अपेक्षा आणि वास्तव : अनुभव

Submitted by किल्ली on 29 September, 2021 - 13:39

:गटणे काका mode चालू :
जीवनाच्या समरात असे प्रसंग येतात की एखाद्या व्यक्तीकडून आपण गृहीत धरलेली साधी अपेक्षा पूर्ण होतं नाही आणि समोर भलतंच वास्तव आ वासून उभं राहतं.
असं झालं की घायाळ होणं आलंच. मनावरचे हे ओरखडे कालांतराने पुसट झाले तरी त्याची खूण राहतेच!
याउलट कधी कधी अजिबात अपेक्षा नसताना आनंदाच्या सुखद सरी कोसळू लागतात आणि आपण त्यात चिंब न्हाऊन निघतो.
:गटणे काका mode बंद :
तुमच्यासोबत कधी असं घडलंय का?
चला तर मग आपापले वास्तविक, काल्पनिक, मित्र मैत्रिणींचे, शेजार पाजाऱ्यांचे अनुभव येथे लिहूयात.
Expectation vs reality Happy
बघू कोणी कोणी अपेक्षा भंगाचा कडू रस पचवलाय आणि कुणाकुणाला मस्त surprizes मिळाली आहेत Happy
....
तळटीप :
धागा विरंगुळा ग्रुपात आहे, मजेदार प्रतिसाद येतील अशी अपेक्षा आहे बघूया वास्तव काय असेल!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण केलेला व्हॉटस अप मेसेज निमिषार्धात लोकांनी पाहिला पाहिजे अशी अपेक्षा असलेले बॉस.
लोकांनी केलेला मेसेज ही ते स्वतः पाच सेकन्दात बघतात आणि रिप्लाय देतात.

लिव्ह एप्रुव्हल बद्दल मेसेज टाकला की:
अपेक्षा: ५ सेकंदात मेसेज बघुन लगेच लिव्ह एप्रुव्ह होईल. 305.gifd77cnoname.gif

वास्तवः दोन तास होउन गेले , अजुन बघितला नाही मेसेज. 2mo5pow.giftuzki-bunny-emoticon-023.gif

डोन्ट वरी
टूल ला न ऍप्लिकेशन्स वेळेत न बघितल्यास ऑटो अप्रुव्ह असेल ना?
बरीच मांजरं ही मेल्स रुल लावून फोल्डर्स ना ऑटो रूट करतात आणि फोल्डर्स कधीतरीच बघतात.

बरं झालं गं किल्ली
लस चे परिणाम बाळांवर वेगवेगळ्या प्रमाणात होतात.तरी आता झोपून घे.

आर्या ची लिव्ह अप्रुव्ह झाली का?इंडिया वॉन्टस टू नो.

<<आर्या ची लिव्ह अप्रुव्ह झाली का?इंडिया वॉन्टस टू नो.<<
अजुन नाही. त्यानंतर चारदा मेसेज करुन झालाय, लिव्हबद्द्ल ! Proud

इतर मेसेज पाहिले जातात. पण या स्पेसिफिक मेसेजकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष! बरे सारख सारख आठवण करुन द्यावी तर जमदग्नीचा अवतार.

आर्या, रजेवर जायचे आणि रजा मंजूर झाली हे गृहित धरायचे. विचारले तर सांग मी मेसेज केला होता त्याला तुमचे उत्तर नाही त्यामुळे मी मंजूर आहे हे समजून घेतले! Happy

<,आर्या, रजेवर जायचे आणि रजा मंजूर झाली हे गृहित धरायचे. विचारले तर सांग मी मेसेज केला होता त्याला तुमचे उत्तर नाही त्यामुळे मी मंजूर आहे हे समजून घेतले! << कृष्णाजी, मागे असेच केले होते. दिवसभर मेसेजला उत्तर नाही. Proud

पण मी ठरवले होतेच, आज काहिही करुन जाणारच.
मग पार ताम्हिणी घाटापर्यंत पोहोचुन गेलो... तेव्हा रिप्लाय आला, येस! असा ! Lol
पण यावेळी प्रश्न १० दिवसांचा आहे, म्हणुन ...

ही ही
हा "10 दिवस इतकं काय काम आहे लिव्ह चं?1 वर्किंग वीक घे आणि परत ये" असं म्हणण्याचा पॅसिव्ह अग्रेसिव्ह मार्ग असावा Happy

(सध्या आमच्याकडे मुलं स्वतःच्या लग्नाला 10 दिवसाची लिव्ह घेवून परत येतात.वर्क फ्रॉम होम ची कृपा असावी.मुली आधी 3 आठवडे घ्यायच्या, लग्न, संसार, सामान सुमान सर्व मार्गी लावायला.आता त्याही 2 आठवडे घेत आहेत.वर्क फ्रॉम होम, इंटरनॅशनल हनिमून ट्रिप ची अनिश्चितता यामुळे सर्व सुट्टीलायक कामे भराभर करून लोक परत कामात स्वतःला बुडवून घेत आहेत.)

आसा... दुरचाच प्लॅन आहे खरे तर Lol

<<हा "10 दिवस इतकं काय काम आहे लिव्ह चं?1 वर्किंग वीक घे आणि परत ये" असं म्हणण्याचा पॅसिव्ह अग्रेसिव्ह मार्ग असावा<< नायतर काय!

बरे सारख सारख आठवण करुन द्यावी तर जमदग्नीचा अवतार.>>> अगदी अगदी ! सगळे बॉस इथून तिथून सारखेच

धनुडी
मौन ही संमती
बुडवा ofc बिनधास्त Proud

ताम्हिणी घाटापर्यंत पोहोचुन गेलो... तेव्हा रिप्लाय आला, येस! असा ! Lol>>>

म्हणजे रजा मंजूर आहेच. तेंव्हा बिंधास्त जा! जे रस्त्यात घाट येतील अडथळे येतील ते ओलांडून जा! Happy

अपेक्षा - एखाद्या बॉलीवूड गाण्यावरचा डान्स किंवा झुंबा युटुबवर बघून करावा, आपणही तसंच लय भारी दिसावं नाचताना
वास्तव - आपले रेकॉर्डेड विडीओ बघितलं की कळतंच Lol

किल्ली अभिनंदन...

अपेक्षा - एखाद्या बॉलीवूड गाण्यावरचा डान्स किंवा झुंबा युटुबवर बघून करावा, आपणही तसंच लय भारी दिसावं नाचताना
वास्तव - आपले रेकॉर्डेड विडीओ बघितलं की कळतंच>>>>
Lol

Pages