नवरात्रीनिमित्त घरच्या बागेतल्या फुला-पानांपासून रचलेल्या देवीच्या रचना
कलाकार : माझी आई
मातर्नमामि कमले कमलायताक्षि
श्रीविष्णुहृत्कमल वासिनि विश्वमातः ।
क्षीरोदजे कमलकोमल गर्भ गौरि
लक्ष्मी ! प्रसीद सततं नमतां शरण्ये ।।१।।
आई लक्ष्मी, तू कमलाप्रमाणे सुंदर आहेस. तुझे डोळे
कमलाप्रमाणे विशाल आहेत. श्रीविष्णूच्या हृदय कमला मध्ये तुझा निवास आहे. तू साऱ्या विश्वाची जननी आहेस. कमलाच्या कोमल गाभ्याप्रमाणे गौरवर्ण गौरी, तुझा जन्म क्षीरसमुद्राच्यामध्ये झाला आहे. भक्तांनी शरण यावे अशी तू शरण्य आहेस, माते लक्ष्मी, शरण आलेल्या भक्तांवर तू प्रसन्न हो
--
त्वं श्रीरुपेन्द्रसदने मदनैकमात-
र्ज्योत्स्नासि चन्द्रमसि चन्द्रमनोहरास्ये ।
सूर्ये प्रभासि च जगत्त्रितये प्रभासि
लक्ष्मि! प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ २ ॥
हे लक्ष्मि! श्रीविष्णूच्या वैकुंठधामात तू श्री या नावाने आहेस. तू मदनाची (प्रद्युम्नाची, रुक्मिणी रुपाने)एकमेव माता आहेस,
तुझे मुख चंद्राप्रमाणे शीतल व सुंदर आहे, तू चंद्राचे शीतल चांदणे आणि सूर्याचे तेजही तूच आहेस.
तुझ्या चैतन्य रूप तेजाने तिन्ही लोक प्रकाशित करतेस. तू भक्तांचे शरण्यस्थान आहेस, तुझ्या भक्तावर तू प्रसन्न हो.
--
त्वं जातवेदसि सदा दहनात्मशक्ति-
र्वेधास्त्वया जगदिदं विविधं विदध्यात् ।
विश्वम्भरोऽपि बिभृयादखिलं भवत्या
लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ ३ ॥
हे लक्ष्मी, अग्नीमधील दाहकतेची शक्ती तूच आहेस.
तुझ्या शक्तीच्या सहाय्याने ब्रह्मदेव विविध प्रकारच्या विश्वाची रचना करतात. या विश्वाचे भरणपोषण रक्षण करणारे श्रीविष्णू तुझ्याच भरवशाने विश्वाचे पालन करतात. तू शरणागतांसाठी शरण्य आहेस.
मी तुला शरण आहे. तू माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.
--
त्वत्त्यक्तमेतदमले हरते हरोऽपि
त्वं पासि हंसि विदधासि परावरासि ।
ईड्यो बभूव हरिरप्यमले त्वदाप्त्या
लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ ४ ॥
निर्मलरुप असलेल्या देवि, ज्यांचा तू त्याग केलेला आहेस, त्याचाच भगवान रुद्र संहार करतात. वास्तविक तूच या जगताचे पालन, संहार आणि निर्माण करतेस. तूच कार्य-कारण स्वरुप जगत् आहेस. हे निर्मलस्वरुप लक्ष्मी, तुला प्राप्त केल्यानेच भगवान श्रीहरि सर्वांना पूजनिय झाले. तू तुझ्या शरणागतांचे रक्षण करणारी आहेस. तू माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.
--
शूरः स एव स गुणी स बुधः स धन्यो मान्यः स एव कुलशीलकलाकलापैः ।
एकः शुचिः स हि पुमान् सकलेऽपि लोके यत्रापतेत्तव शुभे करुणाकटाक्षः ॥ ५ ॥
हे शुभे, ज्या पुरुषावर आपला कृपाकटाक्ष होतो, या संसारांत तोच एकमात्र शूरवीर, गुणवान, धन्य, मान्य, कुलीन, शीलवान तसेच अनेक कलांचा ज्ञाता आणि परम पवित्र मानला जातो
--
यस्मिन्वसेः क्षणमहो पुरुषे गजेऽश्वे
स्त्रैणे तृणे सरसि देवकुले गृहेऽन्ने ।
रत्ने पतत्रिणि पशौ शयने धरायां
सश्रीकमेव सकले तदिहास्ति नान्यत् ॥ ६ ॥
हे देवि, एक क्षणभरसुद्धा तू जिथे राहशील..... पुरुषांमध्ये, हत्ती, घोडा, स्त्रैण, गवताचे पाते, सरोवर, देवाचे मंदिर, घर, अन्न, रत्नेमाणके, पशुपक्षी, शय्येवर, भूमीवर .....ते सारे श्रीयुक्त (सुंदर सौभाग्यशाली, शोभायमान) होते. तुझा जेथे वास(निवास) नाही, असे अन्य काहीही सुंदर असणार नाही.
आहाहा, कित्ती सुंदर.. आईंना
आहाहा, कित्ती सुंदर.. आईंना नमस्कारच..
खूप सुंदर... अप्रतिम.
खूप सुंदर... अप्रतिम.
खूप सुरेख...
खूप सुरेख...
खुप मस्त..
खुप मस्त..
खूपच सुंदर रांगोळ्या
खूपच सुंदर रांगोळ्या
अप्रतिम, तुमच्या आईंना
अप्रतिम, तुमच्या आईंना नमस्कार कळवा.
तुम्हालाही धन्यवाद.
अप्रतिम _/\_
अप्रतिम _/\_
वॉव अप्रतिम सुंदर!
वॉव अप्रतिम सुंदर!
आईंना ___/|\___
फारच सुंदर. रांगोळ्या अप्रतिम
फारच सुंदर. रांगोळ्या अप्रतिम आणि त्यासोबत जोडलेले स्तुतिश्लोकही उत्तम. डोळ्यांचे पारणे फिटले. मातोश्रींचे अभिनंदन आणि त्यांना नमस्कार.
अप्रतिम!
अप्रतिम!
फारच सुंदर. रांगोळ्या अप्रतिम आणि त्यासोबत जोडलेले स्तुतिश्लोकही उत्तम. डोळ्यांचे पारणे फिटले. मातोश्रींचे अभिनंदन आणि त्यांना नमस्कार.>>>>+ 1
अतिसुरेख!
अतिसुरेख!
सुंदर
सुंदर
सुंदर !
सुंदर !
किती सुंदर आहेत रचना.
किती सुंदर आहेत रचना. मावशींना नमस्कार सांगा.
दुसर्या फोटोतील अबोलीची नथ आणि तिसर्या फोटोतील काली माता आवडल्या. लालचुटूक जीभ आणि गालाचा लालिमा. दुसर्या फोटोत माहूरच्या रेणुकामाता आहेत का?
जर त्यांना मोकळा वेळ / वय यानुसार जमलं तर आपल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक चेहरा करायला सांगाल का?
किंवा शांतादुर्गा / मुंबईची महालक्ष्मी / अन्य कुठलेही रूप त्यांना आवडेल ते. नवरात्रानंतरही सावकाश चालेल. आवडेल पहायला.
खूपच सुंदर, आईंना नमस्कार
खूपच सुंदर, आईंना नमस्कार
सुरेख !!
सुरेख !!
उत्सवप्रिय आणि सुंदर धागा.
उत्सवप्रिय आणि सुंदर धागा. डोळ्याचे पारणे फिटले.
सुंदर!
सुंदर!
खूप खुप सुन्दर... सगळ्या
खूप खुप सुन्दर... सगळ्या रान्गोळ्या आवडल्या
खूप सुंदर. आईंना __/\__
खूप सुंदर. आईंना __/\__
लाजरीची फुल आहेत का ती छोटी गुलाबी.
छान.
छान.
खूप सुंदर!!!!
खूप सुंदर!!!!
सुंदर!
सुंदर!