बराच काळ लॉकडाऊनचे सुख उपभोगल्यानंतर दोनचार दिवस कुठेतरी फिरून यायचे ठरवले. फारसा विचार न करता लोणावळा गाठले. काही जणांनी धोक्याची सूचना दिली, या काळात बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण घरच्यांना एका हवापालट रूटीनचेंज ब्रेकची गरज होती. म्हणून मग गेलो. कोरोनापासून बचाव म्हणून गर्दीच्या जागा टाळायच्या होत्या. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करायचा होता. ती काळजी घेतली. पण अखेर ज्याची कल्पनाही केली नव्हती ते झाले..
आज मायबोलीवर येऊन बघतो ते माझाच एक फेक आयडी बनला होता.
माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष
म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही. पण या काळात जे चारीत्र्यहनन व्हायचे होते ते झालेच.
कारण त्या आयडीने धागाही कुठला काढला होता तर - एक करोड बियरप्रेमींचा ग्रुप !
अख्ख्या मायबोलीला ठाऊक असेल की माझे अर्धे आयुष्य दारूला विरोध करण्यात गेले आहे. दारूची जाहीरातबाजी असो वा उदात्तीकरण मी त्याला नेहमीच विरोध करत आलो आहे. संधी मिळताच दारू हे कसे शरीराला घातक पेय आहे याची लोकांना वेळोवेळी आठवण करून देत असतो. आणि आज त्यालाच छेद द्यायला म्हणून कोणीतरी माझ्याच नावाचा आयडी घेत बीअरप्रेमींचा ग्रूप उघडला.
चारीत्र्यहननाची मी कधीच पर्वा केली नाही. याआधीही माझेच भासावे असे डुआयडी मी इथे पाहिले आहेत आणि ते अश्याच कारणांसाठी वापरले आहेत. म्हणजे ऋन्मेष कोणावर वैयक्तिका टिका करत नाही अशी त्याची इमेज आहे तर एखादा डुआयडी काढून एखाद्या चर्चेत त्याची बाजू घेत, त्याच्यावतीने शिवीगाळ करा आणि असे भासवा कि हा डुआयडी वापरून शिवीगाळ करतो. एखादा डुआयडी काढा आणि त्यातून उगाच माझे जुने धागे वर काढा, उगाचच आतिशयोक्ती भासावी अशी स्तुती करा, मग अजून एका डुआयडीने तो आधीचा माझाच डुआयडी असल्याची टिका करा. हे सर्व सोशलसाईटवर वर्षानुवर्षे होत आलेय, होत राहील. मी कधी त्याची पर्वा केली नाही, की कोणाला कसले स्पष्टीकरण द्यायला माझा वेळ खर्च केला नाही. ईतकेच नाही तर कोण कोणाचा डुआयडी आहे, त्यातला कोण माझ्यामागे हात धुवून वगैरे लागलाय हे देखील शोधायचा त्रास घेतला नाही. कारण हे सारे मिळून खरे तर माझेच मनोरंजनाचे दुकान चालवत होते. त्यांचा मी आभारीच आहे.
पण आज नाही ......
आज प्रश्न माझा नाही , माझ्या ईमेजचा नाही, किंवा माझ्या तत्वांचाही नाही..
आज प्रश्न दारूच्या उदात्तीकरणाचा आहे. या धाग्यामुळे कोणाला माझ्याबद्दल गैरसमज होत असेल तर त्याची मला पर्वा नाही, पण एक दारूला वाईट म्हणनारी व्यक्ती अखेर दारूच्या उदात्तीकरणाला बळी पडली असे यातून कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज वेळीच खोडून काढणे गरजेचे आहे. दारूला घातक पेय म्हणणारेही अखेर तिलाच मिठी मारतात असे कोणाला यामुळे वाटले तर त्यांना वेळीच हे असत्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे.
कोणाला तरी असा धागा काढावासा वाटला याचा एका दृष्टीने पाहता मला आनंदही झाला आहे. कारण माझ्या कार्याची दखल घेत कोणातरी मद्याचे उदात्तीकरण करणार्याला माझा असा काटा काढावासा वाटला हि त्या कार्याची एक पावतीच आहे. पण त्याचवेळी हा डाव उधळून लाऊन माझा वापर करून कोणी मद्याचे उदात्तीकरण करू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे म्हणून हा धागा.
ऋन्मेष हा एक वाह्यात ईन्सान आहे असे शंभरातल्या शंभर मायबोलीकरांना वाटले तरी वाटू द्या.
पण दारू हे एक वाह्यात पेय आहे हे शंभरातल्या किमान ९९ मायबोलीकरांना पटत नाही तो पर्यंत तरी मी नाही सुधारणार _/\_
धन्यवाद,
ऋन्मेष
निवडसमिती / प्रशासन
निवडसमिती / प्रशासन
त्यांनी ते ठरवले, मला मान्य झाले Happy
अच्छा अच्छा ओके म्हणजे प्रशासनाने जे ठरवले ते तुम्हाला मान्य होवुन तुम्ही कुठुन जावुन आल्या नंतर तुम्हाला कळल्यावर तुम्ही सारवासारवी नी स्वतःच्या सोयीचा धागा टाकावा आणी तो तुम्हाला टाकता यावा यासाठी तुमचा आयडी आजुन आहे नी तो नवा गेला. आयमाय स्वारी बरकां !
एक कुशंका तो आयडी डुप्लिकेट आहे सगळ्यात आधी कोणाला समजले व कसे या कडे कोणाचेच कसे लक्ष गेले नाही. यात काही गौडबंगाल आहे आहे आहे.
बारा हजार खर्चा तर चिक्की
बारा हजार खर्चा तर चिक्की चॉकलेट फज जेली जाम गुलकंद शरबत ईमली वगैरेंचाच झाला.>> माफ करा, बारा हजार चिक्कीवर खर्च करुन त्याचा इथे डंका वाजवण्यात काय पॉईंट आहे?
तो दुसरा आयडी फेक कसा आणि
तो दुसरा आयडी फेक कसा आणि त्यालाही धागे विणण्याचा अधिकार का नाही? याला बगल दिली हे अपेक्षित होतेच.
>>>>>
अपेक्षित


तुम्हाला सिरीअसली कल्पना नाही का की असे एखाद्या प्रचलित आयडीच्या नावात सूक्ष्म बदल करून मार्केटमध्ये आणलेला आयडी फेक म्हणून ओळखला जातो
राहिला प्रश्न त्याच्या धागे विणण्याच्या अधिकाराबद्दल आणि तो मीच आहे हे समजून माझ्या झालेल्या चारीत्र्यहननाबद्दल तर हि खालची पोस्ट जरूर वाचा
यात मी आशूचॅम्प यांना दोष देणार नाही. मी आजवर दारूच्या धाग्यावर जे दारूचा विरोध करत होतो ते आज अचानक त्याचे कौतुक करताना पाहून त्यांचा संताप होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे त्यांनी मला हे सुनावले. याला जबाबदार तो फेक आयडीच आहे ज्याने तो माझा आहे असे भासवले आणि आशूचॅम्प फसले आणि माझ्यावर बरसले. मला तरी हे माझे चारीत्र्यहनन वाटते. एखाद्याचे मत वेगळे असेल तर तो त्याचा दृष्टीकोन.
माफ करा, बारा हजार चिक्कीवर
माफ करा, बारा हजार चिक्कीवर खर्च करुन त्याचा इथे डंका वाजवण्यात काय पॉईंट आहे?
>>>>
सीमंतिनी यांनी प्रतिसादात चौकशी केली त्याला उत्तर दिले आहे ते, मूळ लेखात चिक्की दूरदूरवर नाही.
बाकी चिक्कीसाठी बारा हजार किरकोळ रक्कम आहे. धागा राजकारणावर जाऊ नये म्हणून चिक्की घोटाळ्याचा उल्लेख टाळत आहे
एक कुशंका तो आयडी डुप्लिकेट
एक कुशंका तो आयडी डुप्लिकेट आहे सगळ्यात आधी कोणाला समजले व कसे या कडे कोणाचेच कसे लक्ष गेले नाही.
>>>>>
मी लोनावळ्याला गेल्याने धागा उशीरा पाहिला. पण पाहिलेला तेव्हा आधीच लोकांनी मला शिव्या घालून मग कोणाला तरी तो वेगळा आयडी आहे हे समजले होते.
वर मूळ लेखात लोनावळ्याला गेल्याचा उल्लेख याचसाठी केला होता की रोज मायबोलीवर पडीक असणार्या ऋन्मेषने चक्क दिवसभरात धागा पाहिला कसे नाही अशी कुशंका कोणाला पडायला नको
बाकी मी खरेच लोनावळ्याला गेलेलो का नाही याचा पुरावा मागाल तर मला नाईलाजाने फोटो टाकावे लागतील, आणि मग पुन्हा आरोप होतील की तुझे फोटो ईथे कश्याला मिरवत आहेस
यात मी आशूचॅम्प यांना दोष
यात मी आशूचॅम्प यांना दोष देणार नाही >> आशूचॅम्प यांना काय दोष द्यायचा? प्रतिसाद आशुचँप यांनी केला आहे. आशूचॅम्प नाही.
टाका हो फोटो... मस्त वातावरण
टाका हो फोटो (पुरावा म्हणून नाही बरं)... मस्त वातावरण असेल ना सध्या तिकडे ? मुलांनी धमाल केली असेल??
त्या नवीन ॠन्मेषला का उडवला?
त्या नवीन ॠन्मेषला का उडवला? Uhoh निदान त्याला त्याचे म्हणणे सिद्ध करण्या साठी तरी एक चानस द्यायला हवा होता.
>>>>>
एका मानेत फक्त एकच तलवार राहू शकते. एका जंगलात फक्त एकच शेर राहू शकतो. एका बॉलीवूडमध्ये फक्त एकच सुपर्रस्टार बनू शकतो. एका देव्हार्यात केवळ एकच देव विराजमान होऊ शकतो. एका कबरीत केवळ एकच प्रेत झोपू शकते. एका कानात केवळ एकच बोट जाऊ शकते. त्याचप्रमाणे एका मायबोलीवर केवळ एकच ऋन्मेष बागडू शकतो.
आधीच तुम्ही माझ्या धाग्यांनी त्रस्त होता. दोघांनी मिळून धागे विणले असते तर......
वेट वेट वेट... कि तुम्हाला ऋन्मेषचे धागे आवडतात आणि तुम्हाला डबल मजा हवी होती
एका कबरीत केवळ एकच प्रेत झोपू
एका कबरीत केवळ एकच प्रेत झोपू शकते. >>> अशी तपासणी झालेली आहे का कुठे ?
धागा राजकारणावर जाऊ नये
धागा राजकारणावर जाऊ नये म्हणून चिक्की घोटाळ्याचा उल्लेख टाळत आहे Happy>>>>> अगं अगं म्हशी मला कुटं नेशी !
वेट वेट वेट... कि तुम्हाला ऋन्मेषचे धागे आवडतात आणि तुम्हाला डबल मजा हवी होती Happy>>>>>> तो दुसरा ॠन्मेष तुझ्यासारखेच असंख्य धागे विणणार होता कशावरुन? तुलाच हौस आहे ना प्रत्येक प्रतीसादाला प्रतीसाद देऊन शंभरी पार करण्याची.
एका मानेत फक्त एकच तलवार राहू शकते. एका जंगलात फक्त एकच शेर राहू शकतो. एका बॉलीवूडमध्ये फक्त एकच सुपर्रस्टार बनू शकतो. एका देव्हार्यात केवळ एकच देव विराजमान होऊ शकतो. एका कबरीत केवळ एकच प्रेत झोपू शकते. एका कानात केवळ एकच बोट जाऊ शकते. त्याचप्रमाणे एका मायबोलीवर केवळ एकच ऋन्मेष बागडू शकतो.>>>>> नको, तुझ्या बाल लीलांनी काही वेळेस लोकांमध्ये भांडणे पण लावलीत.
एका मानेत फक्त एकच तलवार राहू शकते>>>>>>>मायबोली म्हणजे तलवार नाही
एका जंगलात फक्त एकच शेर राहू शकतो>>>>>>>मायबोली म्हणजे जंगल नाही,
एका बॉलीवूडमध्ये फक्त एकच सुपर्रस्टार बनू शकतो. >>>>>> हजारो आले नी गेले एकाचे काय कौतुक !
एका देव्हार्यात केवळ एकच देव विराजमान होऊ शकतो. >>>>>> तू स्वतःला देव समजायला लागला आहेस हे खरे !
एका कबरीत केवळ एकच प्रेत झोपू शकते.>>>>>>> काही जण महायुद्धाच्या वेळी २ -२ जणांना टाकत होते.
एका कानात केवळ एकच बोट जाऊ शकते. >>>>> आम्ही सारखे कानात बोटे घालुन बसु शकत नाही.
किती ते कौतुक करुन घेणे.
जरा मी पणा कमी करा.
(No subject)
एका मानेत फक्त एकच तलवार राहू
एका
मानेतफक्त एकच तलवार राहू शकते > म्यानेतरश्मी ताई, तुमचा प्रतिसाद
रश्मी ताई, तुमचा प्रतिसाद व्हॉट्स अॅप वर व्हायरल करू का ?
मानेतच म्हणायचं असेल. एका
मानेतच म्हणायचं असेल. एका तलवारीने जीव गेल्यावर दुसरीची गरज पडत नाही असा गूढ अर्थ दडलेला असावा.
करा. तुमच्या गृप मध्ये आहे
करा.
तुमच्या गृप मध्ये आहे का ऋन्मेष ?
आपण म्यान कशी बनवून घेऊ
आपण म्यान कशी बनवून घेऊ त्यावर आहे.
म्यानेची डेप्थ वाढवून दोन, तीन तलवारी सहज रहातात.
टाका हो फोटो (पुरावा म्हणून
टाका हो फोटो (पुरावा म्हणून नाही बरं)... मस्त वातावरण असेल ना सध्या तिकडे ? मुलांनी धमाल केली असेल??
>>>>>>
हो, धन्यवाद. छान धमाल केली. दोन दिवसांसाठी गेलेलो. तिसरा दिवस वाढवायचा मोह आवरला नाही. कारण मुलांना स्विमिंग पूल सोडवतच नव्हता. त्यात वर वातावरण कमाल. उन्हाचा पत्ता नाही. तुरळक पाऊस. या तुरळक पावसाचा एक फायदा होतो की मोबाईल न भिजता फोटोही छान काढता येतात. मला काढायलाही आवडतात आणि शेअर करायलाही. आजच सिलेक्टेड काढून फेसबूकवर शेअर करायचा प्लान आहे. मी तर विचार करतोय मायबोलीवर देखील असे फिरायला गेलेले वगैरे पर्सनल फोटो शेअरींगचा धागा काढायला हवा. कारण मला तरी माबो माझे दुसरे घर, दुसरे कुटुंब वाटते. असे आणखी कोणाला वाटत असेल ते शेअर करतील
१०० होऊनही गेले.
१०० होऊनही गेले.
इथे गम्मत करत आहोत ते ठीक आहे
इथे गम्मत करत आहोत ते ठीक आहे पण एखाद्याबद्दलचा प्रतिसाद ज्यात त्याचा नावासकट उल्लेख आहे त्याच्या परवानगीशिवाय असा बाहेर फॉरवर्ड करणे चुकीचे वाटते.
@ रश्मी,
@ रश्मी,
गंमत बघा हं,
माझे एक वाक्य उचललेत --- एका देव्हार्यात केवळ एकच देव विराजमान होऊ शकतो ---- आणि म्हणालात, तू स्वतःला देव समजायला लागला आहेस हे खरे !
पण पुढचेच वाक्य वाचलेले का ----- एका कबरीत केवळ एकच प्रेत झोपू शकते ------ ईथे मात्र मी स्वत:ला प्रेत समजायला लागलो आहे असा अर्थ नाही काढलात
कारण तुम्हाला मी कसा स्वतःला कौतुकाने देवच समजायला लागलो हे अखेरीस लिहायचे होते.
पण ईट्स ओके, जग असेच आहे. आणि मी ते स्विकारले आहे
लिहिणार्याने लिहीत जावे, अर्थ काढणार्याने काढत जावे, आपण पर्वा का करावे
इथे गम्मत करत आहोत ते ठीक आहे
इथे गम्मत करत आहोत ते ठीक आहे पण एखाद्याबद्दलचा प्रतिसाद ज्यात त्याचा नावासकट उल्लेख आहे त्याच्या परवानगीशिवाय असा बाहेर फॉरवर्ड करणे चुकीचे वाटते.
>>>>>
हो सहमत आहे. माझी परवानगी नाहीये.
पण अर्थात माझ्या परवानगीला न जुमानता केलाच फॉर्वर्ड तर तक्रारही नाहीये. कारण बाह्य गोष्टींचा त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे. काल कोणी फेक ऋन्मेष आयडीने धागा काढला, भले हेतू काही का असेना, किती छान मनोरंजन होतेय दोन दिवस. कदाचित त्या व्हॉटसप फॉर्वर्डमधूनही काही आनंदाचे क्षण जरूर वेचता येतील
नक्की एक सांगा करायचा की नाही
नक्की एक सांगा करायचा की नाही ?
किती छान मनोरंजन होतेय दोन
किती छान मनोरंजन होतेय दोन दिवस
स्वतःच्या नावाचा उदो उदो म्हणजे मनोरंजन. सतत आकर्षण केंद्रं बनून राहणे हे मानसिक आजाराचं लक्षण आहे.
माझा गैरसमज झाला हे खरे
माझा गैरसमज झाला हे खरे
पण त्यात चारित्र्यहनन कसे झालं ते कळलं नाही
तू दारू प्यायला लागला असावा असे मला मुळीच वाटले नाही
कारण दारूपेक्षा जबरदस्त व्यसन आहे तुला धागे आणि प्रतिसाद मिळवण्याचे
त्यासाठी तू कुठल्याही थराला जाऊ शकतोस
एकमेव विषय उरला होता आम्हा गरिबांना की त्यात तू मी माझा माझं करत नाहीस त्यातही घुसला आता म्हणल्यावर धस्स झालं
म्हणलं आता शाहरुख स्वप्नील आणि सई पण येणार दारुसोबत
नक्की एक सांगा करायचा की नाही
नक्की एक सांगा करायचा की नाही ?
>
नक्की एक सांगितलेय की, माझी परवानगी नाहीये.
पण जो करेल त्याच्यावर डूख न धरता त्याला त्याच्या कर्मावर सोडून देईन हे देखील तितकेच खरेय.
ज्याने त्याने आपली नैतिकता जपावी हे मी त्यांच्यावर सोडतो, मी माझे सुख शांती समाधान जपतो
सतत आकर्षण केंद्रं बनून राहणे
सतत आकर्षण केंद्रं बनून राहणे हे मानसिक आजाराचं लक्षण आहे.>>>> हे तर मी त्याला केव्हापासून सांगतोय
पण त्याची बरे होण्याची अजिबात लक्षणे नाहीत
कारण दारूपेक्षा जबरदस्त व्यसन
कारण दारूपेक्षा जबरदस्त व्यसन आहे तुला धागे आणि प्रतिसाद मिळवण्याचे >>> मान्य आहे



त्यासाठी तू कुठल्याही थराला जाऊ शकतोस >>> हे अमान्य आहे
सतत आकर्षण केंद्रं बनून राहणे >>> मान्य आहे
हे मानसिक आजाराचं लक्षण आहे. >>> हे अमान्य आहे
नक्की एक सांगितलेय की, माझी
नक्की एक सांगितलेय की, माझी परवानगी नाहीये. > बाकी फाफटपसारा न सांगता इतकंच लिहिल्यावर स्पष्ट कल्पना आली असती सर्वांना. मी नव्हतोच करणार पण तुम्ही दोन्ही बाजुंनी लिहिल्यावर एखादा गोंधळात पडायला नको म्हणून विचारलं.
पण पुढचेच वाक्य वाचलेले का --
पण पुढचेच वाक्य वाचलेले का ----- एका कबरीत केवळ एकच प्रेत झोपू शकते ------ ईथे मात्र मी स्वत:ला प्रेत समजायला लागलो आहे असा अर्थ नाही काढलात Happy>>>>> तुला म्हणजे एका जिवंत हाडा मांसाच्या आणी मन असलेल्या माणसाला मी प्रेत का समजू? तो माझा नीचपणा होईल.
कारण तुम्हाला मी कसा स्वतःला कौतुकाने देवच समजायला लागलो हे अखेरीस लिहायचे होते.>>>>>येस्स ! तसे नसते तर तू त्या ॠन्मेष च्या बाफावरच स्पष्टीकरण देऊन त्यालाच डायरेक्ट विचारले असतेस, त्या करता नवीन सृष्टी निर्माण करावी लागली नसती.
मला नाही वाटत की शांत माणुस हे कायप्पावर शेअर करतील. त्यांनी गंमतीत विचारले, मी हो म्हणले.
बरोबर.
बरोबर.
Pages