प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ९ - पाळीव दोस्त

Submitted by संयोजक on 19 September, 2021 - 07:20

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.

पाळीव दोस्त

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

हा आमचा सिंबा.. वय वर्षे १० !! गेली १० वर्ष स..त..त.. याच्या भोवती सगळं बांधलेलं होतं... आणि या मे महिन्यात ते सगळं सोडून आम्हाला गेला.. आता फक्त आणि फक्त चांगल्या च आठवणी काढणार आहे त्याच्या..!!
तर हा आमच्या पिल्लू चा फोटो..
23101215DSC_8568.jpg

Love you my boy !!

खूप वाईट वाटतं आपली लाडाची पिल्ल अशी सोडून जातात तेव्हा.. आमच्या पाच ससुल्या मधला एक पिल्लू आता काही दिवसांपूर्वी असाच अचानक गेला.. खूप वाईट वाटले.. अगदी इवलुसा निरागस जीव..

कसली स्टायलिश माऊ आहे आणि काय तो स्वॅग आहे. मॉडेलिंग करते का ती?

सिंबाही रुबाबदार होता अगदी. वाचून वाईट वाटले

पिकु Sad समजू शकते.
>>>आता फक्त आणि फक्त चांगल्या च आठवणी काढणार आहे त्याच्या..!!>>> that's the spirit. हॅंडसम हिरो दिसतोय.
अमृताक्षर Sad वाईट वाटलं ऐकून.
दिपाली ब्युटी क्वीन आहे माऊ.

ओह सिंबा फारच देखणा आहे. सॅड Sad

फॅशनिस्टा भारी कपडे वगैरे घालून घेतेय की. आमचे २ तर ख्रिसमस ला आणलेले स्वेटर घातले तर उलटे उलटे चालायला लागले मागे काय वाटलं त्यांना कोण जाणे Lol फारच विनोदी दृश्य होतं. काश विडीओ केला असता तेव्हा.

स्वेटर घातले तर उलटे उलटे चालायला लागले मागे >>> मून वॉक करत असावे. स्वेटर घातल्यावर मायकल जॅकसनसारखे जॅकेट घातल्याचे फिलींग आले असावे.

माउई ला ते ख्रिस्मस स्वेटर्स आणले तर आवडलेच समहाऊ. हौशीने घालून घ्यायचा Happy कदाचित ते कामिंग जॅकेट्स मिळतात तसा काहीतरी फील आला असेल. नंतर त्यांच्यामुळे त्याच्या फर मधे गुंता होऊन गाठी व्हायला लागल्या असे लक्षात आले तसे घालणे बंद केले तर ते स्वेटर्स तोंडात घेऊन फिरायचा नुस्तेच. मग शेवटी चावून चिंध्या केल्या. Happy

Pages