लोखंडी भांड्यांचा गंज - तवा/कढई/पळी

Submitted by हर्ट on 4 April, 2012 - 02:24

रोजच्या वापरातले तवे, कढई, पळ्या ह्या जर लोखंडी वा बीडाच्या असतील तर गंजू नये म्हणून काय करावे? गंज जर अन्नात उतरला तर तो विषारी असतो म्हणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता चेक केलं तर 2500 ला दाखवत आहे लोखंडी कढई......... केया,माझ्या शेजारणीने ह्या किंमतीची कढई घेतली आहे. वोकला लांब हॅण्डल आहे.छान फॅन्सी आहे.
पण मी कालच एका प्रदर्शनात मोठी आणि जड कढई पाहिली.500 रुपये फक्त.kanvali कढई होती.घेऊ का म्हणून विचार करतेय.खूप मोठी असल्याने भाजीसाठी शक्य नाही.फक्त बेसन भाजायला ठीक आहे माझ्या घरी.
काय करू काळात नाही.ठेवायला जागा नाही आणि सोस सुटत नाही.

विनोद ब्रँड नक्की चांगला आहे केया. माझ्याकडे लोखंडी नाही, पण स्टीलची (सँडविच बॉटम, ज्यात मधला थर अल्युमिनियम आणि वर-खाली स्टील असतं) दोन पातेली आणि एक भाजीचा कुकर (स्टीलचाच) आहे. एकदम मस्त आहेत.

नाही लागत. जाड बुडाची भांडी आहेत आणि बुडाला तीन थर असतात त्यापैकी मधला थर अल्युमिनियमचा असतो. मी कोरड्या भाज्या किंवा गोडाचा शिरा वगैरेही त्यात करते.

प्लिज तुमच्या भांड्यांचे फोटो इथे किंवा त्या धाग्यावर टाकाल का? घेताना रेफरन्स असेल तर बरं पडेल.
रच्याकने, माझा पण सेम अनुभव आहे लोखंडी कढईचा. देशातुन येताना ओळखीच्या दुकानातुन लोखंडी कढई घेतली होती पण केमिकल चा खुप वास येत होता. किती वेळा धुतली / सिझन केली तरी तो वास (रॉकेल / पेट्रोल) सारखा येत होता.
शेवटी कढई ठेऊन दिली. Sad

प्लिज तुमच्या भांड्यांचे फोटो इथे किंवा त्या धाग्यावर टाकाल का? घेताना रेफरन्स असेल तर बरं पडेल.
रच्याकने, माझा पण सेम अनुभव आहे लोखंडी कढईचा. देशातुन येताना ओळखीच्या दुकानातुन लोखंडी कढई घेतली होती पण केमिकल चा खुप वास येत होता. किती वेळा धुतली / सिझन केली तरी तो वास (रॉकेल / पेट्रोल) सारखा येत होता.
शेवटी कढई ठेऊन दिली. Sad

आमच्या इथेच आहे विनोद ची फॅक्टरी, सगळीच भांडी छान असतात त्यांची. ७० % विनोदच आहेत घरी.
Export quality असतात, मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया आणि गाॅरडन रॅमसे च्या शो मधे बघितलेली.

मला लोखंडी कढई घेतानाच दुकानदाराने सांगितले होते की ह्यात चिंच घालून उकळा आणि नंतर कढई वापरा. दोन वेळा तसे केले. आणी कढई चांगली घासून काढली. आता काहीच प्राॅब्लेम नाही.

केया, अगदी डोळे झाकून घ्या. अगदी विदेशी असतात ना तसल्या प्रकारची ही लोखंडी भांडी आहेत. ग्रिल पॅन थेट अवन वगैरे मध्ये टाकायलाही मस्त आणि इंडक्शनवरही चालतात. ‘विनोद’ ची सर्वच भांडी छान असतात. स्टीलची नाहीयेत माझ्याकडे. महाग महाग म्हणून घेतली नाहीत. पण क्वालिटी अगदी मस्त असते. लोखंडी कढई वगैरे साठी ‘रॉक’ हा आणखी एक देशी ब्रँड आहे ॲमेझॉनवर. चेन्नैचा असावा. तो पण छान आहे. आता ॲमेझॉनचा सोलिमो वगैरे पण आहे.

बुडाला तीन थर असतात त्यापैकी मधला थर अल्युमिनियमचा असतो >> धिस इज इंटरेस्टिंग. माझ्या आयटीआयच्या तोकड्या ज्ञानाच्या आधारे हे सांगता येईल की दोन वेगळे धातू तापमान वाढवल्यास आणि कमी केल्यास वेगवेगळ्या प्रमाणात प्रसरण आणि आकुंचन पावतात. तसे ह्या बाबतीत होत असेल तर त्यात अंतर्गत ताण वाढत जाऊन कधीतरी भांडे तळाशी वाकडे -तिकडे (असमतोल) होणार नाही का? तुमचा काय अनुभव आहे?

Pages