प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ८ - उंचावरून काढलेली छायाचित्रे

Submitted by संयोजक on 18 September, 2021 - 06:21

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.

उंचावरून काढलेली छायाचित्रे

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

आणि हा अजून एक..
एकीकडे डोंगर तर दुसरीकडे खाडी Happy

1631962376094.jpg

ही उंची कशी वाटतेय?

FB_IMG_1631719879008.jpg

गजानन , मस्त फोटो.

ऑफिसच्या गच्चीवरून दिसणारी (world famous!) अंधेरी मेट्रो

IMG_20210918_163745.jpg

IMG_2722.jpeg

शिकागो सिअर्स टॉवर

युरोप सहलीत आयफेल टॉवर वरून काढलेला फोटो ..सीन नदी आणि तिच्यावरचे छोटे छोटे पूल पलीकडे पॅरिस शहर . नदीच्या पाण्यावर पडलेल्या उन्हामुळे पाणी छान चमकत होतं.
CIMG0595.jpg

स्वस्ति, धन्यवाद.
मेट्रोच्या फोटोमध्ये साकीनाक्याचा सिग्नल दिसतोय का? Happy कोणत्या दिशेने फोटो घेतलेला आहे?
ऋन्मेऽऽष , माळशेजचा माहौल भारी आहे!

night_city.jpg

नाही उलट्या बाजूने. ट्रेन हायवे ला चालली आहे.
उजव्या बाजूला पांढऱ्या bldg जवळ चकाल्याचा गुरूद्वारा आहे. Happy

ओके Happy
पूर्वी काही वर्षे जेबीनगरला / सॉलिटर पार्कात हापिस होते. तेव्हा सकाळी ३३२ चा डबलडेकरचा तर सायंकाळी अंधेरी स्टेशन पर्यंत पायी, अंधेरीवरून मरे व्हाया दादर असा प्रवास रोज घडे. मेट्रोचे काम चालू झाल्यावर पिलर्स उभे राहू लागल्यावर कंपनीने तिथून हापिस हलवले.

मानवी संस्कृतीची पहाट जिथे उगवली ती तैग्रीस नदी! फोटो अर्थातच विमानातून
IMG_20210919_001020.jpg

भोगवे किल्यावरून खाली दिसणारा भोगवेचा अती सुंदर स्वच्छ किनारा आणि अथांग सागर. नजर-कॅमेराच्या लेन्समधे न बसणारा
IMG_20210919_021233.jpg

कविता वाचायची असेल तर : https://mayurapankhi.blogspot.com/2016/03/blog-post.html

Pages