शशक पूर्ण करा-बुंदीचा लाडू-अस्मिता

Submitted by अस्मिता. on 10 September, 2021 - 09:41

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....

       आई म्हणाली होती बरं की या खोलीत झोपू नको पण ही वाड्याच्या एका बाजूला , सज्जात लावलेला जुईचा वेल, कसं शांत शांत वाटत होतं पण ........

    किंकाळी......

    घाबरू नकोस, दर अमावस्येला या नळातून पाणी ठिबकतं.  तुझे खापरपणजोबा रघोत्तमराव त्यांनी बांधलायं हा वाडा, त्यांचे भाऊ माधवराव यांचा मी मुलगा, शिक्षणासाठी पाठवलं होतं मला. याच वाड्यात, माझी मुंजही झाली होती. भली मोठी इस्टेट होती. सगळं आलबेल होतं. एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर खूप भूक लागली होती. रघूतात्याने मायेने बुंदीचे दोन लाडू भरवले फक्त मलाच....मलाच !!मगं इस्टेटीचे दोनंच वारस राहिले.  तेव्हापासून या दिवशी मला तहान लागते आणि मी या खोलीत येतो, पाणी दे , पाणी.........

©अस्मिता.
गणेशोत्सव २०२१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. आवडली शशक. Happy

एक एक शंका आली. Proud
>>शिक्षणासाठी (परगावी) पाठवलं होतं मला.
एके दिवशी शाळेतून ? सुट्टीत घरी आल्यावर

Happy
काका परगावी होते, या मुंजाला/मुलाला शिक्षणासाठी तिथे ठेवले होते. आईवडील तिथे नव्हते म्हणून विषप्रयोग करणे सोपे होते.

Happy धन्यवाद .
शशक आणि भूत पहिल्यांदा ट्राय केले, मजा आली.

छान लिहिलंय . माझ्या कडे ही बाल्कनी पर्यंत जुईचा वेल आहे. अजिबात तिथे बसून बुंदीचा लाडू खाणार नाही.

सर्वांचे आभार. Happy
Blackcat, रघूतात्यांची मुलं ...कारण तीन भावांपैकी एका भावाला मुली होत्या व एका भावाला हे एक भूत /मुलगा. शंभर शब्दांच्या मर्यादेमुळे तपशील लिहिले नाहीत.

Pages