रोजच्या वापरासाठी हेअर ड्रायर चांगला की वाईट?

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 August, 2021 - 19:15

थोडी माहिती हवी आहे.
त्याआधी थोडी माहिती देतो जी समदुखींना उपयोगी ठरू शकते.

मला लहानपणापासूनच केस वाढवायची फार आवड होती. पण तेव्हा शाळा कॉलेजचे नियम आणि घरची बंधने यामुळे फार वाढवता यायचे नाहीत. पुढे ऑफिसला निर्णयस्वातंत्र्य आले तरी कॉर्पोरेटच्या सोफेस्टीकेटेड वातावरणात एचआर लोकांचा फॅशनवर डोळा असायचा. त्यामुळे आवड मनातच राहिली. असेच एक दिवस आपले वय होत टक्कल पडणार आणि लांब केसांची ईच्छा अपुरीच राहणार असे वाटत होते. पण मग एक दिवस कोरोना आला आणि लॉकडाऊन लागला...

वर्क फ्रॉम होम आले. सलून बंद झाले. घरबसल्या केसांचे छप्पर रपारप वाढू लागले. आधी चापून चोपून तेल, मग हेअरबॅंड, मग वेणी, बघता बघता केसांची केस हाताबाहेर गेली.
मोठे केस आवडत तर होते पण सोबत काही प्रॉब्लेमही घेऊन आले. ईतर प्रॉब्लेम तर मी निपटले पण माझा सर्दीचा त्रास मात्र बळावला.

याआधीही जेव्हा मी आंघोळ करून बाहेर यायचो तेव्हा केस कितीही चांगले पुसले तरी जरा वारा लागताच सटासट शिंका यायच्या. कधी चार शिंकांवर निभावले जायचे तर कधी ती सर्दी दिवसभर साथ सोडायची नाही. माझ्याबरोबर कुठेही आंघोळ करून घराबाहेर पडायचे झाल्यास बायकोची पहिली अट हिच असायची की तुझी सर्दी सोबत राहिली तर जाणे कॅन्सल!

मग ती होऊ नये म्हणून आंघोळ केल्यावर केस खचाखचा पुसून मग आतून बाहेरून छान सुकेपर्यंत एका खोलीतला पंखा आणि खिडक्या बंद करून तिथेच बसून राहणे. कारण चुकून उठलो आणि दुसरया खोलीत गेलो तर वाऱ्याची एक झुळूकही सटासट शिंका यायला पुरेशी ठरायची Sad

आता यात केस जितके जास्त तितका हा प्रॉब्लेम मोठा. कारण केस खूप वेळ पुसावे लागतात आणि तरीही लवकर सुकत नाहीत. आतवर ओल राहतेच.
तसेच कधी साबण लाऊन तोंड धुतले तरी त्यात पुढचे निम्मे केस ओले होतात आणि ते ही शिंका येण्यास पुरेसे ठरतात.

पण गेल्या महिन्यात लोणावळ्याला गेलेलो तेव्हा यावर एक सोल्यूशन सापडले. तिथल्या हॉटेलच्या रूमवर बाथरूममध्ये हेअर ड्रायर होते. तोंड धुतल्यावर मी सहज ते वापरले आणि बघता बघता केस सुके सडसडीत! तीन दिवस तिथे होतो, त्यात पाच आंघोळी झाल्या, दहा वेळा तोंड धुणे झाले, दरवेळी न चुकता हेअर ड्रायर वापरला आणि ईतके पाण्यात पावसात भिजून डुंबूनही तीन दिवसात एक शिंक आली असेल तर शप्पथ!

नक्कीच हि कमाल लोणावळ्याच्या वातावरणाची नसून हेअर ड्रायरची होती.
त्यामुळे सध्या डोक्यात विचार घोळत आहे की का नाही एखादा हेअर ड्रायर घरातच बाळगावा.

पण चर्चा आणि चौकशी करता काही जणांनी असे सांगितले की हेअर ड्रायर कधीतरीच वापरावा. रोजच्या वापरासाठी तो नसतो. अन्यथा केस खराब होतात.
आता हे खराब होणे म्हणजे केस गळणे असेल तर बिलकुल नकोय तो हेअर ड्रायर.
रुक्ष होत असतील पण तेल शॅम्पू लाऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर विचार करता येईल.

पण हि अफवा असेल तर ऊत्तमच.

मग त्या केसमध्ये केसांसाठी घरगुती वापरासाठी कुठला हेअर ड्रायर घ्यावा?
बजेट असे काही ठरवले नाही. जास्त वापर होणार असेल, शिंकांचा त्रास सुटणार असेल, तर चार पैसे जास्त मोजायलाही हरकत नाही.

कोणी या वा ईतर कारणासाठी रोज वा वरचेवर हेअर ड्रायर वापरत असाल तर प्लीज अनुभव शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, तुमच्या लिंकमध्ये खालील मशीन फक्त १५९ रुपयात आहे. कसे शक्य आहे? साबणाचे बुडबुडे काढायची मशीन यापेक्षा महाग असेल..>> तां
माका काय म्हाइत? जेफ ला विचार >>>>>>>>>

https://www.amazon.in/gp/product/B089R7M3FS/ref=ppx_yo_dt_b_asin_title_o...

आजच डीलीवर झाला....फक्त ₹149.00/-
पण केसांसाठी नाही घेतला.
airbrush कलर सुकवायला, Epoxy bubbles फोडायला घेतलाय Happy Wink
फक्त गरम हवा आहे. २ settings मध्ये

काही लोकं हॉटेलातला ड्रायर अंतर्वस्त्र सुकवायला वापरतात Happy . हेवी ड्युटी घेवुन बघा अशाच पुढच्या पावसाळी ट्रिपात कामाला येईल.

नॅशनल ट्रेझर सिनेमात डिक्लेरेशन ओफ इंडिपेंडन्स च्या मागे लपलेले मेसेज वाचायला वरून लिंबाचे पाणी फिरवून मग हेअर ड्रायरने वॉर्म करतात तेव्हा ती अक्षरे उमटतात. एकदा ड्रायर आले घरी की त्याचे उपयोग सापडतील.

नॅशनल ट्रेझर सिनेमात डिक्लेरेशन ओफ इंडिपेंडन्स च्या मागे लपलेले मेसेज वाचायला वरून लिंबाचे पाणी फिरवून मग हेअर ड्रायरने वॉर्म करतात तेव्हा ती अक्षरे उमटतात. एकदा ड्रायर आले घरी की त्याचे उपयोग सापडतील.

खरंय अमा
वाऱ्यावर केस उडवत सेल्फीही छान येतील.
दोन तीन हजार तर यासाठी खर्च करायला हरकत नाही.

भारी आहे धागा. आणि प्रतिसाद देखील.

मी Ikonic Luxure ड्रायर वापरते Nykaa चा. मला तरी काही साइड इफेक्ट्स नाही जाणवले. अर्थात ते प्रत्येकाच्या हेअर स्ट्रक्चरवर अवलंबून असणार.
किंमतही जास्त नाही. काहीतरी दोन-अडीच हजार आहे.

ऋनमेश
पुरुषांना हेअर ड्रायर विषयी प्रश्न पडतात.लांब केस पुरुष ठेवत नाहीत.

@ ऋन्मेश-
मी ड्रायरचा वापर तसा विकली करते. केस धुतल्यावर करतेच कारण माझे केस ब-यापैकी जाड आहेत. असेच आपणहून ते लवकर ड्राय होत नाहीत.
आणि अती गरम वगैरे नसतो. त्याची हवा थोडी उबदार म्हणता येईल. पण पाच एक मिनिटात केस वाळतात.

सिद्धी माहितीबद्दल धन्यवाद
घेईन या आठवड्यात..

@ हेमंत,
लांब केस पुरुष ठेवत नाहीत.
>>>
स्त्रियांची हिच मक्तेदारी तोडायची आहे !

>>>>हेअर ड्रायर कोल्ड वर वापरा, काही परिणाम होत नाही. माझी आजी गेली 45 वर्षे वापरते आहे हेयर ड्रायर आणि केस अजूनही छान आहेत.
"चारमीनार" ब्रँड आहे का?
(*भारतातील सर्वाधिक विक्री असलेले अ‍ॅस्बेस्टॉस सिमेंट उत्पादन च्या चालीवर)

लांब केस पुरुष ठेवत नाहीत.
>>> अहो आजकाल लांब केस नॉर्मल आहेत. मुलीचे क्रिएटिव क्षेत्रातले कलीग नेहमीच पोनीटेल बांधता येइल असे केस वाढवतात. त्यात खळ्या वगैरे फारच गोड दिसते. कुरळे केस असतात त्याची तर छानच पोनी येते. आज काल रणवीर ब्रार पण भरपूर तेल लावून छोटीशी पोनी घालतो. तो सरदार असल्याने ते धार्मिक असावे. मी तिथे व्हिडीओ खाली पण प्रतिसाद दिला होता की शांपू व कट कन्सिडर करा प्लीज म्हणून.

लॉकडाउन पासून पुरु शांच्य केसांचे अनेक प्रकार झाले आहेत. काहींनी एकदमच डोके व दाढी वाढवली की ओळखता येत नाहीत. काहींनी एकदमच चकोट केला होता. काल एक माझ्याच वयाचे आहेत ते भेटले तर दाढी तशीच भरगच्च वाढ लेली. पांढरे केस . व डोके एकदम सफाचट. मी त्यांना म्हटले सुद्धा अहो अर्ध्यात वस्तरा हरवला कि कॉय!! पुणेरी आगाउ पणा दुसरे काय.

बाकी डोक्यावर मशरूम कट टाइप टोपली व दोन्ही बाजूने पार साफ असा कट वाली तरुणाई. विराट कोहली वाली दाढी वाढवलेले बालके बरीच आहेत. उत्तर भारतीय केस गोटा व बारकी शेंडी ठेवलेले पण दिसतात. ( आटोवाले पण) सच इज मुंबई लाइफ.

चांगली शांपू करून सेट करणे फार अवघड नाही. बीअर शांपू म्हणून एक येते ती छान आहे. परवा मी माझी नेहमीची औषधे घेत होते तर एक बालक येउन फेस क्रीम व हेअर जेल घेउन गेले त्यातल्या त्यात बारके पॅकिन्ग पण गुड क्वालिटीचे घेउन गेले. डेट वगैरे असावी असे मी मनाशी खुदक न हसत म्हटले. मज्जानु लाइफ.

स्त्रियांची हिच मक्तेदारी तोडायची आहे ! >>
अंमळ उशीरच झाला तुला. सरदारजींनी काही शतकांपूर्वीच हे केले. दुसरं काही शोध.

सरदारजींनी काही शतकांपूर्वीच हे केले.>> बरोबर आहे. मी एकदा बँकेत गेले होते जुन्या काळात नवरा नोकरी करत असे व मी घरी असे तेव्हाची कथा. तर वाट बघताना तिथे एक गुट गुटीत लांब कुरळ्या केसांची मुलगी शर्ट चड्डी घालुन पळत होती. मी नेहमी प्रमाणे क्या नाम है बच्चीका विचारले तर ती बाई शांत पणे म्हणाली वो लडका है. व काही एक सरदार नाव सांगितले. गब्बसले झालं . तेव्हा पासून कानाला खडा!! केसांवरून जेंडर डिस्क्रिमीनेशन नाही करायचे.

अवांतर रॉक ऑन सिनेमात क्लायमॅक्क्ष मध्ये अर्जुन रामपाल चाललेल्या गाण्यात मागून चालत येतो गिटार घेउन तेव्हा केस लांब सोडलेले आहेत. व प्रोफाइल अगदी जीझस सारखी दिसते. ( माबुदो)

नेटफ्लिक्स वर एक जीझस कोड म्हणून सीरीअल आहे. त्यातला जीझस पण लांब सुरेख लाटा लाटांच्या केसांचा आहे.
पण अल्टिमेट ग्रूमिन्ग व गुड लुक्स गुड लुक्स म्हणजे एलायजा ओरिजिनल व्हँपायर व्हँपायर डायरीज सीरीअल मध्ये आहे. सर्च करा.

हे प्रतिसाद जोडुन पॉप्युलर कल्चर मधील केसांचे स्थान असे ललित पाडता येइल. बघा बाई स्पर्धेचा वि ष य सुचवला आहे. Wink

सरदारजींनी काही शतकांपूर्वीच हे केले.
>>>>>
क्रिएटिव क्षेत्रातले कलीग नेहमीच पोनीटेल बांधता येइल असे केस वाढवतात
>>>>>>>>>

काही लोकं धार्मिक कारणामुळे करतात, तर काही क्रिएटीव्ह आणि फॅशन बिजनेस क्षेत्रातील मंडळी स्टाईल आणि हटके लूक म्हणून करतात.
पण रूटीन आयुष्य जगणारया मध्यमवर्गीय पुरुषांनी देखील सर्रास लांब केस बाळगावेत हे माझे ध्येय आहे.

अमा, तुम्ही 'लडका' ऐकल्यावर गब्बस्लात, पण पुढे त्या लडक्याचं नाव नीट ऐकलं असतंत तर मनजीत, कंवलजीत, गुरप्रित, अशी उभयलिंगी नावं ऐकून पुन्हा गब्बसावं लागलं असतं.

हेअर ड्रायरचा अनुभव नाही पण पुरुषांनी केस वाढवण्याचा विषय चाललाच आहे तर राहवत नाही म्हणून एक गंमत सांगते.
आमच्या समोर एक शीख कुटुंब रहात होतं. एकदा रविवारी दुपारी बाराच्या सुमारास मी त्यांच्याकडे गेले. काही तरी जुजबी काम होतं त्यामुळे दारातूनच बोलून निघणार होते पण तिने आग्रहाने आत बोलावलं म्हणून हॉलमध्ये सोफ्यावर बसले. त्यांचं किचन ओपन आहे. किचनमध्ये मला लांब केस सोडलेली (म्हणजे अगदी कमरेच्याही खूप खालपर्यंत लांब केस) व्यक्ती गॅसवर काही तरी ढवळताना वगैरे दिसली. पाठमोरी असल्याने चेहरा दिसला नाही. बोलता बोलता दोन तीन वेळा तिकडे नजर गेली आणि माझ्या अगदी तोंडावर शब्द येणार होते की तुझी कुणी मैत्रीण वगैरे आलीय का? तितक्यात झमकन डोक्यात प्रकाश पडला की हा तर हिचा नवरा आहे!!! मी घरी परत आले आणि मनातल्या मनात म्हटलं बरं झालं लवकर लक्षात आलं ते..नाही तर उगाच सावरून घेताना पंचाईत झाली असती. Lol बरं बर्म्युडा वगैरे मुलीही घालतात .. त्यामुळे त्यावरूनही अंदाज नव्हता आला.

स्त्रिया काही वर्षांपूर्वी ह्या मता पर्यंत आल्या होत्या की केस कमी केले ,बॉय कट केला की समानता आलीच म्हणून समजा .आता काही पुरुष ह्या मता पर्यंत पोचले आहेत की आपण लांब केस ठेवले की समानता येईल.
भारीच आहे.
पण खरी गोष्ट ही आहे लांब केस असतील तसे त्यांची निघा राखण्यास वेळ आणि पैसे जास्त खर्च होतो.आणि बारीक केस असतील तसे वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात.

काल माझा बड्डे होता. बायकोने गिफ्टसमध्ये हेअरड्रायर सुद्धा दिला. हे तिचे नेहमीचे आहे. जे माझ्या डोक्यात घोळत असते त्या गोष्टींची लिस्ट बनवून गिफ्ट करते.
असो, फिलिप्सचा आहे. किंमत काही ती सांगणार नाही. तरी फोटो आणि फिचर्स नंतर टाकतो. रात्री घाईगडबडीत मलाच तो बघता आला नाही. नॉर्मल गरम हवेच्या तीन लेव्हल आहेत. त्या तेवढ्या वापरून बघितल्या. वापर तर छान दिसतोय. सगळ्यात पहिलीच लेव्हल वापरली जाईल असे वाटतेय. जेणे करून केसांचे काही प्रॉब्लेम होऊ नये.

हैप्पी बड्डे अभिषेक Happy
ओल्या न राहणाऱ्या केसांच्या शुभेच्छा
बायका असतातच हुशार Happy

बायको माबोवर नाही, मी तिला मागेच लोणावळ्याहून आल्यावर माझी ईच्च्छा बोलून दाखवलेली. ती तिने लक्षात ठेऊन मला चार दिवसांपूर्वी सहज विचारले होते हेअर ड्रायर बद्दल. त्यामुळेच माझ्याही ते पुन्हा डोक्यात येत मी धागा काढला. आणि तिथे तिने असा गेम केला.
असो, हेअर ड्रायरचे डिटेल देतो नंतर. केक खाऊगल्ली आजचा मेनू धाग्यावर टाकतो. ती चर्चा ईथे नको Happy

मागेच हा हेअर ड्रायर घेतला होता. दरवेळी केसांवरून आंघोळ केली की न चुकता वापरायचो. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत छान वापर चालू होता....
पण मग या विकेंडला केस कापले आणि खेळच संपला Sad
आता राहिल्या फक्त आठवणी..

1635451657247.jpg

हो, हा फिलिप्सचाच आहे.
कपडे वाळवायलाही वापरून झालाय एकदा.
गणपतीला पोरगी अमुकतमुकच ड्रेस घालायचा म्हणून हट्ट धरून बसली. जो ओला होता. आणि हातात फक्त पंधरा मिनिटे होती. मग काय, फुल्ल गरम स्पीडवर वापरला. आणि अचानक पाचेक मिनिटांनी बंद पडला. मी घाबरलो. गेला वाटले. पण दोन मिनिटांनी पुन्हा ट्राय केले तर पुन्हा चालू झाला. पाच मिनिटांनी पुन्हा बंद, दोन मिनिटांनी पुन्हा चालू... बहुधा फुल्ल गरम स्पीड कंटिन्यूअस वापरल्यास तापल्याने बंद पडला असावा. थोड्यावेळाने थंड होताच पुन्हा चालू. अर्थात केसांसाठी वापरताना याची भिती नाही. ईतका आपण वापरणार नाही.

Pages