मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.
उंचावरून काढलेली छायाचित्रे
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
मी कसली सेटींग करत नाही फोटो
मी कसली सेटींग करत नाही फोटो काढताना. कारण मला कळतही नाही. जे काही असते ते ऑटो असते. मोबाईल स्वत:च समोरची हिरवळ पकडून त्यावर ऑटो फोकस करत असेल तर कल्पना नाही.
तसेही पावसाळ्यात हिरवळ छान टवटवीत दिसते आणि मुले रोज फूटबॉल खेळतात त्या भागात गवत उगवत नाही तर फक्त बाजूचे वाढते. त्यामुळे आणखी ऊठून दिसत असेल.
चिखल फुटबॉल फोटो मस्तच.
चिखल फुटबॉल फोटो मस्तच. मुलाचा क्रिकेट खेटायचा प्लॅन होता असे वाटते. गोल पोस्ट साठी स्टंप्स वापरले आहेत आणि गोलपोस्ट एका कोपर्यात ठेवलेत.
कोकणातले फोटो खुप सुंदर
तरोको नॅशनल पार्क , तैवान
यात ती मुले क्रिकेट खेळताना
यात ती मुले क्रिकेट खेळताना दिसतील. हा २ जूनचा फोटो. मग पाऊस सुरू झाला गवत वाढू लागले तसे खेळ बदलला त्यांचा.
त्या आधी मे महिन्यात आठवडाभर मस्त टूर्नामेंट चालू होत्या ईथे. फुल्ल स्टेडीयम भरून पब्लिक आणि डीजे वगैरे. बाल्कनीत बसायचे आणि लाईव्ह क्रिकेटचा आनंद लुटायचा.
Pages