नक्षत्रांची शांती - भाग १ - https://www.maayboli.com/node/80761
........................................................
पहिल्या भागातील नागबली नारायणाची पारायणे करून झाली असतील तर आपण आता दुसर्या भागाकडे वळूया...
आशा करतो हा देखील तसाच ओघवान होईल
तर, आता मी मोठा झालो होतो. खरे तर आपले मूल कुठल्या बाबतीत किती मोठे झालेय हे आईवडीलच ठरवत असतात. त्यांनी मला देवधर्म मानण्या न मानण्याबात व्यक्तीस्वातंत्र्य द्यावे ईतका मोठा मी त्यांच्यासाठी झालो होतो.
मी नवीन नवीनच नास्तिक झालो होतो. त्यामुळे आस्तिकांची टिंगल टवाळी उडवायचे कामही नित्यनेमाने करत होतो. घरी मात्र तो आगाऊपणा टाळायचो. कारण आईवडिलांनी दिलेल्या या व्यक्तीस्वातंत्र्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक आदर निर्माण झाला होता. जेव्हा ईतर भावंडांना त्यांचे आईवडील देवधर्माबाबत कसलीही तडजोड करू देत नव्हते तेव्हा माझे मंदिरात न येणे, गर्दी असेल वा रांग असेल तर सत्यनारायणाच्या पुजेचे दर्शन टाळणे, आवडीचा नसेल तर प्रसाद न खाता गपचूप आईच्या हातात सरकावणे, भूक लागली असेल तर देवाच्या आधी जेवणे, ईत्यादी प्रकार घरी चालवून घेतले जात होते. पाहुण्यांकडे जाताना मात्र अमुकतमुक वागू नकोस, बरे दिसत नाही अशी विनंती केली जात होती. तशी विनंती करण्यातही त्यांचाच मोठेपणा होतो हे उमजून मी ती मान्य करत होतो.
हळूहळू त्यांनी नातेवाईकांना आणि बाहेरच्यांनाही कल्पना द्यायला सुरुवात केली की आमचा मुलगा नास्तिक आहे, तर तो अमुकतमुक धागे दोरे हातात घालणार नाही. घरी पूजा असली तर गुरुजींना सांगायचे की त्याचा यावर फार विश्वास नाही तर त्याने ज्या विधी करायच्या आहेत त्या आम्हाला सांगा, आम्ही करतो. यावर गुरुजी म्हणायचे, आईने केले तरी ते पुण्य मुलाला लाभते. मग मला पुण्य मिळावे म्हणून मला रोज करायला सांगितलेले मंत्रजाप आई करायची. मला पाळायला सांगितलेले मंगळवार आई पाळू लागली. आधीचे तिचे सोमवार गुरुवार वगैरे होतेच, त्यात आणखी एका वाराची भर पडली.
त्याचवेळी एकेकाळी न चुकता दर मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाणारा मी मात्र अंगारकी संकष्टीलाही स्वहस्ते अंड्याचे ऑमलेट करून खाऊ लागलो. अभ्यासाला रात्रीचे डोंगरावर जायचो तेव्हा खाली गाड्यांवर मिळणार्या मांसाहारात बीफ असू शकते याची कल्पना असूनही त्यावर तुटून पडायचो. एखाद्या निर्जीव वस्तूलाही पाय लागला तर चटकन पाया पडायचे संस्कार शाबूत होते. भले मग ती वस्तू एखाद्याची चप्पलच का असेना. पण तेच रस्त्यात मंदीर दिसले तर सवयीनेच पाया पडणे आता नकळत बंद झाले होते. देवाधर्माच्या सार्या संकल्पना माझ्यासाठी शून्य झाल्या होत्या. एकेकाळी मी शिंकणे, मांजर आडवी जाणे, लिंबू-मिर्ची बांधणे वा नजर उतरवणे सारख्या अंधश्रद्धांवरही विश्वास ठेवत होतो याचे माझेच मला हसायला येत होते.
आणि अश्यातच एके रविवारी सकाळी कसल्याश्या गोंगाटानेच जाग आली.
खरे तर रविवारचा गोंगाट म्हणजे आम्हा पोरांची क्रिकेटची मॅच. पण हा गोंगाट त्याहून भारी होता. बाहेर येऊन पाहिले तर सर्व गॅलर्या फुल्ल होत्या. लहानथोर, बायकापुरुष सर्वांच्या नजरा खाली मैदानावर लागल्या होत्या. असे चित्र केवळ नवरात्री वा दहीहंडीलाच बघायला मिळायचे. आज काय स्पेशल आहे म्हणून त्या गर्दीत घुसून खाली डोकावलो तर एक बुवा आणि एक बैल होता. शेजारच्याला विचारले, काय रे, बैल पोळा आहे का आज? तर तो म्हणाला, छे रे. भविष्य सांगतोय तो माणूस..
झालं, मी डोक्याला हात लावला. रोज पेपरात वाचतो राशी भविष्य, हा काय वेगळे सांगणार आहे. तरी चला जवळून मजा घेऊया म्हणून खाली मैदानात गेलो. जेवढा तो बैल सजवला होता तेवढाच तो माणूसही स्वतः सजलेला होता. शेजारीच त्याचा एक मदतनीस बसला होता. तो मात्र साध्या पांढर्या कपड्यात होता. तोच एकेकाला प्रश्न विचारायला उकसवत होता. पण अजूनही संकोचाने म्हणा वा भितीने म्हणा कोणी विचारायला तयार होत नव्हते.
अखेर एक आगाऊ म्हणून ओळखली जाणारी मुलगी पुढे आली. मेरे बारे मे बताओ बाबा. आणि त्याने सांगायला सुरुवात केली. तिचा चंचल स्वभाव, तिची खर्चिक वृत्ती, तिचा चटकन चढणारा रागाचा पारा वगैरे. मी मनातल्या मनात म्हटलं हे तर जगातल्या ९० टक्के मुलींना लागू होईल. कुछ और बताओ बाबा. आणि मग त्याने एक बाँब टाकला. म्हणाला तू तुझ्या आईवडीलांची खरी मुलगी नाहीयेस. हे ऐकून मी उडालोच. ईतके वर्ष मी त्या मुलीला बघत होतो, आय मीन ओळखत होतो. पण ही खबर मलाही माहीत नव्हती. ती मुलगीही आता सिरीअस झाली. त्याने अजून तिच्याबद्दल दोनचार गोष्टी सांगितल्या. ज्या तंतोतंत जुळल्या. त्यापुढे तो म्हणाला की तुझे खरे बाबा आता या जगात नाहीत. पण आई अजून जिवंत आहे. आणि ती तुला भेटणार देखील आहे. हे ऐकून मात्र ती मुलगी रडायची शिल्लक होती.
मग त्याने लगेच दुसरा मुलगा पकडला. त्याच्या वडिलांच्या दोन बायका आहेत म्हणाला. हे तर आमच्याकडे सर्वांना माहीत होतेच. पण पुढे हे देखील म्हणाला की तुझीही दोन लग्ने होतील. हे ऐकून सारेच फुटले. मग त्याने अजून एकाला पकडले, मग अजून एकाला. कोणाचा व्यवसाय सांगितला तर कोणाचे शिक्षण, एखाद्याचा छंद सांगितला तर एखाद्याची आवड, कोणाची चिंता सांगितली तर कोणाचा आजार... तो भूत भविष्य वर्तमान तिन्ही सांगत होता. भूत आणि वर्तमान बरोबर येत होते तसे भविष्याबद्दल तो जे सांगतोय त्यावरही लोकांचा विश्वास बसू लागला होता. लोकांची उत्सुकता वाढू लागली होती. आणि एवढा वेळ जे फक्त लहान मुलेच त्याचा खेळ बघायला खाली जमली होती ते आता वरतून मोठ्यांनीही आवाज देऊन त्याला आमंत्रण धाडले होते.
त्याने बैल खालीच बांधला आणि आता तो एकेकाच्या घरात त्यांच्या विनंतीवरून फिरू लागला. आमच्याकडूनही त्याला बोलावणे आले होते. एकेकाचे उरकत आमचाही नंबर लागला. एव्हाना लोकांचा त्यावरचा विश्वास आणखी वाढला होता. त्यात एक आमचेही कुटुंब होते. आधीच तो भारदस्त माणूस, त्यात भरजरी पोशाख. गळ्यात माळा, हातात अंगठ्या, डोक्यावर पगडी. एकूणच व्यक्तीमत्व छाप टाकणारे. आता तो आमच्यासमोर आमच्या घराण्याचा ईतिहास सांगायला बसला. आजोबा पोस्टमास्टर होते हे त्याने सांगितले. वडिलांना पकडून आठ भावंडे हे सांगितले. प्रॉपर्टीवरून लफडे झालेत हे सांगितले. त्यात आमच्यावरच अन्याय झाला हे सांगणे आलेच. आणि मग ही साडेसाती अशीच कायम राहणार हे देखील सांगितले. कारण काय तर विधवा बाईची नजर लागली आहे.
बिल्डींगमधील एका विधवा बाईशी आमचे बिलकुल पटायचे नाही. तसे तर त्या बाईचे अर्ध्या बिल्डींगशी पटायचे नाही. पण आमची कयामत से कयामत तक सारखी एका पिढीपासूनची दुश्मनी होती. विधवा बाईची नजर म्हणताच तीच डोळ्यासमोर आली. तिच्या बाबतीत हे बिलकुल शक्य आहे म्हणत ते पटलेही. मग काय, अकलेचा भाग पळाला आणि लागला मासा गळाला!
आता समस्या आली तिथे उपाय आला. तो अर्थात तोच देणार होता. पण फुकटात तर कोणी काही देत नाही. भले मग तो कितीही थोर पुण्यात्मा का असेना. आकडा ऐकून आम्हालाच आकडा आला. तब्बल पंचवीस हजार. आमच्या सुदैवाने ईतके पैसे आमच्याजवळ नव्हते. आमची ती ऐपतही नव्हती. किस्सा फार जुना आहे लक्षात घ्या. तेव्हाचे पंचवीस हजार म्हणजे आताचे लाखभर रुपये. असे म्हणायची एक पद्धत असते. मग बार्गेंनिंग सुरू झाली. वॉऽव. यातही बार्गेनिंग. एकामागोमाग एक धोक्याच्या घंटा वाजत होत्या. पण आम्हाला घंटा काही ऐकू येत नव्हते. पंचवीस हजाराचा आकडा उतरत उतरत सात हजारांवर आला. एवढे भाव दणकन अत्तराचेही कोसळत नसावेत, पहिल्या पावसात.. त्यातही गंमत म्हणजे घरात कॅश तीन ते चार हजारच होती. हे देखील एक सुदैवच म्हणावे. वरना डुबने के लिये हम तैयार थे गालिब, पर हमारी नाव जहा गोते खा रही थी, वहा पाणी ही कम था.
मग एक अभुतपुर्व फिल्मी सौदेबाजी झाली. आधा काम होने से पहले, आधा काम होने के बाद. असे म्हणत आम्ही तीन हजार पाचशे रुपये त्या नंदूच्या हातावर टेकवले. कारण राजाबाबू पैसे स्वतःच्या हातात घेत नाहीत. भले पोशाख भरजरी घालतात पण त्यांना पैश्यांचा मोह नाही. सात हजार बहुधा बैलाच्या चार्यासाठी मागितले होते.
आणि मग उपायाला सुरुवात झाली. आम्हा सर्व कुटुंबियांना गोलाकार बसवले. तसेही कितीसे ते मोठे कुटुंब. हम दो हमारा एक. ऊस मे से भी सिर्फ दो बंदे नेक. माझ्या वडिलांनी आधीच त्या बाबाला सांगितले की या पोराचा यावर फारसा विश्वास नाही, त्याला काही करायला सांगू नका. मागणी चटकन मान्य झाली. मग झटपट काहीतरी विधी झाले. सगळे काही आठवत नाहीत. पण तुळशीची पाने तोडून, त्यांनी आमची नजर उतरवून, पुन्हा ती त्याच तुळशीच्या कुंडीत पुरायला सांगितली. हे एक एवढे आठवतेय कारण तुळशीच्या पानांची ने आण करायचे काम मलाच करायला सांगितले होते. मी अनिच्छेनेच उठल्याचे मला आठवतेय म्हणून हे लक्षात. आणि हो, एक मंतरलेला धागा जो मला हातात घालायचा होता पण मी विनम्र नकार दिल्याने तो माझ्या डोक्यावरून फिरवून जाता जाता त्याच तुळशीत तो पुरून गेला. जणू तो तिथून माझी रक्षा करणार होता.
त्या धाग्याला गंडा का बोलतात हे त्या दिवशी मला समजले. गंडा घालणे हा वाक्यप्रचार कुठून आला हे देखील समजले. कारण तो आम्हाला साडेतीन हजारांचा गंडा घालून गेला होता. तेव्हाचे साडेतीन हजार म्हणजे आताचे... सोडा, जे असतील ते असतील.. पण ते त्या भामट्याच्या हातात जात होते आणि मी काही करू शकत नव्हतो, काही बोलू शकत नव्हतो.. कारण उफ्फ हमारे ये उसूल, हमारे ये संस्कार.. जो हमे मां बाप के सामने कुछ बोलने की ईजाजत नही देते.
पण पुढचे काही दिवस मात्र मी बोलत होतो. माझ्या आईवडीलांनी मला दिलेले स्वातंत्र्य, ज्याचा लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केला आहे ते विसरून कृतघ्नपणे त्यांना सतत या प्रसंगाची आठवण करून देत टोमणे मारत होतो. पण त्यांचे तरी काय असे चुकले होते. एकदा तुम्ही कश्यावर श्रद्धा ठेवली तर अध्येमध्ये अंधश्रद्धेची धूसर रेष ओलांडणे स्वाभाविक असते. आणि अंधश्रद्धा म्हणजे तरी काय असते. ज्या श्रद्धेला सर्वसामान्यांकडून मान्यता मिळत नाही ती अंधश्रद्धा. अन्यथा पहिल्या भागातील नागबली नारायण आणि या बाबाने केलेला चुटपूट विधी यात तार्किकदृष्ट्या फरक तो काय...
त्या रात्री कट्ट्यावर सारे मित्र जमले तेव्हा कोण कसे फसले याच्याच चर्चा चालू होत्या. काही किस्से उघड झाले होते, तर काही बचावलेले आम्ही कसे हुशार याच्या फुशारक्या मारत होते. त्या मारतानाही त्यांच्या हातातील पंधरा-वीस हजारांचे खडे खुदकन चमकत होते. मी मात्र आज झोपायला जाण्यापूर्वी कुंडीतला गंडा हळूच उचलून कचराकुंडीत कसा टाकावा याचा विचार करत गपचूप बसलो होतो.
ना तेव्हा कोणाला हे सांगितले, ना कालपर्यंत कोणाला माहीत होते. पण आज हा किस्सा ईथे लिहीला आणि हलके वाटले
पण पण पण .....
एवरीथिंग ईझ फेअर ईन लव्ह अॅण्ड वॉर ..
असे म्हणत आयुष्याच्या एका गोड वळणावर पुन्हा एकदा मी स्वखुशीने हा गंडा आपल्या अकलेवर बांधून घेणार होतो..
क्रमशः आणि धन्यवाद,
ऋन्मेष
-------------------------------------
नक्षत्रांची शांती ३ - प्रेम आणि मृत्यु
https://www.maayboli.com/node/80854
मोरोबा, भारीय व्हिडीओ. थोडा
मोरोबा, भारीय व्हिडीओ. थोडा वेळ आपणच आहोत तिथे असा भास झाला.
पूर्वी जनरल मॅनेजर्स असायचे, आता सीईओ असतात. पर्सनल डिपार्टमेंटचे एचआरडी झाले.
>> दोन्हीही वैवाहीक स्टेटस
>> दोन्हीही वैवाहीक स्टेटस सांगतात. लेबल म्हणणे अजून तरी झेपले नाही. << +१
नक्कि प्रॉब्लेम काय आहे? माझ्या माहिति नुसार विधवा हि टर्म डिरॉगेटोरी, डिस्रिस्पेक्टफुल या अर्थाने वापरली जात नाहि/जाउ नये. ती तशी वापरली जाते (वरच्या ऋन्म्याच्या पोस्ट सकट) असं तुम्हाला वाटंत असेल तर दॅट्स योर शॉर्टफॉल. यु हॅव लॉट्स ऑफ ग्रोइंग अप टु डु. अँड आयॅम अफ्रेड, आय अॅम स्पेलिंग इट आउट विथ ए डिसगस्ट...
बाय्दवे, फेसबुकवर (~३ बिलियन युझर्स, व्हाइल आय टाइप धिस) सेपरेटेड, डिवोर्स्ड, विडोड या कॅटेगोरीज आहेत. त्या का आहेत? टु डिस्रिस्पेक्ट पिपल? हेल नो; व्हेन आर यु गोइंग टु करेक्ट योर प्रेजुडिस टु अलाइन विथ ए लार्जर ग्रुप ऑफ पिपल?..
एक स्पेलिंग न लिहीताच आता
There's a difference in self-declaration and identifying someone as a widow. फेसबूक व अन्य ठिकाणी जिथे स्वतःच स्वतःची माहिती द्यायची असते आणि न देण्याचीही मुभा असते तिथे 'विधवा', विधुर असणे ठीकच आहे. व्यक्तीला ओळख कशी करून द्यायची याचा पर्याय उपलब्ध आहे. भारतीय समाजात विधवा अपशकुनी, तिची नजर लागते, तिला मंगल कार्याला बोलावत नाहीत इ अनेक समज होते आणि अजूनही आहेत. अशिक्षित बैलवाल्याने त्या समजांना चालना देणारी वक्तव्य केली त्याबद्दल आक्षेप नाही. पुढचा परिच्छेद जिथे ऋन्मेष कुटूंबियांचे व त्या रहिवासी व्यक्तीचे संबंध वेगळ्या पद्धतीने लिहीता आले असते असे सुचवले आहे. लिहून दाखवले आहे. पटलं तर बघा नाही तर द्या सोडून...
सीमंतिनी, लॉट्स टू ग्रो अप
सीमंतिनी, लॉट्स टू ग्रो अप वाली कीव मिळाली तुला! वर डिसगस्ट फुकट!!! सँटा केम जस्ट इन टाईम!
एक सिग्रेट द्या म्हणजे इथे
कुठलेही शब्द वापरताना त्यातला
कुठलेही शब्द वापरताना त्यातला भाव महत्वाचा.
मग तो लिखित असो अथवा वाचिक..
मनाला न दुखवणारे नवीन शब्द जर तिरस्कार/हेटाळणी/कुचेष्टा/अपमान याच भावनेतून उच्चारले तर त्या तथाकथित शब्दबदलाचा काय फायदा..?
बऱ्याचदा असे शब्द प्रथा म्हणून, आधुनिकता दाखवायला म्हणून किंवा इलाज नाही म्हणून वापरले जातात पण त्यात बेगडीपणा असतो. आणि समोरच्या व्यक्तीला तो जास्त टोचतो, त्यातल्या दांभिकपणामुळे.
कधीकधी मग असे नवीन शब्द वापरण्यापेक्षा निर्विष पध्दतीने वापरलेले जुने शब्दच चांगले.
तो अपंग आहे. तो दिव्यांग
तो अपंग आहे. तो दिव्यांग आहे.
दोन्ही सारखेच. यात खटकत नाही काही.
अपंग आला. दिव्यांग आला. दोन्ही सारखेच. दोन्ही खटकतात. संबोधन म्हणुन वापरलेत.
तसेच विधवा /विधुर बद्दल वाटते.
ती विधवा आहे. तो विधुर आहे. तिचा नवरा हयात नाही. सारखेच वाटते. त्यात लेबल वाटत नाही.
विधवा आली. विधुर आला. खटकते. लेबल लावले आहे.
विधवा स्त्रीला वेगळी आणि चुकीची वागणुक मिळते हे वर सीमंतिनी यांनी लिहिले आहेच. त्यात सारखा विधवा हा शब्द वापरात असल्याने तो शब्द ही काहींना खटकत असेल असे होउ शकते. पण त्यावर शब्द बदलणे हा उपाय वाटत नाही.
<< तो अपंग आहे. तो दिव्यांग
<< तो अपंग आहे. तो दिव्यांग आहे.
दोन्ही सारखेच. >>
अहो, ते तुम्हाला-मला सारखे वाटत असतील, पण "पॉलिटिकली करेक्ट" बोलणाऱ्याना तसे वाटत नाही ना. मग disabled ऐवजी physically challenged किंवा differently abled, handicapped ऐवजी handy capable, deaf ऐवजी hearing impaired, blind ऐवजी visually challenged असे शब्द वापरायचा आग्रह केला जातो.
म्हणून वरती याच धाग्यात म्हटलंय की "अपंग ऐवजी "दिव्यांग"/डिफरंटली एबल्ड वापरू लागले तरी ते चांगलच." म्हणजे आग्रह हाच असतो की दिव्यांग/डिफरंटली एबल्ड असे गोडगोडच बोला. आणि वर त्यात भर घालायची की कुणी सक्ती केलेली नाही.
हल्ली खूप ठिकाणी diversity, equality, inclusion, empathy अश्या नावानी हा "पॉलिटिकल करेक्टनेस" दिसून येतो. (वेगळ्या धाग्याचा विषय, त्यामुळे जाऊ दे).
जिथे जीवनशैली मोकळीढाकळी असते
जिथे जीवनशैली मोकळीढाकळी असते, बोलणार्याचे हेतू प्रांजळ असतात तिथे काहीच खटकत नाही. खेड्यात तर जातीवरूनच बोलतात. पण त्यात जातीयवाद असेलच असे नाही. Widowed / Widow मधे एक क्रियापद आहे दुसरे विशेषण. आपण दोन्हीला एकच शब्द वापरतो. विधूर/विधवा.
यापेक्षा माझे भाषा विषयाचे ज्ञान जास्त नाही. हलाखीच्या परिस्थितीमुळे कित्येक वर्षे व्याकरण (कुठल्याच भाषेचे) पाहीलेले नाही.
वेगळ्या धाग्याचा विषय, >> अशी
वेगळ्या धाग्याचा विषय, >> अशी उघड हिण्ट दिल्यावर जाऊ दे कसे होईल
मूळात विधवा अथवा विधुर असणं
मूळात विधवा अथवा विधुर असणं ही गोष्टच कीव करण्यासारखी नाहीये. आयुष्य आहे. होतात गोष्टी. कोणी पुढे जातो कोणी मागे. आता स्त्रियाही समर्थ असतात. सावरतात. पुरुष सावरतात. उगाच काय दुर्दैवी किंवा किव करण्यासारखं काय आहे त्यात. निसर्ग आहे.
डिफरंटली एबल्ड हा शब्द जर
डिफरंटली एबल्ड हा शब्द जर कृत्रिम अवयवांच्या साथीने, विज्ञानाच्या मदतीने व्यंगावर मात करण्यासाठी वापरला तर लॉजिकल आहे. याच अर्थाने दिव्यांग वापरला असता तर अडचण नाही. युद्धात पाय गमवाव्या लागलेल्या सैनिकांसाठी रोबोटिक आर्म / फूट बनतोय. त्याच्या चाचण्या पण झाल्या आहेत. अशा तंत्रज्ञानाला दिव्यांग म्हणायचे असेल तर स्वागत केले पाहीजे.
भारतीय समाजात विधवा अपशकुनी,
भारतीय समाजात विधवा अपशकुनी, तिची नजर लागते, तिला मंगल कार्याला बोलावत नाहीत इ अनेक समज होते आणि अजूनही आहेत>>>
आणि विधवा ऐवजी पतीपश्चात, किंवा differently-husbanded असे शब्द निर्माण करून ते नष्ट होणार आहेत?
Retarded ऐवजी स्पेशल असा overcompensating शब्द बनवला गेला. आता तोही उपरोधाने वापरायचा शब्द बनला आहे.
शब्द बदलण्या ऐवजी ऍटिट्युड बदलल्या तर कसे राहील?
खरंतर दोन्ही बदलायचं आहेच
खरंतर दोन्ही बदलायचं आहेच
शब्दापासून सुरुवात करू
तितक्या वर थांबणार नाही
ऊबो यांच्या पोस्टींना अनुमोदन
ऊबो यांच्या पोस्टींना अनुमोदन.
त्या शब्दांमागची भावना नाहीशी झाली तर आहेत तेच शब्द खटकणार नाहीत. भाव बदलले नाहीत तर काही दिवसात नवीन शब्दालाही तोच वास येईल.
मी एक नवीन भाषा बनवत आहे. ती
मी एक नवीन भाषा बनवत आहे. ती समजायला सोप्पी असून येत्या काही वर्षात ती युनिवर्सल भाषा होणार आहे. ती भाषा तुम्हाला आली कि तुम्ही कोणत्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टींसोबत बोलू शकता. तुमची चर्चा वाचून मला ती नवीन भाषा बनवायला खूपच मदत होत आहे. तुमचे काही सजेशन्स असतील तर सांगा.
मोरोबा, हे शब्द मी किंवा कुणी
फक्त 'शब्द बदला' असा आग्रह, अशी सक्ती अजिबात नाही. आणि हा 'पोलिटीकल करेक्टनेस' नाही. मला खरंच पटलं की शब्द ही पहिली पायरी आहे. वचने किं दरिद्रता... पुढे अॅटीट्यूड ते बजेट - बदलाचे बरेच पल्ले आहेतच. इथे लेखाच्या अनुषंगाने शब्दाबद्दल सुचवले. इतकंच.
आफ्रिकन कम्युनिटीच्या बाबत
आफ्रिकन कम्युनिटीच्या बाबत अपमानास्पद ओळख म्हणून वापरले जाणारे शब्द हे रेसशी जन्माशी संबंधित असतात. ते सर्व कम्यूनिटीला लागू होतात. एकच लॉजिक सगळीकडे लागू होत नाही.
गोर्या लोकांच्या पश्चात्तापातून आपण जास्त संवेदनशील आहोत असे दाखवण्याच्या खटाटोपामधून असे प्रकार घडत असावेत असे वाचले होते.
एका घटस्फोटीत स्त्री ची एक मराठी पोस्ट (बहुतेक अनुवादीत) प्रचंड व्हायरल झाली होती. धमाल लिखाण होतं ते.
त्यात त्या बाईचा डिव्होर्स झाल्यानंतर नवीन ऑफिस मधे तिचा पुरूष सहकारी तिला तिच्या मॅरिटल स्टेटस बद्दल विचारतो. त्यांना कुणकुण असते पण तिच्याकडून ऐकायचे असते. ती अगदी सहज सांगते कि मी घटस्फोटिता आहे. यावर दोघांचे (अपेक्षित रिअॅक्शन न आल्याने) चेहरे पाहण्यासारखे होतात. ते सहानुभूती दाखवू लागतात. ती बाईच मग त्यांचे सांत्वन करते. अरे असे काहीच नसते. अशी काहीशी होती पोस्ट.
सी, अगदी अगदी.
सी, अगदी अगदी.
नुसते शब्द बदलून काही होणार नाहीये हे खरं.पण शब्द बदलणं ही पहिली पायरी आहे.
विधवा हा शब्द चांगला आहे, तो बदलून किंवा उगीच गोडगोड शब्द वापरून त्यांचे प्रश्न सुटणार नाहीयेत असं मत असलेल्या लोकांचं पूर्वीच्या काळी पती गमावलेल्या स्त्रियांना वापरला जाणारा रंxकी शब्द होता त्याबद्दल काय मत आहे?तो आपण प्रचलित उच्चारातून का बंद केला असावा?तो बंद करूनही पती गमावलेल्या स्त्रियांचे प्रश्न सुटणार नव्हते.आफ्रिकन अमेरिकन्स ना निगर किंवा ब्लॅक आपण आता का म्हणत नाही?मूल नसलेल्या (काही समस्येने किंवा स्वतःच्या निर्णयाने) स्त्रियांना उद्देशून अनेक अपमानास्पद शब्द वापरले जातात, त्याबद्दल काय मत आहे?
स्त्री, पुरुष दोघांसाठी विधुर
स्त्री, पुरुष दोघांसाठी विधुर हा एकच शब्द वापरा. प्रॉब्लेम सॉल्व्हड.
जेंडर न्युट्रल जगात दोन दोन शब्द हवेत कशाला?
मनाला न दुखवणारे नवीन शब्द जर
मनाला न दुखवणारे नवीन शब्द जर तिरस्कार/हेटाळणी/कुचेष्टा/अपमान याच भावनेतून उच्चारले तर त्या तथाकथित शब्दबदलाचा काय फायदा..?
>>>>
हा मुद्दा योग्य आहे.
शब्द उच्चारताना त्यामागची भावना आणि हेतू सगळ्यात महत्वाचा.
पण, जर समोरून एखादी बाई सांगतेय की तिला वा त्यांना विधवा हा शब्द खटकतो. तर हट्टाने तरीही आम्हाला तो वापरायचाच आहे. आमचा हेतू बघा असे सांगताना तो हट्ट मग तुमच्या हेतूवरच शंका घेणारा नाही का ठरत?
पूर्वीच्या काळी पती
पूर्वीच्या काळी पती गमावलेल्या स्त्रियांना वापरला जाणारा रंxकी शब्द होता त्याबद्दल काय मत आहे? >>> तो शब्द खटकतो म्हणून विधवा हा शब्द वापरात आला असेल तर आता तो का बदलायचा ?
विधवा आणि रंडकी एकसारखे शब्द
विधवा आणि रंडकी एकसारखे शब्द नाहीत. जसे निपुत्रिक आणि वांझोटी एकसारखे नाहीत.
आणि आफ्रिकन अमेरिकन असं कोणीही म्हणत नाही, ब्लॅकच म्हणतात अहो.
ब्लॅक माणसाला ब्लॅक म्हणायला ज्याची जीभ कचरत असेल त्याने आपल्याच मनात कुठेतरी काळया रंगा बद्दल अढी आहे हे ओळखावे.
हो ना ब्लॅकच म्हणतात की इथे.
हो ना ब्लॅकच म्हणतात की इथे. माझ्या एका धाग्यावरती मागे कोणीतरी पेटला होता . ब्लॅक काय म्हणता म्हणे. पूर्ण धाग्याची वाट लावली होती.
शब्द खटकणे, याचे कन्सेप्ट
शब्द खटकणे, याचे कन्सेप्ट काळानुसार बदलत जातात.
मला स्वतःला ब्लॅक आणि व्हाईट असं दोन्ही म्हणायला आवडत नाही.दोन्ही शब्द बकवास आहेत.स्किन चा रंग, जाडी, उंची, केस असणे/नसणे,अवयव असणे नसणे ही बाह्य फीचर्स झाली.
मोरोबा, मला खरोखरच माहीत नाही म्हणून विचारतेय, त्या 2 आणि या 2 शब्दात नक्की कसा आणि काय फरक आहे?
शब्द का खटकतो हे व्यवस्थित
शब्द का खटकतो हे व्यवस्थित सांगितले तर पटेल.
रंxकी शब्दाचा उगम काय, त्याचा अर्थ फक्त नवरा हयात नसेलेली स्त्री नसून अजून काही होता का कल्पना नाही, पण तो दुसऱ्या एका शब्दाच्या खूप जवळचा वाटतो एवढे कारण पुरेसे आहे खटकायला.
जर केवळ ती किंवा काही दोन चार व्यक्ती म्हणत आहेत ना, त्यांना तो खटकतो हेच कारण असेल तर लोक त्या दोन चार व्यक्तींसमोर तो वापरणार नाहीत.
विधवा या शब्दाचा अर्थ अजून काही वेगळा सुद्धा आहे का?
तसेच शब्द बदल ही ऍटीट्युड बदलाची पहिली पायरी वाटत नाही. ऍटीट्युड बदलाची सुरवात करुन मग त्या बदलाची आठवण रहाण्यास शब्द बदल असे असेल तर गोष्ट वेगळी.
नाहीतर वर शांमा यांनी म्हटल्या प्रमाणे रंxकी काढून विधवा शब्द प्रचलीत केला, तरी आता विधवा शब्द बदलायचाय तसा पुढचा शब्दही बदलावा लागेल.
चि सौ का (चि रंजीव सौभाग्य
चि सौ का (चि रंजीव सौभाग्य कांक्षिणी) हाही शब्द खटकण्यासारखा आहे. पुरुष का नसतात चिसौकां (चिरंजीव सौभाग्यकांक्षी)? फक्त स्त्रियाच का?
सौभाग्यवती हा शब्दही. पुरुष नसतात सौभाग्यवान. का????????????
सगळच खटकण्यासारखं आहे.
त्या 2 आणि या 2 शब्दात नक्की
त्या 2 आणि या 2 शब्दात नक्की कसा आणि काय फरक आहे?>>>
माझ्या मते एक शब्द केवळ परिस्थिती दर्शक आहे आणि दुसरा चक्क शिवी आहे. मी कधी कोणाला ' ए विधवे ' अशी शिवी घालताना ऐकले नाही.
हिरा वगैरे लोक जास्त चांगलं सांगू शकतील. उचकी थांबल्यावर येतीलच त्या.
शब्द कोशानुसार त्या शब्दाचा
शब्द कोशानुसार त्या शब्दाचा अर्थ असा आहे

शिवी वेगळी.ती दोन अक्षरी आहे.
(अवांतर: धागा भरपूर वेगळ्या दिशेला गेला.बाकी चर्चा नव्या धाग्यावर घेऊन हा पुन्हा विषयाला न्यायचा असल्यास उत्तम.)
किस्सा मस्त रंगविला आहे.
किस्सा मस्त रंगविला आहे.

>>>>>>>>>> वरना डुबने के लिये हम तैयार थे गालिब, पर हमारी नाव जहा गोते खा रही थी, वहा पाणी ही कम था.
खतरनाक!! इथे फुटलेच.
Pages