खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_20210625_210758-1128x2000.jpg

रविवारी संकष्टी म्हणून शुक्रवारी केलेला बेत. झणझणीत
खाडीच्या कुर्ल्या, म्हणजेच खेकडे. मटण-चिकन एकतरफ आणि कुर्ल्यांची चव एकतरफ. आहाहा.

मटण-चिकन एकतरफ आणि कुर्ल्यांची चव एकतरफ. आहाहा... आरारारार्राररा... अगदी अगदी.. मी कामातून ब्रेक घेत लॅपटॉपवरच मायबोली उघडली आणि पहिलाच हा भलामोठा खेकडा फोटो.. अगदी टोपात तोल जाऊन पडलोच मी.. काय रापचिक दिसताहेत

वाह
गार्निशिंग करताना त्या कोंथीबीरच्य वरतीही चार कोलंब्या वेचून ठेवायच्या होत्या Happy

जाई कोलंबि भात छान झाला आहे.
भाताला माझा झब्बू . मी मटार पण घातलेत.
20210630_155443.jpg

हमस आणी छोले दाल चे टेक्सचर वेगवेगळे असणार.

थँक्स Happy

अमुपरी , झब्बू मस्तच आहे Happy

मस्त.
पाव नाही मिळाले तर केक खा.

@ मानवमामा Proud
आमच्याकडे तसेही केक नाही मिळाला तरी केकच खाऊ शकतो एवढे केक असतात.. नका त्याचे नाव घेऊ Proud

PSX_20210703_221650.jpg
अप्पे
PSX_20210703_221749.jpg
नारळ आणि कोथिंबीर चटणी
गत विकांताचा मेनू

Pages