सोशलसाईटवर होणारे चारीत्र्य हनन आणि मद्य

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2021 - 15:57

बराच काळ लॉकडाऊनचे सुख उपभोगल्यानंतर दोनचार दिवस कुठेतरी फिरून यायचे ठरवले. फारसा विचार न करता लोणावळा गाठले. काही जणांनी धोक्याची सूचना दिली, या काळात बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण घरच्यांना एका हवापालट रूटीनचेंज ब्रेकची गरज होती. म्हणून मग गेलो. कोरोनापासून बचाव म्हणून गर्दीच्या जागा टाळायच्या होत्या. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करायचा होता. ती काळजी घेतली. पण अखेर ज्याची कल्पनाही केली नव्हती ते झाले..

आज मायबोलीवर येऊन बघतो ते माझाच एक फेक आयडी बनला होता.
माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष

म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अ‍ॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही. पण या काळात जे चारीत्र्यहनन व्हायचे होते ते झालेच.
कारण त्या आयडीने धागाही कुठला काढला होता तर - एक करोड बियरप्रेमींचा ग्रुप !

अख्ख्या मायबोलीला ठाऊक असेल की माझे अर्धे आयुष्य दारूला विरोध करण्यात गेले आहे. दारूची जाहीरातबाजी असो वा उदात्तीकरण मी त्याला नेहमीच विरोध करत आलो आहे. संधी मिळताच दारू हे कसे शरीराला घातक पेय आहे याची लोकांना वेळोवेळी आठवण करून देत असतो. आणि आज त्यालाच छेद द्यायला म्हणून कोणीतरी माझ्याच नावाचा आयडी घेत बीअरप्रेमींचा ग्रूप उघडला.

चारीत्र्यहननाची मी कधीच पर्वा केली नाही. याआधीही माझेच भासावे असे डुआयडी मी इथे पाहिले आहेत आणि ते अश्याच कारणांसाठी वापरले आहेत. म्हणजे ऋन्मेष कोणावर वैयक्तिका टिका करत नाही अशी त्याची इमेज आहे तर एखादा डुआयडी काढून एखाद्या चर्चेत त्याची बाजू घेत, त्याच्यावतीने शिवीगाळ करा आणि असे भासवा कि हा डुआयडी वापरून शिवीगाळ करतो. एखादा डुआयडी काढा आणि त्यातून उगाच माझे जुने धागे वर काढा, उगाचच आतिशयोक्ती भासावी अशी स्तुती करा, मग अजून एका डुआयडीने तो आधीचा माझाच डुआयडी असल्याची टिका करा. हे सर्व सोशलसाईटवर वर्षानुवर्षे होत आलेय, होत राहील. मी कधी त्याची पर्वा केली नाही, की कोणाला कसले स्पष्टीकरण द्यायला माझा वेळ खर्च केला नाही. ईतकेच नाही तर कोण कोणाचा डुआयडी आहे, त्यातला कोण माझ्यामागे हात धुवून वगैरे लागलाय हे देखील शोधायचा त्रास घेतला नाही. कारण हे सारे मिळून खरे तर माझेच मनोरंजनाचे दुकान चालवत होते. त्यांचा मी आभारीच आहे.

पण आज नाही ......

आज प्रश्न माझा नाही , माझ्या ईमेजचा नाही, किंवा माझ्या तत्वांचाही नाही..
आज प्रश्न दारूच्या उदात्तीकरणाचा आहे. या धाग्यामुळे कोणाला माझ्याबद्दल गैरसमज होत असेल तर त्याची मला पर्वा नाही, पण एक दारूला वाईट म्हणनारी व्यक्ती अखेर दारूच्या उदात्तीकरणाला बळी पडली असे यातून कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज वेळीच खोडून काढणे गरजेचे आहे. दारूला घातक पेय म्हणणारेही अखेर तिलाच मिठी मारतात असे कोणाला यामुळे वाटले तर त्यांना वेळीच हे असत्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे.

कोणाला तरी असा धागा काढावासा वाटला याचा एका दृष्टीने पाहता मला आनंदही झाला आहे. कारण माझ्या कार्याची दखल घेत कोणातरी मद्याचे उदात्तीकरण करणार्‍याला माझा असा काटा काढावासा वाटला हि त्या कार्याची एक पावतीच आहे. पण त्याचवेळी हा डाव उधळून लाऊन माझा वापर करून कोणी मद्याचे उदात्तीकरण करू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे म्हणून हा धागा.

ऋन्मेष हा एक वाह्यात ईन्सान आहे असे शंभरातल्या शंभर मायबोलीकरांना वाटले तरी वाटू द्या.
पण दारू हे एक वाह्यात पेय आहे हे शंभरातल्या किमान ९९ मायबोलीकरांना पटत नाही तो पर्यंत तरी मी नाही सुधारणार _/\_

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या ऋबद्दल मायबोलीवरचा जुना धागा
'शब्दाचे योग्य रूप कोणते' https://www.maayboli.com/node/7295
इथे टाकून ठेवा संदर्भासाठी. तिथे असेलही पण धाग्याची बरीच पाने पलटायला हवीत शोधायला.

मायबोलीवर धागा काढून एखादा विषय मांडणे यात कुणाचे चारित्र्य हनन कसे होते हे मला अजून समजलेले नाही. दोन वेगळ्या पण सारख्या भासणार्‍या आयडी मध्ये गल्लत करणे हा वाचकाच्या बुद्धीचा दोष. लेखकाचा नक्कीच नाही.

चारित्र्यवान माणसाचे चारीत्र्य बिघडलेले आहे ही गोष्ट मात्र येथे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात यावी.

पर्फेक्ट ! Proud कारण फक्त एवढेच आहे की मी कुटुंब कबिल्या सोबत बाहेर जाऊन आलो हे लोकांना दर्शवुन देण्या साठी नमनाला घडाभर तेल ओतुन नवीन धागा काढता आला.

मला वाटते उर्दूमध्ये (आणि बहुतेक पारसीमध्ये) अक्ल, वस्ल, नस्ल
ह्यासारख्या शब्दांमधे जो अर्धा ल आहे तो स्वर असावा, व्यंजन नसावे.

हे खरं असेल तर ह्यात र्हस्व-दीर्घचा फरक आहे. >> कर्रेक्ट.
ती फक्त दुसरी व्यक्ती आहे आणि धागे विणायचा अधिकार त्याला ही आहे. त्याला/तिला फेक म्हणायचा अधिकार तुला कुणी दिला ऋन्मेष?
त्या धाग्यात चारित्र्य हनन सारखे काय आहे आणि? तू विरोध करतोस म्हणुन लोक पिणे सोडुन देतील किंवा तुला अपेक्षित असे वागतील असा भाबडा आशावाद आहे का?

दिलीपकुमारचा राम और शाम दोन दिवसांपूर्वी बघितला. मला 'ऋन्मेऽऽष आणि ॠन्मेऽऽष' असे वाटू लागले आहे Lol साधर्म्य असणारे जुळे आयडी पण भिन्न स्वभाव

ती फक्त दुसरी व्यक्ती आहे आणि धागे विणायचा अधिकार त्याला ही आहे. त्याला/तिला फेक म्हणायचा अधिकार तुला कुणी दिला ऋन्मेष?
नवीन Submitted by aashu29 on 14 July, 2021 - 11:26
>>>

तटस्थपणे विचार करा. जर मायबोलीवर कोणी aashu 29 असा आयडी घेऊन एखादी गलिच्छ भाषेतील पोस्ट केली तर तुम्हाला ते चालेल का?
किंबहुना ज्यांना ज्यांना असे चालत असेल त्यांनी हात वर करा, आपण त्यांच्या नावाचे साधर्म्य असणारे आयडी काढूया. अ‍ॅडमिनलाही त्यांनी सांगा की तो आयडी राहू द्या Happy

.
त्या धाग्यात चारित्र्य हनन सारखे काय आहे आणि? तू विरोध करतोस म्हणुन लोक पिणे सोडुन देतील किंवा तुला अपेक्षित असे वागतील असा भाबडा आशावाद आहे का?
नवीन Submitted by aashu29 on 14 July, 2021 - 11:26
>>>>
बदलाची शक्यता ०.०००००१ टक्के का असेना म्हणून चुकीच्या गोष्टींना चुकीचे म्हणायचे नाही का?
माझ्या अखंड आयुष्यात निदान एकाने तरी माझ्यामुळे दारू सोडली, वा किमान आहारी न जाता कंट्रोलमध्ये पित राहिला तर एक कुटुंब वाचले म्हणत मी समाधानाने डोळे मिटेन.

तुमचा हेतु चांगला आहे दारूपासून एखाद्याला परावृत्त करण्याचा पण तेवढ्यावरून समाधानाने डोळे मिटेन वगैरे थोडं जास्तच झालं.

पण तेवढ्यावरून समाधानाने डोळे मिटेन वगैरे थोडं जास्तच झालं.
>>>>>
तेवढ्यावरून नाही, माझी बकेट लिस्ट म्हणा हवे तर, फार मोठी आहे. हे त्यातील एक आहे.
या विकेंडला लोनावळ्याला गेलेलो, तेव्हा गप्पांत विषय निघाला, त्यात असे माहीत पडले की हल्ली कित्येक मुलींच्या बकेट लिस्ट मध्ये मद्य पिऊन बेछूट धिंगाणा घालणे असते. कमॉन, पुरुषांची मक्तेदारी मोडणार्‍या स्त्रियांचे मला नेहमीच कौतुक वाटत आलेय. पण आम्हीही तुमच्या तोडीस तोड व्यसने करू शकतो हे जे खूळ हल्ली नवीन येतेय त्याला आवरायला हवे. जिथे आधीच व्यसनाच्या आहारी गेलेल्या पुरुषांना मागे आणायचे आहे तिथे आणखी व्यसनमुक्ती वाल्यांचा लोड का वाढवता आहात... चुकीच्या गोष्टीत का बरोबरी करत आहात? उलट अभिमान बाळगा मला कसलेही व्यसन नसल्याचा. कारण मी कॉलेजात अनुभवलेय की मित्रांच्या ग्रूपमध्ये काही जण एवढ्यासाठीच दारूच्या आहारी जातात की ईतरांच्या मांडीस मांडी लाऊन दारू न पिल्यास ते बायलट वा शेमळट समजले जातील. मी सुद्धा या गैरसमजाचा शिकार झालेलो. सुदैवाने बचावलो.

फेक आयडीने दारूचा धागा काढला होता याचे शल्य जास्त दिसते, इतर चालले असते असे वाटले. नशा शराबमें होता तो नाचती बोतल... असं मी नाय किशोरकुमार म्हणाला... जाऊ द्या.
>>>>>>>

खरंय, किशोरकुमारला जाऊ द्या, तो गायक होता. अमिताभ नट होता. हे जे म्हटलेय त्याची जबाबदारी गीतकारावर आहे. त्याला धरून चोपले पाहिजे.

बाकी ईतर धागे म्हणजे दारूचे दुष्परीणाम सांगणारा धागा असता तर का नाही चालला असता? त्या धाग्यावर क्लीअर केले असते की हा ॠन्मेष वेगळा आहे. पण धागा आणि आयडी तसाच राहू दिला असता.

सर मी तुमच्यामुळे दारूच्या आहारी न जाता कंट्रोल मध्ये पीत आहे
खोटे नाही सांगत लॉक डाऊन च्या आधीपासूनच माझ्याकडे एक डबल ब्लॅक होती
अजूनही ती थोडी शिल्लक आहे
हे कंट्रोल मध्ये येत असेल तर प्लिज दावा केलाय मोठ्या तोंडाने तर वागणार का

नैतर मागे जशी पलटी मारली मायबोली सोडून जाताना तसे करणार

तसे केलेत तर मग मला दुःख होईल आणि मी दारूच्या आहारी जाईन आणि त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल

सर मी तुमच्यामुळे दारूच्या आहारी न जाता कंट्रोल मध्ये पीत आहे
>>>>
आशूचॅम्प हे खरेच असेल तर ईथे मोठ्या मनाने कबूल केल्याबद्दल धन्यवाद Happy
माझ्या बकेट लिस्टीतले एक काम आज झाले समजेन Happy

दोन्ही आयडी जर "सुक्ष्मफरक" धरुन होते तर दुसर्‍याला घराबाहेर का काढला ? (बाय दवे पहिल्यालाही काढता आलेच असते की? ह्यो अन्याव हाय जजसाब ह्यो शिलेक्टीव अन्याव हाय इति. महेश देश्मुख- सल्फ्युरिक अ‍ॅसिड)

>> हे जे म्हटलेय त्याची जबाबदारी गीतकारावर आहे. त्याला धरून चोपले पाहिजे.

नाही हो. गीतकार बिचारे गरीब प्राणी असतात. स्वतःची मर्जी कमी आणि दिग्दर्शक निर्माते म्हणतात त्यानुसारच अधिक शब्दरचना त्यांना कराव्या लागतात. बरं निर्माते तरी कुठं स्वतःच्या मर्जीने वागतात. काय पॉप्युलर होईल आणि गाणे हिट होईल हे त्यांना बघावे लागते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हे गाणे पॉप्युलर झाले. मग आता ह्यात कुणाचा दोष Proud

एकूणच या धाग्यातल्या चर्चेनुसार मिस्टर प्रकाश मेहरा हे दोषी आहेत हे सिद्ध झाले आहे.

बाय दवे पहिल्यालाही काढता आलेच असते की? ह्यो अन्याव हाय जजसाब ह्यो शिलेक्टीव अन्याव हाय
>>>>>>>

खालील फोटोमध्ये एक व्यक्ती दिसत आहे तिच्यावरही नेहमी वैयक्तिक शतकासाठी खेळतो असा आरोप होतो.
उद्या जर तिची जागा घ्यायला फोटोतली दुसरी व्यक्ती आली तर तुम्ही पहिल्या व्यक्तीला संघातून काढणार का?
निर्णय तुमचा ! सन्मान आमचा !!

sachin duplicate.jpg

जबाबदारी गीतकारावर आहे. त्याला धरून चोपले पाहिजे
>>>
अन्जानला शराबीसाठी फिल्मफेअरचं नॉमिनेशन होतं त्यावर्षीचं.

फक्त अन्जानच का? अनेक गाणी लिहून शाहरुखला सुपर्र्स्टार केल्याबद्दल अनेक गीतकारांनाही चोपलं पाहिजे खरं म्हणजे. आणि त्याने दारुडा देवदास करून चुकीचा पायंडा पाडला. त्यालातर जबरदस्त चोपलं पाहिजे.

आणि त्याने दारुडा देवदास करून चुकीचा पायंडा पाडला. त्यालातर जबरदस्त चोपलं पाहिजे.
>>>>>>
जे चित्रपटातून आणि गीतातून दारूचे उदात्तीकरण करतील त्यांना चोपायला हवे.
जे आपल्या कलाकृतीतून सत्य परीस्थितीचे चित्रण करत दारूचे दुष्परीणाम दाखवतील, त्यांचा सत्कार करायला हवा
मग सदर व्यक्ती शाहरूख असो वा अमिताभ वा शेहेनशाह अकबर, मला काही फरक पडत नाही.
मद्य आणि सिगारेटच्या जाहीराती करणार्‍या सेलेब्रेटींचा मी या कारणासाठी नेहमीच निषेध करतो आणि जे हे करत नाही त्यांचे कौतुकाचे धागे वेळोवेळी मायबोलीवर काढले आहेत.

अन्जानला शराबीसाठी फिल्मफेअरचं नॉमिनेशन होतं त्यावर्षीचं.
>>>>
दारू सरकारला करोडोंचा महसूल मिळवून देते म्हणून ते आरोग्यवर्धक पेय ठरत नाही.
राहिला प्रश्न फिल्मफेअरचा तर ते फिक्स असते. निम्मे तर शाहरूखने आपल्या खिशात टाकले आहेत, डिजर्व्ह न करताही.

माझा कबीरसिंग धागा पाहा, दारूने एका ब्रेक अप प्रेमीची काय अवस्था होते हे त्यात छान दाखवले आहे. म्हणून तो मला आवडलाही आहे.
पण हे काय, नशा शराब मे होता तो झूमती बॉतल म्हणून त्याला ग्लॅमर देत नाचायचे. बिलकुल चुकीचे आहे हे. पुर्ण चित्रपटभर जर कोणी दारू पितानाची मौजमजा दाखवत असेल आणि शेवटी उपरती दाखवत असेल तरी बरेचदा ते दारूचे ग्लॅमरस रूपच प्रेक्षकांच्या लक्षात राहते,
पण तेच देवदास वा कबीर सिंग चित्रपट बघा, प्रत्येक दारूच्या दृश्यात नायकाची दयाच येते, हे असे कोणाच्या नशीबी नको येवो, दारू हे वंगाळ पेय आहे हेच मनावर ठसते, हा फरक आहे !

उद्या जर तिची जागा घ्यायला फोटोतली दुसरी व्यक्ती आली तर तुम्ही पहिल्या व्यक्तीला संघातून काढणार का?
जागा घ्यायला आली हे कोण ठरवणार ???????

नशा शराब मे होता तो नाचती बोतल हे फारच बकवास विधान आहे.

दूधात प्रथिने असती बाटली वाढली असती
किंवा पोटॅशियम सायनाईड विष असतं बाटली मेली असती असं म्हटल्या सारखे आहे ते.

कुणीही दारू त्यात नशा नाही, आरोग्यास चांगली आहे म्हणुन पीत नाही. तर दारूच्या होणाऱ्या परिणामासाठीच पितात.
अन्यथा त्यांना नशा नसलेले, अल्कोहोल नसलेले, आरोग्यास अधिक फायदेशीर पेय दिले तर अनेकांनी दारू सोडून ते पेय पिणे सुरू केले असते.

पिणाऱ्याने सरळ 'होय, दारूत नशा असते, हलकीशी नशा करायला मी पितो/ते' हे मान्य करायला काय हरकत आहे?
सत्य स्वीकारावे. आपण घेतो म्हणुन नसते उदात्तीकरण का करावे उगाच?

तसे केलेत तर मग मला दुःख होईल आणि मी दारूच्या आहारी जाईन आणि त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल>> लोल आशुचँप नेहमी हसवता..

aashu 29 असा आयडी घेऊन एखादी गलिच्छ भाषेतील पोस्ट केली तर तुम्हाला ते चालेल का?>>> सुक्ष्म फरक असलेला सेम आयडी असेल तर मला काहीही फरक पडणार नाही, कारण मी फारसे मी किती महान, मी कशी अमुक तमुक म्हणुन मिरवत नाही सोशल साईट वर.

तो दुसरा आयडी फेक कसा आणि त्यालाही धागे विणण्याचा अधिकार का नाही? याला बगल दिली हे अपेक्षित होतेच.

साखरेने मधूमेह होतो हे माहीत असूनही लोक साखर, मिठाई खातात. बाहेर गेल्यावर कोरोना चावतो हे माहीत असूनही लोक गर्दीत मास्क न घालता फिरत असतात. सतत काळजी वाहत जगणे हे कदाचित शक्य होत नसावे. काटेकोर , चाकोरीबद्ध जगणा-यांची संख्या थोडी असावी. ज्याचा जो चॉईस आहे त्याला ते करू द्यावे. परिणाम सांगणे वाईट नाही. मात्र त्याच्या विचारात बदल करणे हे त्याचेच काम आहे. आपले नाही.

Pages