माझ्या जीवनातील एक सकाळ आणि विबासं

Submitted by मामी on 3 December, 2010 - 06:39

गेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं! ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ... यापुढे मात्र ही उणीव भरून काढायचीच. हाकानाका.

एकदा मनावर घेतल्यावर 'प्रोजेक्ट विबासं' च्या बारीकसारील डिटेल्स भरणं चालू झालं. आता कशी बरं पावलं टाकावीत पुढे? हं .... आधीच एक नंबर मनाशी ठरवून ठेवलेला बरा. सुरवातीला किमान दोन डझन विबासंचं टारगेट ठेवलं. तेवढे झेपतील आपल्याला. आपण १२ करू आणि नवर्‍याच्या गळ्यात पण १२ मारूयात. सुखदु:ख सारखी वाटायची तर विबासं पण वाटून घेतलेले बरे असा प्रॅक्टीकल विचार केला.

संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला चांगला जेवायखायला घालून हा विषय काढायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो आला, जेवला आणि मग नेहमीप्रमाणे तंगड्या पसरून टिव्ही बघत बसला. मी आपली आजूबाजूलाच घुटमळत राहिले. जाहिराती सुरू होताक्षणी मी विषयाला वाचा फोडलीच. "अरे, जरा एक प्रोजेक्ट करायचाय आपल्या दोघांना मिळून." नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय! "हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव."

आता हे काय????? हा तर सगळ्यालाच एक वेगळा अँगल देत होता. पण मी ठरवलं ते काय आपल्याला जमायचं नाही .... आपण आपलं 'प्लेन व्हॅनिला विबासं" वरच फोकस ठेवायचा. झोपायला जाण्याआधी बरीच नावं डोळ्यापुढे आली. मग त्यातली कुठली कुठली नावं कोणत्याही फोरमवर देणं योग्य ठरणार नाही याची मनाशी छाननी केली...... २४ नावं शोधणं सोपं नाही.......

सकाळी उठले तेव्हा मस्त प्रसन्न वाटत होते. छानशी पहिल्या धारेच्या चहाची तलफ आलेली. गाणं गुणगुणत मी दार उघडलं तर काय? दाराशी दुधाची पिशवीच नाही. दरवाजा बंद करत असतानाच दुधवाला आला. माझा वैताग त्याच्यावर लगेच काढला. मी माझे रागावलेले डोळे त्याच्यावर रोखून बोलले. "वेळेवर का नाही दुध टाकत हल्ली? किती उशीर होतो!" तर माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून तो म्हणतो कसा "मॅडम, आम्ही काय करणार? ही दुधाची गाडीच हल्ली उशीरा येते बघा. तुम्ही लोकांनी समजून नाही घेतलं तर आम्हा गरीबांचं काय होणार? मलाही बायको-पोरं आहेत. महागाई वाढलीये. उद्यापासून सगळ्यात पहिले तुमच्याकडेच दुध टाकीन. बास?" अन गेला तो.

दुध पातेल्यात ओतून गॅसवर गरम करायला ठेवत असतानाच मला जाणवले. अरे, मी माझ्या भावना दुधवाल्यापाशी मोकळ्या केल्या. त्यावर त्यानेही त्याच्या मनीचे गुज मला सांगितले. म्हणजे?... म्हणजे?? .... माझा पहिला विबासं झाला की काय? अग्गबाई, कळलंच नाही हे कसं घडलं ते! अहाहा, त्या पहिल्यावहिल्या विबासंची मोहिनी मनावर असतानाच .... नवरा स्वैपाकघरात आला आणि चहात लुडबुड करायला लागला. मला एक धक्का मारून त्याने बाजूला ढकलले... हॅ! पण त्याचं काय! विवाहच झाल्यामुळे मला आता अज्जिबात म्हणजे अज्जिबातच रोम्यँटिक वाटले नाही.

घरातली कामं झटपट आवरून, नवर्‍याला ऑफिसला पाठवून, दुसर्‍या चहाचा कप हातात घेऊन मी सोफ्यावर ऐसपैस बसले आणि पुढच्या २३ विबासं ची स्वप्ने बघू लागले.........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच नवरा घरी आला. त्याची एक सेक्रेटरी आज नोकरी सोडून गेली म्हणाला. मी मोठ्या आशेनं विचारलं की, राजीनामा हातात देताना स्पर्श झाला का म्हणून. तर म्हणाला की तिनं राजीनामा इमेलनं पाठवलाय ..... हे प्लॅटॉनिक विबासं ठरू शकेल का?

बघा आता हळूहळू सगळ्यांचीच विबासं प्रक्रणं बाहेर येतील....... सगळे मिळून नेटाने प्रयत्न केले तर २४ आकडा काही दूर नाही.

मामी, पुर्वी १२ गावं अन बारा भान गडी असायचे Wink आता विबासं चा भाव वधारलाय वाटतं. Proud

Rofl मस्त लिहिलं आहे. बाकी २४ वर थांबायचं कि पुढच्या २४ चा नवा प्रोजेक्ट हाती घ्यायचा..

२४ ला एक टप्पा.
ते नाही का १०८ वेळा मंत्र म्हणला की एक माळ होते तसंच हे.
२४ झाली की एक झेप होते.

Biggrin
मी ही एका सहकार्‍याच्या लग्न न जुळण्याच्या व्यथा/कथा ऐकून घेऊन त्याचे सांत्वन केले, त्याला कॉफी प्यायला वेंडिंग मशीन पर्यंतही घेऊन गेले..त्याअर्थी..माझीही सुरुवात झालीच म्हणायची Biggrin

मुख्य म्हणजे असे कुणचे सांत्वन इ.इ. करताना, आपण स्वतः विबासं प्रस्थापित करीत आहोत, हा विचार मनात कायम ठेवला पाहिजे.

अम्हा लग्न न झालेल्यांसाठी कुणितरी बॅचलरच्या जीवनातील एक सकाळ आणि विपुसं असा एखादा धागा सुरु करा बर!

विपुसं = विवाह पुर्व संबंध

विवाह न झालेल्यांनी विवाहितांशी संबंध जोडला की झालेच विबासं. टाली एक हात से नही बजती.

नी, अगं आजचीच गोष्ट आहे ही Happy
आधीचा स्कोर घेतला तर्...२४ च्या पुढचा आकडा नक्कीच होईल! दिवसाला किमान एक असाही आकडा होऊ शकतो नि त्यात नेहमी पुरुषच असतील असंही नाही..काय वाह्यात आहेत आजकालच्या मुली, नाही का? Biggrin

अरे वा मामी एकदम सिक्क्षर मारली की. ऑफिशिएअली कूगर लोकांसाठी काही विनंसंची सोय आहे काय?( विवाहा नंतरचे संबंध? ) पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

आज आमच्या एका म्हातार्‍या मित्राला( तोच तो आजन्म ब्रम्हचारी - बीअरच्या बाट्लीने पोळ्यालाट्णारा साठीचा म्यान) तो आजारी असल्याने त्रिभुवनकीरती व गरम सूप डायवर हाती पाठविले व फॉलो अप कॉल केला. Happy

याची प्राथमिक बोलणी कशी करायची ? थेट बोलले तर चालते का ? समजा थेट प्रस्ताव (प्रपोजल) ठेवले आणि सांगितले कि आज एवढा पल्ला गाठायचा आहे, तर सामनेवाले, यांच्या कडून आणखी काही संबंध (म्हणजे कॉन्टॅक्ट्स - जल्ला मराठी शब्द ) मिळू शकतील का ?
प्रेमप्रकरण, प्रेमपात्र, भानगड हे शब्द टाळण्यासाठी काय करावे ? गोव्याच्या भाषेत एक्स्टर्नल अफेअर्स ना भायेल्ल्या भानगडी असे म्हणतात. मग तो शब्द वापरावा का ? म्हणजे एक्स्टर्नल अफेअर्स !
छे बुवा, भारीच प्रश्न पडताहेत मला !

संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला चांगला जेवायखायला घालून हा विषय काढायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो आला, जेवला आणि मग नेहमीप्रमाणे तंगड्या पसरून टिव्ही बघत बसला. मी आपली आजूबाजूलाच घुटमळत राहिले. जाहिराती सुरू होताक्षणी मी विषयाला वाचा फोडलीच. "अरे, जरा एक प्रोजेक्ट करायचाय आपल्या दोघांना मिळून." नवराच तो. तो काय नविन काम हाती घेतोय! "हे बघ, तु जे काही ठरवलंय ते तुझं तुच कर हा. मला मधेच घालू नकोस. अजून पाहिजे तर बायका ठेव."

Rofl
ख्वॅक करून तोंडातलं पाणी बाहेर आलं... ठसका लागला.
च्यायला..!!
मी काय म्हणते..असं म्हणून हे असे विषय निघायला लागले तर घरोघरी काय होईल या कल्पनेनंच लोटपोट झालो.:हहगलो:

दिनेशदा, या मामल्यात उत्क्रांती अपघाताने होते की संथपणे हे पाहणे इंटरेस्टींग असेल Proud

अहो ऐकताय ना, या महिन्यात मला माझा कोटा पूर्ण करायचाय. जरा ऑफिसमधून टूअर वगैरे मिळतेय का बघा ना जरा, म्हणजे मला जरा बघता येईल माझं.
तूमच्या पण दोन तीन केसेस राहिल्या आहेत ना, त्या करुन टाका !

समोरच माणुस अपला innocently coffee machine गप्पा मारतोय तेव्हा आपण मनात ठेवयच कि हा विबासं आहे. मग भलेहि त्या माणसाला पत्ताच का नसेना कि आपण त्याला आपल्या २४ मधे धरलय. आसे चालतात ना?
आसेच असणार, नाहितर २४ चा अकडा अभिमानाने सांगणारे पुरुष, २४ वेळा second hand use झालेल्या जोड्या प्रमाणे दिसतिल ना.
-शिरीन

मी तर ठरवलयं ... पुढच्या आठेक दिवसात टारगेट पूर्ण नाही झाले तर दादर-डोंबिवली रेल्वे प्रवास करणार संध्याकाळी ६-६.३० च्या फास्ट ट्रेनने - ते पण जनरल कंपार्टमेंटमधून. हाकानाका.

व्हॉट अबाउट पीपल वर्कींग फ्रॉम होम?
आमचा २४ चा स्कोर कधीच पुरा होणार नाही.. Sad
इथल्या बाफ वर टाकलेल्या पोस्ट्स क्वालिफाय होतात का? Wink

मा.य. बोली
नवीन नाव
विबाबोली>> सॉरी हे नाही पटलं. माबो इज मच बिगर.

गंमत चालू दे बरे का.

Pages