कॅलिग्राफी

Submitted by बोकलत on 1 November, 2021 - 00:20

नमस्कार, या दिवाळीत बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही. तर हि सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी कॅलिग्राफी शिकण्याचे मनावर घेतले आहे. सध्या युट्युबवर एक दोन चॅनेल फॉलो करतोय. जास्त फोकस देवनागरी कॅलिग्राफी शिकण्यावर राहणार आहे. सुरवात कशी कोठून करावी हे समजत नाही. काही जण सांगतात कि मार्कर वापरा काही जण सांगताहेत पेनने सुरवात करा. मार्करमध्ये जास्त प्रकार नाहीत पण पेनात भरपूर प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या निबचे पेन ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच हे जे शिकवणारे आहेत त्यांच्याकडे वेगळ्याच प्रकारचे पेन आहे ते त्यांनी स्वतः बनवलेत कि कुठून आणलेत देव जाणे. यामध्ये गोंधळून जायला होतंय. नक्की कोठून कशी सुरवात केली पाहिजे? आणि कसा कुठल्या पेपरवर सराव केला पाहिजे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूपच छान बोकलत. तुमच्या निमीत्ताने आता मुलीसाठी पुस्तक घेतले आहे. मला म्हणाली की आण म्हणून. पण ध्यान शिकलं तर बरं.

बोकलत दिवसेंदिवस चांगली सुधारणा आहे. आता रेघांच्या वही शिवाय कागदावर चांगले वळणदार लिहिताय.

टाक वापरतात तसा पेन दिसतो आहे. शाईत बुडवून लिहिण्याचा.

एक ट्रिक आहे. पहा करून जमलं तर. जुना फाउंटन-पेन घ्या. त्याची निब हव्या त्या कोनात कापता येते. साध्या वायर कटरने काम होईल. ही निब धार लावण्याचा दगड किंवा सहाणेवर घासून, नंतर दगडी पाटीवर घासून गुळगुळीत करून मी कॅलिग्राफि करत असे. सारखे शाईत निब बुडवावे लागत नाही, अन रंग युनिफॉर्म येतो.

हो आ.रा.रा मी शाईत बुडवून लिहितो. पण शाई भरण्याचा ऑप्शन पण आहे पेनात. मी कलर इंक मागवले उद्या येईल बहुतेक. वेगवेगळे कलर वापरता यावेत म्हणून शाई भरली नाही.

रागावू नका बोकलत,

सध्या 'पांडू" सिनेमाची जाहिरात टिवीवर येते. त्यात 'ड' चा उकार लाथ मारून टिंबाला ( अनुस्वाराला) 'पा'वर उडवतो. म्हणजे 'पांडूलिपी' .

(बोकलत, ही कॅलिग्राफि पांडूलिपी होत चाललीय असं लिहिणार होतो. ) काही वळणदार, सरळ, तिरपा असे फॉन्ट शोधा हे सुचवतो. अक्षरे लिहिताना टाकाने जाड/बारीक रेघ करण्यासाठी टाकच लागतो. आपल्या साध्या पेन, बॉलपेननेही लिहिता येईल असे वळणशोधायला हवे.
नाशकातही संमेलनात यावर संवाद होता पण काय दाखवलं हे कुणी गेलेलं सांगेल.

Srd तुम्हाला सुरवातीपासून काहीतरी सांगायचं आहे पण मलाच समजत नाहीये तुम्ही नक्की काय बोलताय. वळणदार तिरपा फॉन्ट म्हणजे नक्की काय? आपण नेहमी लिहितो त्यापेक्षा तो वेगळा कसा असतो? जमलंच तर तुम्ही एक प्रत्यक्ष एखाद दुसरं अक्षर काढून दाखवा. एकीकडे बोलताय की उलट सुलट काहीही रेषा आखल्या म्हणजे कॅलिग्राफी नाही दुसरीकडे बोलताय वेगळा फॉन्ट शोधा. तुम्ही प्रत्यक्ष एखादं लिहिलेलं उदाहरण दिलंत तर तुम्हला नक्की काय म्हणायचं आहे ते समजेल आणि तो रेफरन्स घेऊन मी पुढे लिहीन. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते समजत नसल्याने मी खरंच खूप गोंधळून गेलोय. Happy

नक्की काय म्हणायचं आहे ते समजत नाही. पण कॅलिग्राफि सांपल्समध्ये मजा येत नाही हे सांगतोय. बाकी तुमच्याच कलेबद्दल नसून एकूण मराठी देवनागरी कॅलिग्राफि बद्दल.
असो.
केलेलं काम सुवाच्य छानच आहे.

Bokalat, तुम्ही छान लिहिताय. Srd तुम्हाला जे सांगायचे आहे ते स्पष्ट लिहा. इथे सुरुवातीपासूनच तुमचे प्रतिसाद विचित्र टोन मध्ये आहेत ज्याची अजिबात गरज नाहि आहे.

Ok. मनमोहन.

सहमत. Srd ह्यांनी 'उत्तम कॅलिग्राफी कशी करावी' ह्यावर एक लेख लिहावा असे सुचवेन.

Pages