Submitted by ऋन्मेऽऽष on 4 January, 2022 - 01:21
आयुष्यात कधी तुमचा पोपट, फजिती, पचका झाला असेल तर न लाजता ईथे लिहा आणि त्या आठवणींना पुन्हा उजाळा देत स्वत:वरच हसून घ्या
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्यावरून हा धागा सुचला ती
ज्यावरून हा धागा सुचला ती परवाचीच घटना.
८३ चित्रपटाला जातोय याचा गावभर ढिंढोरा पिटून, व्हॉटसप स्टेटसवर पिक्चरचा पोस्टर लाऊन त्याखाली match begins at 10.55 with popcorn at 10.45 असे लिहून गाजावाजा करून झाला.
पिक्चरला आम्ही शक्य तितके सकाळच्या शो ला जातो कारण मुले झोपलेली असतात. तेवढेच आज्जीला त्यांना सांभाळायचा त्रास कमी. पण यावेळी फक्त मुलालाच सांभाळायचे होते. कारण पहिल्यांदा थिएटरला पिक्चर बघायला मुलगी सोबत होती. यामुळे एक्सायटमेंट देखील डबल होती. किंबहुना पिक्चर थ्रीडी असल्याने ट्रिपल होती. त्यामुळे वेळेच्या आधीच मॉलला पोहोचलो. शास्त्रानुसार सेल्फी वगैरे काढून झाले. वॉशरूम जाणे उरकून झाले. आणि आमच्या स्क्रीन नंबर ५ च्या दारात उभे राहिलो असताना ठिक 10.54 वाजता आम्हाला समजले की शो 10.55 am चा नाही, तर 10.55 pm चा होता.
झाला पोपट !
नुसता पोपट नाही तर सकाळचाच थ्रीडी शो हवा या नादात घरापासून लांबच्या थिएटरला आलेलो. त्यामुळे आता ईथवर आलेले फुकट, पुन्हा परत जा, रात्री एवढेच अंतर कापून पुन्हा या, ते सुद्धा ११ वाजता या, पिक्चर संपणार २ वाजता.. तिथून घरी जाणार कधी, झोपणार कधी, उद्याच्या ऑफिसचे काय, ईतकेच नाही तर नुकतेच सुरू केलेल्या मॉर्निंग वॉकलाही खाडा.. मुले झाल्यावर आजवर कधी ईतक्या उशीराचा शो पाहिला नव्हता. त्यामुळे ते कसे मॅनेज करायचे हे एक भलतेच टेंशन. एकाचवेळी ईतक्या साऱ्या विचारांची गर्दी होत डोक्याला असला शॉट लागला, असला शॉट लागला.. की पाच मिनिटे रिअलाईजच नाही झाले की तिकीटे बायकोने बूक केली होती. पण ते लक्षात येताच असा फुटलो, असा फुटलो.. की पुढची दहा पंधरा मिनिटे हसणे आवरतच नव्हते.
आजवर असले घोळ मीच घालत असायचो. एक बायकोनेही घातला ज्याचे खुद्द आपणच साक्षीदार आहोत याचा काय आनंद वर्णावा. त्यामुळे आपलाही भलामोठा पोपट झाला आहे हेच विसरून गेलो.
तिथून मग मॉलमध्ये खाणेपिणे, फिरणे, ईतक्या वर्षांनी रात्रीचा शो बघायचा अनुभव घेणे, ते सुद्धा लेकीसोबत. आणि या सर्वात चित्रपटही प्रचंड आवडणे असा दिवस खूप छान गेला. पण तरी त्या दिवशी सकाळी पोपट व्हायचा तो झालेलाच
मजेदार धागा.
मजेदार धागा.
मला पटकन आठवलेला किस्सा म्हणजे
त्यावेळी मला आतासारखे सिनेमांचे ज्ञान नव्हते. एका संध्याकाळी ऑफिसातून येता येता अवतार सिनेमा बघायला गेलो होतो. थिएटरमध्ये गेल्यावर नवरा म्हणाला अक्षय कुमारचा नवा 3डि सिनेमा आहे. थोडा उशिर झाला असल्याने, थिएटरमध्ये पोस्टर पाहून पण मला कळले नाही हा इंग्रजी सिनेमा आहे. अशा गेटप मधे अक्षयकुमार असा दिसत असावा असेच मला वाटलं.
सिनेमा सुरू झाला पाच मिनटं होऊन गेली होती. अजून अक्षय कुमार का दिसेना म्हणून शोधत होते.मग कळाले कि माझा पोपट केला गेला आहे.
अजूनही अवतार सिनेमा लागला कि घरातले चिडवून हसून घेतात.
किल्लीचा "अपेक्षा आणि वास्तव"
किल्लीचा "अपेक्षा आणि वास्तव" धागा आहे. त्यात आणि इथे काय फरक अपेक्षित आहे??
सर, पोपट कसा होतो?
सर, पोपट कसा होतो?
तुमचा एखादा बहारदार सत्य (किंवा कसेही) किस्सा टाकलात तर आम्हाला पण ल्हिता येयील.
https://images.app.goo.gl
https://images.app.goo.gl/8PtU6eqijwVUVawp6
अशा गेटप मधे अक्षयकुमार असा
अशा गेटप मधे अक्षयकुमार असा दिसत असावा असेच मला वाटलं.
सरांनी पुन्हा एकदा हातखंडा
सरांनी पुन्हा एकदा हातखंडा उपाय अजमावून शतकी प्रतिसाद मिळतील असा धागा विणला आहे
कृपया त्यांना नवा ज्वलंत विषय मिळेपर्यंत (म्हणजे नाक डाव्या नाकपुडीने शिंकरणे योग्य का कसे वगैरे ) या धाग्याला शतकापर्यंत नेऊ या
सर मायबोली साठी इतके अपरंपार कष्ट घेतात त्याची जाणीव ठेवा जरा तरी
घरचेऑफिसचे काम, परत मॉर्निंग वॉल्क (बोले तैसा लिहे, त्याची वंदावी ..... इथे पाऊले बसत नाहीये मीटर मध्ये, सरांचा काय वंदावी बरे आता ) इतकं करूनही ते आपल्यासाठी इतका वेळ काढतात तर आपली एक सामाजिक जबाबदारी ठरते सरांना सपोर्ट करणे
ते स्वतही जोमाने प्रयत्न करतील स्वतंत्र प्रतिसाद देऊन देऊन धागा हलायला पण आपणही थोडे कष्ट घ्या
@ सीमंतिनी, हा धागा का?https:
@ सीमंतिनी, हा धागा का?
https://www.maayboli.com/node/80239
माझा पहिला किस्सा वा मृणाली यांचा किस्सा ईथे फिट होत नाही असे वाटते. किंबहुना त्या धाग्यावर ईन जनरल पोस्ट आल्यात. मीम्स आलेत. त्यावरून वादही झालेत. पण वैयक्तिक कोणाचे पोपट झाल्याचे किस्से नाहीत.
वर माझ्या पहिल्या किस्स्यात एएम चे पीएम झाले तसेच एक घोडचूक मी सुद्धा केलेली कॉलेजात असताना जे पाहून घरच्यांनी कपाळाला हात मारलेला. थोडी कामातून फुरसत मिळताच टाकतो तो किस्सा..
सरांना कोणीतरी मी केलेला
सरांना कोणीतरी मी केलेला वेंधळेपणा या धाग्याची लिंक द्या
पण त्यानंतरही त्यांचा किस्सा वेगळा आहे असे ते म्हणू शकतात
त्यामुळे आपल्या जबाबदारी वर द्या
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/7293
हा घ्या.
घरचेऑफिसचे काम, परत मॉर्निंग
घरचेऑफिसचे काम, परत मॉर्निंग वॉल्क (बोले तैसा लिहे, त्याची वंदावी ..... इथे पाऊले बसत नाहीये मीटर मध्ये, सरांचा काय वंदावी बरे आता )
पीएल.......तेवढं "कुल्हे" बसतय कां बघा? (पण मग त्यासाठी आधीचा शब्द पण बदलावा लागेल )
माझी एकदा जबरदस्त फजिती झाली
माझी एकदा जबरदस्त फजिती झाली होती.
कॉलेज फेस्टमधे 4 दिवस काय कपडे घालायचं ते ठरलेलं होतं. कसं काय माहित नाही पण दुसर्या दिवशी साडी नेसायची होती तर मी आणि माझी एक मैत्रिण दोघीच आदल्या दिवशी साडी नट्टापट्टा करून गेलो. पोपट.
बाकी मुली कंफ्युज. आज की उद्या
माझं घर जवळ असल्याने पटकन घरी जाऊन दुसरे कपडे घालून आलो.
कुल्हे बेक्कार हसतोय
कुल्हे
बेक्कार हसतोय
आज मायबोलीवर काहीतरी मस्त
आज मायबोलीवर काहीतरी मस्त लिखाण वाचायला मिळेल म्हणून लॉगिन केले,...ले ...पोपट झाला....
मी आणि माझी एक मैत्रिण दोघीच
मी आणि माझी एक मैत्रिण दोघीच आदल्या दिवशी साडी नट्टापट्टा करून गेलो >>> मला हे दर नवरात्रीला टेंशन असायचे. आमच्या ऑफिसमध्ये पोरीच कलर कोड फॉलो करायच्या. मुले नाही. अश्यात आपल्याला माहीत नसल्याने चुकून कोणी पोरगा सेम रंगाचे कपडे घालून आला की त्याचे लोकं जाम खेचायचे
यावरून ईथे एक विनोदी लेखही लिहिलेला.. तो आठवला
येल्लो येल्लो डर्टी फेल्लो !! - https://www.maayboli.com/node/50969
@ च्रप्स तुम्ही लिहा की एखादा किस्सा.. आयुष्याने ज्याचा कधी पोपट केला नाही असा माणूस भूतलावर नसेल
च्रप्संचा किस्सा आवडला.
च्रप्संचा किस्सा आवडला.
सरांचा उद्देश सफल झाला आशा
सरांचा उद्देश सफल झाला आशा रीतीने
सलमानचे देखील चित्रपट का धंदा करतात हे कळलं असेलच लोकांना
सर तुम्ही कितीही अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करा
मी तुमची स्तुती गात रहाणारे
सर असे का वागतात कळत नाही. जे
सर असे का वागतात कळत नाही. जे भक्त आहेत त्यांना दूर लोटतात. जे वाद घालतात त्यांनी अगा जे म्हटलेचि नाही ते कोट करून प्रतिवाद करतात. मी तर सरांच्या या शैलीचा जबरा फॅन आहे.
शाहरूखने जर सरांना असे अनुल्लेखाने मारले तर त्यांना काय वाटेल ?
त्याचं काय झालं आहे सरांना
त्याचं काय झालं आहे सरांना मायबोली वर टीका व्हायची सवय होती इतके वर्ष, ती ते मस्त एन्जॉय करत
आता भक्त जमा झालेत तर ते जरा भांबावून गेले आहेत
लवकरच ते चिंतन मनन करून यावरही तोडगा (कोडगा ला कसलं भारी यमक जुळतंय) काढतील
नाहीच जमले तर त्यांचे ड्युआयडी अंगावर सोडतील
ते चिडत नाहीत हा मुखवटा तर त्यांना दूर करता येत नाही
त्यामुळे सौजन्याने करतील जे काही करायचं ते
तोवर आपण सरांचे पावले किंवा जो कुठला अवयव हाती लागेल तो सोडायचा नाही
कितीही सरांनी दुर्लक्षित ठेवलं तरी आपली भक्ती सुरूच ठेवायची
कधी ना कधी आपल्या श्रद्धेला फळ येईलच
अहं सरास्मि
फूल ना फुलाची पाकळी म्हणून
फूल ना फुलाची पाकळी म्हणून बेलाचे फूल अर्पण करतो
आपकी पारखी नजर और निरमा सुपर
आपकी पारखी नजर और निरमा सुपर
धन्यवाद
धन्यवाद
सुना है कि यहा से रिपोर्ट चली जाती है हर रोज
चार पाच पेग्ज पण उतरत असतील
चार पाच पेग्ज पण उतरत असतील ना बाफ वाचल्यावर
त्यातून सर वॉल्क टॉल्क हुमायुन नेचर असे स्वनिर्मित शब्दप्रयोग करणार
एक वेगळा माणूस ठेवावा लागत असेल सरांचे म्हणणे समजावून सांगणारा
ब्लॅक रॉबिन ची नेमणूक करण्यात
ब्लॅक रॉबिन ची नेमणूक करण्यात आली आहे असे ऐकले आहे.
ट्रोलिंग करु नका. मौज मस्ती
ट्रोलिंग करु नका. मौज मस्ती ठीक आहे.
ट्रोलिंग नाही सर, मजाच सुरु
ट्रोलिंग नाही सर, मजाच सुरु आहे, सरांचे कसले डोंबल ट्रोलिंग करणार, ते त्यावरही धागा काढतील किंवा काढलाही असेल.
ते आता आमच्याकडे लक्ष देत नाहीत, तोवर आम्ही असेच टाहो फोडत राहणार
आता इतके प्रतिसाद कसले म्हणून
आता इतके प्रतिसाद कसले म्हणून कुतुहलाने येणाऱ्या लोकांचाही पोपट झालाच असेल की. काहीजण मान्य करतील काही जण नाही
जनरली पोस्टची पहिली एक-दोन
जनरली पोस्टची पहिली एक-दोन वाक्ये वाचली की ती पोस्ट पूर्ण वाचावी का उडी टाकावी याचा अंदाज येतो. मग ती पोस्ट कोणाची असेल याचा ठोकताळा मनात तयार होतो, उडी टाकली की तो अंदाज बरोबर का चूक हे बघुन पुढे असा साधारण अल्गोरिदम मनात पक्का झालेला आहे.
पूर्वी उडी मारलेल्या पोस्ट ऋन्मेशच्या असायच्या. हल्ली आशूचॅंपला उडी पडते आणि ऋन्मेशच्या पोस्ट वाचल्या जाऊ लागल्या आहेत. असा दोघांनी एकदम पोपट केला आहे.
याला म्हणतात गुण नाही तर वाण
याला म्हणतात गुण नाही तर वाण घेणे
भक्तीरसाने भरपूर अशी ही पोस्ट आहे तुमची
धन्यवाद, मी तर भरून पावलो, सरांशी तादात्म्य पावू लागल्याची पहिली लक्षणे
गेल्या महिन्यात चंद्रग्रहण
गेल्या महिन्यात चंद्रग्रहण होते तेव्हा इतका दीर्घकाळ '६०० वर्षांतुन एकदा' दिसणारे ग्रहण आहे हा भाग मुलाने फारच सिरियसली घेतला. मग आम्ही त्या एक्सायटमेंट मध्ये आदल्या रात्रीचा गजर लावुन झोपलो. मी चारला उठून बघितलं तर आकाश अगदीच ढगाळ होतं, बाहेर तापमान मायनस १५ होतं, तरी जॅकेट घालून डोळे चोळत घरा भोवती एक चक्कर मारली. पण काहीच दिसेना. मग मुलाला काही उठवलं नाही. आत येऊन युट्युबवर लाईव्ह दाखवत असतील तर ते बघू म्हणून शोधलं तरी काही सापडलं नाही. आश्चर्य आहे म्हणत परत झोपलो.
दुसर्या दिवशी काहीच बातम्या नाहीत बघितल्यावर ट्युब पेटली. मग परत अलार्म लावला. त्या रात्री मात्र ग्रहण दिसे पर्यंत अगदी निरभ्र आकाश होतं, बेडरुमच्या खिडकीतूनच छान दिसलं ग्रहण.
Pages