लोखंडी भांड्यांचा गंज - तवा/कढई/पळी

Submitted by हर्ट on 4 April, 2012 - 02:24

रोजच्या वापरातले तवे, कढई, पळ्या ह्या जर लोखंडी वा बीडाच्या असतील तर गंजू नये म्हणून काय करावे? गंज जर अन्नात उतरला तर तो विषारी असतो म्हणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, समुद्रकिनारी राहणार्‍यांना हा प्रॉब्लेम जास्तच जाणवतो.
गोव्याला तर अगदी दरवाजाचे कडी कोयंडे पण गंजतात.
तेल लावावेच लागते पण त्या आधी कोरडे पुसून घ्यावे लागते.

गंजाबद्दल नाही पण लोखंडी भांड्याबद्दल प्रश्न आहे म्हणून इथे विचारते.

चार दिवसांपूर्वी डी-मार्टमधून लोखंडी कढई आणली. साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून ठेवली होती. आज त्याच्यात भेंडीची भाजी करायला घेतली तर भेंडी परतायला लागल्यावर काहीतरी केमिकल सारखा वास यायला लागला. एक चमचा भाजी खाऊन पाहिली पण उगीच रिस्क नको म्हणून टाकून दिली सगळी भाजी Sad आता त्या कढईत पाणी घालून उकळवत ठेवले आहे. ह्या आधीची कढई वापरलेलीच मिळाली होती त्यामुळे लोखंडी कढई नवीन आणल्यावर काय करायचे असते ते माहीत नाही. बीडाच्या भांड्यांसारखी ही भांडीही सिझन करुन घ्यायची असतात का ? की कढईतच गडबड आहे ?

रोजच्या वापरातले तवे, कढई, पळ्या ह्या जर लोखंडी वा बीडाच्या असतील तर गंजू नये म्हणून काय करावे?

>>
बी महाराज,
धन्य धन्य!!

लोखंडाची कढई, पळी वगैरे धुतल्याधुतल्या पुसून घेऊन तेल वगैरे लावून ठेवणं हा उपाय करून बघ.

अगो, सीझन नाही करायला लागत. चिंचेने स्वच्छ घासून घे एकदा आणि मग माइल्ड साबणाच्या पाण्याने धुवून अगदी कोरडीठक्क पुसून सायो म्हणाली तसा तेलाचा हलका हात फिरवून ठेव. दरवेळी वापरलीस की स्वच्छ करायची हीच मेथड. चिंच, लिंबाची उरलेली सालं, आंबट ताकसुद्धा चालतं लावलेलं.

ओके, तसेच करते. थँक्स.
केमिकलचा वास का आला ते मात्र कळले नाही. आय होप, चिंचेने घासून धुतल्यावर तो वास जाईल.

आट पाट नगर होते. तिथे रबियाबी (रब इसे बी) रहात होती. रोज स्वयंपाक करी. धाग्यांतून करीचा अर्थ वाची तरी पण करी. करी कारायची भांडी लोखंडाची. ती गंजू लागली. मग रबिया बी ने धागा काढिला. सख्यांनो, (सखा अन सखी दोहोंचे अ.व. सख्या असेच होते प्लीजच नोट. मीपण भाप्र आहे, हे देखिल प्लीजच नोट) माझे गंज लोखंडी असल्याने गंजतात. त्यावर उपाय सांगा.
मग तिकडून पंच सख्या गंजाचा वसा वसत होत्या. हिने त्यांना मनोभावे विचारले. तर त्यांनी बिनगंजाचे व्रत सांगितले. आधी माबोवर बिडाची भांडि व क्युअरींग असा धागा सर्च करा, नच जमले, तर पुढले व्रत आचरा: पण हा वसा डेंजरस. आधी शपथ घ्यावी लागते.

उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही

रबिया बी ने वसा घेतला. कोणता वसा?

दर शुक्रवारी भल्या पहाटे रामप्रहरी (सहेरी कू. इफ्तारी कर्के सोते ना मियाँ) उठावे. पंचा नेसून आन्हिके उरकावीत. मुख्य म्हणजे शुक्रवार असल्याने आंघोळ करावी. मग ओलेत्या अंगाने रस्त्यावर यावे. पहिला गंजा दिसेल, त्याच्या टाळक्यात आपला लोखंडी गंज हाणावा. त्या 'गंजा'ने टकलावर 'बाल' उगवावेत म्हणून जॅकीश्रॉफ टीव्हीवर विकतो अन रोहिणी हात-तंगडी अनुमोदन देते तसली अनेक तेले थापली असतील. टकलावर थापलेली तेले लोखंडी गंजावर आपोआप अन फुकट येतील. या गंजाच्या डोक्यावर थापलेल्या तेलांच्या योगाने गंजातला गंज आपोआप कमी लागेल.

नंतर गंज स्व्च्छ धुवावा. ती महिनाभराची ती आपली ती ही विकते त्या ढोल्याची चिकणी बायको जाहिरात करते, ती पावडर जमल्यास वापरावी. नसल्यास नुसतेच घासले तरी पुरते. नेक्ष्ट 'गंजा' रस्त्यावर केव्हा येतो ते पहात रहावे.

या व्रताचे आचरण पूर्ण रमजानभर करावे.

याने काय होईल?

गंज कमी होईल.

गंजेपण कमी होईल.

रबिया बी चे टेन्शन देखिल कमी होईल.

तिला गंजाचे तेल प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हास होवो,

ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

इब्लिस Rofl

Happy Happy Happy Happy

मी ऐकले की हायड्रोजन पेरॉक्साईड नि बेकींग सोडा यांची पेस्ट करून लावली की गंज निघून जातो म्हणतात. माझा स्वैपाकाच्या भांड्यांशी फारसा संबंध नाही, पण कुठेतरी वाचले म्हणून लिहीले.

इब्लिसांनी सांगितलेल्या व्रताच्या माहितीत एक उणीव आहे. व्रताचे उद्यापन करण्यासाठी ब्राह्मण दांपत्यास भोजन व भरपूर दक्षिणा द्यावी. कारण त्यांचा कोप झाला तर तुमची स्टेनलेस स्टीलची भांडी पण गंजतील.

पूर्ण व्रत करणे न जमल्यास, महिनाभर दररोज ब्राह्मण भोजन व सहस्त्र (डॉ) दक्षिणा द्यावी.

(मी ब्राह्मण आहे, व घरात एक जानवे आहे, ते मी काही सेकंदात धारण करू शकतो. चार दोन संस्कृत श्लोकहि म्हणेन! )

Wink

मी ब्राह्मण आहे, व घरात एक जानवे आहे, ते मी काही सेकंदात धारण करू शकतो. चार दोन संस्कृत श्लोकहि म्हणेन! >>> तरीही तुम्हाला दक्षिणा नाही मिळणार , कारण तुम्ही अमेरिकन आहात. Proud

लोखंडी भांडे गंजु नयेत म्हण्य्य्न आई त्यांना तेल लावुन वर्तमानपत्रात गुंडाळायची बहुतेक....

इब्लिस.. कैच्याकै Lol

इब्लिस, झक्की >>> एकच नंबर... Rofl

गेस करा बरं, आता पुढच्या धाग्याचा विषय कोणता असेल ??? Wink

गंजाबद्दल प्रश्न नाहीये पण लोखंडी भांड्यात काय काय बनवता येईल या विषयी आहे.
लोखंडी कढई भेंडी, गवार , पालेभाज्या करताना वापरते. एकाच वेळी सगळे सकाळी जेवत नाहीत. साधारण अर्धा ते पाऊण तास केलेला जिन्नस त्याच कढईत राहतो. या भाज्या तशा काळसर दिसतात पण खमंग ही लागतात त्यामुळे भाजीच रुपडं बघितलं जात नाही. पण दुधी, दोडका, उसळी, आमटी हे त्यात केलं की चव बदलते.
आणि कुठल्या भाज्या लोखंडी कढईत करता येतील ?

अवांतर थोडं :
कांदा टोमॅटो तेलात परतून जी ग्रेव्ही करतो ती मी इतके दिवस अल्युमिनियम कढईत करत होते. स्टील ची जाड बुडाची कढई आहे त्यात परतताना खाली चिकटते. मग परतून झालं की परत कढई धुवून भाजी करावी लागते. तसच पोहे, साबुदाणा खिचडी या जड स्टील च्या कढईत चिकटतच. लोणी ही कढवायला अल्युमिनियम वापरलं जातंय.
मधनतरी हौसेने मातीची 3 भांडी आणली आता ती धूळ खात पडलीत कारण आतून काळसर झालीत आणि एक तवंग असतो कितीही घासली तरी. फक्त चहाच अधूनमधून वापरतेय. तवा खूप छोटा आहे त्यामुळं तो पडून राहिलाय. पण पोळ्याना ,भाकरीला लोखंडी तवा वापरतेय.
सोमी वर सगळीकडे वाचून आता अल्युमिनियम बंद करून लोखंडी भांडी वापरायचा विचार आहे. नॉनस्टिक फक्त अळूवड्या ,कटलेट शॅलो फ्राय साठी अधूनमधून वापरलं जातंय. त्याला ही पर्याय सापडला तर बरे.

वर्णिता मी रोजचा सगळा स्वयंपाक लोखंडाच्या कढईत बनवते. लहान मोठ्या 2-3आहेत. शक्यतो रस्सा भाजी झाली की लगेच स्टील च्या भांड्यांत काढून घेते आणि त्याच भांड्यात परत गरम करते(जर गार झाले तर)
पालेभाज्या पण लोखंडाच्या कढईतून लगेच स्टीलच्या भांड्यांत काढून घेते. जेवण थंड झाले तर मायक्रोवेव वापरते.
पोळ्या/ भाकरी/ थालिपीठ सगळे लोखंडाच्या तव्यावरच बनवते.

मी सुद्धा लोखंडाच्या कढयांचा वापर सुरु केलेला आहे. ‘विनोद’ ब्रँड अतिशय चांगला आहे. तव्याचे हँडल / कढईचे कान धरायला त्यांनी छानशी कापडी खोळसुद्धा दिलेली आहे. रोजच्या पोळ्या लोखंडी साध्या तव्यावर पण दोसे करायला काठ असलेला जाड लोखंडी तवा वापरते. त्यावर काय सुंदर दोसे होतात! आमचे बेंगळूरु स्टाइल दोसे - थोडे जाड आणि कुरकुरीत. बिना काठाच्या लोखंडी तव्यावर पातळ दोसे छान होतात. दर २ दोशांनंतर दोन-तीन थेंब तेल टाकून पुसून घ्यावं लागतं. पण लोखंडी तव्यावरील पदार्थांच्या चवीला तोड नाही.

नॉनस्टिक फक्त अळूवड्या ,कटलेट शॅलो फ्राय साठी अधूनमधून वापरलं जातंय. त्याला ही पर्याय सापडला तर बरे.> बिडाचे तवे.
मासे, कोथिंबीरवड्या सगळं काही तळण्यासाठी (shallow fry) तसेच आंबोळ्या , डोसे , घावणे यासाठी मी बिडाचा तवाच वापरते. पूर्वी नॉनस्टिक वापरायचे पण गेले चार वर्षे अजिबात अडले नाही. फुलक्यासाठी एक नॉनस्टिक तवा ठेवलेला पण त्यासाठी हि छोटा हॅण्डल असलेला लोखंडाचा वजनाने हलका तवा घेतला .

Pages