरत यायचा का? >> नाही.. मी अरोराजवळच्या झेरोक्सवाल्याकडे जायचे.. खालसा जवळचा प्रितम कॅार्नर आणि अन्नपूर्णामधे खायचे

अगं, इथे काय लिहीत बसली.. आधी ते कुलूप-किल्ली/कोड बदल प्लीज. तुझी किल्ली त्या घराला लागली म्हणजे कदाचित त्यांनाही तुमच्या घरात येता येईल. ते ओळखीचे असतील तर ठीक. नायतर आधी आज झटपट स्टेप्स घेणे जरूरी.

सी, मी घर कधी लॅाक करून जात नाही.. नुसता नॅाब फिरवला की दार उघडतं .. माझ्या सारखेच इतर बरेच जण घर लॅाक करत नाहीत हे आज कळालं.. ज्यांच्या घरात गेले ते ओळखिचे नव्हते..सॅारी बोलून बाहेर आले.. आजपासून ते दार आतून लॅाक करतील बहुतेक

नो! नो!! नो!!! अजिबात बदलू नका.
किल्ली हरवली तर या शेजार्‍यांकडे मागायला जा. होम डीपोत न जाता ड्युप्लिकेट किल्ली कट करुन मिळाली आहे तर सोडू नका! Proud

आजपासून ते दार आतून लॅाक करतील बहुतेक >> Lol नाही! नवरा बायकोत भांडण लावून आलात तुम्ही! घर उघडं सोडतो म्हणून मला फटके पडतात नेहेमी. आता हा डेमो .. म्हणजे कोणीही घरात शिरू शकतं... जर चुकीच्या पार्टनर घरात असताना मिळाला असेल तर योग्य पार्टनरची काही खैर नाही! Biggrin

साधारण पंधरा वर्षापूवीची गोष्ट. माझे लग्न होऊन नुकतीच सौ. घरी आली होती. सौ शीच लग्न झालं होतं त्यामुळे कृपया गोंधळ वाढवू नये. ( सौ माझ्याच घरी आली होती). तिची हौसमौज पुरवण्यात दिवस चांगले चालले होते. तिचा पहिलाच नोव्हेंबर असल्याने तो साजरा करण्यासाठी आम्ही दापोलीला पिकनिकला जाण्याचे ठरवले. आम्ही नुकतेच एक विमान खरेदी केले होते. सर्वांनी ठरवले कि विमानानेच जाऊ. माझी सौ, एम ए, पीएचडी, मातोश्री, एम (ऑनर्स), पिताश्री (बालिष्टर) आणि मी स्वतः (बारावी नंतरची प्रमाणपत्रे सापडत नाहीत) असे चौघे दापोलीस विमानातून कूच करते झालो. जाताना आम्ही वरंधा घाटातून जायचे ठरवले. त्या वेळी टोल नाका असल्याने या संधीचा फायदा घ्यावा असे ठरले. रस्त्याने मीच विमान चालवत होतो. साठच्या पुढे वेग नको असे पिताश्रींनी बजावल्याने त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. हास्यविनोद करीत आणि गाण्याच्या भेंड्या खेळत आम्ही दापोलीस पोहोचलो. जेवण वगैरे करून विमानाने कर्दे या गावी पोहोचलो. दिवसभर समुद्र्वर मजा केल्यावर अंधार पडायच्या आधी निघावे असे ठरले. कारण या आधी विमानाने कुठेच गेलेलो नसल्याने हेडलाईट आणि डीपर ( डिप्पर) चालतात किंवा नाही याबद्दल काहो कल्पना नव्हती.

जाताना ताम्हणी घाटातून जायचे ठरवले होते. ताम्हणी घाटातून जात असताना ब्रेक दाबलाच जाईना. बाका प्रसंग होता. आम्ही सगळे खूपच घाबरलो होतो. तरीही एका हाताने विमानाचे स्टियरींग सौ ला पकडायला सांगून मी खाली वाकून पाहीले तर काय, ब्रेकच्या खाली फूटबॉल आलेला ! आम्ही बीच वर व्हॉलीबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन हे सगळे खेळ खेळल्यानंतर ते सगळं साहीत्य मागच्या सीट्खाली टाकलेलं. हा बॉल घरंगळ येऊन कधी ब्रेकखाली आला कळलंच नाही. जेव्हां बॉल काढला तेव्हां ब्रेक लागायला सुरूवात झाली. सगळ्यांच्या जिवात जीव आला.

आम्ही आता वर चढून जंगलात आलो होतो. आजूबाजूला चिटपा़खरूही नव्हते. आमचे विमान आणि आम्ही इतकेच काय ते हलत होतो. अंधार मी म्हणत होता. आणि इतक्यात रस्त्यावर काहीतरी चमकलं. पुन्हापुन्हा पाहील्यावर खात्रीच पटली. शंकाच नको. दोन डोळे होते ते. सर्वांची भीतीने गाळणच उडाली. अचानक कुठलं जनावर पुढ्यात येऊन ठाकलंय याची कल्पना नव्हती. मागच्या मागे जाणं धोक्याचं होतं. वळणं वेडीवाकडी होती आणि विमान रिर्व्हर्समधे चालवायची माहिती नव्हती. घरी गेल्यावर काशीहून तज्ञांना बोलावून शिकून घ्यायचा मनोमन निश्चय केला. पण सध्या वेळ मारून न्यावी लागणार होती.

पिताश्री मनाचा हिय्या करून खाली उतरले. ( आमच्यापुढे भविष्यकाळ होता तर पिताश्रींकडे भूतकाळ ). हेडलाईटच्या प्रकाशात चमकणा-या डोळ्यांकडे ते सावकाश जाऊ लागले. मला हेडलाईट बंद करायला लावला. जवळ गेल्यावर ते डोळे इकडे तिकडे पळू लागले. पिताश्रींनी देखील त्यांचा पाठलाग केला आणि जवळचा टॉर्च काढून त्यांच्यावर प्रकाशझोत सोडला. त्याबरोबर डोळे गायब झाले.

पिताश्री विजयी मुद्रेने परत आल्यावर विमानातील दोन्ही महिलांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहीले. पिताश्रींनी सांगितले आता घाबरायचं कारण नाही. पण कुठले जनावर होते हे विचारल्यावर पिताश्रींनी हसतच उत्तर दिले, तो एक मोठ्या आकाराचा उंदीर होता. हे ऐकताच मातोश्री आणि सौ किंचाळल्या. त्याबरोबर आम्ही हसत सुटलो.

आजही तो प्रसंग आठवल्यावर आम्ही खूप हसतो. पोपट झाला तो वेगळाच पण त्याच वेळी जर खरंच एखादं मोठं जनावर असतं तर ? या विचाराने अंगावर शहारा येतो.

(हा किस्सा मागच्या कुठल्यातरी एका जन्मातला आहे).

ताम्हणी घाटातून जात असताना ब्रेक दाबलाच जाईना. बाका प्रसंग होता. आम्ही सगळे खूपच घाबरलो होतो.
>>> मनाचा ब्रेक मारायचा ना... मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक...

मनाचा ब्लेक या जल्मात सलांमुले समजला. त्या जल्मात सल माहित नव्हते. तर ब्ल्रेक कुतुन माहित असनार ?

दोन घर सोडून तिसऱ्याच घरात घुसले होते Lol
>>>
आमच्या ऑफिसला असाच एक किस्सा फेमस आहे. काही जण फिनलँड ऑफिसला गेले होते. तिथे कंपनीची राहायची सोय होती. ऑफिसपासून फार अंतर नाही. तर सारे जण रमत गमत चालत जायचे. आसपासची सारी घरे, बंगले थोड्याफार फरकाने सारखेच. तसे असेच एकदा सर्व मिळून रूमवर परतत असताना एक जण मागे राहिला आणि चुकून भलत्याच अपार्टमेंटमध्ये शिरला. त्यात त्याची ईंग्लिश बोलायची बोंब. ईंग्लिश समजायचीही बोंब. म्हणजे तो डिटेलर होता, ईंजिनीअर नव्हता. आपल्या कामात चोख होता. ईंग्लिशचा प्रॉब्लेम असला तरी कामापुरते कळायचे. म्हणून चढवलेला फिनलँडच्या विमानात. पण त्या अपार्टमेंटध्ये जी ईंग्लिश फिनिश लोकं त्याला भेटली त्यांचा त्याला एक शब्द कळेल तर शप्पथ. त्यात घाबरून आणखी ततपप करू लागला. सोबत नेमके ऑफिसचे आयडीही नव्हते. हे ही काय कमी म्हणून त्याला भलीमोठी दाढीही होती. त्यांनीही मग रिस्क न घेता पोलिस की सिक्युरीटी गार्ड बोलावून त्याला अटक केली. रात्री ईतरांनी शोधाशोधी फोनाफोनी करून त्याला शोधला. पण मधल्या काळात ईथे भारतातही खबर पोहोचली होती के रिझवान खो गया.. बिच्चारा.. आजही तो किस्सा सांगताना त्याच्या चेहर्‍यावर हसू सोबत थोडे भयही दिसते. पोपट झाला तरी कसे म्हणावे.

@ शांत माणूस, छान किस्सा. अजून येऊ द्या Happy
तुमच्या किस्स्यावरून मलाही लहानपणी सश्याच्या शिकारीला गेलो असताना वाघ दिसल्याचा आणि रानडुक्कर मारल्याचा किस्सा आठवला. कदाचित ईथे लिहिलाही असावा.

<<ट्रोलिंग करु नका. मौज मस्ती ठीक आहे.>> या कॉमेंटवर काहीजण तूटून पडतील, पंधरा वीस पोस्टी तरी ही कॉमेंट घेईल असे वाटले होते.

पण तसे काहीच झाले नाही, अन माझा पोपट झाला.

पण तसे काहीच झाले नाही, अन माझा पोपट झाला. >>> ट्रॉलिंग नको हे सरांच्या धाग्यावर सांगितल्यावर अजून काय होणार ? Proud

शांत माणूस तुम्ही गेल्या जन्मात मुक्तीपीठावर होता काय
तिथे एक काकांनी असाच किस्सा लिहिला होता सेम

Pages