सोशलसाईटवर होणारे चारीत्र्य हनन आणि मद्य

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2021 - 15:57

बराच काळ लॉकडाऊनचे सुख उपभोगल्यानंतर दोनचार दिवस कुठेतरी फिरून यायचे ठरवले. फारसा विचार न करता लोणावळा गाठले. काही जणांनी धोक्याची सूचना दिली, या काळात बाहेर जाऊ नकोस म्हणून. पण घरच्यांना एका हवापालट रूटीनचेंज ब्रेकची गरज होती. म्हणून मग गेलो. कोरोनापासून बचाव म्हणून गर्दीच्या जागा टाळायच्या होत्या. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करायचा होता. ती काळजी घेतली. पण अखेर ज्याची कल्पनाही केली नव्हती ते झाले..

आज मायबोलीवर येऊन बघतो ते माझाच एक फेक आयडी बनला होता.
माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष

म्हणजे अगदी जाणवूही नये ईतका सूक्ष्म फरक ठेवला होता.
अर्थात अ‍ॅडमिनकडे रीतसर तक्रार करताच तो उडेलच यात शंका नाही. पण या काळात जे चारीत्र्यहनन व्हायचे होते ते झालेच.
कारण त्या आयडीने धागाही कुठला काढला होता तर - एक करोड बियरप्रेमींचा ग्रुप !

अख्ख्या मायबोलीला ठाऊक असेल की माझे अर्धे आयुष्य दारूला विरोध करण्यात गेले आहे. दारूची जाहीरातबाजी असो वा उदात्तीकरण मी त्याला नेहमीच विरोध करत आलो आहे. संधी मिळताच दारू हे कसे शरीराला घातक पेय आहे याची लोकांना वेळोवेळी आठवण करून देत असतो. आणि आज त्यालाच छेद द्यायला म्हणून कोणीतरी माझ्याच नावाचा आयडी घेत बीअरप्रेमींचा ग्रूप उघडला.

चारीत्र्यहननाची मी कधीच पर्वा केली नाही. याआधीही माझेच भासावे असे डुआयडी मी इथे पाहिले आहेत आणि ते अश्याच कारणांसाठी वापरले आहेत. म्हणजे ऋन्मेष कोणावर वैयक्तिका टिका करत नाही अशी त्याची इमेज आहे तर एखादा डुआयडी काढून एखाद्या चर्चेत त्याची बाजू घेत, त्याच्यावतीने शिवीगाळ करा आणि असे भासवा कि हा डुआयडी वापरून शिवीगाळ करतो. एखादा डुआयडी काढा आणि त्यातून उगाच माझे जुने धागे वर काढा, उगाचच आतिशयोक्ती भासावी अशी स्तुती करा, मग अजून एका डुआयडीने तो आधीचा माझाच डुआयडी असल्याची टिका करा. हे सर्व सोशलसाईटवर वर्षानुवर्षे होत आलेय, होत राहील. मी कधी त्याची पर्वा केली नाही, की कोणाला कसले स्पष्टीकरण द्यायला माझा वेळ खर्च केला नाही. ईतकेच नाही तर कोण कोणाचा डुआयडी आहे, त्यातला कोण माझ्यामागे हात धुवून वगैरे लागलाय हे देखील शोधायचा त्रास घेतला नाही. कारण हे सारे मिळून खरे तर माझेच मनोरंजनाचे दुकान चालवत होते. त्यांचा मी आभारीच आहे.

पण आज नाही ......

आज प्रश्न माझा नाही , माझ्या ईमेजचा नाही, किंवा माझ्या तत्वांचाही नाही..
आज प्रश्न दारूच्या उदात्तीकरणाचा आहे. या धाग्यामुळे कोणाला माझ्याबद्दल गैरसमज होत असेल तर त्याची मला पर्वा नाही, पण एक दारूला वाईट म्हणनारी व्यक्ती अखेर दारूच्या उदात्तीकरणाला बळी पडली असे यातून कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज वेळीच खोडून काढणे गरजेचे आहे. दारूला घातक पेय म्हणणारेही अखेर तिलाच मिठी मारतात असे कोणाला यामुळे वाटले तर त्यांना वेळीच हे असत्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे.

कोणाला तरी असा धागा काढावासा वाटला याचा एका दृष्टीने पाहता मला आनंदही झाला आहे. कारण माझ्या कार्याची दखल घेत कोणातरी मद्याचे उदात्तीकरण करणार्‍याला माझा असा काटा काढावासा वाटला हि त्या कार्याची एक पावतीच आहे. पण त्याचवेळी हा डाव उधळून लाऊन माझा वापर करून कोणी मद्याचे उदात्तीकरण करू नये याची काळजी घेणेही गरजेचे आहे म्हणून हा धागा.

ऋन्मेष हा एक वाह्यात ईन्सान आहे असे शंभरातल्या शंभर मायबोलीकरांना वाटले तरी वाटू द्या.
पण दारू हे एक वाह्यात पेय आहे हे शंभरातल्या किमान ९९ मायबोलीकरांना पटत नाही तो पर्यंत तरी मी नाही सुधारणार _/\_

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष>> हे इतकं लिहून तिथे त्या धाग्यावरच प्रतिसाद दिला असता तर मला तुझ्याबद्दल आदर वाटला असता किंवा फक्त एवढं लिहून दोन ओळींत हा धागा विणला असता तरी चालले असते. आशा नाही तरी फुकटचा सल्ला, बरा हो.

तर मला तुझ्याबद्दल आदर वाटला असता
>>>>
मी हे लिहीताच तो धागा उडला असता. माझ्या या पोस्टसह उडला असता. जर तुम्ही ती पोस्ट वाचायच्या आधीच ऊडला असता. तर तुमच्याकडून मला मिळणारा संभाव्य आदरही त्यासोबत उडला असता Happy

माझ्या मते एकच युजरनेम दोन जणांना घेता येत नाही. किंचित फरक असेल तरी तो आयडी उडाला नसता तर बघायला मिळाला असता.
बाकी फक्त बिअरप्रेमीच का ? बाकीच्या मद्यप्रेमींवर अन्याय का हा प्रतिसाद तिकडे द्यायचा राहून गेला तो इथे देतो. Happy

मायबोली सोडणार याचा खराच अर्थ घेऊन आइडी घेतलेला दिसतोय.
बाकी आइडी ऊर्फ युजरनेम हे एक कंपुटरच बघतो ना जुन्याशी पडताळून? तो वेगळा असल्याने स्विकृत झाला आणि अक्टिवेट झाला.
एकूण गंमतच आहे.

तो वेगळा असल्याने स्विकृत झाला
>>>
वेगळा असेल तर सिस्टम स्विकारत असेल. पण त्या नावाला आत घ्यायचे की नाही हे प्रशासन अ‍ॅप्रूव्ह करत असेल ना. . आणि आधीच एक ऋन्मेऽऽष असताना आणखी एक ॠन्मेऽऽष नावाचाच आयडी त्यांनी अ‍ॅप्रूव्ह केला असेल असे वाटत नाही.
तर साहजिकच आहे, एंट्री मारताना वेगळे नाव असेल, मग आत आल्यावर नाव बदलले असेल.
पण समजा नंतर एडीट करायचा पर्याय प्रशासकांनी काढून टाकला तर हे जमले नसते.
अर्थात ईथे रोज पडीक असणार्‍या सक्रीय सभासदांची नावे प्रशासकांना ठाऊक असणारच. त्यांच्या नावाचा सिमिलर आयडी जो मुद्दाम खोडी काढायला बनवला आहे तो प्रशासन मुळातच आत घेणार नाही, आणि दुसर्‍या नावाने आले तरी त्यांना स्वतःहून बदलता येणार नाही.
अर्थात हे असले प्रकार वारंवार बरेच आयडींशी घडू लागले तरच करावे. उगाच त्रास करून घेऊ नये Happy

नाही असे होत नाही ऋन्मेष. एक आयडी अस्तित्वात असताना त्याच नावाने दुस-या आयडीला एडीट करून सुद्धा युजरनेम घेता येत नाही. हवं तर माझा आयडी घेता येतो का पहा.
अट एकच जसाच्या तसा आयडी. सूक्ष्म फरक सुद्धा नको. यात अ‍ॅप्रूव्हल चा संबंधच येत नाही. सिस्टम जनरेटेड चेक्स आहेत.

शांत माणूस,
एक आयडी अस्तित्वात असताना त्याच नावाने दुस-या आयडीला एडीट करून सुद्धा युजरनेम घेता येत नाही. हवं तर माझा आयडी घेता येतो का पहा.
अट एकच जसाच्या तसा आयडी. सूक्ष्म फरक सुद्धा नको.
>>>>>
अहो तेच तर, सूक्ष्म फरक करूनच आयडीनाव बदलण्यात आले आहे ना. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सभासदांना स्वतः आपले युजरनेम एडीट करायची परवानगी वा सोय असेल. जर ती नसेल तर एखाद्या सभासदाला नाव बदलायला अ‍ॅडमिनकडे धाव घ्यावी लागेल. आणि अ‍ॅडमिन मग सूक्ष्म फरक केलेले नाव अ‍ॅप्रूव्हच करणार नाही.

रॉ कडे तपास देण्यात अर्थ नाही. तिथले अनेक जण आयएसआय शी संधान बांधून आहेत.
लोणावळा हे आयएसआय च्या कारवायांचे केंद्र बनले आहे. कोणीतरी एजंटने याला तिथे फिरताना पाहून घाईघाईने हा कट रचला असणार. हा भारताच्या एकात्मतेवर हल्ला आहे.
रॉ पेक्षा केएलपीडी कडे तक्रार केली पाहिजे. केएलपीडी म्हणजे खंडाळा लोणावळा पोलिस डिपार्टमेंट.

बापरे बारा हजार चिक्कीवर!! गरिबाला परवडायची नाही आता. असो. सौ ला चिक्की केक करायला स्कोप आहे.

फेक आयडीने दारूचा धागा काढला होता याचे शल्य जास्त दिसते, इतर चालले असते असे वाटले. नशा शराबमें होता तो नाचती बोतल... असं मी नाय किशोरकुमार म्हणाला... जाऊ द्या. Imitation is the sincerest form of flattery लक्षात घेऊन फेक आयडीलाही चांगले धागे काढण्यासाठी शुभेच्छा द्याल अशी आशा आहे. अस्मिता. आयडी असताना अस्मिता.. असा आयडीही होता/आहे. अशा घटना घडत असतात, तुम्ही पहिले ही नाही की शेवटचे ही नाही.

अस्मिता. आयडी असताना अस्मिता.. >> हा लक्ष दिले तर समजेला असा फरक आहे. ऋन्मेष चा जो तोतया होता त्याच्या आयडीत अजिबात फरक नव्हता. कदाचित आल्ट की वापरून तसाच दिसणारा आयडी वापरला असेल. आल्ट की चालते कि नाही हे पाहिलेले नाही.

नावातील सारखेपणामुळे आयडी कसा उडेल हा मला पडलेला भाबडा प्रश्न अजूनही तसाच आहे. रुन्मेशसरांनी मला फॅन बघायला सांगितला. शाहरुख असह्य होतो. कोण बघणार !
उद्या कोणी 'हडळीचा आशिक' असा आयडी घेतला तर तो उडेल की कसे....

हा आ >> नावातील सारखेपणामुळे आयडी उडणे हा नंतरचा प्रश्न आहे. मूळ प्रश्न एकसारखे आयडी घेताच येत नसताना घेतला कसा हा आहे.

माझे नाव - ऋन्मेऽऽष
त्याचे नाव - ॠन्मेऽऽष >> असा आय डी होता ना? हे खरं असेल तर ह्यात र्हस्व-दीर्घचा फरक आहे. पहिलं ऋ र्हस्व असतं नि ॠ संस्कृत मध्ये जास्त असतो पण हे दीर्घ अक्षर आहे. लृ आणि लॄ मधला जो फरक तोच इथे आहे, नाही?? शांत माणूस नि शांत माणुस किंवा सीमंतीनी आणि सीमंतिनी... नाही??? एकसारखा कुठंय??

अस्मिता. आणि अस्मीता. ह्यात जो फरक असेल तोच इथे आहे. हल्ली बाराखडीत ऋ आणि ॠ फार शिकवलेच जात नाहीत त्यामुळे लक्षात आले नसावे कुणाच्या.
(I could be wrong. बाराखडी शिकून अनेक वर्ष झाली आहेत तेव्हा चिनूक्स किंवा हीरा किंवा तत्सम संस्कृत येणार्‍या आयडींना विचारायला हवे.)

लृ आणि लॄ मधला जो फरक तोच >>> आता मात्र खरंच माझ्या अज्ञानाची लाज वाटू लागली आहे हा दुसरा लॄ पाहिलेला देखील नाही. या धाग्यामुळे अशा गोष्टी ध्यानात आल्या हे ही नसे थोडके.

मला एकच ऋन्मेष माझ्या ब्राऊजरमध्ये( ऑपेरा) असा वेगवेगळा दिसतो. कदाचित काहीतरी तांत्रिक दोष असावा. PicsArt_07-14-07.13.08.jpg

सीमंतिनी/सीमंतीनी, आजकाल मराठी बाराखडीत ऋ ॠ वगैरे येत नाहीत. लृ हा स्वर तर नाहीच शिकवला जात. त्याचा उच्चारही ल् + ऋ सारखा नसून काहीतरी वेगळा आहे. त्यात मूर्धन्य उच्चार होत नाही (जो र/ऋ मध्ये असतो). लॄ - हा स्वर मी कुठे पाहिला नाही.

मी मराठीत शिकलेली बाराखडी - क का कि की कु कू के कै को कौ कं कः - अशी होती (हे बारा होतात). तुम्हाला कृ, कॄ, क्लृ पण होते का?

पहिला वाला क्लृप्ती मध्ये पाहिलाय >> हो बरोबर. जसा ऋ चा अर् होतो (कृ धातूची रुपं कर् पासून चालू होतात), तसा लृ स्वराचा अल् होतो. क्लृप् धातूपासून कल्प् - कल्पना वगैरे होतात. लृ चा उच्चार ल् + ऋ असा असता तर त्याचा क्ल्रप् किंवा क्लर्प् झाला असता.

ह. पा. Happy "सीमंतिनी"ला विचारलं म्हणून सांगते - कृ, क, क्लृ नव्हते बाराखडीत. बहुतेक अंकलिपी शब्द तिथे चपखल ठरला असता Happy . अंकलिपीत ऋ ऋषिचा नक्की होता आणि इतर अक्षरे होती का ते आठवत नाही पण ही अक्षरे लेजिट अक्षरे आहेत. आता मराठीत 'लेजिट' की संस्कृत, हिंदी अशा इतर देवनागरी भाषेत 'लेजिट' पण मराठीत 'अ-लेजिट' ते माहिती नाही Happy .

चिनूक्स, हीरा, शंतनू व अन्य मराठी/संस्कृत चांगलं येणारे डिस्टींक्शनवाले लोकं बोलवा ह्या धाग्यावर Happy मी म्हणजे पहिल्या फटक्यात पास गट आहे.

सीमंतिनी Happy
अंकलिपीपेक्षा वर्णमाला शब्द पाहिजे तिथे. वर्णमालेचा जो तक्ता होता घरी, त्यात ऋ ऋषीचा आठवतोय. पण शाळेत तो शिकवला होता का आठवत नाही.

अवांतर (खरं म्हणजे माझा वरचा मुद्दा पण मूळ विषयाला अवांतरच आहे, पण हे अजून अवांतर) - संस्कृतात अं आणि अ: हे स्वर मानले जात नाहीत.

धागा पाककृती विभागात हलवला तर बरे होईल.. >> Happy Happy Happy

नशा शराबमें होता तो नाचती बोतल>>>

प्रोटीन दूध मे होता तो, बढती बोतल
किंवा
जहर KCN मे होता तो, मरती बोतल.

फेक आयडीने दारूचा धागा काढला होता याचे शल्य जास्त दिसते, इतर चालले असते असे वाटले. >>> या धाग्याचा हा ही एक उपमुद्दा आहे. माझ्या दृष्टीने सध्या महत्वाचा. इतर अनेकांच्या दृष्टीने नाही. मी पण फेकच आहे पण इथे ड्युआयडी नाही. फरक लक्षात घ्या.
फेक आयडीने धागे काढता यावेत पण एक लक्ष्मणरेषा ओलांडली जाऊ नये इतकेच. सांजसंध्या हा ड्युआयडी चालवणा-याने फोनवरून सांगितले होते की स्त्री च्या दृष्टीकोणातून कविता लिहीण्यासाठी हा आयडी घेतला होता. त्याचा उद्देश नक्कीच लोकांना त्रास देण्याचा नव्हता.
बिथोवन या आयडीने जे केले त्याचे समर्थन कुणी करू शकेल असे वाटत नाही.
अर्थात मतमतांतरे असतीलच.
फेक आयडीने दारूचा मुद्दा मांडावा कि नाही, एकसारखे दिसणारे आयडीज घ्यावेत कि नाहीत , मांसाहाराचे समर्थन करावे का (फेक आयडीने) याबद्दल प्रत्येकाची (त्याला बरोबर वाटणारी) मते असतीलच.

हरचंद पालव >>>> __/\__ घ्या. माझा इतका अभ्यास नाही. तोकडा पडतोय. पण माझ्या आठवणीप्रमाणे काही आकार / ऊकार शिकवलेले नाहीत असेच वाटतेय. संस्कृतमधेही नाही शिकलो.

त्या दोन्ही ऋंंचा एचटीएमेल कोड/युटीएफ कोड वेगळा आहे का?
हपांंनी दाखवलेलं पटलं. गूगल इंडिक बोर्डावर दीर्घ ऋ दाखवला आहे पण दाबल्यावर र्हस्वच उमटतो.

Pages