सोशलसाईटवर होणारे चारीत्र्य हनन आणि मद्य

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2021 - 15:57

बराच काळ लॉकडाऊनचे सुख उपभोगल्यानंतर दोनचार दिवस कुठेतरी फिरून यायचे ठरवले. फारसा विचार न करता लोणावळा गाठले. काही जणांनी धोक्याची सूचना दिली, या काळात बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण घरच्यांना एका हवापालट रूटीनचेंज ब्रेकची गरज होती. म्हणून मग गेलो. कोरोनापासून बचाव म्हणून गर्दीच्या जागा टाळायच्या होत्या. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करायचा होता. ती काळजी घेतली. पण अखेर ज्याची कल्पनाही केली नव्हती ते झाले..

आज मायबोलीवर येऊन बघतो ते माझाच एक फेक आयडी बनला होता.
माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष

म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अ‍ॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही. पण या काळात जे चारीत्र्यहनन व्हायचे होते ते झालेच.
कारण त्या आयडीने धागाही कुठला काढला होता तर - एक करोड बियरप्रेमींचा ग्रुप !

अख्ख्या मायबोलीला ठाऊक असेल की माझे अर्धे आयुष्य दारूला विरोध करण्यात गेले आहे. दारूची जाहीरातबाजी असो वा उदात्तीकरण मी त्याला नेहमीच विरोध करत आलो आहे. संधी मिळताच दारू हे कसे शरीराला घातक पेय आहे याची लोकांना वेळोवेळी आठवण करून देत असतो. आणि आज त्यालाच छेद द्यायला म्हणून कोणीतरी माझ्याच नावाचा आयडी घेत बीअरप्रेमींचा ग्रूप उघडला.

चारीत्र्यहननाची मी कधीच पर्वा केली नाही. याआधीही माझेच भासावे असे डुआयडी मी इथे पाहिले आहेत आणि ते अश्याच कारणांसाठी वापरले आहेत. म्हणजे ऋन्मेष कोणावर वैयक्तिका टिका करत नाही अशी त्याची इमेज आहे तर एखादा डुआयडी काढून एखाद्या चर्चेत त्याची बाजू घेत, त्याच्यावतीने शिवीगाळ करा आणि असे भासवा कि हा डुआयडी वापरून शिवीगाळ करतो. एखादा डुआयडी काढा आणि त्यातून उगाच माझे जुने धागे वर काढा, उगाचच आतिशयोक्ती भासावी अशी स्तुती करा, मग अजून एका डुआयडीने तो आधीचा माझाच डुआयडी असल्याची टिका करा. हे सर्व सोशलसाईटवर वर्षानुवर्षे होत आलेय, होत राहील. मी कधी त्याची पर्वा केली नाही, की कोणाला कसले स्पष्टीकरण द्यायला माझा वेळ खर्च केला नाही. ईतकेच नाही तर कोण कोणाचा डुआयडी आहे, त्यातला कोण माझ्यामागे हात धुवून वगैरे लागलाय हे देखील शोधायचा त्रास घेतला नाही. कारण हे सारे मिळून खरे तर माझेच मनोरंजनाचे दुकान चालवत होते. त्यांचा मी आभारीच आहे.

पण आज नाही ......

आज प्रश्न माझा नाही , माझ्या ईमेजचा नाही, किंवा माझ्या तत्वांचाही नाही..
आज प्रश्न दारूच्या उदात्तीकरणाचा आहे. या धाग्यामुळे कोणाला माझ्याबद्दल गैरसमज होत असेल तर त्याची मला पर्वा नाही, पण एक दारूला वाईट म्हणनारी व्यक्ती अखेर दारूच्या उदात्तीकरणाला बळी पडली असे यातून कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज वेळीच खोडून काढणे गरजेचे आहे. दारूला घातक पेय म्हणणारेही अखेर तिलाच मिठी मारतात असे कोणाला यामुळे वाटले तर त्यांना वेळीच हे असत्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे.

कोणाला तरी असा धागा काढावासा वाटला याचा एका दृष्टीने पाहता मला आनंदही झाला आहे. कारण माझ्या कार्याची दखल घेत कोणातरी मद्याचे उदात्तीकरण करणार्‍याला माझा असा काटा काढावासा वाटला हि त्या कार्याची एक पावतीच आहे. पण त्याचवेळी हा डाव उधळून लाऊन माझा वापर करून कोणी मद्याचे उदात्तीकरण करू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे म्हणून हा धागा.

ऋन्मेष हा एक वाह्यात ईन्सान आहे असे शंभरातल्या शंभर मायबोलीकरांना वाटले तरी वाटू द्या.
पण दारू हे एक वाह्यात पेय आहे हे शंभरातल्या किमान ९९ मायबोलीकरांना पटत नाही तो पर्यंत तरी मी नाही सुधारणार _/\_

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही तर पहाटे निघतो सायकल ने
मनशक्ती ला पोचतो खादाडी करतो आणि आल्या मार्गाने परत येतो दुपारपर्यंत

जास्त वेळ असेल तर बोर घाट उतरून खोपोली आणि मग तिथे पुन्हा थोडे खाऊन घाट चढून संध्याकाळ पर्यंत पुणे

वरच्या बातमीत काही निर्बंध तर असे आहेत जे कायमस्वरूपीच हवे ना...

१) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.

२) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे,

३) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे,

४) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे,

५) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.

६) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे,

७) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे,

८) सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.

९) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.

१०) धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी..

Pages