मी मायबोलीवर येऊन एकोणीस वर्षं आणि सहा महिने झाले, म्हणजे ऑनलाइन गप्पांसाठी फक्तं याहु मेसेन्जर असलेल्या काळापासून ते ऑर्कुट, मायस्पेस, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, स्नॅपचॅट असा भला मोट्ठा टेक्नो प्रवास, journey from my 20’s to 40’s !
तसं असलं तरीपण मायबोली वरचं माझं वय अजुन साडे एकोणीसच आहे, बोले तो ‘अजुनही टिनेज’ आहे
असो , तर मायबोलीची ओळख अर्थातच माझ्या मोठ्या बहिणीने ‘मैत्रेयी’ ने करून दिली, त्यावेळी मी बे एरीआ मधे रहायचे.
युजर आयडी घेताना ‘दीपाली’ या माझ्या अति कॉमन नावा ऐवजी माझ्या नावाशी सिमिलर पण त्यातल्या त्यात कमी कॉमन नावाचा आयडी घेतला, ‘दीपांजली’!
त्यावेळी सुरवात बहुदा गप्पांच्या पानावर केली, मला दिसलं कि बरीच लोक गप्पा मारताना दिव्याची ओंजळ असलेली इमेज टाकायचे, मला वाटायचं माझं नाव दीपांजली म्हणून स्वागत करत आहेत
त्याचा खरा अर्थ नंतर कळला ‘टेक इट लाइट्ली’ = दिवा घेणे
त्यावेळी गप्पांचा सर्वात पॉप्युलर बीबी होता ‘पुणेरी पुणेकर‘ , जसे आत्ताच्या पार्ले बीबी (टिपापा) वर पार्लेकर फार कमी तसे तिथे पुणेकर फार कमी असायचे
मैत्रेयीने तिच्या आठवणींमधे लिहिलय त्याप्रमाणे मोस्ट्ली लग्नाळु किंवा न्युली मॅरीड गोग्गोड फेज मधले पब्लिक होते !
लेखनाच्या आणि चर्चांमधे सर्वात पॉप्युलर होता रसिकयश, ज्याचा नंतर बी झाला , या शिवाय हवाहवाई, आसामी हे ही पॉप्युलर लेखक होते, ह्ह आणि असामीने मिळून ‘त्या वळणावर‘ अशी एक चावट कादंबरी लिहिली होती !
पुणेरीपुणेकर वर त्यावेळचे पॉप्युलर अॅक्टिव्ह आयडीज म्हणजे आर्च,सानिका, वेल्दोडा, प्रफुल्ल, कलंदर, सव्यासाचि, एलायझा, श्रीनि, रचना बर्वे, उपास , अबेडेकर,योगिबेअर, योग , झक्की इ.
लग्नाळु पब्लिक असल्यामुळे शुद्ध तूपातले सभ्य फ्लर्टिंग सुद्धा चालायचे, त्यात सानिका- वेल्दोडा (वेल्डी), उपास-ट्युलिप या नेहेमीच्या यशस्वी फ्लर्टी जोड्या आणि रचनाच्या मागेही बरेच आयडी होते म्हणे
यातूनच योगिबेअरने ‘तोंडओळख’ उपक्रम सुरु केला, म्हणजे ज्यांना एकामेकांची थोबाडं पहायची आहेत त्यांच्या साठी याहु फोटोज मधे प्रायव्हेट अल्बम
मायबोली मुळे लग्नं ठरलेल्यांनी लव्हस्टोरी लेखही लिहिले होते मायबोलीवर , यात राधा-शिरीष , एस्व्हीएस-सुप्रिया, मिल्या-पीएस्जी इ. लोक होते !
गप्पांशिवाय त्यावेळी अंताक्षरी बीबी पण पॉप्युलर होता .
थीम अंताक्षरी वर लक्षात राहिलेल्या काही धमाल थीम्स :
ज्या गाण्यांनंतर अॅक्सिडेन्ट होतो अशी गाणी
डबल मिनिंग चावट गाणी
खाताना म्हंटलेली गाणी
विजोड जोड्यांची गाणी
ठोकळेबाज हिरोजची गाणी
वन साँग वंडर अॅक्ट्रर्स ची गाणी
माबो वर रुळल्यावर मिंग्रजी ते देवनागरी रुपान्तर झालं , फाडफाड मराठीतू लिहिता यायला लागलं , तेंव्हा नव्याने आलेल्या ‘व्ह्युज अँड कॉमेंट्स’ या सेक्शनवर भरपूर धुमाकुळ घातला
स्त्रियांसाठी जाचक आणि खटकणार्या प्रथा, हे कधी बदलणार , इट्स हर चॉइस एनीवेज, वाकून नमस्कार करणे जाचक आहे का, धर्म असावा कि नसावा अशा अनेक बीबीज वर किबोर्ड झिजे पर्यन्त बडवाबडव केली !
त्यावेळी मॉडरेटर टिम असायची आणि बीबी भरकटल्यावर किंवा राडा झाल्यावर एखादा मॉडरेटर येऊन समज देऊन जात असे , मला आठवतय त्या प्रमाणे समीर (आत्ताचे अॅडमिन) मॉडरेटर ११ होता, मैत्रेयी मॉडरेटर १० , मिलिंदा बहुदा मॉडरेटर ४ कि ६ होता जो सर्वात खडुस मॉडरेटर होता , हे अंदाज होते नुसते प्रत्यक्षात मॉडरेटर रिअल आयडेन्टिटी रिव्हिल करायचे नाहीत !
नंतर म्युझिकल आणि डान्स रिअॅलिटी शोज, फिल्मी गप्पा इ. बीबी वर पण मज्जा केली
काही आयडीजशी रेग्युलर्ली मतभेद झाले , त्यातला मेन आयडी म्हणजे श्रिनि , त्यानंतर पराग बरोबर(Adm) बरेच वाद झाले जे वाद मी मैत्रेयेची बहिण आहे हे समजल्यावर आणि तिने केलेला आंब्याचा शिरा खाल्ल्यावर परागनेच संपवून टाकले !
सशल बरोबर श्रीदेवी वि. माधुरी मधे भरपूर वाद झाले पण ही भांडणं नसतात , नेव्हर एंडिंग मज्जा असते दरवेळी श्रीदेवी कशी मस्तं आणि माधुरी कित्ती वरणभात सांगताना !
काही आयडीजशी बरेचदा मतं जुळली ते आयडीज म्हणजे नी, एलायझा, हवाहवाई, श्रद्धा, रचना बर्वे, स्वाती_आंबोळे, मैत्रेयी आणि इतर अनेक फिमेल आयडीज !
मी आणि रचनानी एका मायबोली गणपती उपक्रमात डिबेट स्पर्धाही जिंकली .
मायबोलीची बरीच गेट टुगेदर्स अटेन्ड केली आणि खूप फेमस लोकांना प्रत्यक्षात भेटले !
जीटीजीज मधे बे एरीआत लिंबोणी, स्तोरवि, दिप्ती_डल्यु,फारेंड, मीपुणेकर,सशल, अबेडेकर, महागुरु, समीर,प्रफुल, लालु, मिनोती इ.
नॉर्थ कॅरोलायना मधे असताना अंजली, एले ला मुव्ह झाल्यापासून समीर, सुप्रिया, विकास चौधरी, अनुडॉन, आस्चिग, बस्के, रार, आर.एम.डी ,इ.
पुणे जीटीजीज मधे नी, श्र, संकल्प द्राविड, मिल्या, पूनम,राफा,गंधार,वैभव जोशी, जयश्री आंबासकर आणि इतरही बर्याच आयडीजना भेटले.
न्यु जर्सीला तर मैत्रेयी कडे जेंव्हा जाते दर वेळी तिथले उत्साही मायबोलीकर मित्रमंडळ जीटीजी अरेन्ज करतात,
एन्जे मधे स्वाती आंबोळे, वृन्दाताई, एबाबा, सिंडी, वैद्यबुवा,सायो, मेधा,वेबमास्तर आणि दस्तुरखुद्द झक्कींना भेटले आहे .
असो, तर या नेव्हर एंडिंग मेमरीज नंतर प्रश्नांची उत्तरं :
तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले
बरेच बदल झाले , हे प्रमुख बदलः
मिंग्रजीचं देवनागरी झालं, रंगीत शाई (बहुतेक)बन्द झाली, अद्रुष्य शाई (बहुदा) बन्द पडली (आता स्पॉयकर अॅलर्ट असे लिहावे लागते जे वाचताना स्पॉयल्र्स सुध्द्दा दिसतात ) , एखाद्या आयडीच्या पाउलखुणा पहायची सोय बन्द झाली , दिवाळी अंक बन्द पडला, संयुक्ता बन्दं पडलं , काही फेमस आयडी रुसून निघून गेले आणि बरेच नवे धुमाकुळ घालणारे नवीन आयडी भरमसाट लोकसंख्या वाढवत जॉइन झाले !
इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली ?
ऑनलाइन उत्सव साजरे करणे, क्रिकेट वर्ल्ड कप चर्चेत ऑनलाइन स्टेडियमचा फिल घेणे, विषयांप्रमाणे लेखन आणि गप्पांची पानं शोधणे इ.
कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती?
मायबोलीचे वेबमास्तर माझे नातेवाइक आहेत हे कित्त्येक वर्षं माहितच नव्हते
जोक्स अपार्ट पण यावर विचार केला नाही , इमेज देतो तसा डायरेक्ट व्हिडिओ अपलोड सोय आहे कि नाही माहित नाही, असेल तर माहित करून घ्यायला आवडेल.
गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिल ?
मित्र मैत्रीणी, गेट टुगेदर्स, टिपी, करमणूक, रेसिपीज, सल्ले, मराठी कम्युनिटी/भाषेशी कायम टच मधे रहाणे , असंख्य विषयांवर चर्चा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं मत ठामपणे मांडायचा कॉन्फिडन्स !
तुम्ही मायबोलीला काय दिलं ?
मराठी लोकां मधे कमी चर्चा होणारा/ बहुतेक लोकांना उथळ आणि पांचट वाटणारा ‘फॅशन्/मेकप’ वगैरे विषय मायबोलीवर मी पहिल्यांदा सुरु केला , त्यालाही आता ऑलमोस्ट १६ किंवा जास्तं वर्षं होऊन गेली असतील !
सिनेमा, फिल्मी गॉसिप, रेड कार्पेट फॅशन डिझॅस्टर्स इ. चर्चेत योगदान दिलं
प्रोफेशनल मेंदी अर्टिस्ट म्हणून जे काही सांगत आलेय, त्यातून कोणाला यात प्रोफेशन निवडावे म्हणून /डिझाइन इन्स्पिरेशन दिले असेल तर माहित नाही !
तुमचं कुठलं लेखन गाजलं ?
कोणतं लेखन गाजायला मी काही लेखिका नाही पण रेसिपी सेक्शन मधे माझ्या आईच्या पद्धतीने आंब्याचा शिरा चांगलाच गाजला, अजुनही त्याचे फिडबॅक येतात !
एका गणपती उत्सवात ‘STY’ गोष्टीमधे टाइम मशिन कन्स्पेट दिली होती त्यात मी टाकलेले टेक्नो सॅव्ही महाभारत कॅरॅक्टर्स , टॅटु असलेली नाभीत हिरा ठेवणारी ‘शिंपली’ नावाची टॉपलेस मर्मेड वगैरे कॅरॅक्टर्स त्या एस्टीवाय मधे बरीच पॉप्युलर झाली
कोणाला गांजलं ?
कोणाला गांजलं माहित नाही पण कदाचित व्ह्युज अँड कॉमेंट्स वर बर्याच लोकांच्या डोक्यात गेली असेन , पराग बरोबर सारेगमप वरच्या वादाचा उल्लेख केलाच आहे पण ‘गांजलं’ कॅटॅगरी वाद घातले का नाही माहित नाही
छान लिहीलेय
छान लिहीलेय
जे मला अ जि बा त जमत नाही ते सगळ सगळ तुला उत्तम जमत, म्हणजे फॅशन, मेकप, मेहंदी, ड्रेसिंग सेन्स इत्यादी इत्यादी. त्यामुळे तुझ्या यासंदर्भातल्या पोस्ट्स, फोटो, युट्यूब चॅनलवरचे व्हिडीओ मी अत्यंत कौतुकाने बघते नेहमी
>> लग्नाळु पब्लिक असल्यामुळे
>> लग्नाळु पब्लिक असल्यामुळे शुद्ध तूपातले सभ्य फ्लर्टिंग सुद्धा चालायचे, त्यात सानिका- वेल्दोडा (वेल्डी), उपास-ट्युलिप या नेहेमीच्या यशस्वी फ्लर्टी जोड्या >>
हे माहित नाही किंवा लक्षात नाही पुपुवर अजिबात जाणं नसल्याने. ट्युलिपची खरी आयडेंटिटी बाहेर पडल्यावर उपासला कुठे तोंड लपवू झालं असेल 
बाकी मस्त आठवणी.
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
मराठी लोकां मधे कमी चर्चा
मराठी लोकां मधे कमी चर्चा होणारा/ बहुतेक लोकांना उथळ आणि पांचट वाटणारा ‘फॅशन्/मेकप’ वगैरे विषय मायबोलीवर मी पहिल्यांदा सुरु केला
>>>>>>
हे भारी योगदान आहे. मायबोलीचे दुकान अश्या योगदानांवरच चालू आहे..
उत्तम आढावा.
उत्तम आढावा.
मला वाटायचं माझं नाव दीपांजली
मला वाटायचं माझं नाव दीपांजली म्हणून स्वागत करत आहेत >>> हे खास आहे
मस्त दीपांजली. योगायोग म्हणजे
मस्त दीपांजली. योगायोग म्हणजे आजच तुझ्या रेसिपीने आंब्याचा शिरा केलेला एका गेट टुगेदर साठी. माबोवरच्या मैत्रिणीच होत्या.
DJ तुझ्या आयडिला शोभतील अशा
DJ तुझ्या आयडिला शोभतील अशा गोष्टी लिहिल्यास बघ . जुन्या आठवणी काढल्यास सगळ्या. पण टॅटू प्रकरण एका वाक्यात गुंडाळलेस , हि येह बात कुछ हजम नहि हुयी
बाय द वे , हवाहवाई नि मी लिहिलेले 'डायरी दोघांची' होते, ' त्या वळणावर' पेशवा नि मी लिहिलेले.
हा फार चांगला उपक्रम आहे !
हा फार चांगला उपक्रम आहे ! विविध क्षेत्रातील मायबोलीकरांनी आपल्याला किती समृद्ध केलं आहे याची जंत्रीच जणू. रोज इथे आल्याशिवाय का करमत नाही हे कोडे उलगडले !
आमच्या शेजारच्या दोन बारा तेरा वर्षाच्या मुली बियॉन्सी च्या गप्पा मारत होत्या, या अंकल ना बियोंसी म्हणजे काय हेही माहित नसेल असा त्यांचा एकूण अविर्भाव होता. अरे त्या बियॉन्सी चे काय कौतुक सांगताय, तिला मेहेंदी लावणारी आमच्या चांगल्या ओळखीची आहे ! असे सांगून मीही शायनिंग मारले !
आरती आणि जी एस पण लग्न
आरती आणि जी एस पण लग्न झालेल्यांपैकी.
मला दिपांजली ह्यांचा खूप आणि सार्थ अभिमान वाट्तो. कधी भेटणे होणार नाही पण मायबोली मुळे ह्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली.
तो आंब्याचा शिरा खरच फार भारी आहे. अनेकानेक शुभेच्छा.
अनेकानेक शुभेच्छा.
अनेकानेक शुभेच्छा.
तुम चे व्हिडिओज पाहीलेले आहे
तुम चे व्हिडिओज पाहीलेले आहे त. You have charisma & confidence.
छान आठवणी
सही! तू लिहीलेल्या आठवणींमधले
सही! तू लिहीलेल्या आठवणींमधले काही आयडीज मलाही माहीत नाहीत, व त्या आठवणीही माहीत नव्हत्या. शुद्ध तुपातले फ्लर्टिंग हे सुपरलोल आहे. वैशाली माडे बद्दलचा पग्याबद्दलचा वाद सुद्धा आंब्याच्या शिर्याने मिटला का?
बाकी माधुरीबाबत मी सशलशी टोटल सहमत आहे.
प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून प्रवासही जबरी!
फ्रीमॉण्ट मधल्या २००६ मधे कधीतरी झालेल्या माबोगटगला तू होतीस हे लक्षात आहे. ते माझे पहिले गटग होते.
दिपांजली, चांगला लेख.
दिपांजली, चांगला लेख.
मी अगदी अलीकडेच खूप बायकांना तुझं उदाहरण देते.'मराठी माणसाला बिझनेस जमत नाही म्हणताय?ही बघा, पुण्यातून तिकडे गेली आणि स्वतःच्या कर्तृत्वावर सेलेब्रिटी टॅटू आर्टिस्ट आहे.स्वतःही सेलेब्रिटीज सारखी स्टायलिश आहे'
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
जुन्या माबो आणि माबोकरांबद्दल वाचताना भारी वाटतं.
खुप सुंदर लेख.. मी तर
खुप सुंदर लेख.. मी तर व्हिडीओंचीही फॅन आहे...
Thank you everyone
Thank you everyone
मस्त! जुन्या जुन्या गोष्टी
मस्त! जुन्या जुन्या गोष्टी वाचायला मजा येत आहे.
तुमचे तुनळीवरील व्हिडीओ
तुमचे तुनळीवरील व्हिडीओ आवडीने पाहिले असल्यामुळे हा लेख वाचताना तुमच्या आवाजात ऐकू आला मला ः)
सिनियर मेंबरांच्या ज्या आठवणी आतापर्यंत वाचल्या त्यानंतर "झक्की" हे एक इंटरेस्टिंग आयडी आहे हे कळले. त्यांना या सदरात लिहिते करा की कोणी.
जुन्या धाग्यांवर बी चा उल्लेख आणि त्याचे प्रतिसाद वाचले आहेत. ऋन्मेष हा त्याची mutated आव्रुत्ती असावी असे वाटते कधी कधी.
है शाब्बास! मस्त!!
है शाब्बास! मस्त!!
है शाब्बास! मस्त!!
टॅटु असलेली नाभीत हिरा ठेवणारी ‘शिंपली’ नावाची टॉपलेस मर्मेड वगैरे कॅरॅक्टर्स >>>
आत्ता मुद्दाम शोधून शोधुन २-३ वाचली. हहपुवा झाली!
लिंक दे , वरती अॅड करते, मला
MT
लिंक दे , वरती अॅड करते, मला लक्षातच नव्ह्त कुठलं वर्षं होतं ते
मस्त!
मस्त!
२०१० च्या दिवाळी अंकाच्या वेळी तुझी मेंदी-कला मला पहिल्यांदा कळली होती.
तू आणि मैत्रेयी बहिणी आहात हे आत्ता कळतंय!!
मला वाटायचं माझं नाव दीपांजली म्हणून स्वागत करत आहेत >>>
ही बघ ही एकःhttps://www
ही बघ ही एकः
https://www.maayboli.com/node/10392?page=3
छान लिहिलंयस! तुला भेटायला
छान लिहिलंयस! तुला भेटायला आवडेल. पुढची न्यू जर्सी विजिट कधी आहे सांग.
आंब्याचा शिरा म्हटलं की तूच आठवतेस.
तुला भेटायला आवडेल. >>>
तुला भेटायला आवडेल. >>> अंजली बघतॉय हॉ. मला तर कधी म्हटलं नाय असं!
अग्गंं आता तुमचं रिलेशन
अग्गंं आता तुमचं रिलेशन कळल्यावर तू बाय डीफॉल्ट भेटशीलच

तू आणि मैत्रेयी बहिणी आहात हे
तू आणि मैत्रेयी बहिणी आहात हे आत्ता कळतंय!!>>सेम पिंच
तू आणि मैत्रेयी बहिणी आहात हे
तू आणि मैत्रेयी बहिणी आहात हे आत्ता कळतंय!! >> सेम पिंच +१००
तुझे व्हिडीयोज आवडतात. तू टाकतेस तेव्हा बघणं होत नाही पण सुट्टीच्या दिवशी एकदम भसाभसा सगळे बघते.
दीपांजली........ मस्त लिहिलं
दीपांजली........ मस्त लिहिलं आहेस गं... !!
आपली अमेरिकेतली भेट मात्र राहूनच गेली यार त्यावेळी
Pages