बराच काळ लॉकडाऊनचे सुख उपभोगल्यानंतर दोनचार दिवस कुठेतरी फिरून यायचे ठरवले. फारसा विचार न करता लोणावळा गाठले. काही जणांनी धोक्याची सूचना दिली, या काळात बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण घरच्यांना एका हवापालट रूटीनचेंज ब्रेकची गरज होती. म्हणून मग गेलो. कोरोनापासून बचाव म्हणून गर्दीच्या जागा टाळायच्या होत्या. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करायचा होता. ती काळजी घेतली. पण अखेर ज्याची कल्पनाही केली नव्हती ते झाले..
आज मायबोलीवर येऊन बघतो ते माझाच एक फेक आयडी बनला होता.
माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष
म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही. पण या काळात जे चारीत्र्यहनन व्हायचे होते ते झालेच.
कारण त्या आयडीने धागाही कुठला काढला होता तर - एक करोड बियरप्रेमींचा ग्रुप !
अख्ख्या मायबोलीला ठाऊक असेल की माझे अर्धे आयुष्य दारूला विरोध करण्यात गेले आहे. दारूची जाहीरातबाजी असो वा उदात्तीकरण मी त्याला नेहमीच विरोध करत आलो आहे. संधी मिळताच दारू हे कसे शरीराला घातक पेय आहे याची लोकांना वेळोवेळी आठवण करून देत असतो. आणि आज त्यालाच छेद द्यायला म्हणून कोणीतरी माझ्याच नावाचा आयडी घेत बीअरप्रेमींचा ग्रूप उघडला.
चारीत्र्यहननाची मी कधीच पर्वा केली नाही. याआधीही माझेच भासावे असे डुआयडी मी इथे पाहिले आहेत आणि ते अश्याच कारणांसाठी वापरले आहेत. म्हणजे ऋन्मेष कोणावर वैयक्तिका टिका करत नाही अशी त्याची इमेज आहे तर एखादा डुआयडी काढून एखाद्या चर्चेत त्याची बाजू घेत, त्याच्यावतीने शिवीगाळ करा आणि असे भासवा कि हा डुआयडी वापरून शिवीगाळ करतो. एखादा डुआयडी काढा आणि त्यातून उगाच माझे जुने धागे वर काढा, उगाचच आतिशयोक्ती भासावी अशी स्तुती करा, मग अजून एका डुआयडीने तो आधीचा माझाच डुआयडी असल्याची टिका करा. हे सर्व सोशलसाईटवर वर्षानुवर्षे होत आलेय, होत राहील. मी कधी त्याची पर्वा केली नाही, की कोणाला कसले स्पष्टीकरण द्यायला माझा वेळ खर्च केला नाही. ईतकेच नाही तर कोण कोणाचा डुआयडी आहे, त्यातला कोण माझ्यामागे हात धुवून वगैरे लागलाय हे देखील शोधायचा त्रास घेतला नाही. कारण हे सारे मिळून खरे तर माझेच मनोरंजनाचे दुकान चालवत होते. त्यांचा मी आभारीच आहे.
पण आज नाही ......
आज प्रश्न माझा नाही , माझ्या ईमेजचा नाही, किंवा माझ्या तत्वांचाही नाही..
आज प्रश्न दारूच्या उदात्तीकरणाचा आहे. या धाग्यामुळे कोणाला माझ्याबद्दल गैरसमज होत असेल तर त्याची मला पर्वा नाही, पण एक दारूला वाईट म्हणनारी व्यक्ती अखेर दारूच्या उदात्तीकरणाला बळी पडली असे यातून कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज वेळीच खोडून काढणे गरजेचे आहे. दारूला घातक पेय म्हणणारेही अखेर तिलाच मिठी मारतात असे कोणाला यामुळे वाटले तर त्यांना वेळीच हे असत्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे.
कोणाला तरी असा धागा काढावासा वाटला याचा एका दृष्टीने पाहता मला आनंदही झाला आहे. कारण माझ्या कार्याची दखल घेत कोणातरी मद्याचे उदात्तीकरण करणार्याला माझा असा काटा काढावासा वाटला हि त्या कार्याची एक पावतीच आहे. पण त्याचवेळी हा डाव उधळून लाऊन माझा वापर करून कोणी मद्याचे उदात्तीकरण करू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे म्हणून हा धागा.
ऋन्मेष हा एक वाह्यात ईन्सान आहे असे शंभरातल्या शंभर मायबोलीकरांना वाटले तरी वाटू द्या.
पण दारू हे एक वाह्यात पेय आहे हे शंभरातल्या किमान ९९ मायबोलीकरांना पटत नाही तो पर्यंत तरी मी नाही सुधारणार _/\_
धन्यवाद,
ऋन्मेष
मी फक्त दुसरी शक्यता मांडली.
मी फक्त दुसरी शक्यता मांडली. >>> बहुधा हे आपले चुकले. आपण फक्त दुसरीच शक्यता मांडली
अजून एक म्हणजे वरच्या स्पष्टीकरण्याच्या पोस्टमध्ये श्री च्रप्स असे न लिहीता श्री अबक असे लिहीता आले असते. म्हणजे मला तरी हे योग्य वाटते अन्यथा समोरचा पुन्हा आपली पोस्ट पर्सनली घेऊ शकतो
वीरू म्हणत आहे अगदी तश्शीच
वीरू म्हणत आहे अगदी तश्शीच शक्यता माझ्या ही डोक्यात आली होती.
>
अखेर तुम्ही मला ते करायला लावणार जे ईतका वेळ मी टाळत होतो
खालील फोटोत आम्ही थांबलेले
खालील फोटोत आम्ही थांबलेले हॉटेल, हॉटेलातून दिसणारा लोणावळा आणि तिथली माझी उपस्थिती चेक करू शकता.
पण कृपया करून पिडीताचेच आणखी चारीत्र्यहनन करू नका.
.
.
बहुधा हे आपले चुकले. आपण फक्त
बहुधा हे आपले चुकले. आपण फक्त दुसरीच शक्यता मांडली >> एक्साटली माय पॉईंट माय लॉर्ड...
अजून एक म्हणजे वरच्या स्पष्टीकरण्याच्या पोस्टमध्ये श्री च्रप्स असे न लिहीता श्री अबक असे लिहीता आले असते. म्हणजे मला तरी हे योग्य वाटते अन्यथा समोरचा पुन्हा आपली पोस्ट पर्सनली घेऊ शकतो
>> आणि अबक नावाचा आयडी असेल तर?
दारू आणि देव एकाच पंक्तीत बसत
दारू आणि देव एकाच पंक्तीत बसत नाही हेच आपल्याला यातून दर्शवायचे होते.>>>>
डोक्यावर जोरदार हाफटी खाल्ली आहे का सर तुम्ही
मी असं कधी म्हणालो
देव व्यवस्थित पीत होते दारू
राम सीते पासून, त्याचे उल्लेख संदर्भसहित इथेच मायबोली वर लेखात लिहिले आहेत
शोधले तर सापडतील तुम्हाला
मी मंदिरात पिणार नाही कारण तिथे काही नियम आहेत
तसेच मी मग तुमच्या घरीही नाही पिणार कधो ना ऑफिस मध्ये
ते अपवित्र आहे म्हणून नाही तर काही सामाजिक संकेत आणि लोकांच्या मताचा आदर म्हणून तेवढं नक्कीच तुम्हाला कळत असेल अशी आशा करतो किंवा कळलं आहे असे दाखवण्यासचा प्रयत्न कराल
मला घरी हाफचड्डी घालून उघड्याने बसायला आवडतं म्हमून मी देवळात किंवा बाहेर तसाच जाणार नाही
असो तुम्ही तुमचा मुद्दा सिद्ध करायला यातही फाटे फोडणारे हे माहिती आहेच
त्यामुळे लवकर बरे व्हा सर
आजार विकोपाला जाण्याआधी उपचार करून घ्या
पण कृपया करून पिडीताचेच आणखी
पण कृपया करून पिडीताचेच आणखी चारीत्र्यहनन करू नका.>>
फिरायला जाणे हा गौण मुद्दा आहे साहेब.
माबोची अतिसवय लागलेला मानुस चंद्रावर गेला तरी सवड काढुन माबो चेक करुन पाहिल. मग पिकनिक स्पॉटवरुन तोतया आयडीच्या नावे लेख लिहिणे फार अवघड नाही.
आता कृपा करुन या प्रतिसादातुन तुमचे चरित्रहरण झाले असा निष्कर्ष काढु नका.
मी फक्त दुसरी शक्यता मांडली.
मी फक्त दुसरी शक्यता मांडली. >>> बहुधा हे आपले चुकले. आपण फक्त दुसरीच शक्यता मांडली>> सर आपण आपला धागा पुन्हा एकदा मन लावुन वाचावा ही नम्र विनंती. पहिली शक्यता मांडुनच आपण आपले चरित्रहरण झाले असे म्हणत आहात. या ष्टोरीची दुसरी बाजुपण असु शकते हा पॉइन्ट विचारात घेऊनच मी दुसरी शक्यता मांडली.
असो.. आपले पुन्हापुन्हा चरित्रहरण होत आहे असा आपला गैरसमज होऊ शकतो, म्हणुन मी थांबतो.
पण कृपया करून पिडीताचेच आणखी
पण कृपया करून पिडीताचेच आणखी चारीत्र्यहनन करू नका.
पिडीता ???????रियली
(No subject)
पीडीत व्यक्तीचे असे म्हणायचे
पीडीत व्यक्तीचे असे म्हणायचे असेल. पीडीतेचे असे नाही म्हटलेले.
माझ्या मते धागालेखकाचा आपण फिरायला कुठे गेलो होतो हे सांगण्याचा हेतू असावा. तो साध्य झाला आहे.
@ आशूचँप
@ आशूचँप
राम सीते पासून, त्याचे उल्लेख संदर्भसहित इथेच मायबोली वर लेखात लिहिले आहेत
शोधले तर सापडतील तुम्हाला
>>>>>
सॉरी... राम तर राम, सीता देखील दारू प्यायची? रामायणातली? दारूचे उदात्तीकरण करायला एवढा मोठा बॉम्ब?
मी जेवढे रामायण पाहिले, वाचले त्यात मला हे नाही सापडले कधी.
.
मी मंदिरात पिणार नाही कारण तिथे काही नियम आहेत
>>>
जर आपल्या म्हणण्यानुसार रामसीताच मद्यप्राशन करायचे तर मंदीरात मद्यप्राशन करायला निर्बंध का आहेत?
चहा तर पिऊ शकतो मी, किंबहुना प्यायलो आहे बरेचदा.
.
ते अपवित्र आहे म्हणून नाही तर काही सामाजिक संकेत आणि लोकांच्या मताचा आदर म्हणून
>>>
मी वर घरच्या देवघरात प्याल का? पूजेच्या प्रसादाला, देवाच्या नैवेद्याला, घरच्या देव्हार्यात दारू ठेवाल का? असेही विचारले आहे, त्याचे उत्तर यात नाही दिलेत. तिथे तर तुमचे नियम तुम्ही स्वतः बनवू शकता ना
असो, हे अवांतर होत असेल, तर मी वेगळा धागा काढतो.
@पिडीता?,
@पिडीता?,
पिडीत व्यक्तीचे, पिडीत माणसाचे, पिडीत आयडीचे याला एका शब्दात पिडीताचेच म्हणणार ना? की पिडीतचे म्हणणार की आणखी काही? चुकत असेल तर सुधारा प्लीज
ऋन्मेष, हेमांगी कवीला फार
ऋन्मेष, हेमांगी कवीला फार ट्रोल केलं जातय सोशल मीडियात सध्या. त्यावर एखादा धागा ?
१. पिडीत.... जनरली पुल्लिंग
१. पिडीत.... जनरली पुल्लिंग
२. पिडीता....जनरली स्रीलिंग
धाग्याचा हेतू सफल झालेला आहे.
धाग्याचा हेतू सफल झालेला आहे. फोटो पोस्ट झाले आहेत. बघून घ्या.
सचिन पिळगावकर,स्वप्निल जोशी इ. मंडळी आपणांस इतकी का प्रिय आहेत हे कळले. सोsssहम.
माबोची अतिसवय लागलेला मानुस
माबोची अतिसवय लागलेला मानुस चंद्रावर गेला तरी सवड काढुन माबो चेक करुन पाहिल. मग पिकनिक स्पॉटवरुन तोतया आयडीच्या नावे लेख लिहिणे फार अवघड नाही.
>>>
चंद्रावर काय सुर्यावर गेलो तरी मी त्या धगधगत्या प्रकाशात लाल गॉगल लाऊन मायबोली उघडेन

पण पिकनिकला मुलांसोबत गेलेलो. आणि त्यांच्यासोबत असताना मायबोली, ऑफिस, ईतर सारे छंद, व्यसने शून्य होऊन जातात,. कारण मला त्यांचा बेबीसीटर म्हणूनच पिकनिकला नेतात. त्यामुळे चोवीस तास ऑन ड्युटी असतो. मायबोली तर दूरची गोष्ट, साधा क्रिकेटचा स्कोअर बघत नाही मी
ऋन्मेष, हेमांगी कवीला फार
ऋन्मेष, हेमांगी कवीला फार ट्रोल केलं जातय सोशल मीडियात सध्या. त्यावर एखादा धागा ?
>>>>
यप्स, मी तिच्या बाजूने आहे
आज सकाळीच विचार केलेला यावर धागा काढायचा. पण मायबोलीवर या विषयावर घाईघाईत धागा काढायला नको म्हणून थांबलो.
१. पिडीत.... जनरली पुल्लिंग
१. पिडीत.... जनरली पुल्लिंग
२. पिडीता....जनरली स्रीलिंग
>>>>
हे माहीत आहे
पण पिडीतला म्हणणार की पिडीताला? मला वाटते दोघांसाठी पिडीताला असेच म्हटले जात असावे.
'एका पक्ष्याचे वृक्षांतर'
'एका पक्ष्याचे वृक्षांतर' धागा का उडाला? मी मस्त कविता शोधून लिहीली आणि अचानक पान सापडत नाही एरर आली. भाऊं नी लिहीलेली कथा छान होती की.
'एका पक्ष्याचे वृक्षांतर'
'एका पक्ष्याचे वृक्षांतर' धागा का उडाला? >>>>>> माझ्या नावात पुन्हा हलकासा फरक करून काढलेला आयडी होता तो. बहुधा आयडीही उडाला असावा. धन्यवाद अॅडमिन, मी तक्रार करायचे टाळले होते, पण योग्य केलेत.
ओह बाप रे!! काय त्रास देतात
ओह बाप रे!! काय त्रास देतात ना.
वरच्या फोटोतून आरोपी
वरच्या फोटोतून आरोपी केव्हातरी कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये गेला होता एवढंच सिद्ध होतंय. अलॅबाय सिद्ध होण्यासाठी चिक्कीवाल्याकडून बारा हजार रुपयांची चिक्की घेतल्याची रिसिट (तारखेसहित) अपलोड करण्यात यावी. किंवा रिसॉर्टच्या बिलाची कॉपीही चालेल.
दुसरे म्हणजे अॅडमिनकडे दुसर्या ॠ चा आयपी अॅड्रेस असेलच. त्यावरून तो धागा लोणावण्याहून पोस्ट झाला होता का इतर ठिकाणावरून हे सहज शोधून काढता येईल.
जोपर्यंत हे पुरावे दिले जात नाहीत तोवर 'गंगाधर ही शक्तिमान है' हे डिसप्रूव्ह होत नाही.
(मी फक्त बचावपक्षाच्या युक्तीवादामधल्या गॅप्स दाखवून देत आहे)
या धाग्यावर ७५ टक्के
या धाग्यावर ७५ टक्के प्रतीसाद ऋन्मेष चेच आहेत.
मी चिन्मयी
सही !
जिद्दुच्या फोटोने चार चांद
जिद्दुच्या फोटोने चार चांद लावलेत.
ऋन्मेष, हेमांगी कवीला फार
ऋन्मेष, हेमांगी कवीला फार ट्रोल केलं जातय सोशल मीडियात सध्या. त्यावर एखादा धागा ?
>>>>
कोण हेमांगी कवी?? काय ट्रोलिंग चालू आहे?
मी वर घरच्या देवघरात प्याल का
मी वर घरच्या देवघरात प्याल का? पूजेच्या प्रसादाला, देवाच्या नैवेद्याला, घरच्या देव्हार्यात दारू ठेवाल का? असेही विचारले आहे, त्याचे उत्तर यात नाही दिलेत. तिथे तर तुमचे नियम तुम्ही स्वतः बनवू शकता ना Happy>>>>
हो अगदीच
या एकदा तिर्थप्रासादाला दाखवीन मज्जा
हे मंदिर वाल्याना विचार ना
रच्याकने कालभैरव मंदिरात नाहीयेत निर्बंध
तिथे नैवेद्य मद्याचा दाखवला जातो
जेवढे रामायण पाहिले, वाचले त्यात मला हे नाही सापडले कधी.>>
टीव्ही वर पाहिले असे म्हणा हो
तुम्ही काही वाचत वगैरे असाल यावर विश्वास नाही बसत
आणि टीव्हीवर दाखवले नाही म्हणजे ते नाहीच असे का
मी सांगितले की मायबोलीवर धागा आहे तो शोधा आणि वाचा
ऋन्मेष, हेमांगी कवीचा विषय
ऋन्मेष, हेमांगी कवीचा विषय मायबोलीवर नको.
ऋन्मेष मायबोलीचा हेमांगी कवी
ऋन्मेष मायबोलीचा हेमांगी कवी आहे का?
ते नाही काढणार. तसे हुशार
ते नाही काढणार. तसे हुशार आहेत ते. या धाग्याच्या नावावरूनच आठवले मला ते पण चर्चा कुठेही जाऊ शकते त्यामुळे ब्र शब्द न काढलेलाच बरा. मलाबी ती कोण आहे ते माहित नव्हते पण एवढा धिंगाणा पाहून शोधावे लागले. मागे पदमलक्ष्मीला पण असेच टार्गेट करण्यात आले होते. बाईंचा हेतु काही असेल/नसेल आपला फुल सपोर्ट त्यांना. जय हिंद !
पण चर्चा कुठेही जाऊ शकते
पण चर्चा कुठेही जाऊ शकते त्यामुळे ब्र शब्द न काढलेलाच बरा.
>>>>
मग जाऊ द्यावी कुठेही. अश्या चर्चात कोणाचे मुखवटे गळून खरे कॅरेक्टर कळले तर ते ही कळू द्यावे
Pages