नक्षत्रांची शांती - भाग १ - https://www.maayboli.com/node/80761
........................................................
पहिल्या भागातील नागबली नारायणाची पारायणे करून झाली असतील तर आपण आता दुसर्या भागाकडे वळूया...
आशा करतो हा देखील तसाच ओघवान होईल
तर, आता मी मोठा झालो होतो. खरे तर आपले मूल कुठल्या बाबतीत किती मोठे झालेय हे आईवडीलच ठरवत असतात. त्यांनी मला देवधर्म मानण्या न मानण्याबात व्यक्तीस्वातंत्र्य द्यावे ईतका मोठा मी त्यांच्यासाठी झालो होतो.
मी नवीन नवीनच नास्तिक झालो होतो. त्यामुळे आस्तिकांची टिंगल टवाळी उडवायचे कामही नित्यनेमाने करत होतो. घरी मात्र तो आगाऊपणा टाळायचो. कारण आईवडिलांनी दिलेल्या या व्यक्तीस्वातंत्र्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक आदर निर्माण झाला होता. जेव्हा ईतर भावंडांना त्यांचे आईवडील देवधर्माबाबत कसलीही तडजोड करू देत नव्हते तेव्हा माझे मंदिरात न येणे, गर्दी असेल वा रांग असेल तर सत्यनारायणाच्या पुजेचे दर्शन टाळणे, आवडीचा नसेल तर प्रसाद न खाता गपचूप आईच्या हातात सरकावणे, भूक लागली असेल तर देवाच्या आधी जेवणे, ईत्यादी प्रकार घरी चालवून घेतले जात होते. पाहुण्यांकडे जाताना मात्र अमुकतमुक वागू नकोस, बरे दिसत नाही अशी विनंती केली जात होती. तशी विनंती करण्यातही त्यांचाच मोठेपणा होतो हे उमजून मी ती मान्य करत होतो.
हळूहळू त्यांनी नातेवाईकांना आणि बाहेरच्यांनाही कल्पना द्यायला सुरुवात केली की आमचा मुलगा नास्तिक आहे, तर तो अमुकतमुक धागे दोरे हातात घालणार नाही. घरी पूजा असली तर गुरुजींना सांगायचे की त्याचा यावर फार विश्वास नाही तर त्याने ज्या विधी करायच्या आहेत त्या आम्हाला सांगा, आम्ही करतो. यावर गुरुजी म्हणायचे, आईने केले तरी ते पुण्य मुलाला लाभते. मग मला पुण्य मिळावे म्हणून मला रोज करायला सांगितलेले मंत्रजाप आई करायची. मला पाळायला सांगितलेले मंगळवार आई पाळू लागली. आधीचे तिचे सोमवार गुरुवार वगैरे होतेच, त्यात आणखी एका वाराची भर पडली.
त्याचवेळी एकेकाळी न चुकता दर मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाणारा मी मात्र अंगारकी संकष्टीलाही स्वहस्ते अंड्याचे ऑमलेट करून खाऊ लागलो. अभ्यासाला रात्रीचे डोंगरावर जायचो तेव्हा खाली गाड्यांवर मिळणार्या मांसाहारात बीफ असू शकते याची कल्पना असूनही त्यावर तुटून पडायचो. एखाद्या निर्जीव वस्तूलाही पाय लागला तर चटकन पाया पडायचे संस्कार शाबूत होते. भले मग ती वस्तू एखाद्याची चप्पलच का असेना. पण तेच रस्त्यात मंदीर दिसले तर सवयीनेच पाया पडणे आता नकळत बंद झाले होते. देवाधर्माच्या सार्या संकल्पना माझ्यासाठी शून्य झाल्या होत्या. एकेकाळी मी शिंकणे, मांजर आडवी जाणे, लिंबू-मिर्ची बांधणे वा नजर उतरवणे सारख्या अंधश्रद्धांवरही विश्वास ठेवत होतो याचे माझेच मला हसायला येत होते.
आणि अश्यातच एके रविवारी सकाळी कसल्याश्या गोंगाटानेच जाग आली.
खरे तर रविवारचा गोंगाट म्हणजे आम्हा पोरांची क्रिकेटची मॅच. पण हा गोंगाट त्याहून भारी होता. बाहेर येऊन पाहिले तर सर्व गॅलर्या फुल्ल होत्या. लहानथोर, बायकापुरुष सर्वांच्या नजरा खाली मैदानावर लागल्या होत्या. असे चित्र केवळ नवरात्री वा दहीहंडीलाच बघायला मिळायचे. आज काय स्पेशल आहे म्हणून त्या गर्दीत घुसून खाली डोकावलो तर एक बुवा आणि एक बैल होता. शेजारच्याला विचारले, काय रे, बैल पोळा आहे का आज? तर तो म्हणाला, छे रे. भविष्य सांगतोय तो माणूस..
झालं, मी डोक्याला हात लावला. रोज पेपरात वाचतो राशी भविष्य, हा काय वेगळे सांगणार आहे. तरी चला जवळून मजा घेऊया म्हणून खाली मैदानात गेलो. जेवढा तो बैल सजवला होता तेवढाच तो माणूसही स्वतः सजलेला होता. शेजारीच त्याचा एक मदतनीस बसला होता. तो मात्र साध्या पांढर्या कपड्यात होता. तोच एकेकाला प्रश्न विचारायला उकसवत होता. पण अजूनही संकोचाने म्हणा वा भितीने म्हणा कोणी विचारायला तयार होत नव्हते.
अखेर एक आगाऊ म्हणून ओळखली जाणारी मुलगी पुढे आली. मेरे बारे मे बताओ बाबा. आणि त्याने सांगायला सुरुवात केली. तिचा चंचल स्वभाव, तिची खर्चिक वृत्ती, तिचा चटकन चढणारा रागाचा पारा वगैरे. मी मनातल्या मनात म्हटलं हे तर जगातल्या ९० टक्के मुलींना लागू होईल. कुछ और बताओ बाबा. आणि मग त्याने एक बाँब टाकला. म्हणाला तू तुझ्या आईवडीलांची खरी मुलगी नाहीयेस. हे ऐकून मी उडालोच. ईतके वर्ष मी त्या मुलीला बघत होतो, आय मीन ओळखत होतो. पण ही खबर मलाही माहीत नव्हती. ती मुलगीही आता सिरीअस झाली. त्याने अजून तिच्याबद्दल दोनचार गोष्टी सांगितल्या. ज्या तंतोतंत जुळल्या. त्यापुढे तो म्हणाला की तुझे खरे बाबा आता या जगात नाहीत. पण आई अजून जिवंत आहे. आणि ती तुला भेटणार देखील आहे. हे ऐकून मात्र ती मुलगी रडायची शिल्लक होती.
मग त्याने लगेच दुसरा मुलगा पकडला. त्याच्या वडिलांच्या दोन बायका आहेत म्हणाला. हे तर आमच्याकडे सर्वांना माहीत होतेच. पण पुढे हे देखील म्हणाला की तुझीही दोन लग्ने होतील. हे ऐकून सारेच फुटले. मग त्याने अजून एकाला पकडले, मग अजून एकाला. कोणाचा व्यवसाय सांगितला तर कोणाचे शिक्षण, एखाद्याचा छंद सांगितला तर एखाद्याची आवड, कोणाची चिंता सांगितली तर कोणाचा आजार... तो भूत भविष्य वर्तमान तिन्ही सांगत होता. भूत आणि वर्तमान बरोबर येत होते तसे भविष्याबद्दल तो जे सांगतोय त्यावरही लोकांचा विश्वास बसू लागला होता. लोकांची उत्सुकता वाढू लागली होती. आणि एवढा वेळ जे फक्त लहान मुलेच त्याचा खेळ बघायला खाली जमली होती ते आता वरतून मोठ्यांनीही आवाज देऊन त्याला आमंत्रण धाडले होते.
त्याने बैल खालीच बांधला आणि आता तो एकेकाच्या घरात त्यांच्या विनंतीवरून फिरू लागला. आमच्याकडूनही त्याला बोलावणे आले होते. एकेकाचे उरकत आमचाही नंबर लागला. एव्हाना लोकांचा त्यावरचा विश्वास आणखी वाढला होता. त्यात एक आमचेही कुटुंब होते. आधीच तो भारदस्त माणूस, त्यात भरजरी पोशाख. गळ्यात माळा, हातात अंगठ्या, डोक्यावर पगडी. एकूणच व्यक्तीमत्व छाप टाकणारे. आता तो आमच्यासमोर आमच्या घराण्याचा ईतिहास सांगायला बसला. आजोबा पोस्टमास्टर होते हे त्याने सांगितले. वडिलांना पकडून आठ भावंडे हे सांगितले. प्रॉपर्टीवरून लफडे झालेत हे सांगितले. त्यात आमच्यावरच अन्याय झाला हे सांगणे आलेच. आणि मग ही साडेसाती अशीच कायम राहणार हे देखील सांगितले. कारण काय तर विधवा बाईची नजर लागली आहे.
बिल्डींगमधील एका विधवा बाईशी आमचे बिलकुल पटायचे नाही. तसे तर त्या बाईचे अर्ध्या बिल्डींगशी पटायचे नाही. पण आमची कयामत से कयामत तक सारखी एका पिढीपासूनची दुश्मनी होती. विधवा बाईची नजर म्हणताच तीच डोळ्यासमोर आली. तिच्या बाबतीत हे बिलकुल शक्य आहे म्हणत ते पटलेही. मग काय, अकलेचा भाग पळाला आणि लागला मासा गळाला!
आता समस्या आली तिथे उपाय आला. तो अर्थात तोच देणार होता. पण फुकटात तर कोणी काही देत नाही. भले मग तो कितीही थोर पुण्यात्मा का असेना. आकडा ऐकून आम्हालाच आकडा आला. तब्बल पंचवीस हजार. आमच्या सुदैवाने ईतके पैसे आमच्याजवळ नव्हते. आमची ती ऐपतही नव्हती. किस्सा फार जुना आहे लक्षात घ्या. तेव्हाचे पंचवीस हजार म्हणजे आताचे लाखभर रुपये. असे म्हणायची एक पद्धत असते. मग बार्गेंनिंग सुरू झाली. वॉऽव. यातही बार्गेनिंग. एकामागोमाग एक धोक्याच्या घंटा वाजत होत्या. पण आम्हाला घंटा काही ऐकू येत नव्हते. पंचवीस हजाराचा आकडा उतरत उतरत सात हजारांवर आला. एवढे भाव दणकन अत्तराचेही कोसळत नसावेत, पहिल्या पावसात.. त्यातही गंमत म्हणजे घरात कॅश तीन ते चार हजारच होती. हे देखील एक सुदैवच म्हणावे. वरना डुबने के लिये हम तैयार थे गालिब, पर हमारी नाव जहा गोते खा रही थी, वहा पाणी ही कम था.
मग एक अभुतपुर्व फिल्मी सौदेबाजी झाली. आधा काम होने से पहले, आधा काम होने के बाद. असे म्हणत आम्ही तीन हजार पाचशे रुपये त्या नंदूच्या हातावर टेकवले. कारण राजाबाबू पैसे स्वतःच्या हातात घेत नाहीत. भले पोशाख भरजरी घालतात पण त्यांना पैश्यांचा मोह नाही. सात हजार बहुधा बैलाच्या चार्यासाठी मागितले होते.
आणि मग उपायाला सुरुवात झाली. आम्हा सर्व कुटुंबियांना गोलाकार बसवले. तसेही कितीसे ते मोठे कुटुंब. हम दो हमारा एक. ऊस मे से भी सिर्फ दो बंदे नेक. माझ्या वडिलांनी आधीच त्या बाबाला सांगितले की या पोराचा यावर फारसा विश्वास नाही, त्याला काही करायला सांगू नका. मागणी चटकन मान्य झाली. मग झटपट काहीतरी विधी झाले. सगळे काही आठवत नाहीत. पण तुळशीची पाने तोडून, त्यांनी आमची नजर उतरवून, पुन्हा ती त्याच तुळशीच्या कुंडीत पुरायला सांगितली. हे एक एवढे आठवतेय कारण तुळशीच्या पानांची ने आण करायचे काम मलाच करायला सांगितले होते. मी अनिच्छेनेच उठल्याचे मला आठवतेय म्हणून हे लक्षात. आणि हो, एक मंतरलेला धागा जो मला हातात घालायचा होता पण मी विनम्र नकार दिल्याने तो माझ्या डोक्यावरून फिरवून जाता जाता त्याच तुळशीत तो पुरून गेला. जणू तो तिथून माझी रक्षा करणार होता.
त्या धाग्याला गंडा का बोलतात हे त्या दिवशी मला समजले. गंडा घालणे हा वाक्यप्रचार कुठून आला हे देखील समजले. कारण तो आम्हाला साडेतीन हजारांचा गंडा घालून गेला होता. तेव्हाचे साडेतीन हजार म्हणजे आताचे... सोडा, जे असतील ते असतील.. पण ते त्या भामट्याच्या हातात जात होते आणि मी काही करू शकत नव्हतो, काही बोलू शकत नव्हतो.. कारण उफ्फ हमारे ये उसूल, हमारे ये संस्कार.. जो हमे मां बाप के सामने कुछ बोलने की ईजाजत नही देते.
पण पुढचे काही दिवस मात्र मी बोलत होतो. माझ्या आईवडीलांनी मला दिलेले स्वातंत्र्य, ज्याचा लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केला आहे ते विसरून कृतघ्नपणे त्यांना सतत या प्रसंगाची आठवण करून देत टोमणे मारत होतो. पण त्यांचे तरी काय असे चुकले होते. एकदा तुम्ही कश्यावर श्रद्धा ठेवली तर अध्येमध्ये अंधश्रद्धेची धूसर रेष ओलांडणे स्वाभाविक असते. आणि अंधश्रद्धा म्हणजे तरी काय असते. ज्या श्रद्धेला सर्वसामान्यांकडून मान्यता मिळत नाही ती अंधश्रद्धा. अन्यथा पहिल्या भागातील नागबली नारायण आणि या बाबाने केलेला चुटपूट विधी यात तार्किकदृष्ट्या फरक तो काय...
त्या रात्री कट्ट्यावर सारे मित्र जमले तेव्हा कोण कसे फसले याच्याच चर्चा चालू होत्या. काही किस्से उघड झाले होते, तर काही बचावलेले आम्ही कसे हुशार याच्या फुशारक्या मारत होते. त्या मारतानाही त्यांच्या हातातील पंधरा-वीस हजारांचे खडे खुदकन चमकत होते. मी मात्र आज झोपायला जाण्यापूर्वी कुंडीतला गंडा हळूच उचलून कचराकुंडीत कसा टाकावा याचा विचार करत गपचूप बसलो होतो.
ना तेव्हा कोणाला हे सांगितले, ना कालपर्यंत कोणाला माहीत होते. पण आज हा किस्सा ईथे लिहीला आणि हलके वाटले
पण पण पण .....
एवरीथिंग ईझ फेअर ईन लव्ह अॅण्ड वॉर ..
असे म्हणत आयुष्याच्या एका गोड वळणावर पुन्हा एकदा मी स्वखुशीने हा गंडा आपल्या अकलेवर बांधून घेणार होतो..
क्रमशः आणि धन्यवाद,
ऋन्मेष
-------------------------------------
नक्षत्रांची शांती ३ - प्रेम आणि मृत्यु
https://www.maayboli.com/node/80854
नसेल पटत तर नका वापरू. कुणी
नसेल पटत तर नका वापरू. कुणी सक्ती केलेली नाही. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ज्जे बात !
@ मानव,
@ मानव,
तुम्ही दिलेली उदाहरणेही बहुधा या लेखाशी संबंधित नसली तरी योग्यच आहेत. माझ्याकडून त्याबाबतीत योग्य वागलेही जाते. कारण तसे वागणे बोलणे चूक हे पटकन कळते. आणि मुळातच मला गॉसिपिंगची आवड नाही त्यामुळे याचे किस्से त्याला रंगवून मी सांगत बसत नाही. बायडिफॉल्ट गरजेचेच सांगितले जाते.
सीमंतिनी यांचा ओळख-लेबलवाला मुद्दाही पटला. त्या दोन्हीतला फरक मात्र चटकन कळणारा नाही. ते पटूनही तशी सवय विचारपूर्वक अंगी बाणवल्याशिवाय एखाद्याच्या अंगवळणी पडणार नाही.
छान.
छान.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
'ओळख'/ 'आयडेंटिटी' वरुन आलेले प्रतिसाद आणि चर्चा आवडली. विधवा, बेरोजगार या शब्दांच्या अर्थछटा बराच मोठा अवकाश व्यापतात. त्यांचे कंगोरे (कनोटेशन्स) लक्षात घेऊन लिहिलेले सर्वसमावेशक होते.
हे लक्षात घेऊन प्रामाणिकपणे (ऋन्मेशगिरी न करता) तू प्रतिसाद दिलेस ते ही आवडले. तुझ्या रेझोल्युशनला शुभेच्छा.
हो, मला म्हणायचं होतं ते
हो, ऋन्मेषचे ही खूप धन्यवाद. फिरण्यासाठी शुभेच्छा.
डिफरंटली एबल्ड शब्द मला पटला.
डिफरंटली एबल्ड शब्द मला पटला.
दिव्यांग अंध व्यक्तीला म्हणायचे असेल तर अवघड आहे. अपंग शब्दाला रिप्लेस केलेले माझ्या पाहण्यात आहे. व्यंग दूर केलेल्या व्यक्तीला दिव्यांग म्हणायचे असे अभिप्रेत होते का?
पहिल्या भागातील नागबली
पहिल्या भागातील नागबली नारायणाची पारायणे करून झाली असतील तर आपण आता दुसर्या भागाकडे वळूया... -------------
छे छे तू कुठे पु.ल. आहेस पारायण करायला???
पुलं चे इतकेही भाग्य नाही का
पुलं चे इतकेही भाग्य नाही का ?
अपंग काय आणि दिव्यांग काय
अपंग काय आणि दिव्यांग काय कोणा व्यक्तीला तो शब्द ओळख म्हणून वापरण्यात काही फरक नाही. नवरा असणे किंवा नसणे ही जशी ओळख नाही तसेच एकाद्या अवयवाचा अभाव किंवा तो अवयव असणे ही काही मूळ ओळख न्हवे.
व्याकरणदृष्ट्या/भाषा दृष्टीने
व्याकरणदृष्ट्या/भाषा दृष्टीने अपंग व दिव्यांग काय फरक सांगायला हीरा आली तर सांगू शकेल. चिनूक्स व इतरही सांगू शकतील. इंग्रजीत disabled vs differently abled ह्यात जो फरक आहे तो असावा हे माझे आकलन.
स्त्री, बाई, हे शब्द सुद्धा
स्त्री, बाई, हे शब्द सुद्धा सोशल मीडिया वर बऱ्याचदा अबला, उपेक्षित, disadvantaged या अर्थाने वापरले जातात.
उदा - बायांचे प्रॉब्लेम्स बायांनाच कळतात.
नुसतंच 'व्यक्ति' असं लिहायला पाहिजे खरंतर.
ती नक्षत्रांची शांती कुठे
ती नक्षत्रांची शांती कुठे दिसली नाही अजून
(No subject)
व्यक्ती व्यक्ती.... मनमोराचा
व्यक्ती व्यक्ती.... मनमोराचा कसा पिसारा फुलला...
व्यक्ती व्यक्ती.... मनमोराचा ......
कसा पिसारा फुलला...
(No subject)
व्यक्ती व्यक्ती....
पिसारा म्हटला की लिंग लक्षात
पिसारा म्हटला की लिंग लक्षात येतं.
व्यक्ती व्यक्ती, मनपक्ष्याचे कसे पंख पसरले
व्यक्ती व्यक्ती
व्यक्ती व्यक्ती![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
येह दिल मांगे मोर .. व्हाई नॉट लांडोर
ती नक्षत्रांची शांती कुठे
ती नक्षत्रांची शांती कुठे दिसली नाही अजून >>> विश्वास ठेवा, कदाचित तिसर्या भागात दिसेल, न दिसल्यास अंतिम भागात नक्की!
हीरा स्त्री आहेत हे आत्ता
हीरा स्त्री आहेत हे आत्ता समजले.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हीरा स्त्री आहेत हे आत्ता
हीरा स्त्री आहेत हे आत्ता समजले. Sad >>> हायला अॅक्चुअली +७८६, सीमंतिनी यांची पोस्ट वाचून ना. मी सुद्धा ते वाचून त्यांचे प्रोफाईल चेक करून आलो. पण तिथे स्त्री-पुरुष काही दिसले नाही. पण मग यात सॅड होण्यासारखे काही नाही. हे ग्रेट आहे.
हीरा आयडी स्त्री आहे की पुरूष
हीरा आयडी स्त्री आहे की पुरूष माहिती नाही पण मराठीत हीरा सहसा बाईचे नाव असते. इतिहासात हीराबाई होत्या. हिंदीत हीरा पुरूषाचे नाव जास्त ऐकले आहे. देवानंदाचे गाणे आहे-
https://www.youtube.com/watch?v=b7Cgc5nVVkU
(हो, हीरा आली उल्लेख आवडला नसेल तर माफी. हीरा आल्यास सांगतील असा लिंगनिरपेक्ष आदरार्थी अनेकवचनी उल्लेख योग्य!)
हीरा यांना झोपेत उचकी लागली
हीरा यांना झोपेत उचकी लागली असेल.
'कोण व्यक्ती आठवण काढतंय?'
आता मायबोलीवर नावा बरोबर
आता मायबोलीवर नावा बरोबर सर्वनाम (प्रोनाऊन) टाकायची सोय करा म्हणावं अॅडमिनला. - अमित (तो/ त्याचं)
:आय रोल:जाऊ द्या मोरोबा... मला आधीच
जाऊ द्या मोरोबा... मला आधीच गोरंमोरं व्हायला झालंय.
ते अस्मिता/सामो यांच्या अध्यात्मिक पोस्टींवर प्रतिसाद द्यायचे तर मी फारसं धड न वाचता मराठीत हीरा स्त्रीवाचक म्हणून स्त्रीआयडी समज केला. कधी पाहिलंच नाही प्रोफाईल. इथे शा मा म्हणाले म्हणून कळालं.
आता मायबोलीवर नावा बरोबर
आता मायबोलीवर नावा बरोबर सर्वनाम (प्रोनाऊन) टाकायची सोय करा म्हणावं अॅडमिनला. - अमित (तो/ त्याचं) :आय रोल: >> +१०००००० आय रोल नको... सोय हवी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिव्यांग आणि इतर शाब्दिक
दिव्यांग, डिफरंटली एबल्ड आणि इतर शाब्दिक मलमपट्टी
हे बघा. https://youtu.be/vuEQixrBKCc
ओल्ड क्रिपल्ड व्हाईट मेल
ओल्ड क्रिपल्ड व्हाईट मेल सुप्रिमिस्टचा फXX स्ट्युपिड व्हिडिओ. असं डायरेक्ट आवडतं तर तसं बोलतो.
छान, असं डायरेक्टच बोलत चला.
छान, असं डायरेक्टच बोलत चला. उगीच खोटंखोटं गोग्गोड कशाला बोलायचं? (तेच सांगितलंय वरच्या व्हिडीओत. 4:09 Smug, greedy, well-fed white people invented these words.).
काय आहे तो ईंग्लिश विडिओ?
काय आहे तो ईंग्लिश विडिओ?
ऑन ए सिरीअस नोट, त्याचा आवाजाचा पोत आणि बोलायची ढब पाहून शाहरूखची आठवण झाली.
अरेच्चा ! सरांचे धागे वर
अरेच्चा ! सरांचे धागे वर काढायची वेळ झाली.
Pages