गेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं! ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ... यापुढे मात्र ही उणीव भरून काढायचीच. हाकानाका.
एकदा मनावर घेतल्यावर 'प्रोजेक्ट विबासं' च्या बारीकसारील डिटेल्स भरणं चालू झालं. आता कशी बरं पावलं टाकावीत पुढे? हं .... आधीच एक नंबर मनाशी ठरवून ठेवलेला बरा. सुरवातीला किमान दोन डझन विबासंचं टारगेट ठेवलं. तेवढे झेपतील आपल्याला. आपण १२ करू आणि नवर्याच्या गळ्यात पण १२ मारूयात. सुखदु:ख सारखी वाटायची तर विबासं पण वाटून घेतलेले बरे असा प्रॅक्टीकल विचार केला.
संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला चांगला जेवायखायला घालून हा विषय काढायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो आला, जेवला आणि मग नेहमीप्रमाणे तंगड्या पसरून टिव्ही बघत बसला. मी आपली आजूबाजूलाच घुटमळत राहिले. जाहिराती सुरू होताक्षणी मी विषयाला वाचा फोडलीच. "अरे, जरा एक प्रोजेक्ट करायचाय आपल्या दोघांना मिळून." नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय! "हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव."
आता हे काय????? हा तर सगळ्यालाच एक वेगळा अँगल देत होता. पण मी ठरवलं ते काय आपल्याला जमायचं नाही .... आपण आपलं 'प्लेन व्हॅनिला विबासं" वरच फोकस ठेवायचा. झोपायला जाण्याआधी बरीच नावं डोळ्यापुढे आली. मग त्यातली कुठली कुठली नावं कोणत्याही फोरमवर देणं योग्य ठरणार नाही याची मनाशी छाननी केली...... २४ नावं शोधणं सोपं नाही.......
सकाळी उठले तेव्हा मस्त प्रसन्न वाटत होते. छानशी पहिल्या धारेच्या चहाची तलफ आलेली. गाणं गुणगुणत मी दार उघडलं तर काय? दाराशी दुधाची पिशवीच नाही. दरवाजा बंद करत असतानाच दुधवाला आला. माझा वैताग त्याच्यावर लगेच काढला. मी माझे रागावलेले डोळे त्याच्यावर रोखून बोलले. "वेळेवर का नाही दुध टाकत हल्ली? किती उशीर होतो!" तर माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून तो म्हणतो कसा "मॅडम, आम्ही काय करणार? ही दुधाची गाडीच हल्ली उशीरा येते बघा. तुम्ही लोकांनी समजून नाही घेतलं तर आम्हा गरीबांचं काय होणार? मलाही बायको-पोरं आहेत. महागाई वाढलीये. उद्यापासून सगळ्यात पहिले तुमच्याकडेच दुध टाकीन. बास?" अन गेला तो.
दुध पातेल्यात ओतून गॅसवर गरम करायला ठेवत असतानाच मला जाणवले. अरे, मी माझ्या भावना दुधवाल्यापाशी मोकळ्या केल्या. त्यावर त्यानेही त्याच्या मनीचे गुज मला सांगितले. म्हणजे?... म्हणजे?? .... माझा पहिला विबासं झाला की काय? अग्गबाई, कळलंच नाही हे कसं घडलं ते! अहाहा, त्या पहिल्यावहिल्या विबासंची मोहिनी मनावर असतानाच .... नवरा स्वैपाकघरात आला आणि चहात लुडबुड करायला लागला. मला एक धक्का मारून त्याने बाजूला ढकलले... हॅ! पण त्याचं काय! विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही.
घरातली कामं झटपट आवरून, नवर्याला ऑफिसला पाठवून, दुसर्या चहाचा कप हातात घेऊन मी सोफ्यावर ऐसपैस बसले आणि पुढच्या २३ विबासं ची स्वप्ने बघू लागले.........
विबासं => विवाह बाह्य संबंध
विबासं => विवाह बाह्य संबंध
यामुळेच विपौड्या मारल्या
यामुळेच विपौड्या मारल्या जातात काहीही कारण नसतांना
विपु याचा लॉन्ग फॉर्म काय आहे
विपु याचा लॉन्ग फॉर्म काय आहे?
आपल्या मायबोली सदस्यत्वाच्या
आपल्या मायबोली सदस्यत्वाच्या पानावरील विचारपूस.
@aparichit धनयवाद..
@aparichit
धनयवाद..
Comment mdhe smilies ksha use
Comment mdhe smilies ksha use krtat
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/1818 हे वाचा.
विपौड्या म्हणजे काय?
विपौड्या म्हणजे काय?
अरे धागा काय प्रतिक्रिया काय
अरे धागा काय
प्रतिक्रिया काय
एकाच्या विचारपुशीतुन दुसर्
एकाच्या विचारपुशीतुन दुसर्याच्या विचारपुशीत मारलेल्या उड्या = विपौड्या
आता विपु - विचारपुस - विचारपुशी म्हणजे काय विचारु नका
(No subject)
खतरनाक धागा आहे. खूप हसले. हा
खतरनाक धागा आहे. खूप हसले. हा वाचला नव्हता. बरं झालं धनुडीने वर काढला ते.
प्लेन व्हॅनिला विबासं
भारी लिहीलंय. मजा आली वाचायला
भारी लिहीलंय. मजा आली वाचायला. पूर्वी छान विनोदी कॉलम्स यायचे पेपर्स मधे तसं वाटलं.
विबासं हा शब्द आधी काही ठिकाणी वाचल्यासारखा वाटत होता पण अर्थ माहीती नव्हता. पण इथं परिचित यांनी कॉमेंट मधे अर्थ सांगितलेला दिसला त्यामुळे कळलं. थँक्यु परिचित.
२४ कॅरटच्या पोस्टी कुठे आहेत
२४ कॅरटच्या पोस्टी कुठे आहेत इथे ?
काल मी ड्रायक्लिनर कडे गेले
काल मी ड्रायक्लिनर कडे गेले.त्याने पैठणी चे 280 सांगितले.नंतर रेकॉर्ड मध्ये माझा मोबाईल नंबर चुकीचा लिहिला. मग त्याला म्हटलं करेक्ट कर तर रेकॉर्ड बदलता येणार नाही म्हणाला.त्याला म्हटलं तुझ्या रिसीटवर बरोबर नंबर लिही खोडून तर म्हणाला माझी कॉपी मी ठेवली.आता सापडणार नाही.
बहुधा या भांडणात मनातून एखादा विबासं झाला असावा.
जर त्याने करेक्ट नंबर लिहून
जर त्याने करेक्ट नंबर लिहून घेतला नाही तर ते फाऊल झाल्याने विबासंमध्ये गणल्या जाणार नाही.
झगडा प्यार वगैरे
झगडा प्यार वगैरे
त्याच्या नाकावरची माशीही हलली नाही माझा नंबर चुकीचा लिहून घेताना.
वर गोल्डन खराब होणार नाही ना विचारलं तर साडी उलट पालट करून नाक मुरडून कुठंय सोनं म्हणाला.इतकी जरीची नक्षी होती ती दिसली नाही याला.मग परत जर खराब होणार नाही विचारले तर नरो वा कुंजरो वा चेहरा करून आकाशाकडे पाहिले.
हा हा!
हा हा!
>>>>परत जर खराब होणार नाही
>>>>परत जर खराब होणार नाही विचारले तर नरो वा कुंजरो वा चेहरा करून आकाशाकडे पाहिले.
हाहाहा
(No subject)
हा विबासं कमी विबासा अधिक आहे
हा विबासं कमी "विबासा" अधिक आहे. विवाहबाह्य सासुरवास...
Pages