प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ८ - उंचावरून काढलेली छायाचित्रे

Submitted by संयोजक on 18 September, 2021 - 06:21

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.

उंचावरून काढलेली छायाचित्रे

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

सनसेट/सनराईज पॉईंट, सागर विहार, वाशी ईथला ऊंचावरून काढलेला चार दिवसांपूर्वीचा फोटो.
अर्थात हा फोटो सनसेटचा आहे. ईथे नेहमी तेव्हाच जाणे झालेय. पण सनराईजला सुर्य कुठून उगवताना दिसतो हे सुद्धा बघायची ईच्छा आहे.

खालचा फोटो बोनस, ती ऊंच जागा नक्की काय हे दाखवायला Happy

1632512708045.jpg

.

1632512727908.jpg

सागर-विहारला हे आठवत नाही. नवीन झालंय का? आमच्या कॉलेजच्या एकदम जवळ होतं हे. बेस्ट जागा होती. आणि मशिदीच्या बाहेर ब्रेडपॅटिस आणि वाशीडेपोच्या मागे से. ९ साईडला झाडाच्या सावलीतली सँडविजची सायकल.

अरे वा.. तुम्हीही याच परीसरात राहिलेले का..

हो बहुधा नवीन झाले असावे कारण वाशीतलेच कित्येक जण मला हे कुठे आहे विचारतात. कोणाला कळतही नाही चटकन कारण जरा आत जावे लागते, जिथे उगाचच कोणी माहीत असल्याशिवाय वाट वाकडी करून जाणार नाही असे आहे. मलाही साधारण वर्षभरापूर्वी मुलांना सोबत घेऊन फिरताफिरताच शोध लागला.

मी एक छानपैकी फोटोंचा धागाही काढायचा विचार करत होतो या सागर विहार आणि मिनी सीशोअर परीसरावर.. वेगवेगळ्या सीजनचे वेगवेगळी रुपे आहेत माझ्याकडे.. आता हा फोटो शेअर करताना पुन्हा आठवले.. गणपतीनंतर नक्की..

अरे वाह.. एक तर ती माझ्या बायकोची शाळा
दुसरे म्हणजे मी गेले चार वर्षे राहायला त्याच रोडवर दोनचार बिल्डींग सोडून होतो Happy

जबरदस्त फोटो एकेक.

अनू हाहाहा. पहिल्या दिवशी मीही उंटावरुन असच वाचलेले.

मस्त फोटो आहेत.

हा कोवालम च्या विझिंगम लाईट हाऊस मधून काढलेला खालच्या समुद्राचा फोटो.
kovalam2.jpg

हे असेच होते .. म्हणून जेव्हा मला ग्रिलच्या पिंजऱ्यात न अडकता मोकळाढाकळा अनुभव घ्यायचा असेल तेव्हा मी ईथे जातो Happy

1632573515933.jpg

IMG-20210926-WA0003.jpg

नवऱ्याने काही वर्षांपूर्वी कोकणात ट्रेनने जाताना काढलेला फोटो आहे.

दोन्ही फोटो superb आणि थॅंक यु . मी वाट बघत होते कोणी फोटो पोस्ट करतेय का.

IMG-20210926-WA0004_0.jpg

हाही ट्रेनप्रवासातला नवऱ्याने कोकणात जाताना एका नदीचा काढलेला.

कोकण रेल्वेचा प्रवास .. बदाम बदाम बदाम Happy

हा फूटबॉल खेळणाऱ्या पोरांचा. पावसाळ्यातला चिखलातला सीजनल खेळ आहे. बाकी बर्षभर क्रिकेट चालू असते Happy

1632612762487.jpg

Pages