Submitted by हर्ट on 4 April, 2012 - 02:24
रोजच्या वापरातले तवे, कढई, पळ्या ह्या जर लोखंडी वा बीडाच्या असतील तर गंजू नये म्हणून काय करावे? गंज जर अन्नात उतरला तर तो विषारी असतो म्हणे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भांड्यांना तेल लावून ठेवायचे.
भांड्यांना तेल लावून ठेवायचे.
भांड्यांना तेल लावून
भांड्यांना तेल लावून ठेवायचे.
>>> बरोबर.. आमच्या घरी तेच करतात..
बी, समुद्रकिनारी
बी, समुद्रकिनारी राहणार्यांना हा प्रॉब्लेम जास्तच जाणवतो.
गोव्याला तर अगदी दरवाजाचे कडी कोयंडे पण गंजतात.
तेल लावावेच लागते पण त्या आधी कोरडे पुसून घ्यावे लागते.
गंजाबद्दल नाही पण लोखंडी
गंजाबद्दल नाही पण लोखंडी भांड्याबद्दल प्रश्न आहे म्हणून इथे विचारते.
चार दिवसांपूर्वी डी-मार्टमधून लोखंडी कढई आणली. साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून ठेवली होती. आज त्याच्यात भेंडीची भाजी करायला घेतली तर भेंडी परतायला लागल्यावर काहीतरी केमिकल सारखा वास यायला लागला. एक चमचा भाजी खाऊन पाहिली पण उगीच रिस्क नको म्हणून टाकून दिली सगळी भाजी आता त्या कढईत पाणी घालून उकळवत ठेवले आहे. ह्या आधीची कढई वापरलेलीच मिळाली होती त्यामुळे लोखंडी कढई नवीन आणल्यावर काय करायचे असते ते माहीत नाही. बीडाच्या भांड्यांसारखी ही भांडीही सिझन करुन घ्यायची असतात का ? की कढईतच गडबड आहे ?
रोजच्या वापरातले तवे, कढई,
रोजच्या वापरातले तवे, कढई, पळ्या ह्या जर लोखंडी वा बीडाच्या असतील तर गंजू नये म्हणून काय करावे?
>>
बी महाराज,
धन्य धन्य!!
लोखंडाची कढई, पळी वगैरे
लोखंडाची कढई, पळी वगैरे धुतल्याधुतल्या पुसून घेऊन तेल वगैरे लावून ठेवणं हा उपाय करून बघ.
रोजच्या वापरातल्या तवा,
रोजच्या वापरातल्या तवा, कढयांना गंज येतो?
अगो, सीझन नाही करायला लागत.
अगो, सीझन नाही करायला लागत. चिंचेने स्वच्छ घासून घे एकदा आणि मग माइल्ड साबणाच्या पाण्याने धुवून अगदी कोरडीठक्क पुसून सायो म्हणाली तसा तेलाचा हलका हात फिरवून ठेव. दरवेळी वापरलीस की स्वच्छ करायची हीच मेथड. चिंच, लिंबाची उरलेली सालं, आंबट ताकसुद्धा चालतं लावलेलं.
ओके, तसेच करते.
ओके, तसेच करते. थँक्स.
केमिकलचा वास का आला ते मात्र कळले नाही. आय होप, चिंचेने घासून धुतल्यावर तो वास जाईल.
आट पाट नगर होते. तिथे रबियाबी
आट पाट नगर होते. तिथे रबियाबी (रब इसे बी) रहात होती. रोज स्वयंपाक करी. धाग्यांतून करीचा अर्थ वाची तरी पण करी. करी कारायची भांडी लोखंडाची. ती गंजू लागली. मग रबिया बी ने धागा काढिला. सख्यांनो, (सखा अन सखी दोहोंचे अ.व. सख्या असेच होते प्लीजच नोट. मीपण भाप्र आहे, हे देखिल प्लीजच नोट) माझे गंज लोखंडी असल्याने गंजतात. त्यावर उपाय सांगा.
मग तिकडून पंच सख्या गंजाचा वसा वसत होत्या. हिने त्यांना मनोभावे विचारले. तर त्यांनी बिनगंजाचे व्रत सांगितले. आधी माबोवर बिडाची भांडि व क्युअरींग असा धागा सर्च करा, नच जमले, तर पुढले व्रत आचरा: पण हा वसा डेंजरस. आधी शपथ घ्यावी लागते.
उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही
रबिया बी ने वसा घेतला. कोणता वसा?
दर शुक्रवारी भल्या पहाटे रामप्रहरी (सहेरी कू. इफ्तारी कर्के सोते ना मियाँ) उठावे. पंचा नेसून आन्हिके उरकावीत. मुख्य म्हणजे शुक्रवार असल्याने आंघोळ करावी. मग ओलेत्या अंगाने रस्त्यावर यावे. पहिला गंजा दिसेल, त्याच्या टाळक्यात आपला लोखंडी गंज हाणावा. त्या 'गंजा'ने टकलावर 'बाल' उगवावेत म्हणून जॅकीश्रॉफ टीव्हीवर विकतो अन रोहिणी हात-तंगडी अनुमोदन देते तसली अनेक तेले थापली असतील. टकलावर थापलेली तेले लोखंडी गंजावर आपोआप अन फुकट येतील. या गंजाच्या डोक्यावर थापलेल्या तेलांच्या योगाने गंजातला गंज आपोआप कमी लागेल.
नंतर गंज स्व्च्छ धुवावा. ती महिनाभराची ती आपली ती ही विकते त्या ढोल्याची चिकणी बायको जाहिरात करते, ती पावडर जमल्यास वापरावी. नसल्यास नुसतेच घासले तरी पुरते. नेक्ष्ट 'गंजा' रस्त्यावर केव्हा येतो ते पहात रहावे.
या व्रताचे आचरण पूर्ण रमजानभर करावे.
याने काय होईल?
गंज कमी होईल.
गंजेपण कमी होईल.
रबिया बी चे टेन्शन देखिल कमी होईल.
तिला गंजाचे तेल प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हास होवो,
ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण!
इब्लिस
इब्लिस
वरच्या प्रतिसादात भाप्र =
वरच्या प्रतिसादात भाप्र = बासा पर्बू हे पण प्लीजच नोट
:) :)
इब्लिस
इब्लिस
इब्लिसदा एकच नंबर
इब्लिसदा
एकच नंबर
इब्लिस
इब्लिस
लई भारीच
लई भारीच
मी ऐकले की हायड्रोजन
मी ऐकले की हायड्रोजन पेरॉक्साईड नि बेकींग सोडा यांची पेस्ट करून लावली की गंज निघून जातो म्हणतात. माझा स्वैपाकाच्या भांड्यांशी फारसा संबंध नाही, पण कुठेतरी वाचले म्हणून लिहीले.
इब्लिसांनी सांगितलेल्या व्रताच्या माहितीत एक उणीव आहे. व्रताचे उद्यापन करण्यासाठी ब्राह्मण दांपत्यास भोजन व भरपूर दक्षिणा द्यावी. कारण त्यांचा कोप झाला तर तुमची स्टेनलेस स्टीलची भांडी पण गंजतील.
पूर्ण व्रत करणे न जमल्यास, महिनाभर दररोज ब्राह्मण भोजन व सहस्त्र (डॉ) दक्षिणा द्यावी.
(मी ब्राह्मण आहे, व घरात एक जानवे आहे, ते मी काही सेकंदात धारण करू शकतो. चार दोन संस्कृत श्लोकहि म्हणेन! )
मी ब्राह्मण आहे, व घरात एक
मी ब्राह्मण आहे, व घरात एक जानवे आहे, ते मी काही सेकंदात धारण करू शकतो. चार दोन संस्कृत श्लोकहि म्हणेन! >>> तरीही तुम्हाला दक्षिणा नाही मिळणार , कारण तुम्ही अमेरिकन आहात.
लोखंडी भांडे गंजु नयेत
लोखंडी भांडे गंजु नयेत म्हण्य्य्न आई त्यांना तेल लावुन वर्तमानपत्रात गुंडाळायची बहुतेक....
इब्लिस.. कैच्याकै
इब्लिस, झक्की >>> एकच
इब्लिस, झक्की >>> एकच नंबर...
गेस करा बरं, आता पुढच्या धाग्याचा विषय कोणता असेल ???
बी तुमच्या बी ला पण माहिती
बी तुमच्या बी ला पण माहिती नाय काय?
गंजाबद्दल प्रश्न नाहीये पण
गंजाबद्दल प्रश्न नाहीये पण लोखंडी भांड्यात काय काय बनवता येईल या विषयी आहे.
लोखंडी कढई भेंडी, गवार , पालेभाज्या करताना वापरते. एकाच वेळी सगळे सकाळी जेवत नाहीत. साधारण अर्धा ते पाऊण तास केलेला जिन्नस त्याच कढईत राहतो. या भाज्या तशा काळसर दिसतात पण खमंग ही लागतात त्यामुळे भाजीच रुपडं बघितलं जात नाही. पण दुधी, दोडका, उसळी, आमटी हे त्यात केलं की चव बदलते.
आणि कुठल्या भाज्या लोखंडी कढईत करता येतील ?
अवांतर थोडं :
कांदा टोमॅटो तेलात परतून जी ग्रेव्ही करतो ती मी इतके दिवस अल्युमिनियम कढईत करत होते. स्टील ची जाड बुडाची कढई आहे त्यात परतताना खाली चिकटते. मग परतून झालं की परत कढई धुवून भाजी करावी लागते. तसच पोहे, साबुदाणा खिचडी या जड स्टील च्या कढईत चिकटतच. लोणी ही कढवायला अल्युमिनियम वापरलं जातंय.
मधनतरी हौसेने मातीची 3 भांडी आणली आता ती धूळ खात पडलीत कारण आतून काळसर झालीत आणि एक तवंग असतो कितीही घासली तरी. फक्त चहाच अधूनमधून वापरतेय. तवा खूप छोटा आहे त्यामुळं तो पडून राहिलाय. पण पोळ्याना ,भाकरीला लोखंडी तवा वापरतेय.
सोमी वर सगळीकडे वाचून आता अल्युमिनियम बंद करून लोखंडी भांडी वापरायचा विचार आहे. नॉनस्टिक फक्त अळूवड्या ,कटलेट शॅलो फ्राय साठी अधूनमधून वापरलं जातंय. त्याला ही पर्याय सापडला तर बरे.
वर्णिता मी रोजचा सगळा
वर्णिता मी रोजचा सगळा स्वयंपाक लोखंडाच्या कढईत बनवते. लहान मोठ्या 2-3आहेत. शक्यतो रस्सा भाजी झाली की लगेच स्टील च्या भांड्यांत काढून घेते आणि त्याच भांड्यात परत गरम करते(जर गार झाले तर)
पालेभाज्या पण लोखंडाच्या कढईतून लगेच स्टीलच्या भांड्यांत काढून घेते. जेवण थंड झाले तर मायक्रोवेव वापरते.
पोळ्या/ भाकरी/ थालिपीठ सगळे लोखंडाच्या तव्यावरच बनवते.
गंजपेठेतून जाताना गंजलेली
गंजपेठेतून जाताना गंजलेली भांडी घेऊन मी लकाकी रोडने चालत जात असे. एकदम चकाचक होत.
सियोना , ओके
सियोना , ओके
मी सुद्धा लोखंडाच्या कढयांचा
मी सुद्धा लोखंडाच्या कढयांचा वापर सुरु केलेला आहे. ‘विनोद’ ब्रँड अतिशय चांगला आहे. तव्याचे हँडल / कढईचे कान धरायला त्यांनी छानशी कापडी खोळसुद्धा दिलेली आहे. रोजच्या पोळ्या लोखंडी साध्या तव्यावर पण दोसे करायला काठ असलेला जाड लोखंडी तवा वापरते. त्यावर काय सुंदर दोसे होतात! आमचे बेंगळूरु स्टाइल दोसे - थोडे जाड आणि कुरकुरीत. बिना काठाच्या लोखंडी तव्यावर पातळ दोसे छान होतात. दर २ दोशांनंतर दोन-तीन थेंब तेल टाकून पुसून घ्यावं लागतं. पण लोखंडी तव्यावरील पदार्थांच्या चवीला तोड नाही.
नॉनस्टिक फक्त अळूवड्या ,कटलेट
नॉनस्टिक फक्त अळूवड्या ,कटलेट शॅलो फ्राय साठी अधूनमधून वापरलं जातंय. त्याला ही पर्याय सापडला तर बरे.> बिडाचे तवे.
मासे, कोथिंबीरवड्या सगळं काही तळण्यासाठी (shallow fry) तसेच आंबोळ्या , डोसे , घावणे यासाठी मी बिडाचा तवाच वापरते. पूर्वी नॉनस्टिक वापरायचे पण गेले चार वर्षे अजिबात अडले नाही. फुलक्यासाठी एक नॉनस्टिक तवा ठेवलेला पण त्यासाठी हि छोटा हॅण्डल असलेला लोखंडाचा वजनाने हलका तवा घेतला .
पार्वती ..आता चेक केलं तर
पार्वती ..आता चेक केलं तर 2500 ला दाखवत आहे लोखंडी कढई....is it worth spending?
तुमच्याकडे कोणती आहे ते
तुमच्याकडे कोणती आहे ते सांगणार का..विनोद ची स्टील ची भांडी कशी आहेत..चिकटत का बुडाला?
Pages