बराच काळ लॉकडाऊनचे सुख उपभोगल्यानंतर दोनचार दिवस कुठेतरी फिरून यायचे ठरवले. फारसा विचार न करता लोणावळा गाठले. काही जणांनी धोक्याची सूचना दिली, या काळात बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण घरच्यांना एका हवापालट रूटीनचेंज ब्रेकची गरज होती. म्हणून मग गेलो. कोरोनापासून बचाव म्हणून गर्दीच्या जागा टाळायच्या होत्या. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करायचा होता. ती काळजी घेतली. पण अखेर ज्याची कल्पनाही केली नव्हती ते झाले..
आज मायबोलीवर येऊन बघतो ते माझाच एक फेक आयडी बनला होता.
माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष
म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही. पण या काळात जे चारीत्र्यहनन व्हायचे होते ते झालेच.
कारण त्या आयडीने धागाही कुठला काढला होता तर - एक करोड बियरप्रेमींचा ग्रुप !
अख्ख्या मायबोलीला ठाऊक असेल की माझे अर्धे आयुष्य दारूला विरोध करण्यात गेले आहे. दारूची जाहीरातबाजी असो वा उदात्तीकरण मी त्याला नेहमीच विरोध करत आलो आहे. संधी मिळताच दारू हे कसे शरीराला घातक पेय आहे याची लोकांना वेळोवेळी आठवण करून देत असतो. आणि आज त्यालाच छेद द्यायला म्हणून कोणीतरी माझ्याच नावाचा आयडी घेत बीअरप्रेमींचा ग्रूप उघडला.
चारीत्र्यहननाची मी कधीच पर्वा केली नाही. याआधीही माझेच भासावे असे डुआयडी मी इथे पाहिले आहेत आणि ते अश्याच कारणांसाठी वापरले आहेत. म्हणजे ऋन्मेष कोणावर वैयक्तिका टिका करत नाही अशी त्याची इमेज आहे तर एखादा डुआयडी काढून एखाद्या चर्चेत त्याची बाजू घेत, त्याच्यावतीने शिवीगाळ करा आणि असे भासवा कि हा डुआयडी वापरून शिवीगाळ करतो. एखादा डुआयडी काढा आणि त्यातून उगाच माझे जुने धागे वर काढा, उगाचच आतिशयोक्ती भासावी अशी स्तुती करा, मग अजून एका डुआयडीने तो आधीचा माझाच डुआयडी असल्याची टिका करा. हे सर्व सोशलसाईटवर वर्षानुवर्षे होत आलेय, होत राहील. मी कधी त्याची पर्वा केली नाही, की कोणाला कसले स्पष्टीकरण द्यायला माझा वेळ खर्च केला नाही. ईतकेच नाही तर कोण कोणाचा डुआयडी आहे, त्यातला कोण माझ्यामागे हात धुवून वगैरे लागलाय हे देखील शोधायचा त्रास घेतला नाही. कारण हे सारे मिळून खरे तर माझेच मनोरंजनाचे दुकान चालवत होते. त्यांचा मी आभारीच आहे.
पण आज नाही ......
आज प्रश्न माझा नाही , माझ्या ईमेजचा नाही, किंवा माझ्या तत्वांचाही नाही..
आज प्रश्न दारूच्या उदात्तीकरणाचा आहे. या धाग्यामुळे कोणाला माझ्याबद्दल गैरसमज होत असेल तर त्याची मला पर्वा नाही, पण एक दारूला वाईट म्हणनारी व्यक्ती अखेर दारूच्या उदात्तीकरणाला बळी पडली असे यातून कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज वेळीच खोडून काढणे गरजेचे आहे. दारूला घातक पेय म्हणणारेही अखेर तिलाच मिठी मारतात असे कोणाला यामुळे वाटले तर त्यांना वेळीच हे असत्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे.
कोणाला तरी असा धागा काढावासा वाटला याचा एका दृष्टीने पाहता मला आनंदही झाला आहे. कारण माझ्या कार्याची दखल घेत कोणातरी मद्याचे उदात्तीकरण करणार्याला माझा असा काटा काढावासा वाटला हि त्या कार्याची एक पावतीच आहे. पण त्याचवेळी हा डाव उधळून लाऊन माझा वापर करून कोणी मद्याचे उदात्तीकरण करू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे म्हणून हा धागा.
ऋन्मेष हा एक वाह्यात ईन्सान आहे असे शंभरातल्या शंभर मायबोलीकरांना वाटले तरी वाटू द्या.
पण दारू हे एक वाह्यात पेय आहे हे शंभरातल्या किमान ९९ मायबोलीकरांना पटत नाही तो पर्यंत तरी मी नाही सुधारणार _/\_
धन्यवाद,
ऋन्मेष
आपण सगळयानी ऋन्मेष नाव घेतलं
आपण सगळयानी ऋन्मेष नाव घेतलं तर कसली भन्नाट मज्जा येईल
ढिम्म काही कळणार नाही
मधले एस मोजत शोधावे लागेल
एक ऋन्मेष लाख ऋन्मेष
एक ऋन्मेष लाख ऋन्मेष
एक कोटी ऋन्मेष नावाचे सदस्य झालेत पाहिजेत
आता काय कराइच फुडं? ऍडमिन
आता काय कराइच फुडं? ऍडमिन सायबना सांगा कोणीतरी.
ऋन्मेष अशी अवस्था
ऋन्मेष अशी अवस्था झाल्यासारखे वाटतेय का ?
यात ऋन्मेष आहे, माआयबोलीकर्स आहेत आणि टीकाकार सुद्धा अधून मधून येत आहेत.
शांत माणूस, आजवर हे गाणे
शांत माणूस, आजवर हे गाणे ईतक्यांदा ऐकलेले, गायलेले, पण आज पहिल्यांदा पाहिले. आणि त्यात दिलीप कुमार आहेत हे देखील पहिल्यांदाच समजले
आहे कि नाही पण या सिच्युएशनला
आहे कि नाही पण या सिच्युएशनला सूट एकदम ?
आमी काय सांगायचं रियल ऋन्मेषा
रिबुक आणि रिबूक आहे हे सी...
रिबूक आणि रीबूक आहे हे सी...
तो मद्याचा (ओन्ली बीअर) धागा
तो मद्याचा (ओन्ली बीअर) धागा उडायच्या आधी ऋन्मेषने तिथे आपले हे गार्हाणे मांडले असते तर दोन्हीही ऋन्मेष राहीले असते.
करोनाव्हायरसचे जसे व्हेरियंट
करोनाव्हायरसचे जसे व्हेरियंट येतात तसे ऋन्मेषचे व्हेरियंट येत आहेत. लस शोधा. ऋन्मेsssष हा ऋन्मेssष चा डेल्टा व्हेरियंट समजावा काय??
कोरोनाची लस घेतल्याने एका
कोरोनाची लस घेतल्याने एका आजीबाईला डोळे आले, एकाला ऐकू येऊ लागले, काहींच्या अंगाला घरातली ताट वाटं चिकटू लागली तर एकाला दूरदृष्टी आली. तेरा रे क्या होगा कालिया ?
सरदार, मैंने आपली गालिंया खाई
नेमका तोच धागा वाचायचा राहिला
नेमका तोच धागा वाचायचा राहिला. चक्चक्चक्चक्.
नाव दिसत होते पण उघडून वाचायचा आळस केला. शिर्षक वाचले तरी आत तेच तेच काहीतरी असणार असं वाटलं म्हणून.
आता हा धागा बघितल्यावर जीव चुकचुकला पार.
असे तडकाफडकी धागे उडतात का? मग त्या गलिच्छ कविता, उगीच टिंबवाले धागे कसे राहतात? आयडी पण उडतो का लगेच? कसा काय उडतो? लेखी तक्रार नोंदवावी लागते की नवीन धागा काढावा लागतो? आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी पण या सोयी आहेत का? फार प्रश्न पडलेत बाई.
मला बी तोच प्रश्न पडलाय. आता
मला बी तोच प्रश्न पडलाय. आता धागा काढावा लागन का?
काढु का रे ओरिजिनल ऋन्मेष? कोणच्या विषयावर काढु?
रूनमेश हाच अडमीन असेल तर?
रूनमेश हाच अडमीन असेल तर?
असली किरकोळ रूपे घेणे त्यांच्यासाठी अगदी सोपे असेल
अतुल. on 14 July, 2021 - 20
अतुल. on 14 July, 2021 - 20:29>> जबरी.
गंगाधर ही शक्तिमान है??
गंगाधर ही शक्तिमान है??
रूनमेश हाच अडमीन असेल तर? >>
रूनमेश हाच अडमीन असेल तर? >> छे, मी तर देव आहे
गुगल कॅचे मध्ये दिसतोय अजून
गुगल कॅचे मध्ये दिसतोय अजून धागा. पण प्रतिसाद दिसत नाहीयेत.
प्रतिसादांतच मज्जा होती. मापृ काका काय पेटलेले!!
मायबोलीवर अडमीन हाच देव असतो
मायबोलीवर अडमीन हाच देव असतो

थोडक्यात काय तर एक दिवस
थोडक्यात काय तर एक दिवस मायबोली वर प्रतिसाद द्यायचा नाही. आपली कोणाला आठवण येते का ते मधुनमधुन बघायचे. आणि मग आपल्या आयडी सारखाच दुसरा तोतया आयडी मैदानात उतरवायचा. आपल्या अधिकृत मताला छेद देईल असा धागा तोतयाच्या नावे आपणच काढायचा. जनता तुटुन पडली की मग 'तो मी नव्हेच, मी तर फिरायला गेलो होतो' असा कांगावा करत आपले चरित्र हरण झाल्याची आरोळी ठोकायची आणि नवा धागा काढायचा. पुराव्यासाठी पोरांना आवडतात म्हणुन पिकनिक स्पॉटवरची प्रसिध्द चिंचा, बोरं इ.ची दहा बारा हजारांची खरेदी केल्याची ठोकुन द्यायची. अशा प्रकारे प्रसिध्दीचा आपल्यावरुन हटणार नाही याची काळजी घेत चर्चा घडवुन आणायची.
*समाप्त*
पुराव्यासाठी पोरांना आवडतात
पुराव्यासाठी पोरांना आवडतात म्हणुन पिकनिक स्पॉटवरची प्रसिध्द चिंचा, बोरं इ.ची दहा बारा हजारांची खरेदी केल्याची ठोकुन द्यायची.
>>>>>>
अहो खरेच मी लोणावळ्याला गेलेलो आणि तिथे ईतक्या पैश्यांची नुसती खाऊची खरेदी झाली दोन्ही कुटुंबात मिळून. आमच्याकडे कुठेही फिरून आले भले गावाच्या वेशीवरच फिरून का आले असेना, तिथून खाऊ आणून चारचौघात वाटायची पद्धत आहे.
.
मग आपल्या आयडी सारखाच दुसरा तोतया आयडी मैदानात उतरवायचा.
>>>>
तो जर माझाच आयडी असेल असे आपल्याला वाटत असेल तर त्याचे मी काही करू शकत नाही.
कारण एखादी गोष्ट आपण केली आहे याचे पुरावे देऊ शकतो. पण एखादी गोष्ट आपण केली नाही याचे पुरावे देऊ शकत नाही. त्यामुळे मी जीवाला जास्त त्रास करून घेणार नाही.
बाकी लोणावळ्याचे फोटो हवेत तर सांगा, आज संध्याकाळीच फेसबूकवर टाकलेत
मायबोलीवर अडमीन हाच देव असतो
मायबोलीवर अडमीन हाच देव असतो Happy >>>>> आणि मी कुठेही गेलो तरी स्वतःलाच देव समजतो. त्यामुळे दुसर्या कुठल्या देवाला मानायची गरज पडत नाही. आपले जे काही भलेबुरे करायचे असते ती क्षमता आपल्याकडेच असते असे मला वाटते
आणि मी कुठेही गेलो तरी
आणि मी कुठेही गेलो तरी स्वतःलाच देव समजतो. त्यामुळे दुसर्या कुठल्या देवाला मानायची गरज पडत नाही. >>>>
हरी ओम !
आमचं काही म्हणणं नाही.
सगळे बुवाबाबाबाप्पूमहाराज स्वत:ला देवच समजतात.
रच्चाकने
भगवद्गीतेत कुठल्यातरी एका अध्यायात कृष्ण असाच मीमी करतो म्हणे !
तो वरचा डिपी फार सुरेख, गोड
तो वरचा डिपी फार सुरेख, गोड आहे.
आणि मी कुठेही गेलो तरी
आणि मी कुठेही गेलो तरी स्वतःलाच देव समजतो.>>>>
म्हणजे तो नाना पाटेकर आरशात बघून स्वतःची आरती करतो तसे का?
आणि देव समजतो हे स्वतःपुरते ठेव बाबा
नैतर सजवलेल्या मखरात जाऊन बसशील आणि दहा दिवसांनी वाजत गाजत समुद्रात नेऊन बुडवतील लोकं
आजकाल काही सांगता येत नाही
वीरू यांचा प्रतिसाद वाचला...
वीरू यांचा प्रतिसाद वाचला... विनोद आहे तर कोणत्या वाक्याला हसावे ते लिहिले असते तर बरे पडले असते...आरोप गंभीर केलाय आपण ... एमपथी नावाची गोष्ट विकत मिळत नाही हेच खरे..
तो जर माझाच आयडी असेल असे
तो जर माझाच आयडी असेल असे आपल्याला वाटत असेल >> इतक्यातच माझ्यावर इतक्या आयडींचा आरोप झाला की नंतर नंतर करमणूक करून घेतली.
च्रप्स तो विनोद नव्हता. ती
च्रप्स तो विनोद नव्हता. ती Conspiracy theory होती. ज्याला मराठीत षडयंत्र सिद्धांत असे म्हणतात. या कधी वाचायला रोचकही वाटतात. पण यातही कोणाचे ना कोणाचे पुराव्याशिवाय चारीत्र्यहनन होत राहते
म्हणजे तो नाना पाटेकर आरशात
म्हणजे तो नाना पाटेकर आरशात बघून स्वतःची आरती करतो तसे का?
>>>
नाना पाटेकर असा करतो. हि नवीनच माहिती आहे माझ्यासाठी
पण करू दे की. जवळपास ९० टक्के जनता आरश्यात बघून स्वत:चे सौंदर्य कौतुकाने न्याहाळत असते आणि फ्रंट कॅमेरा ऑन करून स्वत:चेच फोटो म्हणजे सेल्फी काढत असते.
Pages