दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
फटाके वाजवायचे नाहीत, तर
फटाके वाजवायचे नाहीत, तर दारू पण प्यायची नाही असे का नाही ठरवत?
फार दारू पितात बुवा भारतातले लोक!
लहान मुलांना आनंद मिळण्यासाठी
लहान मुलांना आनंद मिळण्यासाठी फटाके ऊडवू द्यावेत , तुम्ही-आम्ही लहानपणी उडवले मग आता आपल्या मुलांनी का नाही ऊडवयचे असे वाटणार्यांसाठी ब्रुसलीचा हा कोट शेअर करावासा वाटतो
"Instead of buying your children all the things you never had, you should teach them all the things you were never taught. Material wears out, but knowledge stays."
ऊद्या प्रदुषणांमुळे आजारी पडलेल्या आपल्या मुलांना बघून आजच्या बाबांच्या मुलांनी विचारले 'बाबा मला का नाही शिकवले लहानपणी फटाके ऊडवण्याचे विपरित परिणाम' तर?
भविष्यात विपरीत परिणाम फक्त
भविष्यात विपरीत परिणाम फक्त फटाक्यांमुळे होणार आहेत बाकी सगळ्या प्रदूषण होणाऱ्या गोष्टी जीवनावश्यक आहेत. त्या नसल्या तरी आपण तडफडू असं लिहिलंय कोणीतरी वर.
अजूनही दिल्ली मधे स्मॉगची
अजूनही दिल्ली मधे स्मॉगची परिस्थिती गंभिर आहे. मी दिवाळी संपण्याची आणि परिस्थिती थोडी तरी निवळण्याची वाट पहात होते. आधी म्हटल्याप्रमाणे दिवाळीतले फटाके हे परिस्थिती बिघडविण्यास हातभार लावतात, पण स्मॉगचे प्रमुख कारण नाही आहे. इतर कारणांचा (शेतातला कचरा, वाहतून , पावर प्लँट आदींचा आणि एकंदर जिवनशैलीचा गांभिर्याने विचार व्हायला हवा.
आज PM2.5 = 470 असे दाखवतो आहे, चोविस तासांमधले सर्वच काळात प्रदूषण "severe " असे म्हटले आहे.
दिल्लीतील शाळा , कॉलेजेस तसेच ६ थर्मल पावर प्लँट्स महिना अखेर पर्यंत बंद ठेवणार आहेत.
https://indianexpress.com/article/cities/delhi/air-panel-directs-work-fr...
ऊद्या प्रदुषणांमुळे आजारी
ऊद्या प्रदुषणांमुळे आजारी पडलेल्या आपल्या मुलांना बघून आजच्या बाबांच्या मुलांनी विचारले 'बाबा मला का नाही शिकवले लहानपणी फटाके ऊडवण्याचे विपरित परिणाम' तर? >> ह्या भीतीने कुणी फटाके सोडेल असं वाटत नाही. अगदीच विचारलं मुलांनी तर हे लोक सांगतील की 'आमच्या लहानपणी आम्हीही उडवलेच की फटाके, तेव्हा काही झालं नाही. तुमच्या पिढीत मुळात मोबाईल, संगणक वगैरे मुळे व्यायाम नाही, मैदानी खेळ नाहीत, रोगप्रतिकारकशक्ती कमी. त्या गोष्टी करा म्हणून कानी-कपाळी ओरडलो, तेह्वा त्या केल्या नाहीत आणि आता फटाक्यांचे दुष्परिणाम का नाही सांगितले ते तोंड वरती करून विचारता!'
वातावरण आणि प्रकृतीवर फटाके परिणाम करत आहेतच, त्याशिवाय इतर कित्येक गोष्टी करत आहेत. त्या प्रत्येक गोष्टीला असे आयसोलेट करून बाबांना कुणी प्रश्न विचारेल असं वाटत नाही. मुळात एवढ्या सगळ्या प्रदूषण होणाऱ्या गोष्टी जीवनावश्यक असतील (आणि पुढच्या जीवांच्या जीवनाचा नाश करणार असतील) तर बाबा मला जन्मालाच का घातलं - हा प्रश्न येऊ शकतो.
ऊद्या प्रदुषणांमुळे आजारी
दो वे ती प्र आ म्ह प्र का टा आ
आता फटाक्यांचे दुष्परिणाम का
आता फटाक्यांचे दुष्परिणाम का नाही सांगितले ते तोंड वरती करून विचारता!' >>>> कोर्टात चोर आपल्या आईचा कान चावतो व लहानपणी चोर्या करायला लागल्यावर तेव्हाच माझा कान उपटून का नाही सांगितलेस अशा एक ऐकलेल्या बोधकथेची आठवण झाली.
एक नंबर! मागे (पान क्र ९ वर)
एक नंबर! मागे (पान क्र ९ वर) पण माझा प्रतिसाद वाचून तुम्हाला खुलभर दूध (की पाणी) असलेली बोधप्रद कथा आठवल्याचे स्मरते. मी आता बोधिवृक्षाखालीच हापिस थाटीन म्हणतो! (ह घ्या)
ऑन ए सिरीयस नोट, ती कान चावण्याची कथा मला बिलकुल पटत नाही. आईने भले शिक्षा न करू देत, मुलाला स्वतःची काही सदसद्विवेकबुद्धी आहे की नाही? शाळेत काहीतरी शिकला असेल की नाही? उगा आपल्या चुकीचं खापर बिचाऱ्या आईवर फोडणं अजिबात समर्थनीय नाही.
पण काहीही म्हणा घाटपांडेंच्या
पण काहीही म्हणा घाटपांडेंच्या लिखाणात एक प्रकारची जादू आहे. त्यांचा लेख आणि चर्चा वाचून अनेक जण जे फटाके फोडत न्हवते त्यांना फटाके फ़ोडावेसे वाटत आहेत.आणि जे पहिल्यापासून फोडत आहेत ते तर हा लेख वाचून दररोज फोडतील कि काय अशी भीती मला वाटायला लागली आहे.
काल तुळशीच्या लग्नाला मुलगी
काल तुळशीच्या लग्नाला मुलगी आणि तिचे फ्रेंडस माझ्याकडे फटाके मागायला आलेले. कारण एकच दिवस वाजवल्याने आमचेच फटाके शिल्लक होते. बिल्डींगमध्ये कोणाकडे तरी तुळशीचे लग्न होते. त्यांनी या मुलांना सांगितले की हे लग्न लागल्यावर फटाके वाजवायचे असतात. मी आधी त्या मुलांना फटाके द्यायला नकार दिला. दिवाळी संपली, पोलिस पकडून नेतील आता वाजवले तर असे म्हणालो. पण पोरांचा गलका काही शांत होत नव्हता. मग चक्रपाऊस न देता फक्त फुलबाजे देऊन सेटलमेंट झाली.
परवा पेप्रात एका माणसाला
परवा पेप्रात एका माणसाला इतर लोक्स फटाके वाजवत होते व हा फक्त बघायला बाहेर फिरत होता तर एकदम पोटात काहीतरी घुसले.
हे जाण वले व रक्त आले. फटाक्याचे श्रापनेल लिव्हर मध्ये घुसले व लॉज झाले. नशिबाने रक्तवाहिनी किंवा गॉल ब्लॅडर ला काही झालेले नाही.
पण ट्रीटमेंट दहा दिवस घ्यावी लागली. व तो आता घरी परत गेला आहे.
जिथे मुळात रिक्स नाही व अवॉइ ड करू शकतो तिथे रिक्स क्रिएट करावे असे माण सांना का वाटत असावे?
मुलाला स्वतःची काही
मुलाला स्वतःची काही सदसद्विवेकबुद्धी आहे की नाही? शाळेत काहीतरी शिकला असेल की नाही? उगा आपल्या चुकीचं खापर बिचाऱ्या आईवर फोडणं अजिबात समर्थनीय नाही.>>> अपत्यप्रेमात अंध होण्यापेक्षा कठोरे होउन वेळेवर योग्य संस्कार केले असते तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती हा बोध.लहान वयात शाळेतील संस्काराने सदसदविवेक बुद्धी शाबूत राहून चोरी न करणे हा विवेक बाळगणे ही गोष्ट जरा कठीणच. त्यापेक्षा आईने कठोर होउन वेळीच शिक्षा दिली असती तर मी सुधारलो असतो असच त्या चोराला म्हणायच होत ना!
सदसद्विवेकबुद्धी मोठेपणी हो!
सदसद्विवेकबुद्धी मोठेपणी हो! लहानपणी आम्ही पण खडूच्या मारामाऱ्या करायचो. तेव्हा आई ओरडली नाही म्हणून काय अजूनही करत बसू का तेच? वयानुसार जी सदसद्विवेकबुद्धी येते, तिचा उपयोग करायला हवा ना?
वयानुसार जी सदसद्विवेकबुद्धी
वयानुसार जी सदसद्विवेकबुद्धी येते, तिचा उपयोग करायला हवा ना?>>>> बोधकथेत सदसद्विवेक बुद्धिसाठी संस्काराचा वाटा मोठा आहे हे अधोरेखित करायचे आहे.
सलमानने दारू पिऊन गाडी घुसवली
सलमानने दारू पिऊन गाडी घुसवली आणि फूटपाथवरची माणसे चिरडली
यात दोष कोणाला द्यावा?
सलमानच्या बेजबाबदारीला? दारू पिण्याला? गाडी चालवण्याला?
>>सलमानच्या बेजबाबदारीला?
>>सलमानच्या बेजबाबदारीला? दारू पिण्याला? गाडी चालवण्याला?<<
वरच्या बोधकथेनुसार सलमानच्या आईला. लहानपणीच तिने सलमानच्या पायावर फटके दिले असते तर वेळेवर ब्रेक लावायला तो शिकला असता...
फुटपाथ वर झोपणारांचा
फुटपाथ वर झोपणारांना
लहानपणी आम्ही पण खडूच्या
लहानपणी आम्ही पण खडूच्या मारामाऱ्या करायचो. तेव्हा आई ओरडली नाही म्हणून काय अजूनही करत बसू का तेच? >>
तुळशी विवाह पार पडला. तरीही
तुळशी विवाह पार पडला. तरीही इथे सुरू असलेल्या फटाक्यांना दिवाळीमुक्त फटाके म्हणायला हवे.
तर माझी एक टिकली: सलमान तर कोर्टात निर्दोष सुटला. तरी त्याला दोषी का ठरवत आहात?
'बाबा मला का नाही शिकवले
'बाबा मला का नाही शिकवले लहानपणी फटाके ऊडवण्याचे विपरित परिणाम' तर?>>>> असं कसं असं कसं. कशावरून मुलगा हेच विचारेल? मुलाने विचारलं 'बाबा मला फटाकेमुक्त दिवाळी लेख का वाचायला लावला? तो लेख वाचूनच मी फटाके फोडायला लागलो' तर???
त्या प्रत्येक गोष्टीला असे
त्या प्रत्येक गोष्टीला असे आयसोलेट करून बाबांना कुणी प्रश्न विचारेल असं वाटत नाही. >> हरचंद पालव, अहो बोधकथा कुठली घेऊन बसलाय?
You have stolen my dreams and my childhood with your empty words. And yet I'm one of the lucky ones. People are suffering. People are dying. How dare you?
हा आणि असे अनेक अवघड प्रश्न 15 वर्षांच्या Greta Thunberg आणि तिला फॉलो करणार्या लक्षावधी मुलांनी ऑलरेडी त्यांच्या आणि जगाच्या सगळ्या पालकांना विचारलेले आहेत.
हो, खरंच की! तुमचं बरोबर आहे
हो, खरंच की! तुमचं बरोबर आहे अश्विनी, ग्रेटा सारखं कुणी अपत्य असेल तर असे आयसोलेटेड प्रश्न येऊ शकतात.
सालाबादप्रमाणे यावर्षी
सालाबादप्रमाणे यावर्षी दिवाळीला मी कुठलेही आवाजी/ बिनआवाजी फटाके फोडणार नाही.
मी आजपर्यंत एक ही फटाका
मी आजपर्यंत एक ही फटाका वाजवलेला नाहीये , फटाके मुक्ती दिनाची वाट बघतेय.:)
Anu बोंब,हायड्रोजन bomb
Anu बोंब,हायड्रोजन bomb बनवायला समर्थन देणारे फटाक्यांना विरोध करतात.
हे समजण्याच्या पलीकडे आहे.
विमानाचा आवाज,पेट्रोल,डिझेल पासून होणारे प्रदूषण फक्त स्व हीत आहे म्हणून सहन
करणारे फटक्या नी प्रदूषण होते असा कांगावा करतात
हे समजण्याच्या पलीकडे आहे
>>>>Anu बोंब,हायड्रोजन bomb
>>>>Anu बोंब,हायड्रोजन bomb बनवायला समर्थन देणारे फटाक्यांना विरोध करतात. विमानाचा आवाज,पेट्रोल,डिझेल पासून होणारे प्रदूषण फक्त स्व हीत आहे म्हणून सहन
करणारे फटक्या नी प्रदूषण होते असा कांगावा करतात
हे समजण्याच्या पलीकडे आहे
फटाक्यांचे समर्थन करणारे हॅन्डबोन्ब आनि grenades ना विरोध करतात. किडनी चोरीला विरोध करणारे, बायपास सर्जरी स्व हित आहे म्हणून सहन करतात.
हे समजण्याच्या पलीकडे आहे
गेल्यावेळी लेकीला बोटाने
गेल्यावेळी लेकीला बोटाने टिकल्या फोडायला शिकवलेले. तिला त्यात थ्रिल वाटलेले. यावेळी जर त्यातच खुश राहिली तर चक्रपाऊसच्या नादाला लागणार नाही, आणि मोजक्या प्रदूषणात निघून जाईल दिवाळी.
यावेळी मी भरपूर फटाके आणणार
यावेळी मी भरपूर फटाके आणणार आहे.. मुले खूप एन्जॉय करतात...
हा धागा नेमका 'मुलांचे न
हा धागा नेमका 'मुलांचे न मारता संगोपन'च्या खाली दिसत असल्याने 'फटकेमुक्त दिवाळी' असा वाचला गेला.
तर ती तशी होऊ द्या.
मुलांनी फटाक्यांसाठी हट्ट
मुलांनी फटाक्यांसाठी हट्ट केला, रडून धिंगाणा वगैरे घातला, तर त्यांना फटाके द्यावेत की फटके?
जो दे फटके वो भी बुरा, जो दे फटाके वो भी बुरा..
तर मुलांना फटके न देता फटाक्यांपासून प्रवृत्त कसे करावे?
Pages