चातुर्मासाच्या कथा - चतुरमा'सी'सह (कहाणी पिठोरीची- समारोप)

Submitted by Barcelona on 4 September, 2021 - 00:55

या कहाण्यांनी मला काय दिलं? इतका जमाखर्च अजून मांडला नाही. कधी फार व्रत केली नाहीत, जी एक-दोन हातून घडली त्यात श्रद्धा कितपत नि परक्या गावात ‘सोशलायझेशनार्थ’ कितपत हे ही उमगलं नाही. माझ्या टिवल्याबावल्या सोसल्याबद्दल श्रद्धेने व्रते करणाऱ्यांची मी ऋणी आहे. उतराई होण्यापेक्षा काही ऋणातच मोक्ष आहे _/\_. काहींनी अजून कथा सुचवल्या पण त्या नंतर कधी लिहीन. ह्या श्रावणातील ही शेवटची कथा…
__________________

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याच्या घरीं श्रावणांतल्या अवसेच्या दिवशीं बापाचं श्राद्ध असे.
(करोनापूर्व काळात अवसेच्या दिवशी यु.एस/ यु.के व्हिसा अपॉईंटमेंट्स हमखास रिकाम्या असायच्या!! सगळे श्राद्धात बिझी असतात…)

इकडे दरवर्षी काय होई? ज्या दिवशी श्राद्ध, त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखूं लागे, व ब्राह्मण जेवायला बसण्याचें वेळेवर बाळंत होऊन पोर मरून जाई.
(अरे ही क्रिएटीव्ह लिबर्टी की मस्करी म्हणायची …भारतीय बायांना बाळंत होताना टेबल-टेनिसचे टेबल, सुईणीऐवजी बाजीराव, बिलं भरायला गजराज राव असं काही चालतं तिथे भर लंच टाईममध्ये सगळे मोकळे असताना बाळ कसं मरत… )

असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं सहा वर्षं झालं. सातव्या वर्षीही असंच झालं, तेव्हा सासरा रागावला. मेलेलं पोर तिच्या ओटींत घातलं, तिला रानांत हाकून लावलं. पुढं जातां जातां ती एका मोठ्या अरण्यांत गेली.
(हिला श्रावणात कशाला हाकून द्यायची त्यापेक्षा वेळीच मुलाला मार्गशीर्षात यात्रेला पाठवायचं!)

तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, “बाई, बाई, तूं कोणाची कोण? इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा; नाहींतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील.”तेव्हां ब्राह्मणाची सून म्हणाली, “तेवढ्याकरितां मी इथं आलें आहे.”
(रेल्वेखाली जीव देणे हे ऑप्शन तेव्हा नसल्याने झोटिंगाचे जेवायचे टाईम टेबल देवळात नायतर चावडीवर लावलेले असायचे काय??)

तशी झोटिंगाची बायको म्हणाली “बाई बाई, तूं इतकी जिवावर उदार कां ?” “मी एका ब्राह्माणाची सून, दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशीं बाळंत होई व मूल मरून जाई.
( दरवर्षी अचूक श्रावणी अवस म्हणजे - दिदी, तेरा देवर... अरे देवर क्या उसकी पूरी फॅमिली दिवानी लगती है...)

त्याच दिवशीं आमच्या घरीं माझ्या आजेसासर्‍याचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्नाण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणें माझी झाली, सातव्या खेपेलाहि असंच झालं.
(सहा मुले गेली त्यापेक्षा श्राद्ध झालं नाही ह्याच दुःख जास्त असणाऱ्यांच एकदाच श्राद्ध घालून मोकळं व्हावं…. जिवंत असलातरी.. )

तेव्हां मामंजींना राग आला. ते मला म्हणाले, “माझा बाप तुझ्या बाळतपणामुळं सात वर्षं उपाशी राहीला. तर तूं घरांतून चालती हो.” असं म्हणून हें मेलेलं मूल माझ्या ओटींत घातलं, आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आलें. आतां मला जगून तरी काय करायचं आहे?” असं म्हणून ती रडूं लागली.
(जगून काय करायचं ??…. मेलेलं मूल आधी नीट क्रियाकर्म करायचं , मग वैद्याकडे जाऊन सारखे स्टीलबर्थ का होतात ह्याच्या टेस्ट/ ट्रीटमेंट करायच्या… मग एखादा अनामिकासारखा 'कहीं करता होगा वो मेरा इंतजार' असा धमाल म्युजिक अल्बम काढायचा नि मिळालेल्या पैशात सुखी जगायचं Wink )

तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, “बाई, बाई, तूं भिऊं नको, घाबरूं नको. अशीच थोडीशी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दॄष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून रहा. रात्रीं नागकन्या, देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि ‘अतिथी कोण आहे’ म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण, त्या तुला पाहतील. कोण कुठची म्हणून चौकशी करतील, तेव्हां तूं सगळी हकीगत त्यांना सांग.”
(खीर पुरी चालते की बाळंतिणीला. बेष्ट प्लॅन!! बाकी सौ.झोटींग एकदम शराफत की तोप है टुन्ना.. ही बाई गेली देवकन्येकडे तर सौ.झोटींगला कणिक तिंबा, पराठे लाटा असा सैपाक पडेल की... )

ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली, तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहूं लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यांत रात्र झाली, तशा नागकन्या, देवकन्या, आसरांच्या स्वार्‍यासुद्धां आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि ‘अतिथी कोण आहे’ म्हणूनं विचारलं. त्याबरोबर ती खालीं उतरली. ‘मी आहे’ म्हणून म्हणाली. तेव्हां सगळ्यांनीं मागं पाहिलं, त्यांचा आश्चर्य वाटलं, तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली.
(सॉंग सिच्यूएशन - किसका है यह तुमको इंतजार मैं हूं ना… )

नागकन्या देवकन्यांनीं तिच्या मुलांची चौकशी केली, तेव्हां आसरांनीं तीं दाखवलीं. पुढं त्यांनी तिच्या सातही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हें व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली. आणि मृत्युलोकीं हें व्रत प्रगट करायला सांगितलं; तसं तिनं विचारलं, “ह्यानं काय होतं?” असरांनी सांगितलं. “ हें व्रत केलं म्हणजे मुलंबाळ दगावत नाहींत, सुखासमाधानांत राहतात.” पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गांवांत आली.
(मुले सुखसमाधानात हवी असतील तर आया व्रतात बिझी बऱ्या नायतर फालतूच ‘अजून दप्तर भरलं नाही’, ‘कालचा डबा आज दप्तरातून काढतोस, खरकाट्याच्या वासानेच कचरागाडी येईल’ असली किरकिर करत राहतात.)

लोकांनी तिला पाहिलें. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, “भटजी, भटजी, तुमची सून घरीं येत आहे.” त्याला तें खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहूं लागला तों मुलंबाळं दृष्टीस पडूं लागलीं. पाठीमागून सुनेला पाहिलं.
(अरे बापरे सात-आठ जण असे एका आडव्या ओळीत… द्या टाकून सॉंग सिच्यूएशन “निकलेंगे मैदान मे जिस दिन हम झूम के ..”)

तसा उठला, घरांत गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली, तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलांबाळांसुद्धा सुखाने ती नांदू लागली.
(क्रिकेट टीम नाही पूर्ण केली का? मग सुखीच म्हणायची)

ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.
(#मॉडर्नचातुर्मास. कहाण्या ह्यावर्षीपुरत्या संपल्या. फिर कभी मिलेंगे सीझन टू के साथ .... _/\_ )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच कथा.
जन्मतः मेलेली मुलं चालत घरी परतली? अनुक्रमे सात,सहा,पाच,चार,तीन,दोन,एक अशा वयांची होऊन का??
सिच्युएशन सॉन्ग्स आणि सीताईची कॉमेन्ट्री Lol

((हिला श्रावणात कशाला हाकून द्यायची त्यापेक्षा वेळीच मुलाला मार्गशीर्षात यात्रेला पाठवायचं))..... Rofl Rofl

ते झोटिंग काय प्रकरण आहे? झोटिंगशाही असाही शब्द ऐकलाय!

“निकलेंगे मैदान मे जिस दिन हम झूम के ..”) ----- फुटले याला अक्षरशः!
अजून एक सांगते ," कोई हमसे जीत न पावे चले चलो चले चलो मिटजावे जो टकरावे , चले चलो"
( मग सासऱ्यांकडे बोट दाखवून ) तुट गई जो उंगली उठी... 7 मिले तो बन गई मुठ्ठी !

पुढं त्यांनी तिच्या सातही मुलांना जिवंत केलं >>>>> मुलं काय ममीफाय केली होती?
बाकी सीतैना नेहमीप्रम_/\_

) तुट गई जो उंगली उठी... 7 मिले तो बन गई मुठ्ठी !>>>> हे भारीये.

झोटिंग म्हणजे बहुतेक मुस्लिम माणसाचे भूत असते
सुंदर स्त्री चे भूत हडळ
ओल्ड स्त्री चे जखिण
ब्राह्मणाचे ब्रह्मराक्षस
समुद्रावरच्या माणसाचे गिरा
मावळ्यांचे/योद्ध्यांचे भूत इर
मेलेला अनमॅरीड मुलगा मुंज्या
अशी काहीतरी कास्टीझम व्यवस्था आहे.

https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4

तुमच्या सगळ्या कथा वाचल्या. धमाल आहे.
आताच कशाला थांबता. संपूर्ण चातुर्मास कथा चालू दे की.

तशा नागकन्या, देवकन्या, आसरांच्या स्वार्‍यासुद्धां आल्या.
>>
हे आसर की आसरा याचा खूप ठिकाणी उल्लेख असतो. अर्थ काय? (आणि एकवचन काय?)

आसरा म्हणजे अप्सरा.यांचा जनरली विहिरीत वास(म्हणजे परफ्युम चा नाही, रेसिडन्स) असतो.
परदेशात सायरेन हे भूत यांचेच कझीन भूत मानायला हरकत नाही.

या सगळ्या स्टोरी मध्ये मेन कर्तधर्त सुनेचा नवरा बिलकुल आला नै ,त्याला काही पडलीच नाही वाटतं बायकोची ,
सासरा 7 मुलं बघून तांदूळ पाणी घेऊन आला त्याला पण स्टोरी ऐकायच्या आधीच सगळं समजलं बहुतेक

सी तै, समारोप नको बै, भारी वाटतात ह्या जुन्या कहाण्या नवीन रुपात ऐकायला

>>>>>>रेल्वेखाली जीव देणे हे ऑप्शन तेव्हा नसल्याने झोटिंगाचे जेवायचे टाईम टेबल देवळात नायतर चावडीवर लावलेले असायचे काय??
हाहाहा हे भारी आहे.
>>>>>>तेव्हां मामंजींना राग आला.
कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं Sad

सर्वच कथा आवडल्या. @सी तुमचे प्रतिसादही आवडतात. यु हॅव्ह व्हेरी गुड सेन्स ऑफ ह्युमर.
------------------------
पण पूर्वी बालमृत्युंचे प्रमाण फार होते. तसेच बाळंत पणातील स्त्रियांच्या मॄत्युचे देखील.

मस्तच झाली मालिका Lol
अनिश्काचा प्रतिसाद Lol
हे आसर की आसरा याचा खूप ठिकाणी उल्लेख असतो. अर्थ काय? >>> आसरा-अप्सरा म्हणजे जलदेवता. सहसा पाण्याजवळ वावरतात. म्हणून दुपारी बारा ते दोन पाण्याजवळ म्हणजे नदीकाठी, ओढ्याकडे, विहिरीवर जाऊ नये म्हणतात. खखोआजा.

अनिष्का Lol मी_अनु, अस्मिता मस्त माहिती. सगळ्यांनाच धन्यवाद!!
हो सामो, पूर्वी माता-बालक आरोग्याची इतकी आबाळ होती. आठ जन्माला घालावी तेव्हा दोन वाचायची, चाळीशीत नातवंड पाहिलं की बाई मरायला मोकळी, सहस्त्रचंद्रदर्शन एखादीचचं व्हायचं. आता फक्त एक-दोन मुले जन्माला घालणे नि त्यांच्या म्हतारपणापर्यंत जगणे म्हणजे आयुष्यातला किती वेळ मोकळा मिळाला. क्या किजिएगा इस समयराशी का? Wink Happy

@सी खरे आहे माणसाच्या आयुष्याचा दर्जा खूप खूप उंचावला आहे. विज्ञानाची घोडदौडच त्यास कारणीभूत आहे. आपण खूप 'प्रिव्हिलेज्ड' जनरेशन आहोत.
>>>>क्या किजिएगा इस समयराशी का? Wink Happy
Happy खरे आहे. पूर्वी ते पाणी शेंदणं, चूली पेटवणं, लाकडं तोडणं. बाप रे!! आता कसं सुटसुटीत आणि स्वच्छ.

क्या किजिएगा इस समयराशी का? >> आह म कन्सिडरिन्ग जॉ यनिन्ग द पुरन पोली क्लब. जस्ट टु सी हाउ द अदर साइड लिव्हज.

सी, एकदम हटके झाली ही सगळीच मालिका.. आजच्या काळात या कहाण्यांचा relevance राहीलेला नसला तरी यांचे स्वरूप छान आहे एक पार्श्वभूमी, मग माणसाच्या वागण्यातून घडणाऱ्या चुका, त्यांचे परीणाम, मग त्यावर उपाय/प्रायश्चित्त आणि शेवट सुखांत (म्हणजे सुखाचा अंत इति पु. लं.!)
गाभा तोच राखून नवीन काळाच्या नवीन कहाण्या हव्या आहेत याची जाणीव झाली तुझी मालिका वाचताना!
बाकी इस समयराशी को हमने बिल्कूल ही जाया कर दिया और बोले तो नेचर की वाट लगा दी Sad

खतरनाक मालिका...
पण ह्या असल्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे म्हणजे तुमची जेनेरेशन कळून येतेय Wink

धन्यवाद, पण ही असली विधाने करता म्हणजे तुमच्या कशात गॅप आहे ते ही कळून येतेय... Wink Happy

अमा, सौ सौ चूहे खाके बिल्ली क्लब को चली म्हणावे लागेल Wink जि, धन्यवाद!

म्हतारपणापर्यंत जगणे म्हणजे आयुष्यातला किती वेळ मोकळा मिळाला. क्या किजिएगा इस समयराशी का? Wink Happy>>> अगं अजून चार वसे घेतले असते, आणि कोणी कोणी छळ केला असता तो सोसला असता, क्रिकेट टिम पुरी केली असती. वेळेचा सद्उपयोगच केला असता. Wink

Lol भारीच झालीये मालीका.

भारीच झालीये मालीका. >> +1
सर्वच कथा आवडल्या. @सी तुमचे प्रतिसादही आवडतात. यु हॅव्ह व्हेरी गुड सेन्स ऑफ ह्युमर. >> येस्स, मला पण प्रतिसदातला हजरजबाबी पणा फार आवडतो.

भारीच झालीये मालीका. >> +1
सर्वच कथा आवडल्या. @सी तुमचे प्रतिसादही आवडतात. यु हॅव्ह व्हेरी गुड सेन्स ऑफ ह्युमर. >> येस्स, मला पण प्रतिसदातला हजरजबाबी पणा फार आवडतो. >>>>>>

अगदीच खरंय

अवांतर - आपण आपल्या पारंपरिक धार्मिक समजुतींना अशा कोपरखळ्या मारू शकतो हे पण भारीये ना !!! हे सगळे वाचून इथे कोणी तलवारी उपसून आले नाही हे तर अजूनच भारी. Wink

आपण आपल्या पारंपरिक धार्मिक समजुतींना अशा कोपरखळ्या मारू शकतो हे पण भारीये ना !!! हे सगळे वाचून इथे कोणी तलवारी उपसून आले नाही हे तर अजूनच भारी. >> अगदी अगदी.
कुणाच्या भावना दुखवायच्या अजिबातच नाहीत. शेवटी व्रत म्हणजे काय एकप्रकारची कर्मनिष्ठा असते, एकप्रकारचे सातत्य असते, परिस्थिती बदलेपर्यंत क्रियांवरचा संयम असतो. पारंपारिक व्रतात आजच्या जीवनातील प्राधान्यक्रमाशी फारसे काही निगडीत नसते आणि तपासूनही बघितलेली नसते म्हणून 'कशाला असलं करत बसता' असे विचार मनात येतात. पण at it's core एक कर्मनिष्ठा, सातत्य, नि संयम असते जी इतर लोकं आपल्या नोकरीत म्हणा, चॅरिटीत म्हणा, किंवा छंदात म्हणा दाखवतात. हे गुण जोपासण्यासाठी कुठलेही अ‍ॅप नसते. ते प्रयत्न करूनच अंगी बाणवावे लागतात.

मला व्रतातलं उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको वाक्य आवडतं.
कोणतेही नवीन काम अंगावर घेताना ते वाक्य कानात घुमत राहतं.

उतू जाणे माहीत आहे, पण 'उतणे' ह्या क्रियापदाचा अर्थ काय? तसाच 'मातणे' पण आहे, पण 'चांद मातला' गाण्यावरून अर्थाचा अंदाज येतो. हे शब्द आजकाल कुणी वापरत नाही. ह्या कहाण्यांमधले जुने शब्द ऐकायला मजा येते.

ते झोटिंग काय प्रकरण आहे? >> मलाही हा शब्द माहीत नव्हता. 'व्हॉट एज ही झोटिंग?' असं वाटायचं. अर्थ सांगितल्याबद्दल आभार, अनु.

बाकी, चतुर-मा-सींसह कहाण्या वाचायला मजा आली.

पण 'उतणे' ह्या क्रियापदाचा अर्थ काय>> बिब्बा उततो असे वाचले ऐकले आहे. म्हणजे बिब्बा सीड्स पूर्वी घासून शरीराला लावत असत. काहींना त्याची रिअ‍ॅक्षन येत असे त्याला उतणे म्हणत. लालसर चट्टे पडत. जे काय व्रत सांगितले आहे ते जसे च्या तसे पार पाडलेत तरच इच्छित फळ मिळे. थोडी सुद्धा उत मात झाली तर द गेम इज ओव्हर. हे म्हणायला जागा आहे. म्हणजे माझ्या मनात क्ष इच्छा आहे त्यासाठी हे व्रत करायचे पण त्यात थोडी पण चूक झाली तर इछा पूर्ण तर होणार नाही अजून काही विपरीत व्हायला पण जागा आहे. मनुषय मन कायम कशाला तरी घाबरलेले असते. त्याला असे खत पाणी मिळते.

१०८ प्रद क्षिणा घालणे त्यात दमून पायाचे तुकडे पडले. फुलांचा/ बेलाच्या पानाचा लक्ष वाहायचा हे व्रत तर लाख फुले कोण मोजून आणेल इतकी पाने ओरबाडावी लागतील तर त्या झाडाचे काय? एक पान कमी पड ले तरी गेम ओव्हर रिमेंबर!! अश्याने स्ट्रेस जिथे नाही तिथे तयार होतो. व गिल्ट पण निर्माण होते. व व्रति व्यक्ती कंट्रोल मध्ये राहते. मग लाखा ऐवजी दहाच वहा मी मंत्र म्हणतो वाला येतो. लाखा ऐवजी एक चांदीचे पान वहा म्ह टले की सोनार येतो. व्रत पूर्ण करता आले नाही तर प्रायस्चित्त घेता येते व सुटका करून घेता येते. कन्फेशन दिले की गिल्ट जाते म्हणतात. मग जो पाद्री कन्फे शन बॉक्स मध्ये बारक्या मुलाचे शोषण करतो तो कुठे कन्फेस करत असेल! त्याला गिल्ट येत असेल का?
इट इज ऑल अ कन्स्ट्रक्ट. मासेस ला घाबरवून ठेवायचे कंट्रोल मध्ये ठेवायचे. त्यासाठी भंपक नियम बनवायचे. मारून मुटकून ते पाळायला लावायचे हे सर्वत्र आहे.

Pages