रोजच्या वापरासाठी हेअर ड्रायर चांगला की वाईट?

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 August, 2021 - 19:15

थोडी माहिती हवी आहे.
त्याआधी थोडी माहिती देतो जी समदुखींना उपयोगी ठरू शकते.

मला लहानपणापासूनच केस वाढवायची फार आवड होती. पण तेव्हा शाळा कॉलेजचे नियम आणि घरची बंधने यामुळे फार वाढवता यायचे नाहीत. पुढे ऑफिसला निर्णयस्वातंत्र्य आले तरी कॉर्पोरेटच्या सोफेस्टीकेटेड वातावरणात एचआर लोकांचा फॅशनवर डोळा असायचा. त्यामुळे आवड मनातच राहिली. असेच एक दिवस आपले वय होत टक्कल पडणार आणि लांब केसांची ईच्छा अपुरीच राहणार असे वाटत होते. पण मग एक दिवस कोरोना आला आणि लॉकडाऊन लागला...

वर्क फ्रॉम होम आले. सलून बंद झाले. घरबसल्या केसांचे छप्पर रपारप वाढू लागले. आधी चापून चोपून तेल, मग हेअरबॅंड, मग वेणी, बघता बघता केसांची केस हाताबाहेर गेली.
मोठे केस आवडत तर होते पण सोबत काही प्रॉब्लेमही घेऊन आले. ईतर प्रॉब्लेम तर मी निपटले पण माझा सर्दीचा त्रास मात्र बळावला.

याआधीही जेव्हा मी आंघोळ करून बाहेर यायचो तेव्हा केस कितीही चांगले पुसले तरी जरा वारा लागताच सटासट शिंका यायच्या. कधी चार शिंकांवर निभावले जायचे तर कधी ती सर्दी दिवसभर साथ सोडायची नाही. माझ्याबरोबर कुठेही आंघोळ करून घराबाहेर पडायचे झाल्यास बायकोची पहिली अट हिच असायची की तुझी सर्दी सोबत राहिली तर जाणे कॅन्सल!

मग ती होऊ नये म्हणून आंघोळ केल्यावर केस खचाखचा पुसून मग आतून बाहेरून छान सुकेपर्यंत एका खोलीतला पंखा आणि खिडक्या बंद करून तिथेच बसून राहणे. कारण चुकून उठलो आणि दुसरया खोलीत गेलो तर वाऱ्याची एक झुळूकही सटासट शिंका यायला पुरेशी ठरायची Sad

आता यात केस जितके जास्त तितका हा प्रॉब्लेम मोठा. कारण केस खूप वेळ पुसावे लागतात आणि तरीही लवकर सुकत नाहीत. आतवर ओल राहतेच.
तसेच कधी साबण लाऊन तोंड धुतले तरी त्यात पुढचे निम्मे केस ओले होतात आणि ते ही शिंका येण्यास पुरेसे ठरतात.

पण गेल्या महिन्यात लोणावळ्याला गेलेलो तेव्हा यावर एक सोल्यूशन सापडले. तिथल्या हॉटेलच्या रूमवर बाथरूममध्ये हेअर ड्रायर होते. तोंड धुतल्यावर मी सहज ते वापरले आणि बघता बघता केस सुके सडसडीत! तीन दिवस तिथे होतो, त्यात पाच आंघोळी झाल्या, दहा वेळा तोंड धुणे झाले, दरवेळी न चुकता हेअर ड्रायर वापरला आणि ईतके पाण्यात पावसात भिजून डुंबूनही तीन दिवसात एक शिंक आली असेल तर शप्पथ!

नक्कीच हि कमाल लोणावळ्याच्या वातावरणाची नसून हेअर ड्रायरची होती.
त्यामुळे सध्या डोक्यात विचार घोळत आहे की का नाही एखादा हेअर ड्रायर घरातच बाळगावा.

पण चर्चा आणि चौकशी करता काही जणांनी असे सांगितले की हेअर ड्रायर कधीतरीच वापरावा. रोजच्या वापरासाठी तो नसतो. अन्यथा केस खराब होतात.
आता हे खराब होणे म्हणजे केस गळणे असेल तर बिलकुल नकोय तो हेअर ड्रायर.
रुक्ष होत असतील पण तेल शॅम्पू लाऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर विचार करता येईल.

पण हि अफवा असेल तर ऊत्तमच.

मग त्या केसमध्ये केसांसाठी घरगुती वापरासाठी कुठला हेअर ड्रायर घ्यावा?
बजेट असे काही ठरवले नाही. जास्त वापर होणार असेल, शिंकांचा त्रास सुटणार असेल, तर चार पैसे जास्त मोजायलाही हरकत नाही.

कोणी या वा ईतर कारणासाठी रोज वा वरचेवर हेअर ड्रायर वापरत असाल तर प्लीज अनुभव शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< या विकेंडला केस कापले आणि खेळच संपला Sad
आता राहिल्या फक्त आठवणी.. >>

------- हे पण दिवस जातील. एक खेळ संपला तर दुसरा नवा खेळ सुरू करण्यात काही अडचण नसावी. केस लवकर वाढण्यासाठी काही विशेष प्रयत्न करत असशील तर वेगळा धागा काढ म्हणजे इतरांना पण मदत होईल.

मुलीचा मुलगा खुप लहान म्हणजे तान्हं बाळ असताना मुलीने केस वाळवायला हेअर ड्रायर लावला की त्याच्या आवाजाने बटण बंद केल्या सारखा रडत असला तरी थांबत असे. त्यामुळे त्याला शांत करण्याचे सगळे उपाय करून थकलो आम्ही की मुलगी हेअर ड्रायर ऑन करायची थोडा वेळ. हमखास लागू पडणारा उपाय होता तो आमचा.

या विकेंडला केस कापले आणि खेळच संपला Sad
आता राहिल्या फक्त आठवणी..
>>
गेल्या १५ वर्षांमधे सुमारे ८-१० वेळा खांद्यापर्यंत केस वाढवले आहेत. जनरली वाढवून थोडे दिवस ठेऊन कापून टाकायचो. पण २०१८-१९ मधे सलग वर्षभरापेक्षा जास्त मेंटेन केले. मजा आली.
लॉकडाऊन (पहिल्या अन दुसर्‍याही) मधे घरच्या घरी मशीन मारून ऑलमोस्ट चमनगोटा केला होता.
आता परत वाढवतो आहे.

या अनुभवातून आलेलं थोडं ज्ञानः
- रोज केस धुवायचे नाहीत (बारीक असतानाही)
- धुतल्यावर केस पूर्ण कोरडे होताहेत की नाही ते तपासायचं (ओले राहिले तर सर्दी बरोबरच कोंडा फोफावतो)
- हेअर केअर प्रॉडक्ट्स साठी एक्सपर्टचा सल्ला घ्यायचा. ते प्रॉडक्ट्स रेकमेंड करतील तेंव्हा कुठलं प्रॉडक्ट कशासाठी रेकमेंड करताहेत ते विचारून घेऊन, एक्सपेक्टेड रिजल्ट्स येताहेत की नाही / साईड इफेक्ट्स होताहेत का हे बघायचं. जर काही शंका आली तर परत एक्सपर्टला विचारायचं, गरज पडल्यास प्रॉडक्ट बदलून घ्यायचं (आता इतका महागाचा शॅम्पू आणलाच आहे तर पूर्ण वापरून मग बदलू वगैरे विचार दूर ठेवायचे, नाहितर शॅम्पू संपेपर्यंत केसही संपू शकतील)
- केस वाढवायला सुरुवात करतेवेळी हेअर कट / ट्रिम सोबत हेअर स्पा केला तर केस जरा फास्ट वाढतात
- साधारण सहा महिन्यांच्या अंतरानी स्पा करायचा
- ऑफ द शेल्फ प्रॉडक्ट्स / प्रमोशन्स पासून दूर रहायचं

बंगलोरच्या हार्ड वॉटर अन पोल्यूशनमुळे बॉर्डरचे केस अन दाढी बेकार पांढरे झालेत, पण बाकी लोकांच्या केसांची गळती बघता, जो पर्यंत आहेत तो पर्यंत करा हौस...
ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट सीजन...
मोहाच्या क्षणांपासून दूर रहा (केस वाढवताना एक फेज अशी येते की आत्ता जाऊन कटिंग करावी अशी उर्मी यायला लागते. या फेजमधे केस धड लहान नसतात, धड लांब नसतात अन बेकार वेडेवाकडे दिसतात. हे जर ट्रिम केले तर केस वाढल्यावर वेडेवाकडे दिसतात. म्हणून या १५-२० दिवसांमधे इरादा पक्का ठेवायचा...) फिर जीत तुम्हारी होगी...

केस वाढवायला सुरुवात करतेवेळी हेअर कट / ट्रिम सोबत हेअर स्पा केला तर केस जरा फास्ट वाढतात
>>>>
माहितीत भर पडली. सुरुवातीला अनुभवातून आलेले ज्ञान लिहिलेय. ही माहिती वाचनात / ऐकण्यात आलेली का? करून बघता येईल.

ही माहिती वाचनात / ऐकण्यात आलेली का?
>>
अनुभव रे... संपूर्ण स्वानुभव...

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे पूर्वी केस लांब झाले की थोडे दिवस ठेऊन मग कापून टाकायचो. केस कापणारा / री कायम इतके चांगले वाढलेत तर कशाला कापतोस असं म्हणायचे, तेंव्हा त्यांनाही थोड्या दिवसांनी परत वाढवीन असं सांगायचो. असं पाच-सहा वेळा झाल्यानंतर एकदा एकजण म्हणाला की स्पा करतोस का? त्यानी लवकर वाढतात. म्हटलं बघू करून. केल्यावर खरंच फास्ट वाढले. आता दर सहा महिन्यांनी स्पा करतो (केस लहान असले तरी)

Dyson म्हणजे कार्पेट ड्रायर असेल. >> व्याख्या विख्हिई वुख्हू. हो डायसन चा एक लहान मुलांचा खेळण्यातला व्हॅक्युम क्लीनर काढला आहे आणी तो खरंच चालतो. ( असे वाचले.) डायसन च्या जाहिराती फारच पिडत असतात.

डायसनचा हेअर ड्रायर घ्यायचा विचार मी सुद्धा तेव्हा केला होता. एकच दिवस. कारण त्या रात्री एवढे पैसे कसे उभारायचे या चिंतेने माझे काही केस गळाले. जर केसच नाही राहिले तर हेअर ड्रायर काय कामाचा हे ग्यान मग सकाळी उठल्यावर प्राप्त झाले.

डायसन कंपनी बद्दल माहीत नव्हते. पण डायसनचे अमुक, तमुक वरून डायसनचा गोळा (Dyson's Sphere) आठवला.

फ्रिमन डायसन नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला. तो वादग्रस्त विधाने, व लिखाण करणारा म्हणुन प्रसिद्ध होता. काही जण त्याला सर्किट म्हणत असत असे वाचले आहे.
त्याने डायसनचा गोळा हा कन्सेप्ट मांडला. (तसाच काहीसा कन्सेप्ट स्टार मेकर या सायन्स फिक्शन मध्ये आधी येऊन गेला होता.) तारा हा विझण्यापूर्वी राक्षसी तारा होऊन मग विझतो. तर जसा एखादा तारा विझू लागला तशी त्यापासून त्याच्या ग्रहांना मिळणारी ऊर्जा कमी कमी होत जाईल. पृथ्वीवर आज प्रगत मानव आहे आणि आपल्या सूर्याला त्या स्थितीत जायला तर करोडो वर्षे लागतील. त्यावेळी मानव किती प्रगत झाला असेल.
म्हणजे असा एखादा दुसरा तारा जर आज विझण्यास सुरवात झाली असेल आणि त्याच्या एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असेल तर तिथले काही / एखादा जीव कितीतरी प्रगत झाला असेल.
तो जीव मग त्या ताऱ्यापासून मिळणारी ऊर्जा खूपच कमी झाल्याने, आहे तेवढी ऊर्जा आपल्या ग्रहाला मिळावी म्हणुन आपल्या तारामंडळा भोवती असा एक गोळा (स्फिअर) बांधेल जेणे करून त्या ताऱ्यापासून निघणारी सगळी ऊर्जा आपल्या ग्रहाकडे वळवू शकेल. त्यामुळे तो एक प्रचंड मोठा गोळा होईल. तेव्हा अंतराळात इतर कुठे जीव सृष्टी आहे का हे शोधताना असा प्रचंड मोठा गोळा आहे का हे शोधावे, सापडल्यास तिथे फारच प्रगत जीव असतील.

असे विचार डोक्यातून काढून टाकायला डायसनचा व्हक्युम क्लिनर काढला असेल काय असे वाटले.

4 वर्षाच्या मुलीसाठी हेअर ड्रायर वापरू शकतो का?>> लो सेटिन्ग वर व जरा दुरून वापरायचे. व अगदी ओले ओले कच्च असताना नाही वापरायचे.
न्हायल्यावर केस कॉट न च्या टावेल/ पंचात बांधोन ठेवायचे. असे एक वेगळे फडके मिळतेसुद्धा. बटन लावुन ठेवतायेते. व जरा हलके कोरडे झाले की ड्रायर ने सुकवायचे. आधी थोडावेळ पंख्या खाली किंवा हवेत सुकवा. हाय सेटिन्ग व हीट खरेतर फक्त पार्लरवाले ट्रेन्ड लोक्स वापरतात. त्याने व जवळून केल्याने हीट मुळे केस दुखावतात.

४ वर्षाच्या लेकीची केस वाढवायची हौस पुरवता हे कौतुकास्पद आहे.
अमा यांच्या पोस्टशी सहमत.
तसेच पावसाळ्यात तिला केस जरा बारीक ठेव सांगता येऊ शकते. ईथे मुंबईत पावसाळ्यात दमट हवेमुळे केस आणि कपडे लवकर सुकत नाहीत.
जर आंघोळ केल्यावर लगेच कुठे बाहेर वार्‍यावर जायचे नसेल तर हेअर ड्रायर वापरायची गरज नसावी असे वाटते. आणि त्यातही त्याचा जास्त वापर टाळायला आंघोळ निघायच्या शक्य तितके वेळ आधी करता येऊ शकते. मी स्वत:ही तेच करतो. घाईघाईत कुठे आंघोळ करून जायचे असेल तरच वार्‍यावर ओले केस न्यायला नको यासाठी हेअरड्रायर वापरतो. ईतरवेळी केस पुसून घरीच काही वेळ पंखा स्लो करून असतो.

बरुबर. दुसरे म्हणजे दमट केस मावश्यां ना आमंत्रण. ऑफलाइन शाळा सुरु झाली तर तो एक त्रास पीडा होतेच. त्यामुळे केस नीट सुकवाच.

आत्ता पासून बरोबर तेल पाणी उत्तम आहार केले तर हाय स्कुल मध्ये घटट मुठ्ठ दोन वेण्या येतील व सोडल्यावर केस सुरेख फ्रेम करतात केसांना.
इट इज अ लाँग टर्म प्रॉजेक्ट फॉर द मम्मा.

ॠ णमेश भाउ मी मध्यंतरी लेकी साठी हेअर ड्रायर घेतला पण तो स्वस्तातलाच तिने सिलेक्ट केला. सातशे रु चा आहे. दोन सेटिन्ग . अगदी साधा आहे. तेव्हा ह्या बाफाची आठवण आलेली.

प्लस पार्लर वाल्याने महागडी केरास्टेज वाली हेअर केअर प्रॉड्क्ट्स चिपक वली तिला. लॉक डाउन नंतर प्रथमच पार्लर मध्ये जाउन केस कापले तिने व त्याने केसाने गळा कापला ( माझा) मी चुपचाप घरी गेम खेळ त बसलेले तर मेसेज आला क्रेडिट् कार्डावर इतके इतके खर्च? मी परेशानच झाले अरे इतके काये फेशिअल वगैरे केले कि काय आल्यावर बघितले तर हेअर केअर प्रॉडक्ट्स. ओ एम जी इत्तेमें तो पंध्रा दिन का राशन आएगा मेरा और कुत्तेका

महिलाविषयक रोजच्या गरजा / कटकटींबद्दल सर एक्स्पर्ट आहेत. आय ब्रो, पैन्सिल, मेक अप, लिपस्टीक याबद्दलचे धागे लवकरच अपेक्षित आहेत.

सातशे रु चा आहे. दोन सेटिन्ग .
>>>
आमचा दिड दोनच्या रेंजमध्ये असेल. आता आठवत नाही. दुसर्‍या पानावर फोटो टाकलाय त्याचा. तीन सेटींग आहेत.

मृणाली, तुम्ही तसला घेऊ शकता.
माझा अनुभव तरी चांगला आहे त्या मॉडेलचा.

अजून एक म्हणजे अश्या गरम होणार्‍या वस्तू अगदीही स्वस्तातल्या घेऊ नये. गंडतात लवकर. अमांच्या हेअर ड्रायरचे अनुभव ते सांगतील. पण मला स्वस्तातल्या स्टीमरचे बरेच वाईट अनुभव आहे. डायरेक्ट काम करायचे बंद करतात. मग एक जरा बरेपैकी चांगला घेतला तर तो टिकलाय छान. तो स्टीमरही सर्दी झाली की वाफ घ्यायला वापरतो.

अमांच्या हेअर ड्रायरचे अनुभव ते सांगतील. >> मला म्हाइतच नाही ना. मी फक्त घेउन दिला ती घेउन गेली. पन माझे मत तुमच्यासारखे आहे. इलेक्ट्रोनिक किंवा हाइटेक वस्तु आपल्याला परवडेल तितकी महागच घ्यावी. चांगली बनवलेली असते. वारंटी असते. पार्लर मध्ये एक मोठ्या झोताचा चार पाच एटेच मेंट वाला असतो तो मला आवड तो. पण तिने एक ऑनलाइन बघुन ठेवलेला तो तिथूनच घेइल म्हणे. सो ओके!

आता काही वर्ष तरी लांब केस मेन्टेन करायचे असा गेल्या ऑगस्ट मधे निश्चय केला अन् फिलिप्स ला बाय करून डायसन वर स्विच मारला.
ज ह ब ह र दस्त आहे हा प्रकार

3 टेंपरेचर कंट्रोल, 3 स्पीड कंट्रोल, क्विक कोल्ड मोड अन् खूप अटॅचमेन्ट
नुसत्या हीट नी केस न सुकावता स्पीड मुळे केसातले पाण्याचे थेंब उडवून लावतो
किंमत बाकीच्यांपेक्षा जास्त असली तरी फुल वसूल

अगदी बेसिक नको असेल अन् वापरण्याची गॅरण्टी असेल तर अधले मधले पर्याय न निवडता डोळे झाकून घ्यावा...

सर
नमस्कार.
आता शाखा डोकंं भादारायची स्टाईल आणतोय. मग कशाला पाहिजे हेअर ड्रायर?

अन् फिलिप्स ला बाय करून डायसन वर स्विच मारला.
/>>>>>>

कितीला पडला?

माझा अजून चालू आहे चांगला. वापर सुद्धा होत आहे. अगदी मोगली सारखे केस आता वाढवत नसलो तरी हेअर ड्रायर ची गरज पडावी इतके कापल्यावर देखील असतातच.

आता शाखा डोकंं भादारायची स्टाईल आणतोय
>>>>>>>

लेक लहान असताना जेव्हा तिचे पहिल्यांदा केस कापून टक्कल केले. तेव्हा तिला कंपनी म्हणून मी सुद्धा मशीन फिरवून ऑल्मोस्ट टक्कल केले होते.
आता मात्र असे स्टंट करत नाही. चायला पुन्हा आलेच नाहीत तर.....

कितीला पडला?
>>
पडला नाही अजून... (पडून काही झालं तर किडनी हलेल थोडी)
बावीस का पंचवीस सहस्र
कॅश बॅक ऑफर होती...

Pages