Submitted by बोकलत on 1 November, 2021 - 00:20
नमस्कार, या दिवाळीत बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही. तर हि सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी कॅलिग्राफी शिकण्याचे मनावर घेतले आहे. सध्या युट्युबवर एक दोन चॅनेल फॉलो करतोय. जास्त फोकस देवनागरी कॅलिग्राफी शिकण्यावर राहणार आहे. सुरवात कशी कोठून करावी हे समजत नाही. काही जण सांगतात कि मार्कर वापरा काही जण सांगताहेत पेनने सुरवात करा. मार्करमध्ये जास्त प्रकार नाहीत पण पेनात भरपूर प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या निबचे पेन ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच हे जे शिकवणारे आहेत त्यांच्याकडे वेगळ्याच प्रकारचे पेन आहे ते त्यांनी स्वतः बनवलेत कि कुठून आणलेत देव जाणे. यामध्ये गोंधळून जायला होतंय. नक्की कोठून कशी सुरवात केली पाहिजे? आणि कसा कुठल्या पेपरवर सराव केला पाहिजे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला फाईन आर्टस् मध्ये निब
मला फाईन आर्टस् मध्ये निब विकत घाययला लावलेल्या... त्याच्या इंक ही येतात...
सोपं असतं ते... इंग्लिश आणि मराठी / हिंदी च्या वेगवेगळ्या निब असतात...
मार्कर ने ती मज्जा येत नाही..
मी माझ्या इंक्स आणि पेन गेल्या महिन्यात च माझ्या फ्रेंड च्या मुलीला दिले.. थोडा आधी हा धागा आला असता तर मी तुम्हाला च पाठवून दिले असते म्हणजे प्रॅक्टिस परपज साठी उपयोगी पडले असते
आर्टस् च साहित्य मिळणारे
आर्टस् च साहित्य मिळणारे दुकानं असतात त्यांच्या इथे मिळतात हे पेन , निब आणि इंक
थोडा आधी हा धागा आला असता तर
थोडा आधी हा धागा आला असता तर मी तुम्हाला च पाठवून दिले असते म्हणजे प्रॅक्टिस परपज साठी उपयोगी पडले असते>>>
आर्टस् च साहित्य मिळणारे दुकानं असतात त्यांच्या इथे मिळतात हे पेन , निब आणि इंक>>> हे म्हणजे स्टेशनरी दुकान ना? कि हि दुकानं वेगळी असतात स्टेशनरी पेक्षा.
इंग्लिश आणि मराठी / हिंदी च्या वेगवेगळ्या निब असतात...>>>> हे कसं ओळखायचं?
नॉर्मल स्टेशनरी दुकानं नाही
नॉर्मल स्टेशनरी दुकानं नाही
जिथे drawing बोर्ड , पेंट ब्रश, रंग , कागद वगैरे मिळतात ते दुकान , आशा दुकानात तुम्हाला जास्त व्हरायटी बघायला मिळते...
निब वर जो कट असतो ज्याने callygraphy चा स्ट्रोक येतो तो मराठी ला सुलट आणि इंग्लिश ला उलट असतो
callygraphy चा स्ट्रोक येतो
callygraphy चा स्ट्रोक येतो तो मराठी ला सुलट आणि इंग्लिश ला उलट असतो >> रोचक! ह्याबद्दल जमल्यास माहिती लिहा नक्की, तुमच्या कलेच्या चित्रांसकट. वाचायला आवडेल.
\ हा मराठी आणि / हा इंग्रजी
\ हा मराठी आणि / हा इंग्रजी असं ना?
बरोबर बोकलत
बरोबर बोकलत
हरचंद मला आवडलं असतं दाखवायला पण मी गेले 10 वर्ष callygraphy केली नाही मी मोस्टली नाईफ पेंटिंग आणि डूडल करते....
हरकत नाही, अनिश्का. तुम्हाला
हरकत नाही, अनिश्का. तुम्हाला जमेल तसं टाका इथे. बोकलत कॅलिग्राफी शिकले की आपण त्यांना सांगू त्याबद्दल लिहायला.
Skygold ह्या कंपनीचा
Skygold ह्या कंपनीचा देवनागरीसाठी वेगळा सेट काही दुकानदार उपलब्ध करून देऊ शकतात. मी लहान असताना अच्युत पालव यांचा रोमन कॅलिग्राफीचा कोर्स केला होता, तेव्हा मला ह्या सेट बद्दल माहिती मिळाली.
तुम्ही म्हणालात तसं रोमनसाठी ४५ अंशी आणि देवनागरीसाठी ३१५ अंशी कट असलेली निब वापरतात. कट निबने सुरुवात केल्यास नंतर फ्लॅट निब वापरायला सोपी जाते - अर्थात हा माझा अनुभव आहे. काहीजण शिकतानाच फ्लॅट निब ने शिकतात, अश्यावेळी हाताला ४५ अंशला निब धरायची सवय पडून घ्यावी लागते.
फ्लॅट निब साठी तुम्ही सुरुवातीला पार्कर किंवा लामीचा जॉय सेट घेऊ शकता. सेट नको असेल तर लामी पेन घेताना १.५ मिलीमीटरची (१.१ फारच अरुंद आहे आणि १.९ फारच रुंद) निब घेऊ शकता. लगेच अक्षरे शिकण्याआधी उभ्या आडव्या तिरक्या रेषा, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी आकारांची उजळणी करावी लागेल, कारण अक्षरे ह्यांपासून तयार होतात.
बोकलत , कोणते यु ट्यूब चॅनल
बोकलत , कोणते यु ट्यूब चॅनल फॉलो करताय ?
@जाई. चैतन्य गोखले कॅलिग्राफी
@जाई. चैतन्य गोखले कॅलिग्राफी आणि अक्षरकट्टा.
Skygold ह्या कंपनीचा
Skygold ह्या कंपनीचा देवनागरीसाठी वेगळा सेट काही दुकानदार उपलब्ध करून देऊ शकतात. >>> हे ऍमेझॉन वर आहे पण अनिश्का म्हणतात तसं तो इंग्रजीसाठी आहे. मी आता सुरवातीला फ्लॅट निबने सुरवात करणार आहे.
ओके बोकलत
ओके बोकलत
(No subject)
मस्त बोकलत! नवीन छंद,
मस्त बोकलत! नवीन छंद, उपक्रमास दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा.
फारच छान !! शुभेच्छा.
फारच छान !! शुभेच्छा.
धन्यवाद
धन्यवाद
(No subject)
मराठी कॅलिग्राफी शिकणे मनावर
मराठी कॅलिग्राफी शिकणे मनावर घेतले तर. सुंदर जमले आहे.
पुण्यात असता तर हा सेट गिफ्ट दिला असता.
पुण्यात असता तर हा सेट गिफ्ट
पुण्यात असता तर हा सेट गिफ्ट दिला असता.>>>
खूप सुंदर बोकलत
खूप सुंदर बोकलत
बोकलत, मस्त. लगे रहो.
बोकलत, मस्त. लगे रहो.
शिका हो बोकलतराव.
शिका हो बोकलतराव.
.
पण
शुद्धलेखनाकडे लक्ष द्या.
श्रद्धा आणि तुम्ही लिहिलेला शब्द 'श्रध्दा'
ओके. चूक लक्षात आणून
ओके. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. यापुढे लिहीताना ती चूक पुन्हा करणार नाही. तुम्हाला पण कॅलिग्राफीमध्ये धन्यवाद लिहिणार होतो पण इंग्रजी कॅलिग्राफीला अजून हात नाही लावला.
वा मस्त लिहिताय
वा मस्त लिहिताय
देवनागरी कॅलिग्राफीमध्ये
देवनागरी कॅलिग्राफीमध्ये नक्षीदारपणा नसतो.
देवनागरी कॅलिग्राफीमध्ये
देवनागरी कॅलिग्राफीमध्ये नक्षीदारपणा नसतो.>>> म्हणजे???
(No subject)
मस्त करताय बोकलत.
मस्त करताय बोकलत.
एखादी किनार किंवा पट्टा जर
एखादी किनार किंवा पट्टा जर मराठी देवनागरी कॅलिग्राफीमध्ये लिहिला तर नक्षी वाटेल का?
मोडी'त लिहिल्यास शक्य आहे.
Pages