Submitted by कविन on 18 September, 2021 - 03:50
गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि…रिफ्लेक्स ॲक्षनने कच्चकन ब्रेक दाबला जाऊन कचकचीत शिवी बाहेर पडली
मगाशी इथूनच पुढे गेले ना मी? go slow चा बोर्ड आणि 'क्षणभर विसावा' हॉटेल दाखवणारी पाटी मगाशी पण दिसली होती.
चकवा असावा? की अल्कोहोल लेव्हल जास्त झाल्याने डिरेक्षनचा सेन्स गंडलाय? पण अल्कोहोलला हात लावूनही दहा दिवस होतील आता.
परत च्यायला तोच बोर्ड आला 'अपघाती वळण' आणि 'go slow'. हा त्याच त्या वर्तुळात फिरणारा प्रवास अजून कदाचित ३ दिवस. तेराव्याला कदाचित मुक्तीदिन? कदाचित परत प्रवास. सगळच कदाचित, इथला चकवा संपून मोक्ष मिळेपर्यंत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दूरचा प्रवास फारच दूरचा
दूरचा प्रवास फारच दूरचा निघाला की. छान आहे कथा
लै दुरचा प्रवास! भारी लिहिलंय
लै दुरचा प्रवास!
भारी लिहिलंय
भारी!
भारी!
भारी लिहिलीयं..!
भारी लिहिलीयं..!
जबरदस्त
जबरदस्त
भारी!
भारी!
(पण शीर्षकामुळे जरा अंदाज आला आधीच...)
डेन्जरच चकवा
डेन्जरच चकवा
३ दिवसांचा संदर्भ लागला नाही.
३ दिवसांचा संदर्भ लागला नाही. चकवा इन जनरल ३ दिवस चालतो का?
बाकी संकल्पना आवडली. 'जन्म-मृत्यु' चा फेरा.
छान!
छान!