सोशलसाईटवर होणारे चारीत्र्य हनन आणि मद्य

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2021 - 15:57

बराच काळ लॉकडाऊनचे सुख उपभोगल्यानंतर दोनचार दिवस कुठेतरी फिरून यायचे ठरवले. फारसा विचार न करता लोणावळा गाठले. काही जणांनी धोक्याची सूचना दिली, या काळात बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण घरच्यांना एका हवापालट रूटीनचेंज ब्रेकची गरज होती. म्हणून मग गेलो. कोरोनापासून बचाव म्हणून गर्दीच्या जागा टाळायच्या होत्या. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करायचा होता. ती काळजी घेतली. पण अखेर ज्याची कल्पनाही केली नव्हती ते झाले..

आज मायबोलीवर येऊन बघतो ते माझाच एक फेक आयडी बनला होता.
माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष

म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अ‍ॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही. पण या काळात जे चारीत्र्यहनन व्हायचे होते ते झालेच.
कारण त्या आयडीने धागाही कुठला काढला होता तर - एक करोड बियरप्रेमींचा ग्रुप !

अख्ख्या मायबोलीला ठाऊक असेल की माझे अर्धे आयुष्य दारूला विरोध करण्यात गेले आहे. दारूची जाहीरातबाजी असो वा उदात्तीकरण मी त्याला नेहमीच विरोध करत आलो आहे. संधी मिळताच दारू हे कसे शरीराला घातक पेय आहे याची लोकांना वेळोवेळी आठवण करून देत असतो. आणि आज त्यालाच छेद द्यायला म्हणून कोणीतरी माझ्याच नावाचा आयडी घेत बीअरप्रेमींचा ग्रूप उघडला.

चारीत्र्यहननाची मी कधीच पर्वा केली नाही. याआधीही माझेच भासावे असे डुआयडी मी इथे पाहिले आहेत आणि ते अश्याच कारणांसाठी वापरले आहेत. म्हणजे ऋन्मेष कोणावर वैयक्तिका टिका करत नाही अशी त्याची इमेज आहे तर एखादा डुआयडी काढून एखाद्या चर्चेत त्याची बाजू घेत, त्याच्यावतीने शिवीगाळ करा आणि असे भासवा कि हा डुआयडी वापरून शिवीगाळ करतो. एखादा डुआयडी काढा आणि त्यातून उगाच माझे जुने धागे वर काढा, उगाचच आतिशयोक्ती भासावी अशी स्तुती करा, मग अजून एका डुआयडीने तो आधीचा माझाच डुआयडी असल्याची टिका करा. हे सर्व सोशलसाईटवर वर्षानुवर्षे होत आलेय, होत राहील. मी कधी त्याची पर्वा केली नाही, की कोणाला कसले स्पष्टीकरण द्यायला माझा वेळ खर्च केला नाही. ईतकेच नाही तर कोण कोणाचा डुआयडी आहे, त्यातला कोण माझ्यामागे हात धुवून वगैरे लागलाय हे देखील शोधायचा त्रास घेतला नाही. कारण हे सारे मिळून खरे तर माझेच मनोरंजनाचे दुकान चालवत होते. त्यांचा मी आभारीच आहे.

पण आज नाही ......

आज प्रश्न माझा नाही , माझ्या ईमेजचा नाही, किंवा माझ्या तत्वांचाही नाही..
आज प्रश्न दारूच्या उदात्तीकरणाचा आहे. या धाग्यामुळे कोणाला माझ्याबद्दल गैरसमज होत असेल तर त्याची मला पर्वा नाही, पण एक दारूला वाईट म्हणनारी व्यक्ती अखेर दारूच्या उदात्तीकरणाला बळी पडली असे यातून कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज वेळीच खोडून काढणे गरजेचे आहे. दारूला घातक पेय म्हणणारेही अखेर तिलाच मिठी मारतात असे कोणाला यामुळे वाटले तर त्यांना वेळीच हे असत्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे.

कोणाला तरी असा धागा काढावासा वाटला याचा एका दृष्टीने पाहता मला आनंदही झाला आहे. कारण माझ्या कार्याची दखल घेत कोणातरी मद्याचे उदात्तीकरण करणार्‍याला माझा असा काटा काढावासा वाटला हि त्या कार्याची एक पावतीच आहे. पण त्याचवेळी हा डाव उधळून लाऊन माझा वापर करून कोणी मद्याचे उदात्तीकरण करू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे म्हणून हा धागा.

ऋन्मेष हा एक वाह्यात ईन्सान आहे असे शंभरातल्या शंभर मायबोलीकरांना वाटले तरी वाटू द्या.
पण दारू हे एक वाह्यात पेय आहे हे शंभरातल्या किमान ९९ मायबोलीकरांना पटत नाही तो पर्यंत तरी मी नाही सुधारणार _/\_

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दारूबद्दलची भुमिका पटली मात्र
>>>म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अ‍ॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही>>> केवळ नावातील सारखेपणामुळे आयडी उडेल हे कसे ?

हे सिरीयस आहे. पोलीस तक्रार केली पाहीजे.
इथे वैद्यबुवा नावाचा एक जण आहे. फिल्मी या नावाने तो वावरतो. याच्या शेपटावर पाय पडला की शिवराळ आयडी काढून शिव्या देत बसतो. पण त्याचे हे शिवराळ आयडी उडत नाहीत. कारण त्याला अभय आहे. हा मूळ रूपात आणि फिल्मी या अवतारात पुरोगामी गोटात वावरतो आणि पुरोगामी गोटातल्या त्याला न आवडलेल्या आयडीचा काटा काढायला शशिकांत परब या नावाने येऊन शशिराम, शक्तीराम, खान ९९ असे शिव्या देणारे आयडी बनवत राहतो. याच्या आयड्यांची लिस्ट खूप मोठी आहे. अ‍ॅडमिनच्या जवळचा असल्याने तक्रार करूनही फायदा होत नाही.
त्यामुळे पोलीस तक्रारीशिवाय इलाज नाही.

वैद्यबुवाचा बिथोवन हा आयडी महिलांना अश्लील शेरेबाजी केल्यानंतरही अ‍ॅडमिन उडवत नव्हते. एका आयडीने मोहीम उघडल्यानंतर तो उडाला. त्यामुळे सध्या वैद्यबुवा फिल्मी या आयडीने अंदाधुंद फायरिंग करत सुटले आहेत. त्यांच्या या अंदाधुंद फायरिंगला वैतागून अनेक आयडी मायबोली सोडून गेले. काहींनी आयडी उडवून घेतले. या आयडीच्या विरोधात काय कारवाई करता येईल ? कारण असे उद्योग हाच आयडी करत असतो. मानसोपचाराच्या पलिकडे गेलेली केस आहे.

हाडळीचा आशिक
केवळ नावातील सारखेपणामुळे आयडी उडेल हे कसे ?
.>>>>

तसे तर तो बहुधा उडाला आहे हा धागा बघताच ॲडमिनना समजताच.
पण नेमके यात काय धोका असतो हे जाणून घ्यायला तुम्ही शाहरूखचा फॅन हा चित्रपट जरूर बघा Happy

खरा पुणेकर धन्यवाद Happy

@ च्रप्स, अहो म्हणजे मी तीन दिवस नव्हतो तर नेमके याच काळात तो धागा आल्याने मला त्वरीत तो बघून त्याची तक्रार करता आली नाही. त्यामुळे तो धागा जवळपास एक पुर्ण दिवस वा जास्त वेळ मायबोलीवर राहिला. बरेच प्रतिसादही आले, बरेच लोकांनी वाचलाही असेल. नंतर तो धागा उडूनही काही लोकांना हेच वाटत असेल की ऋन्मेषनेच तो धागा काढला होता. त्यात काही लोकांना तो वेगळा आयडी आहे हे समजले. पण माझ्या दिवसभराच्या अनुपस्थितीमुळे काही लोकांना तो देखील माझाच दुसरा आयडी वाटला होता.
शायद ये सोची समझी साजिश हो सकती है. कदाचित माझी अनुपस्थिती लीक झाली असावी. माझे व्हॉटसप स्टेटस हॅक झाले असावे. ते बघूनच कोणालातरी हे समजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण कुठे फिरायला जातो तेव्हा तिथले फोटो त्याच काळात व्हॉटसप स्टेटसला ठेवावेत का हा एक प्रश्नच आहे. या आधी मी हे टाळायचो. पहिल्यांदाच असे केले आणि हे झाले.

काही लोकांना हेच वाटत असेल की ऋन्मेषनेच तो धागा काढला होता>>>>>>>
हो ना आधी तर शिर्षक वाचून च वाईट वाटले.या विषयावर तुमचा लेख.मग वाटलं विडंबन टाईप काही लिहिले असेल
मग लेख वाचून वाटलं,प्रतिसाद पण मोठ्ठे मोठ्ठे लिहिणारे तुम्ही, लेख इतका आखूड कसा.
मग प्रतिसाद वाचून कळले ते तुम्ही नव्हेच.

एखादा आयडी कुणी घेतला असेल तर दुस-याला तो घेता येत नाही. असे असताना सारखेच दिसणारे युजरनेम मायबोलीने कसे घेऊ दिले ?

ऋन्मेष यांच्या सारख्या पापभीरू व्यक्तीच्या नावावर दारू उदात्तीकरणाचा धागा खपवून त्यांच्या चारित्र्यहननाचा कुटील डाव मांडलेला पाहून खुप वाईट वाटले आणि ढसाढसा रदलो मी.

+१ जिद्दु. याची रॉ मार्फत चौकशी व्हायला हवी.
मला वाटले हा उदात्तिकरणाला बळी पडला.
व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ही हा दिसे ना, वाटले टल्ली झालाय की काय.
प्रत्यक्ष माझगाव की वाशीला जाऊन याला समजवायचा विचार करत होतो, कोव्हीडमुळे थांबलो मलाच खोकला, सर्दी आहे, कोव्हीडची लक्षणे, अन्यथा लगेच गेलो असतो फ्लाईट पकडून.

कुणाची अशी बदनामी, त्यासाठी मग माझ्यासारख्यांची उगाच धावपळ आणि वेळ पैसा खर्च, हे फार गंभीर आहे.
याची रॉ मार्फत चौकशी व्हायलाच हवी.

शायद ये सोची समझी साजिश हो सकती है. कदाचित माझी अनुपस्थिती लीक झाली असावी. माझे व्हॉटसप स्टेटस हॅक झाले असावे>> खुपच गंभीर आहे हे. सांभाळुन रहा. रॉ तपासाला सुरुवात करे पर्यंत पोलीस तक्रार करा. वाटल्यास शस्र परवान्यासाठी अर्ज करा. शस्र परवाना मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत काठी जवळ बाळगा.

शस्र परवाना मिळेल तेव्हा मिळेल तोपर्यंत काठी जवळ बाळगा.>>>>> पण सोशल साईट वरल्या माणसास / आय डी ला तो काठीने कसा मारेल?

हो ना आधी तर शिर्षक वाचून च वाईट वाटले.या विषयावर तुमचा लेख.मग वाटलं विडंबन टाईप काही लिहिले असेल
>>>>
धन्यवाद.
हे असे कोणाला वाटणे हिच माझी ईथली ईमेज कमाई.

असे असताना सारखेच दिसणारे युजरनेम मायबोलीने कसे घेऊ दिले ?
>>>>
सदस्यत्व घेताना वेगळे असेल. नंतर बदलले असावे.
मायबोलीने युजरनेम एडीट करायची सोय काढून टाकायल हवी.

@ सीमंतिनी,
आणली ना..
बारा हजार खर्चा तर चिक्की चॉकलेट फज जेली जाम गुलकंद शरबत ईमली वगैरेंचाच झाला.
त्यातला दोन हजारांचा माल तर पोरीने लंपास करून आपल्या कपाटातील लॉकरमध्ये टाकला. काल संध्याकाळी आल्याआल्याच त्यातला अर्धा माल उचलून आपल्या फ्रेंडससोबत टेंण्टपार्टी करून झाली.
बाकी धाग्याची सुरुवातच जिथे लोणावळ्याला जाण्यापासून झालीय तिथे चिक्की अवांतर कशी होऊ शकते. त्यामुळे अवांतराबद्दल क्षमस्व या औपचारीकतेची गरज नाही. किंबहुना लोकांनी दारू आणि चखना सोडून मिल्कशेक सोबत चिक्की खायला सुरुवात केली तर आवडेलच मला Happy

सारखे दिसणारे युजरनेम मायबोली घेउ देते अगदी किंचित फरक असतानाही. पण ते खरेच कुणाचे सारखे नाव असेल तर. उदा. अमुक, अमुक१, मी_अमुक वगैरे. इथे दुसऱ्या कुणाचे सोंग रचवणे हा उद्देश नसतो.
पण कुणी आपल्या नावात दोन SS टाकले आहेत आपले नाव वेगळे दिसावे म्हणुन आणि कोणी तेच कॉपी करून फक्त एक ऱ्हस्व दीर्घाचा फरक करत असेल ते नाव घेता यावे म्हणुन, तर त्याचा उद्देश आपण हाच आयडी असण्याचे सोंग करणे हा आहे हे उघड आहे. त्यामुळे लगेच आयडी उडाला.

>> सदस्यत्व घेताना वेगळे असेल. नंतर बदलले असावे.

थोडासा फरक असेल तरी यूजरनेम मिळू शकते (उपलब्ध असेल तर). कोणत्याही साईटवर.
'अगदी साधर्म्य' पडताळणारे अल्गोरिदम अद्याप तरी विकसित झालेले नाहीत (नसावेत). सध्या फक्त string compare करतात.

तुम्ही त्या डू आयडी विरूद्ध न बोलता किंवा आकांडतांडव न करता त्याने लिहिलेल्या लेखाबद्दल लिहिले हे आवडले.
नाहीतर दुसरे कुणी असते तर राजकारण्यां सारखा फार आकांडतांडव केला असता. तुमच्या सारख्या व्यक्तींची आज राजकारणात गरज आहे.

कोरोना चा कहर संपलेला नाही
पोलीस लोणावळ्याला पर्यटन करायला येणाऱ्या आणि गर्दी करणाऱ्या अतिउत्साही लोकांना दंड करत आहेत अशा बातम्या होत्या
पर्यटन स्थळे बंद आहेत अजूनही आणि अशात मायबोलीवर चे नैतिक धडे देणारे व्यक्तिमत्त्व मी कसा कुटुंबाला घेऊन लोणावळ्याला मज्जाकरून आलो हे फुशारक्या मारत सांगत आहे हे वाचून सखेद आश्चर्य वाटले

रॉ म्हणजे देसी तपास यंत्रणा. पक्षपात होण्याची शक्यता. त्यापेक्षा तपास तिकडे पलीकडे एफ्बीआयकडे द्या. Wink

पर्यटन स्थळे बंद आहेत अजूनही आणि अशात मायबोलीवर चे नैतिक धडे देणारे व्यक्तिमत्त्व मी कसा कुटुंबाला घेऊन लोणावळ्याला मज्जाकरून आलो हे फुशारक्या मारत सांगत आहे हे वाचून सखेद आश्चर्य वाटले
>>>

१) पर्यटनावर बंदी नाहीये. अन्यथा आम्ही जिथे थांबलो ते हॉटेल बेकायदेशीररीत्या उघडे होते असे आपल्याला म्हणायचे आहे का? बिलकुल नाही. म्हणजे आम्ही कुठलाही कायदा मोडला नाहीये.

२) शक्य ती काळजी घेऊन आणि सरकारने घातलेले निर्बंध पाळून सर्वांनी गर्दीच्या जागा टाळून माफक प्रमाणात पर्यटन करावे अशी मी सर्वांनाच विनंती करतो. प्रश्न केवळ आपल्या कुटुंबाच्या मौजमजेचा नसून त्या गेले वर्ष दिड वर्षे ठप्प असलेल्या पर्यटन व्यवसायाशी निगडीत लोकांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाचाही आहे. त्यांची बायकापोरे तुमच्या येण्याची वाट बघत आहेत.

सध्या एक विचित्र ट्रेंड चालू आहे. त्याबद्दल काही वाचनातून आलेली निरिक्षणे:

१. हॉटेल मध्ये खोली घेऊन कोव्हिड चे सर्व नियम पाळून राहणे अलाऊड आहे.
२. पण त्या हॉटेल्स ना जाणारे रस्ते जर एखाद्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाकडे जाणारे रस्ते असतील तर तिथून जाणे अलाऊड नाही (कारण पुढे तुम्ही हॉटेल ला जाऊन झोपता की सिंहगड्/भुशी डॅम वर गर्दी करता हे कळायचा पोलीसांना मार्ग नाही.)
३. दंडात्मक कारवाई करुन झाल्यावर पुढे काय करायचे याच्या स्पष्ट गाईडलाईन्स पोलीसांकडे नाहीत. त्यामुळे दंड करुन पावती घेऊन पुढे सोडतात.
४. काही परिस्थितीत वाहन जप्त करुन लॉकडाऊन हटेपर्यंत ठेवण्याचे/पॅनडेमिक अ‍ॅक्ट पीनल कोड खाली चार्ज करायची मुभाही पोलीसांना असते.
५. काही ठिकाणी रेझॉर्ट, वॉटर पार्क उघडे ठेवून एका वेळी ५० लोक त्यात डुंबतात. अश्या रेझॉर्ट्स वर दंडात्मक कारवाई पालघर जिल्ह्यात झाली आहे.
६. इतकं करुन जायचं काय नडलंय हे म्हणणं बरोबर आहे.पण लहान मुलं, म्हातारी कोतारी परिस्थितीला प्रचंड कंटाळली आहेत.
७. मी गेले अनेक महिने पेपर मध्ये याबद्दल स्पष्टपणे 'अलाऊड आहे' अश्या सूचनांची वाट पाहते आहे. मला चेंज हवाय.पण असं लपत छपत कारणं सांगत जाऊन नाही. उजळ माथ्याने हवाय.सध्या सगळीकडे जोरात जाहिरात करणार्‍या अनेक रेझॉर्ट्स ना मी व्यक्तीगत निरोपात विचारलं की तुमच्याकडे राहणं अलाऊड आहे हे बरोबर आहे, पण तुमच्याकडे येणं अलाऊड आहे का? यावर लोक उत्तरं टाळतात (कारण त्यांना धंदा चालवायचा आहे.)

लसीकरणाचे २ डोस झाल्यावर परत गाईडलाईन्स वाचून निर्णय घेण्यात येईल.

कारण पुढे तुम्ही हॉटेल ला जाऊन झोपता की सिंहगड्/भुशी डॅम वर गर्दी करता हे कळायचा पोलीसांना मार्ग नाही
>>>>

आम्हीही तीन दिवसांपैकी १ दिवस किंबहुना अर्धा दिवस फिरायला बाहेर पडलो तेव्हा आम्हाला कळले की भुशी डॅमला वा टायगर पॉईंटला जायचे असल्यास पहाटेच चला. नंतर अडवतात. ते रस्ते बंद होतात. आम्ही म्हटले काही गरज नाही. आधीच गर्दीचे ठिकाण नकोय, त्यात मुद्दाम तिथे जायला वर कायदाही मोडा.
बाकी आम्ही गेलो त्या हॉटेलमध्ये वॉटरपार्कही होते जे बंद होते. स्विमिंगपूल मात्र चालू होते. पण त्यात एकावेळी आमची तीन पकडून तुरळक आठदहा टाळकी असायची. स्विमिंगपूलचा भलामोठा आकार पाहता आठदहाची पंधरासोळा झाली तरी दूरदूरच राहायची. मात्र एखादा मोठा ग्रूप आला की आम्ही बाहेर पडायचो आणि रूमवर बाथटबमध्ये डुंबायचो. तिथे मात्र तिन्ही टाळकी दाटीवाटीने चिकटून जायची.

जोक्स द अपार्ट, एके ठिकाणी मुलांना कॅमल द ऊंट दिसला. तिथे मात्र तुरळक गर्दी असूनही गाडी थांबवावी लागली आणि कॅमल राईड झाल्यावर फोटोसाठी मास्कही हटवावा लागला. शक्य झाल्यास तुम्ही असा प्रसंग टाळा. कॅमल जिथे दिसेल तिथून गाडी नेऊ नका किंवा मुलांचे लक्ष दुसरीकडे वळवा.

Pages