Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह हे भारी दिसतेय..
वाह हे भारी दिसतेय..
मुलीचा आहे.
मुलीचा आहे.
Submitted by मेधावि on 21 December, 2021 - 20:52
<<
वा वा वा. अभिनंदन
मानव तुमच्या कडे जबर मेनू
मानव तुमच्या कडे जबर मेनू आहेत आजकाल...
मानवदादा मस्तच मेन्यू.
मानवदादा मस्तच मेन्यू.
माझेमन ही घे मुगवडीची भाजी मी कांदा घातला आहे व मोहरीचे तेल वगळले आहे बाकी तंतोतंत...
आज खूप दिवसांनी शन्या भेटल्या
आज खूप दिवसांनी शन्या भेटल्या त्याची भाजी केली होती.
शन्या
भाजी
शन्या? छान आहे की नाव. माहीत
शन्या? छान आहे की नाव. माहीत नव्हते.
Tempting....
Tempting....
शन्या बोलीभाषेतील वा स्थानिक
शन्या बोलीभाषेतील वा स्थानिक नाव आहे का? कधी ऐकले नव्हते हे नाव..
ब्रेकफास्ट आफ्टर मॉर्निंग वॉक
ब्रेकफास्ट आफ्टर मॉर्निंग वॉक
पहिल्या दिवशी ब्रेड पकोडा झाले.
आज अय्यंगारचे वेज पॅटीस घेऊन आलो.
.
तव्यावरचे Sunny side up -
तव्यावरचे Sunny side up -
ताटात येता येता सूर्य ढगांआड लपला
कडक दिसताहेत हाल्फफ्राय.. हा
कडक दिसताहेत हाल्फफ्राय.. हा आमचा फॅमिली नाश्ता आहे
पण मी हे असे ताटात घेऊन फोटो काढू शकत नाही.. जराही थंड झालेले चालत नाही
पण मी हे असे ताटात घेऊन फोटो
पण मी हे असे ताटात घेऊन फोटो काढू शकत नाही.. जराही थंड झालेले चालत नाही>> मलाही थंड नाही चालत पण फोटो काढायला असा किती वेळ लागतो
ते ही खरेय म्हणा.. पण
ते ही खरेय म्हणा.. पण सायकॉलॉजी.. चहा, हाल्फफ्राय, चहासोबत खायची चपाती मला एकही सेकंद वाया न घालवता गरम लागते. असतात लाड एकेकाचे. यावर स्वतंत्र लेख बनेल.
पण वाफाळत्या चहाने तोंड पोळलं
पण वाफाळत्या चहाने तोंड पोळलं की बाकी पदार्थांची चव कळत नाही म्हणून मी चहा दोन सेकंद थंडच होऊ देते
मिठाच्या पाण्यात आवळे घातले ,
मिठाच्या पाण्यात आवळे घातले , प्रत्येकावर चमच्याने 7,8 बारीक बारीक घाव केले.
मीठ किती घालणार ?
( ह्याचे उत्तर दिल्याशिवाय सेकंड इअर mbbs ला पास करत नाहीत. उत्तर आहे hypersaturated salt solution म्हणजे पाण्यात भरपूर भरपूर मीठ विरघळून तळाशी थोडे अजून मीठ दिसले पाहिजे.
पोस्ट मोरटेम करून अवयव अशाच बरणीतून व मीठमय पाण्यातून लॅबला पाठवतात)
करून बघायला हवं.. पोस्ट
करून बघायला हवं.. पोस्ट मोरटेम नव्हे मीठमय आवळे
आज सकाळी तुरीच्या शेंगा सोलून
आज सकाळी तुरीच्या शेंगा सोलून त्याचे कचोरी केली होती.
सारण
कचोरी
छान
छान
मी तुरीच्या शेंगा नुसत्याच शिजवून ठेवल्या आहेत
Black cat, saturated salt
Black cat, saturated salt solution कुठे वापरतात का? (माहिती म्हणून विचारतेय)आ जकाल तर tissue fixative म्हणून NBF ( Formalin ) वापरलं जातं .
खाऊच्या धाग्यावर कशाला पोस्टमोर्टम, सर्वाना रुचणार नाही.
सर्व पदार्थ लाजवाब, बनवायला हवे वाटतात
ते शन्या भेटल्या वाचून बाईचं नांव वाटतंय, म्हणजे शन्या भेटली व रेसिपी सांगितली इ्.इ..... शेफच्या नावाने ओळखली जाणारी रेसिपी. पदार्थ काय आहे ते समजत नाही
इतके मीठ आरोग्यास हानिकारक
इतके मीठ आरोग्यास हानिकारक नसते का??
खरंच मीठाचे संतृप्त द्रावण
खरंच मीठाचे संतृप्त द्रावण वापरणे गरजेचे आहे का?
मी सुद्धा करणार आहे लौकरच मिठातले आवळे.
या हिशेबाने रोज दोन आवळे खाल्ले तर किती मीठ जाईल पोटात?
मिठाच्या पाण्यात- saturated
मिठाच्या पाण्यात- saturated salt solution कैऱ्या पण टिकवतात, पुढचा आंब्याच्या हंगाम येईपर्यंत तरी आरामात टिकतात. अति मीठ पोटात जाण्याच्या भीतीनं कधी आवडल्या नाहीत पण नातलगांना आवडणारा प्रकार.
मानव - हो, ( संपृक्त शब्द
मानव - हो, ( संतृप्त) शब्द आवडला). गरजेचे आहे कारण ते मिठाचं पाणी आवळ्याच्या पेशींमधील पाण्याला replace करते व खराब होण्यापासून वाचवते.
किती टेबलस्पून मीठ जाते ते नक्की सांगता नाही येणार पण उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी तसंही साठवणिच्या पदार्थ पासून लांब राहावे (अति मीठ असलेल्या- लोणचं पापड इ).
रोज 2 gm मीठ गरजेचे आहे.
रोज 2 gm मीठ गरजेचे आहे..भारतीय व्यक्ती रोज 10gm मीठ खातो..
संतृप्त....
संतृप्त....
संपृक्त द्रावण ना? की मीच चुकीचे लिहितेय!
केया, १० ग्रॅम! एवढे जास्त
केया, १० ग्रॅम! एवढे जास्त याची कल्पना नव्हती.
खूप लोक पापड, लोणची रोज खातात खरे.
यप संपृक्त!!!
यप संपृक्त!!!
देवकी, होय संपृक्त हे बरोबर
देवकी, होय संपृक्त हे बरोबर आहे.
होय , भरपूर मीठ लागत अगदी
होय , भरपूर मीठ लागत अगदी संपृक्त (शाळेत सायन्स मध्ये होत हे) द्रावण म्हणता येईल एवढं. चार पाच दिवसात आवळ्यांचा रंग बदलतो आणि ते पांढरुके दिसायला लागतात. की झाले तयार . मी फार करत नाही तात्पुरते करते आणि फ्रीज मध्येच ठेवते अश्या गोष्टी नेहमी. जेवताना किंवा जेवण झाल्यावर एक आवळा चार पाच जणांना पुरतो. अर्थात मुलं खाऊ शकतील जास्त., मोठी नाही. पण आवळा , कैरी, लिंबू, चिंच ह्या गोष्टी नुसत्या खाणं खूपच कठीण आहे.
मीठ आवळ्यात मुरत असेलच पन नंतर ते पाणी वापरायचं नाही आहे त्यामुळे बेतानी खाऊ शकतो अस मला वाटतय . अर्थात बीपी वैगेरे असेल तर लोणचं चटणी अश्या मीठ preservative म्हणून घातलेल्या गोष्टी न खाणच बरं.
आवळा म्हटलं की हेच दृश्य डोळ्यासमोर येत. आमच्या ऑफिस मध्ये एक साधरण मध्यमवयीन बाई सी व्हिटॅमिन साठी जेवताना रोज एक आखका डोंगरी आवळा नुसता काही ही न लावता खात असे आवळ्याच्या सिझन मध्ये. आमचेच दात आंबत असत तिला खाताना बघून. असो.
अति सर्वत्र वर्ज्ययेत हे माझं प्रिन्सिपल आहे सगळ्याच बाबतीत.
मानव..पापड,लोणची, सरबत,चिप्स,
मानव..पापड,लोणची, सरबत,चिप्स, फरसाण,चिवडा, चिरमुरे, खारी बिस्किटे,टोस्ट,पाणीपुरी मसाला, चाट मसाला.. आणि अजून अनेक गोष्टी आहेत ज्यात प्रचंड प्रमाणात मीठ असते..
साखरेपेक्षा जास्त घातक आहे मीठ खरतर...
Pages