बराच काळ लॉकडाऊनचे सुख उपभोगल्यानंतर दोनचार दिवस कुठेतरी फिरून यायचे ठरवले. फारसा विचार न करता लोणावळा गाठले. काही जणांनी धोक्याची सूचना दिली, या काळात बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण घरच्यांना एका हवापालट रूटीनचेंज ब्रेकची गरज होती. म्हणून मग गेलो. कोरोनापासून बचाव म्हणून गर्दीच्या जागा टाळायच्या होत्या. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करायचा होता. ती काळजी घेतली. पण अखेर ज्याची कल्पनाही केली नव्हती ते झाले..
आज मायबोलीवर येऊन बघतो ते माझाच एक फेक आयडी बनला होता.
माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष
म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही. पण या काळात जे चारीत्र्यहनन व्हायचे होते ते झालेच.
कारण त्या आयडीने धागाही कुठला काढला होता तर - एक करोड बियरप्रेमींचा ग्रुप !
अख्ख्या मायबोलीला ठाऊक असेल की माझे अर्धे आयुष्य दारूला विरोध करण्यात गेले आहे. दारूची जाहीरातबाजी असो वा उदात्तीकरण मी त्याला नेहमीच विरोध करत आलो आहे. संधी मिळताच दारू हे कसे शरीराला घातक पेय आहे याची लोकांना वेळोवेळी आठवण करून देत असतो. आणि आज त्यालाच छेद द्यायला म्हणून कोणीतरी माझ्याच नावाचा आयडी घेत बीअरप्रेमींचा ग्रूप उघडला.
चारीत्र्यहननाची मी कधीच पर्वा केली नाही. याआधीही माझेच भासावे असे डुआयडी मी इथे पाहिले आहेत आणि ते अश्याच कारणांसाठी वापरले आहेत. म्हणजे ऋन्मेष कोणावर वैयक्तिका टिका करत नाही अशी त्याची इमेज आहे तर एखादा डुआयडी काढून एखाद्या चर्चेत त्याची बाजू घेत, त्याच्यावतीने शिवीगाळ करा आणि असे भासवा कि हा डुआयडी वापरून शिवीगाळ करतो. एखादा डुआयडी काढा आणि त्यातून उगाच माझे जुने धागे वर काढा, उगाचच आतिशयोक्ती भासावी अशी स्तुती करा, मग अजून एका डुआयडीने तो आधीचा माझाच डुआयडी असल्याची टिका करा. हे सर्व सोशलसाईटवर वर्षानुवर्षे होत आलेय, होत राहील. मी कधी त्याची पर्वा केली नाही, की कोणाला कसले स्पष्टीकरण द्यायला माझा वेळ खर्च केला नाही. ईतकेच नाही तर कोण कोणाचा डुआयडी आहे, त्यातला कोण माझ्यामागे हात धुवून वगैरे लागलाय हे देखील शोधायचा त्रास घेतला नाही. कारण हे सारे मिळून खरे तर माझेच मनोरंजनाचे दुकान चालवत होते. त्यांचा मी आभारीच आहे.
पण आज नाही ......
आज प्रश्न माझा नाही , माझ्या ईमेजचा नाही, किंवा माझ्या तत्वांचाही नाही..
आज प्रश्न दारूच्या उदात्तीकरणाचा आहे. या धाग्यामुळे कोणाला माझ्याबद्दल गैरसमज होत असेल तर त्याची मला पर्वा नाही, पण एक दारूला वाईट म्हणनारी व्यक्ती अखेर दारूच्या उदात्तीकरणाला बळी पडली असे यातून कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज वेळीच खोडून काढणे गरजेचे आहे. दारूला घातक पेय म्हणणारेही अखेर तिलाच मिठी मारतात असे कोणाला यामुळे वाटले तर त्यांना वेळीच हे असत्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे.
कोणाला तरी असा धागा काढावासा वाटला याचा एका दृष्टीने पाहता मला आनंदही झाला आहे. कारण माझ्या कार्याची दखल घेत कोणातरी मद्याचे उदात्तीकरण करणार्याला माझा असा काटा काढावासा वाटला हि त्या कार्याची एक पावतीच आहे. पण त्याचवेळी हा डाव उधळून लाऊन माझा वापर करून कोणी मद्याचे उदात्तीकरण करू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे म्हणून हा धागा.
ऋन्मेष हा एक वाह्यात ईन्सान आहे असे शंभरातल्या शंभर मायबोलीकरांना वाटले तरी वाटू द्या.
पण दारू हे एक वाह्यात पेय आहे हे शंभरातल्या किमान ९९ मायबोलीकरांना पटत नाही तो पर्यंत तरी मी नाही सुधारणार _/\_
धन्यवाद,
ऋन्मेष
त्या ॠन्मेष च्या बाफावरच
त्या ॠन्मेष च्या बाफावरच स्पष्टीकरण देऊन त्यालाच डायरेक्ट विचारले असतेस, त्या करता नवीन सृष्टी निर्माण करावी लागली नसती.
>>>
याचे उत्तर मी आधी एका प्रतिसादात दिले आहे. मी त्या धाग्यावर स्पष्टीकरण दिले असते तर त्या धाग्यासह माझे स्पष्टीकरणही उडाले असते आणि ज्यांनी तो फक्त धागाच पाहिला असता, माझे स्पष्टीकरण नाही त्यांच्या नजरेत मी एक बीअरचा धागा काढणारा म्हणून ओळखलो गेलो असतो. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढे, तर एखाद्या निर्व्यसनी माणसासाठी यापेक्षा मोठे चारीत्र्यहनन नाही.
मला नाही वाटत की शांत माणुस हे कायप्पावर शेअर करतील. त्यांनी गंमतीत विचारले, मी हो म्हणले
>>>
हो, कल्पना आहे. ईतरांनी मुद्दा उचलल्याने स्पष्टी द्यावे लागले
बाकी फाफटपसारा न सांगता इतकंच
बाकी फाफटपसारा न सांगता इतकंच लिहिल्यावर स्पष्ट कल्पना आली असती सर्वांना.
>>>
दोन कारणे
१) ईतकेच लिहिले असते तर ऋन्मेष घाबरला असे एखाद्याला वाटले असते. ते मला टाळायचे होते.
२) मला जास्तीचे चार शब्द लिहायला आवडतात
मला जास्तीचे चार शब्द लिहायला
मला जास्तीचे चार शब्द लिहायला आवडतात>>>
चारशे असे असेल ते बहुदा
शेवटचा शे विसरलाय का?
ब्रह्मदेवाचा १ दिवस म्हणजे
ब्रह्मदेवाचा १ दिवस म्हणजे १००० महायुगे होतात
जोक्स द अपार्ट तशी म्हणायची पद्धत असते ओ ..
मला नाही वाटत की शांत माणुस
मला नाही वाटत की शांत माणुस हे कायप्पावर शेअर करतील. त्यांनी गंमतीत विचारले, मी हो म्हणले
>>>
हो, कल्पना आहे. ईतरांनी मुद्दा उचलल्याने स्पष्टी द्यावे लागले>>>>>> तू नमनाला घडाभर तेल ओतत रहातोस, प्रत्येक प्रतीसादाला प्रतीसाद देऊन धागे वाढवत सुटतोस ते माफ आहे वाटते. आणी तुझ्याकडे लाईट जात नाहीत का?
आशुचँप
तुम्हाला सिरीअसली कल्पना नाही
तुम्हाला सिरीअसली कल्पना नाही का की असे एखाद्या प्रचलित आयडीच्या नावात सूक्ष्म बदल करून मार्केटमध्ये आणलेला आयडी फेक म्हणून ओळखला जातो Happy
कोण म्हणे ? मला जेम्स बॉण्ड असा आयडी हवा होता तो आधीच असल्याने मला जेम्स बॉन्ड असा मिळाला/घ्यावा लागला, वरच्या न्यायाने मी आज ईथे असायला नको होतो नाही कां? (आणी हो त्या रु रु त फरक समजत नाही नी ण आणी न त समजतो असा युक्तिवाद असेल तर वादिहाशु)
लोणावळा चा बॅकलॉग भरतायत
लोणावळा चा बॅकलॉग भरतायत ऋन्मेष... आणि पब्लिक मदत करतेय..
मला जेम्स बॉण्ड असा आयडी हवा
मला जेम्स बॉण्ड असा आयडी हवा होता तो आधीच असल्याने मला जेम्स बॉन्ड असा मिळाला/घ्यावा लागला
>>>>>
मला त्या जेम्स बॉण्ड आयडीची लिंक मिळेल का? तो किती सक्रिय आहे हे चेक करायचे आहे. कारण जर निष्क्रिय असेल तर समीकरण बदलते .
आता मी थोड्या वेळानं ऋन्मेष
आता मी थोड्या वेळानं ऋन्मेष नावा मंदी थोडा बदल करून माझा आयडी ठिवतो. बघु आपण आयडी उडतो का.
कोणता आयडी ठिवायचा सांगा.
माझे स्पष्टीकरण नाही
माझे स्पष्टीकरण नाही त्यांच्या नजरेत मी एक बीअरचा धागा काढणारा म्हणून ओळखलो गेलो असतो.>> कोण इतके लक्षात ठेवते हो. सोशल मेडीयाच्या इतकं आहारी जाऊ नये मानसाने.
तो सोशल मिडीयाच्या नाही, तर
तो सोशल मिडीयाच्या नाही, तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी धाग्यांच्या आहारी गेलाय. कोंबडी अंड्यावर बसली की मालक कसे खुराडे बघतो, तसे याचे चाललेय.
ऋन्मेष मायबोलीचा मोदी झालाय..
ऋन्मेष मायबोलीचा मोदी झालाय...
नुसती बडबड आणि नुसता लाईमलाईट पाहीजे...
बापरे ,
बापरे
,
चिक्की , एफबिआय, रॉ, आयसआय ,टु ऋ ऑर नॉट टु ऋ , लोणावळा, दारू, शाहरुख, शराबी, किशोर कुमार , दूध, शुद्धलेखन, बाराखडी, प्रेत, कोंबडी, सई........
अजून काही राहिलयं का ?
अजून काही राहिलयं का ? >
अजून काही राहिलयं का ? > स्वप्नील जोशी
अजून काही राहिलयं का ?
अजून काही राहिलयं का ?
>>>गर्लफ्रेंड
'उदात्तीकरण' राहिलं ना. अजून
'उदात्तीकरण' राहिलं ना. अजून पुरेसं झालं नाही. मूळ बाफातच अर्धा डझन वेळा आहे. अभी तो बहुत जलील होना बाकी हय
(No subject)
जिद्दु सगळीकडे सुसाट मिम व
जिद्दु सगळीकडे सुसाट मिम व प्रतिसाद देताय
प्रश्न: दूसरा आयडी का उडाला?
प्रश्न: दूसरा आयडी का उडाला?
एकंदर चर्चा वाचल्यानंतर या प्रश्नाचे मला आकलन झालेले उत्तर असे येते. बघा बरोबर आहे का:
उत्तर: कारण तो आधीच अस्तित्वात असलेल्या व सक्रिय असलेल्या एका आयडीशी पट्कन ओळखू न येण्याइतके साधर्म्य साधणारा होता व त्याने आधीच अस्तित्वात असलेल्या व सक्रिय असलेल्या आयडिच्या विचारसरणी विरुद्ध विचार मांडल्याने आधीच अस्तित्वात असलेल्या व सक्रिय असलेल्या आयडीला ते चारित्र्य हनन वाटले, म्हणून तो आयडी उडाला.
अस्मिता, बदली झालीय ८
अस्मिता, बदली झालीय ८ दिवसांपुर्वी पण अजून काही कामच नाही दिलय तर बसतो माश्या मारत नवीन कचेरीत
जिद्दु
जिद्दु
रात बाकी, बात बाकी, हो ना है जो
हो जाने दो , सोचो ना, समझो ना....
अभी तो पार्टी शुरु हुई है
अतुल
अतुल
समझ सको तो समझ को समझो
समझ समझना भी एक समझ है
समझ समझ कर भी जो न समझे
मेरी समजह में वो नासमझ है
सगळेच
सगळेच
{ऋन्मेष मायबोलीचा मोदी झालाय.
{ऋन्मेष मायबोलीचा मोदी झालाय...
नुसती बडबड आणि नुसता लाईमलाईट पाहीजे...}
याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी
कुकातकुका दुःख सांगते
कुकातकुका दुःख सांगते माझ्याकडे किबोर्डवर दीर्घ ऋ नाही , असतो हेही माहिती नव्हते. लहानपणी लिहिताना तोच लिहायचे पण तो दीर्घ होता हेच माहिती नव्हते. ड्यूप्लिकेटच ओरिजनल निघाला.
तात्पर्य: ऋषीचा 'ऋ' लक्षात ठेवा न ठेवा ऋन्मेषचा ठेवा.
तर मी घिऊन येऊ का ऋन्मेष आयडी
तर मी घिऊन येऊ का ऋन्मेष आयडी नाव?
न्हाई तर आसं व्हायचं माझा तो आयडी ऱ्हायचा आन वरीजनल ऋन्मेषचा आयडी उडायचा, ह्या ह्या ह्या!
@निळु भाऊ लोल
@निळु भाऊ लोल
ऋन्मेष मायबोलीचा मोदी झालाय..
ऋन्मेष मायबोलीचा मोदी झालाय...
नुसती बडबड आणि नुसता लाईमलाईट पाहीजे...
>>>>>
हे मी जवळपास चारपाच वर्षांपूर्वीच म्हटलेले.
राजकारणात मोदी, बॉलीवूडमध्ये शाहरूख, आणि मायबोलीवर ऋन्मेष
सेल्फ मार्केंटींगचे दुकान आहेत.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
हो, मीच म्हटलेले
(No subject)
आता मी पण झालो ऋन्मेष
आता मी पण झालो ऋन्मेष
Pages