रोजच्या वापरासाठी हेअर ड्रायर चांगला की वाईट?

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 August, 2021 - 19:15

थोडी माहिती हवी आहे.
त्याआधी थोडी माहिती देतो जी समदुखींना उपयोगी ठरू शकते.

मला लहानपणापासूनच केस वाढवायची फार आवड होती. पण तेव्हा शाळा कॉलेजचे नियम आणि घरची बंधने यामुळे फार वाढवता यायचे नाहीत. पुढे ऑफिसला निर्णयस्वातंत्र्य आले तरी कॉर्पोरेटच्या सोफेस्टीकेटेड वातावरणात एचआर लोकांचा फॅशनवर डोळा असायचा. त्यामुळे आवड मनातच राहिली. असेच एक दिवस आपले वय होत टक्कल पडणार आणि लांब केसांची ईच्छा अपुरीच राहणार असे वाटत होते. पण मग एक दिवस कोरोना आला आणि लॉकडाऊन लागला...

वर्क फ्रॉम होम आले. सलून बंद झाले. घरबसल्या केसांचे छप्पर रपारप वाढू लागले. आधी चापून चोपून तेल, मग हेअरबॅंड, मग वेणी, बघता बघता केसांची केस हाताबाहेर गेली.
मोठे केस आवडत तर होते पण सोबत काही प्रॉब्लेमही घेऊन आले. ईतर प्रॉब्लेम तर मी निपटले पण माझा सर्दीचा त्रास मात्र बळावला.

याआधीही जेव्हा मी आंघोळ करून बाहेर यायचो तेव्हा केस कितीही चांगले पुसले तरी जरा वारा लागताच सटासट शिंका यायच्या. कधी चार शिंकांवर निभावले जायचे तर कधी ती सर्दी दिवसभर साथ सोडायची नाही. माझ्याबरोबर कुठेही आंघोळ करून घराबाहेर पडायचे झाल्यास बायकोची पहिली अट हिच असायची की तुझी सर्दी सोबत राहिली तर जाणे कॅन्सल!

मग ती होऊ नये म्हणून आंघोळ केल्यावर केस खचाखचा पुसून मग आतून बाहेरून छान सुकेपर्यंत एका खोलीतला पंखा आणि खिडक्या बंद करून तिथेच बसून राहणे. कारण चुकून उठलो आणि दुसरया खोलीत गेलो तर वाऱ्याची एक झुळूकही सटासट शिंका यायला पुरेशी ठरायची Sad

आता यात केस जितके जास्त तितका हा प्रॉब्लेम मोठा. कारण केस खूप वेळ पुसावे लागतात आणि तरीही लवकर सुकत नाहीत. आतवर ओल राहतेच.
तसेच कधी साबण लाऊन तोंड धुतले तरी त्यात पुढचे निम्मे केस ओले होतात आणि ते ही शिंका येण्यास पुरेसे ठरतात.

पण गेल्या महिन्यात लोणावळ्याला गेलेलो तेव्हा यावर एक सोल्यूशन सापडले. तिथल्या हॉटेलच्या रूमवर बाथरूममध्ये हेअर ड्रायर होते. तोंड धुतल्यावर मी सहज ते वापरले आणि बघता बघता केस सुके सडसडीत! तीन दिवस तिथे होतो, त्यात पाच आंघोळी झाल्या, दहा वेळा तोंड धुणे झाले, दरवेळी न चुकता हेअर ड्रायर वापरला आणि ईतके पाण्यात पावसात भिजून डुंबूनही तीन दिवसात एक शिंक आली असेल तर शप्पथ!

नक्कीच हि कमाल लोणावळ्याच्या वातावरणाची नसून हेअर ड्रायरची होती.
त्यामुळे सध्या डोक्यात विचार घोळत आहे की का नाही एखादा हेअर ड्रायर घरातच बाळगावा.

पण चर्चा आणि चौकशी करता काही जणांनी असे सांगितले की हेअर ड्रायर कधीतरीच वापरावा. रोजच्या वापरासाठी तो नसतो. अन्यथा केस खराब होतात.
आता हे खराब होणे म्हणजे केस गळणे असेल तर बिलकुल नकोय तो हेअर ड्रायर.
रुक्ष होत असतील पण तेल शॅम्पू लाऊन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर विचार करता येईल.

पण हि अफवा असेल तर ऊत्तमच.

मग त्या केसमध्ये केसांसाठी घरगुती वापरासाठी कुठला हेअर ड्रायर घ्यावा?
बजेट असे काही ठरवले नाही. जास्त वापर होणार असेल, शिंकांचा त्रास सुटणार असेल, तर चार पैसे जास्त मोजायलाही हरकत नाही.

कोणी या वा ईतर कारणासाठी रोज वा वरचेवर हेअर ड्रायर वापरत असाल तर प्लीज अनुभव शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग कोणता हेअर द्रायर चांगला ठरला? मला पण घ्यायाचा आहे जुना खराब झाला. माझे केस म्हणजे भयंकर गुंता आहे धुतल्यावर पंचाने पुसुन विशेष काही होत नाही.

फिलिप्स
दुसऱ्या पानावर फोटो टाकला आहे
सध्या केस पुन्हा वाढवत आहे आणि गेल्या वेळेपेक्षा पुढे जात आहे... त्यामुळे वापर जोरात चालू आहे. एमर्जन्सीला घरातले इतर सदस्य सुद्धा वापरतात. अजून छान टिकून आहे.

आता माझ्यासाठी ती जीवनावश्यक वस्तू झाली आहे. चार दिवसांसाठी कुठे जायला बॅग पॅक करताना एकवेळ मोबाईल चार्जर विसरेन पण हेअर ड्रायर नाही..

माझे केस म्हणजे भयंकर गुंता आहे
>>>> तुम्ही कंडिशनर नाही का वापरत? सुकवण्यासाठी नाही पण चांगल्या कंडिशनरने गुंत्याचा प्रॉब्लेम फारच कमी होतो.

सर तुमची "केस" खूप "गुंतागुंतीची" आहे. तो गुंता सोडवण्यासाठी स्पेशल ड्रायर परग्रहावरून मागवायला पाहिजे.

बरं, माझा पण फिलिप्स होता लवकर खराब झाला दोन अडीच सालात.
रोज conditioner लावण चांगले आहे का.

केशवकूलजी हे हे Proud
तुम्ही तर एखादी मस्त कथा लिहु शकता अशा केस वरती. लिहा एक.

रोज conditioner लावण चांगले आहे का>> वीकली दोन दा जेंव्हा केस धुतले जातात तेंव्हा कंडीशनर लावतात. त्याने केस मऊ होतात, पण ते लाऊन धुताना जर केस नेहमीपेक्षा जास्त गळत असतील तर तो particular conditioner सुट होत नाहीये असे समजावे.

हल्लीच हेयर सरळ करणे हे कसे घातक आहे हा व्हिडीओ वाचनात आला. हेयर ड्रायर ने फक्त वाळवत असलात तर ते लागू होणार नाही असे धरून चालू. केराटिन वगैरे ट्रीटमेंट घातक असल्याचे & त्याची रासायनिक क्रिया शरीरात घातक केमिकल प्रोपॅगेट करते, ज्याने किडनी फेल झालेली १ केस बघण्यात आली..खरे खोटे माहित नाही.

केशवकूलजी हे हे Proud
तुम्ही तर एखादी मस्त कथा लिहु शकता अशा केस वरती. लिहा एक.>>> नको. सर माझ्या वर "केस" टाकतील. कॉपीराईट्स आणि प्रायव्हसी.

Lol
फक्त बिल माझ्यावर नका फाडू Lol

थैंक्स आशु29. केस रोज धुतो थंडीचे दिवस वगळुन. conditioner कधी कधी वापरला आहे, रोज वापरायची भीती वाटते.
हेअर ड्रायर केस सुकवायलाच पाहिजे आहे. परत फिलिप्सच घेईन बहुतेक.

Pages