अपेक्षा आणि वास्तव : अनुभव

Submitted by किल्ली on 29 September, 2021 - 13:39

:गटणे काका mode चालू :
जीवनाच्या समरात असे प्रसंग येतात की एखाद्या व्यक्तीकडून आपण गृहीत धरलेली साधी अपेक्षा पूर्ण होतं नाही आणि समोर भलतंच वास्तव आ वासून उभं राहतं.
असं झालं की घायाळ होणं आलंच. मनावरचे हे ओरखडे कालांतराने पुसट झाले तरी त्याची खूण राहतेच!
याउलट कधी कधी अजिबात अपेक्षा नसताना आनंदाच्या सुखद सरी कोसळू लागतात आणि आपण त्यात चिंब न्हाऊन निघतो.
:गटणे काका mode बंद :
तुमच्यासोबत कधी असं घडलंय का?
चला तर मग आपापले वास्तविक, काल्पनिक, मित्र मैत्रिणींचे, शेजार पाजाऱ्यांचे अनुभव येथे लिहूयात.
Expectation vs reality Happy
बघू कोणी कोणी अपेक्षा भंगाचा कडू रस पचवलाय आणि कुणाकुणाला मस्त surprizes मिळाली आहेत Happy
....
तळटीप :
धागा विरंगुळा ग्रुपात आहे, मजेदार प्रतिसाद येतील अशी अपेक्षा आहे बघूया वास्तव काय असेल!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना एक थँक्यू फिदी. Proud

लांब केसांचं काही सांगू नको हं ऋ..... मिसलीडिंग आहे ते asset... हा पुरावा Proud
Screenshot_20210930-115632_Gallery.jpg

अपेक्षा ...............................................वास्तव
अजून एक रत्न , अ.ग. वर मृने दिलेले इथे चपखल बसते.

अस्मिता, माफ करा पण शब्दात लिहिले नाही म्हणून मीम्स एखाद्याच्या अ‍ॅपिअरन्स वरून केलेले शेमिंग होत नाहीत का?

Lol नेल्डइट नावाचा शो बघा नेफ्लिवर.>>>>>>>>>>>>>>> येस येस माझी मुलगी बघते हा शो फार Proud

जबरी आहेत एकेक अपेक्षा आणि वास्तव Lol

बाहुली Rofl एकुणातच बेकिंग आणि कुकिंग चे एक्पेक्टेशन आणि रिअ‍ॅलिटी खतरनाक असतात.

पण अमरीश पुरीला हसवण्याकरताच तो गेट अप दिलाय अश्विनी.+11
आणि वर भाऊंचा गेट अप पण, चला हवा येऊ द्या मधे हसवण्यासाठीच असतो ना?

माझ्या मते त्या चित्रातून ते स्वर्गीय अमरिष पुरी आहेत हे तुम्हाला ओळखता येते ह्यातच सर्व काही आले.
तो ७० मधला प्रचलित हिप्पी लूक आहे. राजेश खन्ना, देवानंद, डॅनी, प्रेम चोप्रा वगैरे बरेच लोक दिसतील त्या लूक मध्ये त्यात हसण्यासारखे काही दिसत नाही. त्या काळात जगलेले अनेकांचे वडिल, आजोबाही ह्या लूक मध्ये असतील जुन्या फोटोत.
अमरिष पुरी रूढार्थाने हँडसम नाहीत म्हणून तो फोटो आला आहे, त्यात लांब केस आणि शेड्सचाही सबंध नाही.
तुमच्या मते हे शेमिंग नसेल तर चालू देत.

हा धागा मस्त हसत खेळत मजेदार गोष्टींसाठी आहे, I hope यावर भांडणं होणार नाहीत.

मला नाही वाटत त्या फोटो मध्ये अमरीशपुरी आहे म्हणून तो फोटो फनी आहे, माझ्यामते तो लुकच फनी आहे, त्या सो कॉल्ड रूढार्थाने सुंदर असलेल्या पुरुषांचा फोटो असता तरी तो फनीच दिसला असता.
शिवाय यात अमरीश पुरींची त्यांनी वठवलेल्या भूमिकेतून जी इमेज बनली आहे त्यामुळे पण तो फोटो फनी बनतो. म्हणजे इतर कोणी असतं तर तुम्ही शोधायला गेलात हे पण मिळाला हिरो अशा अर्थी आलं असतं आणि ते फनी झालंच नसतं. पण तो लुक फनी च आहे त्यात शेमिंग वगैरे असेल तर त्या काळच्या फॅशनचं आहे फार फार तर!

बाहुली केक >>> Rofl
धमाल धागा आहे हा!

स्वस्ति : अगदी अगदी. बरेचसे वीकेंड असेच गायब होतात Proud

सी: इश्श वगैरे वाचून एकदा ती पोस्ट तुझीच आहे ना हे कन्फर्म केलं! Proud

अरे भांडू नका. विनोद कसा असावा हा फार गहन विषय आहे. एकाचा दुसर्‍याला आवडेल. दुसर्‍याचा तिसर्‍याला आवडणार नाही. तर आपण स्वतंत्र धागा काढूया.

अस्मिता कुठून कुठून शोधून आणतेस ही रत्ने! >>> अस्मिता नाव असलेल्यांना फार शोधावे लागत नाही. चटकन रत्नं हाती लागतात Happy

रीया , ज्जे बात. सहमतच !!!!!!!
व्यक्तीशः अमरिश पुरींइतका रूबाबदार खलनायक नाही असे माझे मत आहे. आणि कुणाला दुखावायचा हेतू नव्हताच तरीही
डिसक्लेमर :
इथून पुढे सर्वांनी चित्रातल्या Brad Pitt मधे पूर्वज शोधा. काही वर्षांत तोही आजोबा होईलच की, हाकानाका.. Wink

@ ऋ , ही स्वतःची स्तुती आहे हे मला ठाऊक आहे. Lol

एक्स्पेक्टेशन : ही ऋन्मेषची पोस्ट आहे म्हणजे यात त्याची स्वतःचीच स्तुती असणार

रीअ‍ॅलिटी : अरे हो, मेल्याने स्वतःचीच स्तुती केलीय

मॉरल - ऋन्मेष अपेक्षांना जागतो Proud

Lol

अस्मिता, असेच आमचे पूर्वज असते आम्हीही सुंदर झालो असतो वगैरे वगैरे ... पण मी जेनिफर फॅन असल्याने हट मेल्या पिटा!

Pages