सोशलसाईटवर होणारे चारीत्र्य हनन आणि मद्य

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2021 - 15:57

बराच काळ लॉकडाऊनचे सुख उपभोगल्यानंतर दोनचार दिवस कुठेतरी फिरून यायचे ठरवले. फारसा विचार न करता लोणावळा गाठले. काही जणांनी धोक्याची सूचना दिली, या काळात बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण घरच्यांना एका हवापालट रूटीनचेंज ब्रेकची गरज होती. म्हणून मग गेलो. कोरोनापासून बचाव म्हणून गर्दीच्या जागा टाळायच्या होत्या. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करायचा होता. ती काळजी घेतली. पण अखेर ज्याची कल्पनाही केली नव्हती ते झाले..

आज मायबोलीवर येऊन बघतो ते माझाच एक फेक आयडी बनला होता.
माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष

म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अ‍ॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही. पण या काळात जे चारीत्र्यहनन व्हायचे होते ते झालेच.
कारण त्या आयडीने धागाही कुठला काढला होता तर - एक करोड बियरप्रेमींचा ग्रुप !

अख्ख्या मायबोलीला ठाऊक असेल की माझे अर्धे आयुष्य दारूला विरोध करण्यात गेले आहे. दारूची जाहीरातबाजी असो वा उदात्तीकरण मी त्याला नेहमीच विरोध करत आलो आहे. संधी मिळताच दारू हे कसे शरीराला घातक पेय आहे याची लोकांना वेळोवेळी आठवण करून देत असतो. आणि आज त्यालाच छेद द्यायला म्हणून कोणीतरी माझ्याच नावाचा आयडी घेत बीअरप्रेमींचा ग्रूप उघडला.

चारीत्र्यहननाची मी कधीच पर्वा केली नाही. याआधीही माझेच भासावे असे डुआयडी मी इथे पाहिले आहेत आणि ते अश्याच कारणांसाठी वापरले आहेत. म्हणजे ऋन्मेष कोणावर वैयक्तिका टिका करत नाही अशी त्याची इमेज आहे तर एखादा डुआयडी काढून एखाद्या चर्चेत त्याची बाजू घेत, त्याच्यावतीने शिवीगाळ करा आणि असे भासवा कि हा डुआयडी वापरून शिवीगाळ करतो. एखादा डुआयडी काढा आणि त्यातून उगाच माझे जुने धागे वर काढा, उगाचच आतिशयोक्ती भासावी अशी स्तुती करा, मग अजून एका डुआयडीने तो आधीचा माझाच डुआयडी असल्याची टिका करा. हे सर्व सोशलसाईटवर वर्षानुवर्षे होत आलेय, होत राहील. मी कधी त्याची पर्वा केली नाही, की कोणाला कसले स्पष्टीकरण द्यायला माझा वेळ खर्च केला नाही. ईतकेच नाही तर कोण कोणाचा डुआयडी आहे, त्यातला कोण माझ्यामागे हात धुवून वगैरे लागलाय हे देखील शोधायचा त्रास घेतला नाही. कारण हे सारे मिळून खरे तर माझेच मनोरंजनाचे दुकान चालवत होते. त्यांचा मी आभारीच आहे.

पण आज नाही ......

आज प्रश्न माझा नाही , माझ्या ईमेजचा नाही, किंवा माझ्या तत्वांचाही नाही..
आज प्रश्न दारूच्या उदात्तीकरणाचा आहे. या धाग्यामुळे कोणाला माझ्याबद्दल गैरसमज होत असेल तर त्याची मला पर्वा नाही, पण एक दारूला वाईट म्हणनारी व्यक्ती अखेर दारूच्या उदात्तीकरणाला बळी पडली असे यातून कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज वेळीच खोडून काढणे गरजेचे आहे. दारूला घातक पेय म्हणणारेही अखेर तिलाच मिठी मारतात असे कोणाला यामुळे वाटले तर त्यांना वेळीच हे असत्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे.

कोणाला तरी असा धागा काढावासा वाटला याचा एका दृष्टीने पाहता मला आनंदही झाला आहे. कारण माझ्या कार्याची दखल घेत कोणातरी मद्याचे उदात्तीकरण करणार्‍याला माझा असा काटा काढावासा वाटला हि त्या कार्याची एक पावतीच आहे. पण त्याचवेळी हा डाव उधळून लाऊन माझा वापर करून कोणी मद्याचे उदात्तीकरण करू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे म्हणून हा धागा.

ऋन्मेष हा एक वाह्यात ईन्सान आहे असे शंभरातल्या शंभर मायबोलीकरांना वाटले तरी वाटू द्या.
पण दारू हे एक वाह्यात पेय आहे हे शंभरातल्या किमान ९९ मायबोलीकरांना पटत नाही तो पर्यंत तरी मी नाही सुधारणार _/\_

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव समजतो हे स्वतःपुरते ठेव बाबा
नैतर सजवलेल्या मखरात जाऊन बसशील
>>>>
मी सजवलेल्या मखरातील देवाला मानत नाही. मी देव माणसात बघतो. स्वत:ही कोणासाठी तरी देव बनायचा प्रयत्न करतो. कधी माझ्यामुळे कोणाची दारू सुटली तर त्यांच्या कुटुंबियांना मी देवासमानच वाटेल Happy

नाना पाटेकर आरशात बघून स्वतःची आरती करतो तसे का?>>>>मी पाहिलाय हा सिनेमा.. नाव आठवेना नेमकं.

तो वरचा डिपी फार सुरेख, गोड आहे. Happy >>> धन्यवाद हाडळीचा आशिक, विचार करत होतो तात्पुरता एखादा लोणावळ्याचा फोटो डीपी म्हणून लावावा. तरी तो बदलायला जीवावर येत होते Happy

ओह चित्रपट आहे का? पण त्यात ब्लफमास्टर अभिषेक बच्चन दाखवलाय नाना पाटेकर नाही. मी नक्की अभिषेक बच्चन आहे की नना पाटेकर Happy

म्हणजे तो नाना पाटेकर आरशात बघून स्वतःची आरती करतो तसे का? >>> एका विशिष्ट शहरातले नागरीक गुरूपौर्णिमा अशीच साजरी करतात.

मी सुद्धा हा विनोद ऐकलेला, पण ते कुठले शहर ते न कळल्याने विनोदही कळला नाही.
तरी आशूचँप यांना नाव सांगा त्या शहराचे, ते बदलून ऋन्मेषनगरी ठेवतील Happy

त्यापेक्षा मुंबई बदलून तू ऋबई का ठेवत नाहीस

तुझा काहीतरी अफाट गैरसमज झालेला दिसतोय
तू स्वतःला देव मानतोय
मी नाही मानत तुला देव
त्यामुळे तुझ्यासाठी काही बदलायची गरज नाहीये मला

आपले देवपण स्वतःपुरते ठेवा महाराज
नैतर मग खरेच एक दिवस विसर्जन होईल Happy

तू स्वतःला देव मानतोय
मी नाही मानत तुला देव
>>>>>>

मी मात्र तुम्हालाही देव मानतो. मी प्रत्येक माणसात देव बघतो, दगडात नाही ज्याला मखरात बसवले जाते Happy

प्रत्येक माणसात देव बघतो
>>>
क्लोन झालेले आयडी पण देवाचा अवतार झाले की मग.

(यावर तुला प्रतिसाद द्यायची इच्छा झाल्यास बॅक टू फ्युचर तंत्रज्ञान वापरून हा प्रतिसाद अनरीड करून टाक)

दारू पिणारा देव चालतो का तुम्हाला? >>>>>> हि शंका उपस्थित करून आपण दारूबद्दलचे आपले मत व्यक्त केलेत याबद्दल धन्यवाद Happy

क्लोन झालेले आयडी पण देवाचा अवतार झाले की मग. >>>> हे मीच लिहिणार होतो, पण उगाच ते स्वतःच स्वतःचे कौतुक केल्यासारखे झाले असते. जे मला बिल्कुल आवडत नाही.

यावर तुला प्रतिसाद द्यायची इच्छा झाल्यास बॅक टू फ्युचर तंत्रज्ञान वापरून हा प्रतिसाद अनरीड करून टाक >>> माझ्याकडे हे तंत्रज्ञान नाही. तुमच्याकडे असेल तर तेच माझ्या प्रतिसादाबाबत करा. मला हे शक्य नाही.

माझ्या पाच मूलभूत गरजा आहेत - अन्न वस्त्र निवारा सेक्स आणि प्रतिसाद Happy

तोतया शब्दावरून अवांतर थोडे.
ऑर्कुटवर असताना एका सुंदर मुलीच्या प्रोफाईलने "भेटायला हरकत नाही" म्हणून एका ठिकाणी बोलावले होते. खरं सांगायचं तर आयडी फेक असेल ही भीती होतीच. तरीही निघालीच खरी तर रिस्क नको म्हणून भेटायला गेलो. मी थोडा बावळट असल्याने लोकांना दिसेल अशा पद्धतीने वेळेच्या खूप आधी जाऊन त्या ठिकाणी थांबलो. त्या मागे समजा ती आली आणि मी दिसलो नाही तर परत जाऊ नये, चुकामूक होऊ नये असे चांगले उद्देश होते. (त्या वेळी मोबाईल सर्रास नव्हते).
पण बाकीचं पब्लीक किती सावध असतं याचा अनुभव तेव्हां आला. माझ्याप्रमाणेच इतरही काही जणांना तिने तिथेच बोलावले होते. त्यांनी मला बघताच आडोशाला उभे राहून काय होतंय हे पाहणे पसंत केले. मी त्या भेटीसाठी रिलायन्सचा लवकर तापणारा आणि स्क्रीन मधे अक्षर भिंगाखाली वाचायला लागणारा फोन घेतला होता. त्यावर ऑर्कुट लोड व्हायलाच पंधरा वीस मिनिटे लागायची.
वेळ टळून गेल्यावर मी अस्वस्थ होत तिला मेसेजेस पाठवत होतो. पण ती काही आलीच नाही. अंधार पडल्यावर नाईलाजाने निघालो.
दुस-या दिवशी मला दोघा तिघांनी ती भेटली का असे खरडवहीत विचारले होते. तेव्हांच लक्षात आलं यांना कसं कळलं ? नंतर त्या प्रोफाईलने सावकाश ती मूळची(चा) कोण हे उघड केलं. त्या वेळी शिव्या दिल्या थोड्या. पण नंतर तक्रार नाही केली. उलट मस्त ग्रुप झाला.

छान अनुभव शांत माणूस. पहिल्यांदा ऑर्कुटवरच्या मैत्रीणीला भेटायची हुरहूर भारीच.
मलाही तो अनुभव लक्ख आठवतो, मायबोलीवर लिहीलाही होता. कोणी वाचला नसल्यास जरूर वाचा, लिंक देतो.

https://www.maayboli.com/node/40718

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!
Submitted by तुमचा अभिषेक on 2 February, 2013 - 13:24

हि शंका उपस्थित करून आपण दारूबद्दलचे आपले मत व्यक्त केलेत याबद्दल धन्यवाद>>>>
माझं मत कुठलं व्यक्त केलं
मला पण सांगा ना प्लिज
मी दोन वेळा वाचून पाहिलं त्यात मत कुठं दिसलेच नाही
आपण देव आहात
त्यामुळे सामान्य लोकांना दिसू न शकणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसत असणार
उदा स्वप्नील जोशी चा अभिनय Happy

माझं मत कुठलं व्यक्त केलं >>> दारू पिणारा देव चालतो का तुम्हाला? >>>>

देव हि एक पवित्र संकल्पना आहे. तो दारू पिणारा चालतो का असे वाटले म्हणजे आपल्यामते दारू हे एक अपवित्र वाह्यात पेय आहे.

तुम्हाला चालतो का असा विचारलं
सीलेक्टिव्ह वाचनाची घाणेरडी सवय कधी जाणार सर
मी जे म्हणलं नाही ते म्हणलं आहे असे गृहीत धरून ते माझं मत आहे असे स्वतःच्या देवमनाला बजावून तुम्ही पोस्ट करता हे महान आहे

देव असून इतकी छचोरगिरी कशी काय जमते बुवा तुम्हाला
तुमच्या ड्यु आयडी सारखेच भोंदू देव तर नाही ना तुम्ही?

छ्चोरगिरी तुमच्या वागण्याबद्दल आहे सर

दारू बद्दल नाही

किती हो सारखे पेडगाव ला जाता

मुद्दा सुचत नसेल तर नाही लिहिलं तरी चालतं अहो

अनु जी >>> तुम्ही जी लिंक दिली आहे त्यात धार्मिक दंगे भडकवण्यासाठी फेक प्रोफाईलचा वापर केला गेला असे म्हटले आहे. थट्टामस्करी, कथा कविता यासाठी फेक प्रोफाईल बनवणे आणि धार्मिक दंगे किंवा कुणाचा खून करण्यासाठी, ठगण्यासाठी फेक प्रोफाईलचा वापर करणे यात फरक नसेल का ?
मायबोलीवर ७०% लोकांच्या फेक प्रोफाईल्स असतील.

छान अनुभव शांत माणूस. पहिल्यांदा ऑर्कुटवरच्या मैत्रीणीला भेटायची हुरहूर भारीच. >> धन्यवाद ऋन्मेष. ते प्रोफाईल हे कॉलेजच्या माझ्या एका अव्यक्त क्रशचे असावे असा समज मी करून घेतला होता. तो समज इतका पक्का होता कि तिने काहीही कमेण्ट केली किंवा प्रतिसाद दिला तरी त्यावरून हीच ती असा अर्थ वेडं मन लावायचं. ते सगळं विशफुल थिंकिंग असायचं. १% ही ती नसेल ही शक्यता गृहीत धरलेली होती. माझ्याच बॅचमेट्सनाही भेटायला बोलावले होते. माझी फजिती फक्त उघड झाली. ती ऑर्कुटवर कुणी लिहू नये म्हणून हातापाया पडाव्या लागल्या होत्या. Happy
यातला एक मित्र तर आता मोठा उद्योगपती आहे. इतका की त्याचे वकील केंद्रीय मंत्री राहिलेले एक दिवंगत नेते होते.
या गोष्टी मजेत सोडून द्यायच्या असतात.

दारू पिणारा देव चालतो का तुम्हाला? >> तुम्हाला चालतो का असा विचारलं >>
>>>

तुम्ही मला विचारा किंवा आणखी कोणाला, दारू आणि देव एकाच पंक्तीत बसत नाही हेच आपल्याला यातून दर्शवायचे होते.
अन्यथा मग तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः मद्यप्राशन करता पण आपण मानत असलेल्या सर्व देवांनी केले तर चालेल का? किंवा आपण स्वतः ते मंदिरात देवाच्या मुर्तीसमोर बसून कराल का? किंवा घरी पूजेला दर्शनाला येणारे जे लोकं पितात त्यांच्यासाठी तीर्थप्रसादाच्या जागी तांब्यात दारू भरून ठेवाल का?
जर यांची उत्तरे आपण नाही म्हणून देत असाल तर आपल्यामते दारू हे एक अपवित्र पेय नाही का झाले Happy

शा मा,
निव्वळ फेसबुक्/ऑरकुट वर मुलाने मुलगी म्हणून प्रोजेक्ट करणे या प्रसंगावरुन या संदर्भात ते उदाहरण आहे.
मायबोलीवरच्या प्रोफाईल्सची याच्याशी तुलना करण्याचा कोणताही हेतू/हिडन अजेंडा मनात नाही.

त्या पोराने काहीतरी कांड केले. धार्मिक भावना चिथावणार्‍या पोस्ट केल्या म्हणून तो फसला. फेक प्रोफाईल असो वा नसो त्याला बांबू लागणारच होता. अन्यथा असे आपल्याच मित्रांशी फ्लर्टींग करायला पोरीचे प्रोफाईल काढणे हा तुलनेत सौम्य प्रकार झाला. मला एकेकाळी असे करायच्या सुपार्‍या मिळायच्या..

@ च्रप्स,
आपण माझा प्रतिसाद वाचल्याबद्दल धन्यवाद.
पहिली गोष्ट म्हणजे मी काही विनोद केला नाही त्यामुळे प्रतिसाद वाचुन हसु येण्याचा प्रश्नच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोपही केलेला नाही. मी फक्त एक शक्यता वर्तविली आहे. कारण या सगळ्या चर्चैत तोतया कोण होता हा मुद्दाच बाजुला पडला आहे.
एक उदाहरण घेऊ, समजा श्री.च्रप्स यांना स्वत:वर फोकस ठेवायची खुप आवड आहे. ते २ दिवस माबोवरुन गायब झाले तर फार कुणाच्या लक्षातही येणार नाही. पण श्री.च्रप्स यांना वाटते की त्यांच्या गायब होण्याची दखल घेतली जाईल.
आता दोन शक्यता निर्माण होतात-
१) श्री.च्रप्स गायब झाल्याची दखल कोणीतरी घेतली. यातही ३ गोष्टी होऊ शकतील-
-ज्याने दखल घेतली तो काहीच करणार नाही.
-इतरांना सांगेल.
-एक नवीन तोतया आयडी निर्माण करुन श्री.च्रप्स यांचे चारित्र्यहनन करेल.
२) श्री.च्रप्स यांना फोकस मध्ये राहण्याची आवड असल्याने त्यांनीच तोतया आयडी निर्माण करुन वादळ उठवण्याचा प्रयत्न केला. पण माबो प्रशासक महोदय यांनी चतुराईने तो तोतया आयडी उडवला आणि विषय संपवला. मग आता काय करावे? तर दुसरा धागा काढुन "बघा माझे चरित्रहरण झाले हो" अशी ओरड करायची आणि फोकस आपल्यावरुन ढळु द्यायचा नाही.

मी फक्त दुसरी शक्यता मांडली. त्यात तुम्हाला आरोप दिसला हा मी माझ्या लिखाणात दोष समजतो.

(हा सगळा प्रतिसाद प्रपंच करण्याचे कारण इतकेच आहे की, या सगळ्यापासुन प्रेरणा घेऊन उद्या एखादी त्रयस्थ व्यक्ती कोणाच्या घेण्यादेण्यात नसलेल्या आयडीशी साधर्म्य असलेला आयडी घेऊन काही विकृत लिखाण प्रकाशित करु शकते.)

खरंच हा मानसिक आजार आहे. मी मी पणा, प्रतिसादाचा अति हव्यास, परपज्फूल भाबडेपणा...
वीरू म्हणत आहे अगदी तश्शीच शक्यता माझ्या ही डोक्यात आली होती.

Pages