बराच काळ लॉकडाऊनचे सुख उपभोगल्यानंतर दोनचार दिवस कुठेतरी फिरून यायचे ठरवले. फारसा विचार न करता लोणावळा गाठले. काही जणांनी धोक्याची सूचना दिली, या काळात बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण घरच्यांना एका हवापालट रूटीनचेंज ब्रेकची गरज होती. म्हणून मग गेलो. कोरोनापासून बचाव म्हणून गर्दीच्या जागा टाळायच्या होत्या. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करायचा होता. ती काळजी घेतली. पण अखेर ज्याची कल्पनाही केली नव्हती ते झाले..
आज मायबोलीवर येऊन बघतो ते माझाच एक फेक आयडी बनला होता.
माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष
म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही. पण या काळात जे चारीत्र्यहनन व्हायचे होते ते झालेच.
कारण त्या आयडीने धागाही कुठला काढला होता तर - एक करोड बियरप्रेमींचा ग्रुप !
अख्ख्या मायबोलीला ठाऊक असेल की माझे अर्धे आयुष्य दारूला विरोध करण्यात गेले आहे. दारूची जाहीरातबाजी असो वा उदात्तीकरण मी त्याला नेहमीच विरोध करत आलो आहे. संधी मिळताच दारू हे कसे शरीराला घातक पेय आहे याची लोकांना वेळोवेळी आठवण करून देत असतो. आणि आज त्यालाच छेद द्यायला म्हणून कोणीतरी माझ्याच नावाचा आयडी घेत बीअरप्रेमींचा ग्रूप उघडला.
चारीत्र्यहननाची मी कधीच पर्वा केली नाही. याआधीही माझेच भासावे असे डुआयडी मी इथे पाहिले आहेत आणि ते अश्याच कारणांसाठी वापरले आहेत. म्हणजे ऋन्मेष कोणावर वैयक्तिका टिका करत नाही अशी त्याची इमेज आहे तर एखादा डुआयडी काढून एखाद्या चर्चेत त्याची बाजू घेत, त्याच्यावतीने शिवीगाळ करा आणि असे भासवा कि हा डुआयडी वापरून शिवीगाळ करतो. एखादा डुआयडी काढा आणि त्यातून उगाच माझे जुने धागे वर काढा, उगाचच आतिशयोक्ती भासावी अशी स्तुती करा, मग अजून एका डुआयडीने तो आधीचा माझाच डुआयडी असल्याची टिका करा. हे सर्व सोशलसाईटवर वर्षानुवर्षे होत आलेय, होत राहील. मी कधी त्याची पर्वा केली नाही, की कोणाला कसले स्पष्टीकरण द्यायला माझा वेळ खर्च केला नाही. ईतकेच नाही तर कोण कोणाचा डुआयडी आहे, त्यातला कोण माझ्यामागे हात धुवून वगैरे लागलाय हे देखील शोधायचा त्रास घेतला नाही. कारण हे सारे मिळून खरे तर माझेच मनोरंजनाचे दुकान चालवत होते. त्यांचा मी आभारीच आहे.
पण आज नाही ......
आज प्रश्न माझा नाही , माझ्या ईमेजचा नाही, किंवा माझ्या तत्वांचाही नाही..
आज प्रश्न दारूच्या उदात्तीकरणाचा आहे. या धाग्यामुळे कोणाला माझ्याबद्दल गैरसमज होत असेल तर त्याची मला पर्वा नाही, पण एक दारूला वाईट म्हणनारी व्यक्ती अखेर दारूच्या उदात्तीकरणाला बळी पडली असे यातून कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज वेळीच खोडून काढणे गरजेचे आहे. दारूला घातक पेय म्हणणारेही अखेर तिलाच मिठी मारतात असे कोणाला यामुळे वाटले तर त्यांना वेळीच हे असत्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे.
कोणाला तरी असा धागा काढावासा वाटला याचा एका दृष्टीने पाहता मला आनंदही झाला आहे. कारण माझ्या कार्याची दखल घेत कोणातरी मद्याचे उदात्तीकरण करणार्याला माझा असा काटा काढावासा वाटला हि त्या कार्याची एक पावतीच आहे. पण त्याचवेळी हा डाव उधळून लाऊन माझा वापर करून कोणी मद्याचे उदात्तीकरण करू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे म्हणून हा धागा.
ऋन्मेष हा एक वाह्यात ईन्सान आहे असे शंभरातल्या शंभर मायबोलीकरांना वाटले तरी वाटू द्या.
पण दारू हे एक वाह्यात पेय आहे हे शंभरातल्या किमान ९९ मायबोलीकरांना पटत नाही तो पर्यंत तरी मी नाही सुधारणार _/\_
धन्यवाद,
ऋन्मेष
@ आशूचँप
@ आशूचँप
कालभैरव मंदिरात नाहीयेत निर्बंध
तिथे नैवेद्य मद्याचा दाखवला जातो
>>>>>
व्हाई नॉट ऑल मंदीर? मद्य अपवित्र समजले जाते आणि देवांपासून दूर ठेवले जाते, आणि हे तुम्हीही मानता हे मान्य करायला काय अडचण आहे
तुम्ही काही वाचत वगैरे असाल यावर विश्वास नाही बसत
>>>
तुमचे प्रतिसाद वाचतो. मायबोलीवरचे धागे वाचतो. लोकांचे चेहरे वाचतो. बायकांच्या मनातले वाचतो. अजून काय हवेय आयुष्यात..
या धाग्यावर ७५ टक्के प्रतीसाद
या धाग्यावर ७५ टक्के प्रतीसाद ऋन्मेष चेच आहेत. Proud
>>>>>>>
म्हणजे जिद्दू, वीरू, आशूचॅप, शांत माणूस, च्रप्स हे सारे माझे डू आयडी आहेत का?
कारण यांना जोडल्याशिवाय ७५ टक्के होणार नाहीत.
बोकलत रिसर्च करतायत तुमच्या
बोकलत रिसर्च करतायत तुमच्या ड्यु आयडी बद्धल... त्यांना मी विनंती करतो एक धागा काढावा त्यांनी..
तुम्ही धागे काढते रहो, हम
तुम्ही धागे काढते रहो, हम तुम्हारे साथ है. तेरी-मेरी यारी फिर *** गेली दुनियादारी. देवाची कृपा राहिली तर रात्रीत आपण ३०० क्रॉस करू.
दुनियादारीत स्वप्नील व सई
दुनियादारीत स्वप्नील व सई आहेत विसरू नका...
व्हाई नॉट ऑल मंदीर
व्हाई नॉट ऑल मंदीर
तो त्या देवळांचा प्रश्न आहे, तुमच्या माहीतीसाठी जवळपास सगळे देव सुरापान करणारे होते. देवाचा राजा इंद्र हा तर त्यासाठी प्रसिद्ध होता
आता त्यांच्या मंदिरात का नाही चालत मद्य हे पुजारी लोकांना विचारा बुवा
मला दारु पिण्यासाठी माझं घर आहे त्यामुळे उगाच मद्य देवळातच जाऊनच घेतल पाहीजे असा माझा अट्टाहास नाही
जिथे जे नियम आहे ते मी साधारणपणे पाळतो
मध्ये साउथ च्या मंदीरात त्यांनी खाली धोतर किंवा लुंगी आणि वर उघडे असा नियम केल्यामुळे तसे जावे लागले. आता मी काय वाद नाही घातला की टीशर्ट अपवित्र कसा आणि तो का देवापासून लांब ठेवता
या धाग्यावर ७५ टक्के प्रतीसाद
या धाग्यावर ७५ टक्के प्रतीसाद ऋन्मेष चेच आहेत. >> 'या' ? तो असलेल्या कुठल्याही धाग्याबाबत ते सत्य आहे आजकाल.
तुम्ही काही वाचत वगैरे असाल यावर विश्वास नाही बसत
>>>
तुमचे प्रतिसाद वाचतो. मायबोलीवरचे धागे वाचतो. लोकांचे चेहरे वाचतो. बायकांच्या मनातले वाचतो. अजून काय हवेय आयुष्यात.. >> पुस्तक वाचणे ! सगळि नकोत, फक्त एकच , कुठले ते तुला माहित आहेच
आशुचँप तुम्ही अजूनही
आशुचँप तुम्ही अजूनही मंदीराबद्दलच बोलत आहात. चला ते मंदीर चालवणारे वा तिथे जाणारे वा त्या देवांना मानणारे दारूला अपवित्र समजत असतील म्हणून बनवले असतील नियम
पण तुम्ही घरच्या देवाबाबत, घरच्या पूजेबाबत काय यावर अजूनही स्पष्टपणे काहीच बोलत नाही आहात.
असो, सोडूया आपण हा विषय
म्हणजे जिद्दू, वीरू, आशूचॅप,
म्हणजे जिद्दू, वीरू, आशूचॅप, शांत माणूस, च्रप्स हे सारे माझे डू आयडी आहेत का? >>> आता हा सहावा सातवा आरोप होईल. इतक्या विविध व्यक्तीमत्वांचा मी ड्युआयडी असेन तर मला चक्कर येईल किंवा कुठेतरी ज्योतिषाकडे जाऊन यातला मी नेमका कुणाचा ड्युआयडी हा प्रश्न विचारावा लागेल.
ऋन्मेष चा ड्युआयडीचा आरोप होणे हे कमी तापदायक आहे.
हेमांगी कवी चा विषय नको हे
हेमांगी कवी चा विषय नको हे यासाठी म्हटले की सोशल मीडीयात विषय छेडून खूप मोठी क्रांती होते असे मला वाटत नाही. त्यात आंबटशौकीनांना फुकटच संधी मिळते. असे विषय संघटनेचं काम उभारून त्यातून जागृती करून पुढे जाऊ शकतात. पुरूषांना नक्की सहभागी करून घ्यावं. पण गल्ली मीटिंग्ज, वॉर्ड मीटींग्ज अशा पद्धतीने जागृती घडवून. सोशल मीडीयात टॅब्यु विषय घ्यावेत कि घेऊ नये या विषयापेक्षा परिणाम घडवून आणणे जास्त महत्वाचे.
पण तुम्ही घरच्या देवाबाबत,
पण तुम्ही घरच्या देवाबाबत, घरच्या पूजेबाबत काय यावर अजूनही स्पष्टपणे काहीच बोलत नाही आहात.>>>>>
देव सर तुम्हाला चष्मा लागलाय
वाचा पाहू माझे प्रतिसाद परत
फक्त सोयिस्कर मुद्द्यांना उत्तर द्यायला मी काय ऋन्मेष आहे काय
फक्त सोयिस्कर मुद्द्यांना
फक्त सोयिस्कर मुद्द्यांना उत्तर द्यायला मी काय ऋन्मेष आहे काय
>>>
जी देतो ती सुद्धा तुम्हा लोकांना जास्त वाटतात
असो, देव आणि मद्य - पवित्र की अपवित्र - वगैरे पुन्हा कधीतरी नवा धागा काढू फुरसतीत. हा महत्वाचा धागा भरकटायला नको.
ऋन्मेष चा ड्युआयडीचा आरोप
ऋन्मेष चा ड्युआयडीचा आरोप होणे हे कमी तापदायक आहे. >>> धन्यवाद शांत माणूस
मलाही पुढचा जन्म काय घ्यायचा हा चॉईस देवाने दिला तर मी ऋन्मेषचा डुआयडी म्हणूनच जन्म घेईन 
पुस्तक वाचणे ! सगळि नकोत,
पुस्तक वाचणे ! सगळि नकोत, फक्त एकच , कुठले ते तुला माहित आहेच Lol
>>>>>
सचिनचे... तो पण एक देव आहे.. शॅम्पेन पिणारा
वरच्या फोटोतून आरोपी
वरच्या फोटोतून आरोपी केव्हातरी कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये गेला होता एवढंच सिद्ध होतंय. अलॅबाय सिद्ध होण्यासाठी चिक्कीवाल्याकडून बारा हजार रुपयांची चिक्की घेतल्याची रिसिट (तारखेसहित) अपलोड करण्यात यावी.
>>>>>>
तीन वेगवेगळ्या ठिकाणी घेतली.
एक ते मॅप्रो गार्डनला गेलेलो तिथे लुटमार केली. मग एक हॉटेलच्या जवळच्या एका शॉपला. मग जाताना रस्त्यात गाडी थांबवून.
एकाचेही पैसे मी माझ्या खिशातून थेट दिले नसल्याने पावती वगैरे प्रोड्यूस करू शकत नाही.
खर्च सासुरवाडीने केला होता सारा. घरी परतल्यावर अर्धा अर्धा हिशोब करताना लक्षात आले की या चिक्की खरेदीचा माझ्या वाट्याला सहा हजाराचा तंबाखू लागला.
माझ्या वाट्याला सहा हजाराचा
माझ्या वाट्याला सहा हजाराचा तंबाखू लागला.
>>Lol
माबोची अतिसवय लागलेला मानुस
माबोची अतिसवय लागलेला मानुस चंद्रावर गेला तरी सवड काढुन माबो चेक करुन पाहिल. मग पिकनिक स्पॉटवरुन तोतया आयडीच्या नावे लेख लिहिणे फार अवघड नाही.>>> एग्झॅक्ट्लीईईईईईई. थँक्यू वीरू सर माझा टाईम वाचवल्या बद्दल.
बाय द वे, आम्ही ही लोणावळ्याला याच हॉटेलात होतो २०१९ ला
कल शब मुझे बे- शक्ल सी आवाज
कल शब मुझे बे- शक्ल सी आवाज ने चौंका दियां
मैने कहां, तू कौन है, उसने कहा आवारगी....
बाय द वे, आम्ही ही
बाय द वे, आम्ही ही लोणावळ्याला याच हॉटेलात होतो २०१९ ला Lol

>>>>
अरे वाह मस्त, कोणाशी विचार जुळो न जुळो पण आचार जुळतात तेव्हा मला फार आनंद होतो
बहुतांश स्टाफ मराठीच असल्याने मला फार सोयीचे पडले. अन्यथा आमचे घरवाले ऊगाचच जिथे तिथे ईंग्लिश बोलत सुरुवात करतात त्यात माझी उगाच अडचण होते
त्यात सर्विस फार वा घरच्यांच्या अपेक्षेपेक्षा स्लो असल्याने ते चिडलेले. नंतर चौकशी करता समजले की कोरोनामुळे स्टाफ कमी आहे पण हॉटेल फुल्ल. मग म्हटले आपलीच चुकी आहे जे फुकटफाकट गर्दी करून बसलो आहोत.
सोमवारी आम्ही एक्स्ट्रा दिवस वाढवला तेव्हा दुपारी गर्दी लुप्त झालेली दिसली आणि मग साक्षात्कार झाला की या कोरोनाकाळात वीकडेजला फिरायचा प्लान बनवायला हवा. दोन दिवस पदरची सुट्टी टाकावी लागेल, पण ते ठिक आहे. प्रायोरीटी कोरोनापासून बचाव हेच हवे.
बाकी लोणावळ्याच्या हॉटेलबद्दल चर्चा करायला एक धागा काढायला हवा. मायबोलीवरची बहुधा निम्मी जनता मुंबई-पुणे येथील असल्याने बरेच जणांना फायदेशीर ठरेल.
हे हॉटेल केशरी रंगाच्या
हे हॉटेल केशरी रंगाच्या रेशनकार्डधारकांसाठी मोफत आहे. तसेच इथे खरेदी केलेली चिक्कीही मोफत आहे. मर्यादा रू सहा हजार पर्यंत एका रेशनकार्डावर. ( हॉटेल माझेच असल्याने माहीत आहे).
अयायायाया !!
अयायायाया !!

हे हॉटेल केशरी रंगाच्या
हे हॉटेल केशरी रंगाच्या रेशनकार्डधारकांसाठी मोफत आहे. >> माझ्याकडे रेशनकार्ड नाही पण आधारकार्ड आहे. त्याच्यावर काही discount मिळेल का?
आणि नंतर जर मी धागा काढुन हॉटेलचे फोटोबिटो टाकले तर आणखी काही सवलत (चिक्की वगैरे) मिळु शकेल का?
माझा एक मित्र आणि त्याचे
माझा एक मित्र आणि त्याचे मित्र बाईकवरून बेंगलोर ते लोणावळा प्लान करताएत.
मलाही थोडी माहिती मिळु शकेल का?
(सीरीयसली विचारतेय,गंमत नाही)
बंगलोरहुन, बंदिपूर, कुर्ग,
बंगलोरहुन, बंदिपूर, कुर्ग, कोडाई कनाल, मुन्नार, केरळची अजून कितीतरी ठिकाणे सोडून ते लोणावळा का जात आहेत?
की ते सर्व अनेकवेळा बघून कंटाळलेत आणि एक साधीशी ट्रिप करायचीय त्यांना?
आणि एक साधीशी ट्रिप करायचीय
आणि एक साधीशी ट्रिप करायचीय त्यांना?
>>>
लोणावळा साधीशी ट्रिप ???
बाकी लोणावळ्याच्या हॉटेलबद्दल
बाकी लोणावळ्याच्या हॉटेलबद्दल चर्चा करायला एक धागा काढायला हवा. मायबोलीवरची बहुधा निम्मी जनता मुंबई-पुणे येथील असल्याने बरेच जणांना फायदेशीर ठरेल.>> ववि ठरव आणि हजेरी लाव. कदाचित अशा कार्यक्रमांना हजेरी लावणारा पहिला ड्युआय असा मान मिळेल.
काय काय आहे लोणावळ्याच्या
मानव, ती सगळी ठिकाणं बघून झालीएत त्यांची.
काय काय आहे लोणावळ्याच्या आसपास पाहण्यासारखे?
मी फक्त भुशी डैम पाहिले आहे आणि चिक्क्ंयाची दुकाने.
ते पुतळ्यांचे संग्रहालय आहे
ते पुतळ्यांचे संग्रहालय आहे की मादाम तुसां सारखे. स्वामी समर्थांचा मठ आहे. डोंगर दर्यातुन भटकंती आहे. लोक आपले सारखे त्या भुशी डॅम वर जाऊन नाचतात.
https://www.tripadvisor.in
https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g608474-d10061057-Reviews-L...
https://www.tripadvisor.in
https://www.tripadvisor.in/Attractions-g608474-Activities-Lonavala_Pune_...
Pages