माझ्या जन्म झाला तेव्हा माझी जन्मपत्रिका काढली गेली. ती जन्म झाल्यावर लगेच काढली की दोनचार वर्षांनी ते आता आईला विचारावे लागेल. ती कुठली पद्धत वापरून काढली, कोणी काढली याची मला कल्पना नाही. पण जेव्हा जेव्हा घर आवरताना ती आईला सापडली तेव्हा तेव्हा मी ती कौतुकाने जरूर वाचली. प्रत्येकवेळी हेच लक्षात आले की त्यात जे जे लिहिले होते तेच जवळपास माझ्या आयुष्यात घडलेय.
उदाहरणार्थ, भावंडांचे फार सुख नाही.
आणि हो, खरेच की! मी एकुलता एक आहे
पुढे प्रॉपर्टी वादात चुलत भाऊबहिणींच्या सुखालाही मुकलो ते कायमचेच
मला स्वतःला किमान दोन अपत्ये होतील असे पत्रिकेत लिहिलेले. आतापर्यंत दोन तरी झाली आहेत. कन्यारत्नाचे सुख लिहिलेले. पहिली मुलगीच झाली. दोन्ही मुलांत जास्त लाडकी तीच आहे हे विशेष.
सरकारी नोकरी आणि सरकारी गाडीतून फिरण्याचा योग आहे असे लिहिलेले. खरे तर त्या काळात हे साधारण असावे, पण माझे शिक्षण होईस्तोवर काळ बदलला होता आणि मी त्याला अनुसरून ईंजिनिअरींग केल्यावर खाजगी नोकरीच करणार होतो, किंबहुना करतही होतो. पण अपघातानेच म्हणा, त्या खाजगी कंपनीत कामाला असताना तिथे माझा एक खास मित्र झाला. जसे दोन खास मित्र टॉयलेटला सुद्धा एकत्र जातात तसे तो एमपीएससी परीक्षेचा फॉर्म भरायला जात असताना निव्वळ त्याला सोबत म्हणून मी गेलो होतो आणि हीच सोबत कायम ठेवायला म्हणून अचानक मी सुद्धा परीक्षा द्यायचे ठरवले. तिथेच फॉर्म घेतला आणि दोन दिवसांनी मी सुद्धा भरला. पण नंतर सिलॅबस बघून मात्र कॉलेज सुटल्यावर पुन्हा अभ्यास करायच्या कल्पनेनेच जाऊ दे म्हटले.
पुढे परीक्षेच्या वीसेक दिवस आधी आठवडाभर आजारी पडल्याने तीच सुट्टी दोनेक आठवडे वाढवून आयत्या वेळी पुस्तकांची जमवाजमव करून जे विषय माझे चांगले होते त्याचीच रिवीजन करत परीक्षेला बसलो आणि शॉर्टलिस्ट झालो. ईंटरव्यू सुद्धा चांगला गेला. मधल्या काळात पत्रिकेत लिहिलेले मित्राला सांगितले. तो बिचारा नव्हता शॉर्टलिस्ट झाला. पण तो रोज मला म्हणायचा, "तुझे सिलेक्शन तर होणारच रे, तुझ्या पत्रिकेतच लिहीले आहे" .... आणि अखेर तसेच झाले. गडचिरोलीला का होईना आठेक महिन्यांची सरकारी नोकरी झाली. सरकारी गाडीत फिरायचाही योग जुळून आला.
करीअरबाबत अजून एक लिहिले होते ते म्हणजे मुलगा हुशार निघेल. वृत्तपत्रात फोटो झळकेल. शालेय जीवनातच चौथी आणि सातवीत स्कॉलरशिप परीक्षांच्या निमित्ताने वृत्तपत्रात फोटो झळकत ते देखील सत्य ठरले. आमच्या बिल्डींगमध्ये वा आमच्या घराण्यात असे होणारा मी पहिलाच मुलगा असल्याने ही देखील नक्कीच छोटी गोष्ट नव्हती जे तुक्का लागला असे म्हणू शकतो. जसे की विमानप्रवासाचा योग आहे असेही पत्रिकेत लिहिले होते, पण ते मात्र आजच्या काळात फार साधारण झाले आहे.
सध्या जो मला Crohn's Disease नामक आजार झाला आहे जो बरा होत नाही, फक्त कंट्रोल करू शकतो. त्याचाही पत्रिकेत उल्लेख आजाराचे नाव न घेता आयुष्यभराचा सोबती म्हणून अगदी समर्पक केलाय. तसेच शरीराचा नाजूक भाग म्हणून पोटाचा त्रास कायम सतावणार असेही लिहीले आहे, ते देखील खरेच ठरले आहे. कारण आजवर विविध आजारात माझ्या पोटानेच बरेच काही सहन केले आहे. याऊपर अजूनही ऊतार वयात अमुकतमुक काहीबाही चूटूरपुटूर वा प्राणघातक होईल असे नमूद केले आहे, पण ते कुठल्या स्वरुपाचे आजार असतील यावर भाष्य न करता केवळ वयाच्या कोणकोणत्या वर्षी होणार ईतकेच दिले आहे. त्यातून बचावलात तर सत्तरेक वर्षांचे आयुष्य जगाल असेही लिहिले आहे. पुन्हा पत्रिका शोधून चेक करायला हवे. पण नकोच ते आता. उगाच ती वयवर्षे आता लक्षात राहतील, आणि त्या काळात त्या भितीत जगणे होईल.
अरे हो, महत्वाचे तर राहिले. पत्रिकेत प्रेमविवाहही लिहिलेला. लहानपणी हे वाचून फार गुदगुल्या व्हायच्या. पण नंतर कॉलेज उरकल्यावर असे वाटले की प्रेमप्रकरणांच्या ऐवजी प्रेमविवाह असे चुकून छापले गेलेले की काय...
पण अखेरीस प्रेमविवाहच झाला. तो देखील बदलत्या काळाला अनुसरून ऑर्कुटच्या माध्यमातून झाला. विशेष म्हणजे जेव्हा आम्ही नवरा-बायको दोघेही अरेंज मॅरेजच्या तयारीला लागलेलो त्या वयात झाला. जेव्हा आमची ओळख झाली तेव्हा बायकोची काही स्थळेही बघून झालेली, त्या स्टेजला येऊन झाला. जणू काही जोड्या आकाशातूनच ठरवून येतात आणि त्या एकमेकांच्या जन्मपत्रिकेत लिहिल्या जातात
पण जन्मपत्रिकेत लिहिलेली जोडी लग्नपत्रिकेत पोहोचायचा प्रवास सोपा नव्हता. आणि हे देखील माझ्या जन्मपत्रिकेतच लिहिले होते. प्रेमविवाहात अडचणी येतील असे स्पष्ट शब्दात लिहिले होते. आता आपल्याकडे प्रेमविवाह कधीच सुखासुखी होत नाहीत. पण तरीही पत्रिकेत मुद्दाम नमूद केलेले त्याचा मान राखत जरा जास्तच अडचणी आल्या. सोशलसाईटवरची ओळख आणि आंतरजातीय विवाह असल्याने घरच्यांच्या विरोधात जात रजिस्टर विवाह करावा लागला. पण त्यानंतरही घरचे तयार झाल्यावर दोघांची पत्रिका जुळवताच त्यात मृत्युयोग आला
याऊपर माझ्या जन्मपत्रिकेत स्वभावावरही भाष्य केले होते. आता त्यात स्वभावातील चांगले गुण सोडून देऊया. कारण ते कुठल्याही नाक्यावरच्या ज्योतिषाने सांगितले तरी आपल्याला पटतातच. जसे की भाऊ तुम्ही फार स्वाभिमानी आहात बघा, कोणाचे दोन पैश्यांचे फुकटचे खाणार असा तुमचा स्वभाव नाही भाऊ.. तर आता कुठला भाऊ हे नाकारणार बोला
पण पत्रिकेत लिहिलेले स्वभावातील दुर्गुणही पटण्यासारखे होते. जसे की शीघ्रकोपी. चटकन राग येणे आणि चटकन निवळणे. स्वभावातील हा दोष मी मान्यही करतो आणि नेहमी यावर कसा कंट्रोल राहील या प्रयत्नातही असतो. याऊपर अजून एक म्हणजे आरामाची आवड. हे बहुधा तुपात घोळवून लिहिले असावे. स्पष्ट भाषेत आळशी म्हणायचे टाळले असावे. पण काहीही लिहिले तरी आहे ते खरेच. माझे घरचे नावही "साळशीचा आळशी" असे आहे (साळशी आमचे मूळ गाव). तसेच शाळाकॉलेजच्या जमान्यापासून आजही मी ज्या ज्या ठिकाणी काम केले तिथे ऑफिसमधील सर्वात आरामप्रिय व्यक्ती म्हणून मीच ओळखला जातो.
शेवटचे मी पत्रिका पाहिलेली वा वाचलेली त्याला आता पाचसहा वर्षे झाली असावीत. घर बदलल्यापासून मी ईथे नवी मुंबईला आलो तर पत्रिका जुन्या मुंबईतच राहिली. अन्यथा नेमके शब्द, नेमकी वाक्ये लेखात टाकता आली असती. पण आज अचानक हे लिहावेसे वाटले कारण एका व्हॉटसपग्रूपवरच्या चर्चेत विषय निघाला तेव्हा माझ्या पत्रिकेतील हे मुद्दे तिथे लिहिणे झाले. त्यांनाच एकत्र करत मग हा लेख लिहिला.
गंमतीचा भाग म्हणजे हे असे असूनही माझा आजही पत्रिका वा भविष्य अश्या कुठल्याही प्रकारावर विश्वास नाही. मी देवधर्म काही मानत नाही. कुठला सणवार पाळत नाही. चालीरीती, कुळाचार, प्रथा-परंपरा वगैरे काही काही नाही.
पण तरीही माझ्या पत्रिकेत जे लिहिलेय ते बहुतांश माझ्या आयुष्यात घडलेय आणि म्हणूनच स्वत:ची पत्रिका वाचणे मला नेहमीच रोचक वाटत आलेय हे प्रामाणिकपणे कबूल करण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही.
कुठलीही श्रद्धा अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही. पण जे माझ्याबाबत आहे ते असे आहे. अब तुम लोग मानो, या ना मानो
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
>>>>बाकी माबोवर धागे काढणे
>>>>बाकी माबोवर धागे काढणे माझा छंद आहे.
हे बाकी खरे आहे. आणि मग त्या दृष्टीकोनातून हा छंद रिझनेबल आहे. त्यावर अन्य कोणाला टीका करायचा हक्क नाही कारण छंद किंवा पॅशन ही माणसाची गरज असते.
त्यावर अन्य कोणाला टीका
त्यावर अन्य कोणाला टीका करायचा हक्क नाही कारण छंद किंवा पॅशन ही माणसाची गरज असते.
>> आता समजा कोणाला घरांवर दगडे मारण्याचा छंद असेल, तरी काही बोलायचे नाही का..
स्वतःच्या घरावर मारलीत तर
स्वतःच्या घरावर मारलीत तर हरकत नाही.
किंवा असे एखादे ठिकाण जे दगडं मारण्यासाठीच बनवले आहे, सगळेच मारतात, तिथे एखाद्याने छंद म्हणुन जास्त दगड मारले तर आपण हरकत घेऊन काय उपयोग?
स्वतःच्या घरावर मारलीत तर
स्वतःच्या घरावर मारलीत तर हरकत नाही. >>> तुम्ही दगडाचे घेऊन बसला आहात, ईथे लोकांना स्वतःच्या घरी पुरणपोळ्या करायच्या छंदावरही हरकत असते
जोक्स द अपार्ट,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण मी टिका करणार्यांवर वा हरकत घेणार्यांवर कधीच आक्षेप घेतला नाही.
जसे धागे काढणे हा माझा छंद आहे तसे एखाद्याने काढलेल्या धाग्यांवर टिका करणे हा त्यांचा छंद असेल.
मी माझा छंद जोपासतो तेव्हाच त्यांचा छंद जोपासला जात असेल तर आईरॉनॉटीकली आम्ही एकाच होडीत आहोत
किंवा असे एखादे ठिकाण जे दगडं
किंवा असे एखादे ठिकाण जे दगडं मारण्यासाठीच बनवले आहे, सगळेच मारतात, तिथे एखाद्याने छंद म्हणुन जास्त दगड मारले तर आपण हरकत घेऊन काय उपयोग?
>> मायबोलीचा असा उल्लेख?? अरेरे
लोकांना स्वतःच्या घरी
लोकांना स्वतःच्या घरी पुरणपोळ्या करायच्या छंदावरही हरकत असते >>
उद्या म्हणशील अण्वस्त्रे तयार करणे नॉर्थ कोरियनांचा "छंद" आहे....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हे असलं बोलण्याआधी केवळ माणूसकी म्हणून जरा "कृपया कुर्सी की पेटी बांध लिजिए" वगैरे अशी काही वॉर्निंग द्यावी.
आईरॉनॉटीकली >>> व्याख्या
आईरॉनॉटीकली >>> व्याख्या विक्खी वुक्खु. चंद्र रास कुठली आणि सूर्य रास कुठली आहे? कोणत्या घरात कोण ग्रह आहे ते ही विस्तृत मोड मध्ये लिहा. जे पत्रिकांचा अभ्यास करतात ते सांगतील. सा डेसाती येउन गेली का यायची आहे? तेव्हा मात्र काळ जी घ्या.
(No subject)
माझ्या ओळखीमधे एकाच्या
माझ्या ओळखीमधे एकाच्या पत्रिकेत राजयोग आहे. त्याला नोकरी नाही. वयाची चाळीशी उलटून गेली तरी. घरी राज (राज्य) करणे हा तो योग असावा बहुधा.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
माझ्या नवर्याच्या पत्रिकेत संसार सुखाचा होणार असं लिहिलंय पण एका "गुरूजींनी" 'संसारसुख लाभणार नाही, सतत दोघांची तोंडं दुशीकडे(opposite you know) असतील' असं सांगितलंय. खखोदेजा. असो.
राजयोग असेल तर नोकरी कशाला
राजयोग असेल तर नोकरी कशाला करेल... नोकरीला ठेवेल इतरांना... चाळीस म्हणजे फार नाही... वेरा वांग ने चाळिशीनंतर सुरुवात केली..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रे क्रोक ने पन्नाशीत mc D सुरू केला, केफसी वाल्याने साठीत kfc सुरू केला. आणखी एक उदाहरण म्हणजे जुडी dench साठी नंतर फेमस झाली.. ओळख सोडू नका त्या व्यक्तीशी.. काय माहीत उद्याचा हिरो तो असेल
रे क्रोक ने पन्नाशीत mc D
रे क्रोक ने पन्नाशीत mc D सुरू केला, केफसी वाल्याने साठीत kfc सुरू केला. आणखी एक उदाहरण म्हणजे जुडी dench साठी नंतर फेमस झाली.. ओळख सोडू नका त्या व्यक्तीशी.. >> मी पण चिकन ६५ व बिर्याणीची गाडी टाकणारे साठीत. धीर सोडायचा नाही. पत्रिकेत काही का असेना.
राजयोगाची वाट बघत बसणे हा एक
राजयोगाची वाट बघत बसणे हा एक वेगळा प्रकार असू शकतो.
राजयोग म्हणजे नक्की काय बादवे
राजयोग म्हणजे नक्की काय बादवे...
> मायबोलीचा असा उल्लेख??
> मायबोलीचा असा उल्लेख?? अरेरे >> घरावर दगड मारण्याच्या तुलनेत बरा आहे ना पण![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Submitted by मी चिन्मयी on 3
Submitted by मी चिन्मयी on 3 September, 2021 - 06:39 >>> याचं उत्तर असं असतं, "जन्मवेळ किंवा काहीतरी नोंद करण्यात चूक झालीय, किंवा तुमच्या गुरुजींना नीट येत नाही." त्यामुळे ही उदाहरणे देऊन काही उपयोग होत नाही.
बहुतेक कुंडली बनवणारे, माझं चूक निघालं तर मी पत्रिका बनवणं, भविष्य सांगणं सोडून देईन असं म्हणतात.
काही मोजकी पत्रिके प्रमाणे घडलं अशी उदाहरणे असतात आणि बरीच तसं काही घडत नाही घडलं नाही याची.
त्यात इंजिनिअर होणार, डॉक्टर होणार, सरकारी नोकरी/गाडी , वगैरे अलीकडचे (शतक दीड शतकातले) इंटरप्रिटेशन्स आहेत, पूर्वी लोक घरचाच वारसा पुढे चालवत.
म्हणजे जोतिष्यशास्त्र काळानुसार फाईन ट्यून होत आहे म्हणावे लागेल.
चंद्र रास कुठली आणि सूर्य रास
चंद्र रास कुठली आणि सूर्य रास कुठली आहे? कोणत्या घरात कोण ग्रह आहे ते ही विस्तृत मोड मध्ये लिहा
>>>>
अमा पत्रिका सध्या मुंबईला आहे. ती सुद्धा कुठल्या घरात ते कल्पना नाही. हाती लागताच डिटेल देता येतील.
* असे जन्मपत्रिकेचे डिटेल सोशलसाईटवर देण्यात काही धोका तर नाही ना? - जाणकारांनी प्लीज मार्गदर्शन करा
बाकी रास म्हणाल तर चंद्ररास सुर्यरास मला कळत नाही. कर्क रास आहे असे आई म्हणते. आणि त्यानुसार जो स्वभाव सांगितला आहे तो माझ्याशी मॅच होतो. त्यामुळे लहानपणी पेपरात भविष्य आले की मी कर्क राशीचेच बघायचो.
ईतकेच नाही तर त्यात जे आठवड्यातले शुभ दिवस दिले असायचे त्या दिवशी भारताची क्रिकेट मॅच आहे का बघायचो आणि त्यावरून भारत हरणार की जिंकणार हे ठरवायचो. कारण तेव्हा भारत हरला की माझा मूड ऑफ व्हायचा आणि जिंकला तर मूड चांगला होऊन दिवस शुभ जायचा.
* असे जन्मपत्रिकेचे डिटेल
* असे जन्मपत्रिकेचे डिटेल सोशलसाईटवर देण्यात काही धोका तर नाही ना? >>>>
"जारण-मारणासाठी त्या व्यक्तीच्या नक्षत्र-नक्षत्रपदाची आवश्यकता असते तसले प्रयोग करताना. तसेच सदर व्यक्तीची खराब दशा पाहून प्रयोग केल्यास तो जास्त मारक ठरण्याची शक्यता असते. अजून बरेच काही असते"- हा संवाद एकदा मी अंनिसच्या कार्यक्रमाला टमटममध्ये बसून जात असताना सहप्रवाश्यांकडून ऐकला होता. बाकी बघा तुम्ही तुमचे काय खखो .
जिद्दु
जिद्दु![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>>>>>>>>> जारण-मारणासाठी
>>>>>>>>>>> जारण-मारणासाठी त्या व्यक्तीच्या नक्षत्र-नक्षत्रपदाची आवश्यकता असते तसले प्रयोग करताना. तसेच सदर व्यक्तीची खराब दशा पाहून प्रयोग केल्यास तो जास्त मारक ठरण्याची शक्यता असते. अजून बरेच काही असते
ह्म्म्म!!!
--------------------------------------------------------------
या पोस्टशी संबंधित असेलही किंवा नसेलही - मला दत्तभक्तीचे बाळकडु लहानपणी मिळाले असते तर ..... असा विचार मनात येतो.
अर्थात मी अध्यात्माकडे कल असलेली होते आणि मला १००% फायदा झाला असता. आई रामरक्षा म्हणे त्यामुळे ती पाठ होती पण रामरक्षेचा फायदा असा झाला नाही मला. का ते माहीत नाही.
बरं झालं गेलं गंगेला मिळालं पण मुलगीही अध्यात्मिक नाही. हा मुद्दा मला डाचतो. ईश्वरी कृपा ही अंधश्रद्धेची बाब नसते. मी तिच्याकरता प्रार्थना म्हणते पण मी कुठवर पुरणार! एक जरी मंत्र तिने मुखोद्गत केला तरी बास. हां-
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा|
पाठ आहे तिला.
जारण-मारणासाठी त्या
जारण-मारणासाठी त्या व्यक्तीच्या नक्षत्र-नक्षत्रपदाची आवश्यकता असते
>>>
हो, याच दृष्टीकोनातून विचारलेले ते.
आमच्या कोकणात असे बरेच प्रकार ऐकून माहीत आहे. म्हणून आई मला काही लोकांपासून दूर ठेवते.
हा पण ते इतके सोपे असते तर
गावभर माहित झाले तरी तुम्ही निवांत रहा. ते इतके सोपे असते तर लोकं गल्लोगल्ली जारणमारण खेळत बसले असते![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो, सोपे तर नक्कीच नसणार
हो, सोपे तर नक्कीच नसणार
प्राचीन विद्या आहे. कुठे शाळा कॉलेजात तर शिकवली जात नसणार. ज्यांना हे जमतेय अशी लोकं आता कमीच असतील. पण मायबोलीचा वाचक सर्वदूर पसरला आहे. त्यात सध्याच्या व्हॉटसपयुगात माहीती वेगाने पसरते. आपण ईथे काही डिटेल्स टाकायचो ते चुकीच्या हातात जायला वेळ लागणार नाही.
अहो लोक वही पेन घेऊन तयारच
अहो लोक वही पेन घेऊन तयारच बसलेत. कधी तुमचे ग्रहतारे डिटेल्स तुम्ही टाकताय आणि ते लिहून घेतायत. करणी करायला लगेच निघणार ते बरं. सांभाळूऩ.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आमच्या इथे एक नंदीबैलवाला आला
आमच्या इथे एक नंदीबैलवाला आला होता. माणसं बघून त्यांचा भूतकाळ अचूक सांगत होता.
चिन्मयी,
चिन्मयी,
वुई नेव्हर क्नो.. कोणी माझ्या धाग्यांनी त्रस्त असलेला आयडी करणी करून माझ्या बोटांतील शक्ती काढून घेईल, मला लुळेपांगळे करेल, सांगता येत नाही.
आमच्या इथे एक नंदीबैलवाला आला
आमच्या इथे एक नंदीबैलवाला आला होता. माणसं बघून त्यांचा भूतकाळ अचूक सांगत होता.
>>>
आमच्याईथेही आलेला. काही लोकं म्हणत होते की हा माहिती काढून आला आहे. आधी त्याने मैदानात शो करून सर्वांना इम्प्रेस केले. मग तो लोकांच्या घराघरात जाऊन त्यांना भविष्य, अडचणी, उपाय सांगून पैसे उकळू लागला. आमच्या घरच्यांनीही त्याला घरी बोलावलेले. आम्हाला त्याने सांगितले की विधवेची नजर लागली आहे. आमच्या शेजारची बाई विधवा होती हि माहिती बहुधा त्याने काढलेली.
आमच्या इथे एक नंदीबैलवाला आला
आमच्या इथे एक नंदीबैलवाला आला होता. माणसं बघून त्यांचा भूतकाळ अचूक सांगत होता. >>>
असं कसं??????!!! नंदीबैल भविष्य सांगतो - पाऊस पडेल का? इ इ. नंदीबैलाने भूतकाळ सांगितला तर आया बेरोजगार होतील... "तू दुसरीत होतास ना, तेव्हा..." इ इ....
आम्हाला त्याने सांगितले की
आम्हाला त्याने सांगितले की विधवेची नजर लागली आहे. आमच्या शेजारची बाई विधवा होती हि माहिती बहुधा त्याने काढलेली.>> माफ करा, पण गंमतीत का असेना पण सोशल मीडियावर अशी विधाने करण्यात काय पॉईन्ट आहे.
माफ करा, पण गंमतीत का असेना .
माफ करा, पण गंमतीत का असेना ....
>>>>>
माफ करा पण तुम्हाला यात काय गंमत आढळली?
जे घडलेय ते सांगत आहे. पॉईंट असा आहे की लोकांना सावध करणे की हे लोकं कशी खबर काढून ऑपरेट करतात.
तुम्हाला यात काय गंमत आढळली?>
तुम्हाला यात काय गंमत आढळली?>>मला काहीही गंमत आढळली नाही. पण तुम्ही जे उदाहरण दिले ते अप्रस्तुत वाटले इतकेच. तुम्हाला उदाहरण देतांना काही चुकले असे वाटत नसेल तर प्रश्नच मिटला.
Pages