बदला

Submitted by kotwalsk on 25 June, 2021 - 06:14

पहिल्यांदाच लिहितोय काही चुकल माकल तर माफ करा
अज्ञातवासी आणि बेफिकीर गुरु माझे. त्यांच्या प्रभावाने लिहीत आहे. थोडाफार त्यांचा टच असलेलं पण खूप आधीपासून मनात असलेलं लिहीत आहे
----------–-----------------------------------------------------------

गोवा प्रत्येक भारतीयांची इच्छा एकदा तरी तिथे जावे फिरावे मस्त मज्जा करावी. निसर्ग बघावं तर गोवा. गोव्यात आल्याशिवाय गोव्याची मज्जा काळात नाही हेच खरं. म्हणूनच फॉरेनर्स सुद्धा गोव्याला हजेरी लावतात.
अश्या या गोव्याला त्याचे पाय लागले. तो विष्णू, वय 36, वर्ण सावळा, उंची 5'5, तब्येत कमावलेली. पाठीवर छोटी सॅक. गरजेपुरते कपडे बस.
पणजी ला आल्यापासून फक्त पायी फिरत होता. शोध चालू होता. त्याची नजर हॉटेल्स वर फिरत होती. पण मनासारखं हॉटेल भेटत नव्हतं. शेवटी एका हॉटेल मध्ये जाऊन 1 बिअर घेतली. तेव्हा कुठं बर वाटलं. मग परत फिरणं चालू. फिरता फिरता एक हॉटेल त्याला मनासारखं भेटलं. हॉटेल गोवा इन प्युअर व्हेज. आणि बाहेर बोर्ड वेटर भरतीचा. विष्णूचे डोळे चमकले. हेच त्याला हवं होतं.
हॉटेल तस लहानच होत. पण टिपटॉप. दोन मजली हॉटेल पण गिऱ्हाईक एकदम कमी. साहजिकच गोव्याला येऊन कोण व्हेज खाणार.
हॉटेल मालक जॉर्ज कॉउंटरलाच बसलेला आणि त्याच्या समोर उभा होता विष्णू.
विष्णू-" नमस्कार"
जॉर्ज-"नमस्कार बोला काय सेवा करू आपली"
विष्णू-" सेवा तुम्ही नका करू, मला तुमची सेवा करायची आहे. बाहेर बोर्ड बघितला वेटर साठी म्हणून आलो"
जॉर्ज-ओके ओके, पण तू कुठला आहेस, गोव्याचा दिसत नाहीस.
विष्णू-"हो. मी पुण्याचा आहे, एकटाच आहे. तिकडे कंटाळलो म्हणून इकडे आलो. गोवा फार अवडते मला. म्हटलं इकडेच काही काम भेटल तर बघावं. "
जॉर्ज-" बर पण आधी या क्षेत्रात काम केलं आहेस का?"
विष्णू-" हो तर, दोन वर्षे काम केलंय, थोडंफार किचन मधलं पण काम जमते मला."
जॉर्ज-"बर, पण असं आहे की आपल्या हॉटेलला गिऱ्हाईक कमी आहे, म्हणून बाकीच्या हॉटेल्स पेक्षा आपल्याकडे पगार कमी आहे, काम पण कमीच आहे, बघ आधी जमेल का?"
विष्णू-" मी बाकीचे हॉटेल्स सोडून पहिल्यांदा तुमच्याकडेच आलोय. जमेल मला. तरी काय पगार द्याल तुम्ही?"
जॉर्ज-" बघ सात हजार पगार देईल. दोन वेळा जेवण एक वेळ नाष्टा आणि राहणे."
विष्णू-" ओके पण मी अस म्हणतो की पगार मला पाच हजारच द्या. पण रात्री माझी ड्युटी संपेल तेव्हा मात्र एक बीअर तुमच्या तर्फे. बस"
जॉर्ज विचार करू लागला हा वेडा आहे का? पण त्याला परवडत होत. म्हणून त्याने जास्त विचार नाही केला.
जॉर्ज-" ठीक आहे. तुझे आधार कार्ड माझ्याकडे जमा कर. इकडे नोंदणी करावी लागते. दुसर अस की सकाळी 11 ला ड्युटी चालू होईल तुझी ती रात्री शेवटचं गिऱ्हाईक असेपर्यंत. त्यानंतर तू बिअर पिऊ शकतोस. आणि दर रविवारी सुट्टी असेल. त्या सुट्टीचा तुला अर्धा पगार भेटेल."
विष्णू-" मग अस करा अर्धा पगारा ऐवजी मला रविवारी 3 बिअर द्या बस. बाकी ड्युटीचा मला काही प्रॉब्लेम नाही."
जॉर्ज-"ठीक आहे. अरे पीटर याला वरची स्टाफ रूम दाखवून दे. आज अराम करू दे. उद्या कामाला जॉईन होतील."
पीटर पुढे आला म्हटला चला, विष्णू त्याच्या मागोमाग निघाला. जिना चढून वरच्या मजल्यावर एक 15*15 ची रूम होती. पीटर त्याला सोडून निघून गेला. बॅग ठेऊन विष्णू बाथरूम मध्ये शिरला. फ्रेश होऊन बाहेर आला तर पीटर आला होता . हातात बिअर होती. म्हटला शेठ नि पाठवलंय तुमच्यासाठी. अराम करायला सांगितलंय, "
विष्णू हसून ओके बोलला. आणि बिअर पहिली. Tuborg होती. त्याचाच ब्रँड. हा योगायोग होता.
पीटर निघून गेला. बिअर फोडून त्याने बाटली तशीच तोंडाला लावली.
जॉर्ज विचार करत होता. विष्णू बद्दल. हॉटेल लाईनचा माणूस नाही दिसत हा. त्याची उंची तब्येत राहणीमान सगळंच वेगळं आहे. आपण चूक तर केली नाही ना. पगारासाठी लोक त्रागा करतात पण याने स्वतःच पगार कमी घेतला. काम तर करेल की नाही. खूप विचार केल्यावर त्यांनी ठरवलं 2 4 दिवस पाहू. जर नीट काम केलं तर ठीक. नाहीतर काढून टाकू.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय !!
मोठ्या भागांची अपेक्षा आहे

१)<<<मनासारखं हॉटेल भेटत नव्हतं. शेवटी एका हॉटेल मध्ये जाऊन 1 बिअर घेतली. तेव्हा कुठं बर वाटलं. मग परत फिरणं चालू. फिरता फिरता एक हॉटेल त्याला मनासारखं भेटलं. >>>

हॉटेल भेटतं? ते कसं काय?

२) <<<बिअर फोडून त्याने बाटली तशीच तोंडाला लावली.>>>

बिअर फोडली की बिअर ची बाटली?

<<<अज्ञातवासी आणि बेफिकीर गुरु माझे. >>> हे दोघं अतिशय उत्तम लिहितात. त्यांच्या पातळीला यायला तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील. असो.

हे भेटणे वगैरे शब्दप्रयोगावर मी आधीच लिहिले होते. ज्या अकोल्यातून लेखक आले आहेत त्या
भागात हा शब्द प्रयोग सर्रास वापरला जातो.
" त्याची बायको काल जळाली." हे ऐकून मी उडालोच होतो. पण नंतर कळले कि तिचा हात गरम पाण्याने भाजला होता. अजूनही अश्या बऱ्याच गमती जमती आहेत.
"तो गाडीखाली मिळाला." हे ऐकले आहे कि नाही?
"पाणी उकडून आणि गाडून प्या."
पुण्या मुंबईकरांना हे सर्व नवीन असणार. तेव्हा प्लीज समजून घ्या.
छान सुरुवात केली आहे. ती लय सोडू नका. म्हणून म्हणतो पुलेशु!

king_of_net धन्यवाद

रश्मी. धन्यवाद

स्वेन सर, माफी असावी. जस गाव तशी भाषा. त्यामुळे काही शब्द तुम्हला आवडले नाहीत. आणि हो हे खरंय की बेफिकीर आणि अज्ञातवासी यांच्या इतक् चांगलं मी नाहीच लिहू शकत. खर तर पहिल्यांदाच लिहितोय. ते दोघंही माझे गुरू आहेत. ते खूप उंचीवर आहेत. आणि मी जस्ट आलोय. माफी असावी पुन्हा एकदा

च्रप्स धन्यवाद

Sadha manus धन्यवाद

प्रभुदेसाई सर धन्यवाद

विदर्भातील लोकं निर्जीवाला सजिवासारखेच मानतात. Happy

जे जे भेटिशी भुत, त्यासी मानिजे भगवंत, असं काहीसं.
बाकी मालवणी चालते, तर वर्हाडी का नाही. त्याचाही आनंद घ्या. Happy
छान लिहिलय...

माफी असावी. जस गाव तशी भाषा.>>माफी कशासाठी मागत आहात. प्रत्येक बोलीभाषेचा एक गोडवा असतो.
छान सुरुवात केली आहे तुम्ही.

पुण्या मुंबईकरांना हे सर्व नवीन असणार. तेव्हा प्लीज समजून घ्या.
>>> मुंबईकर नाही हो.. हे पुण्याचेअसतात भेटणे म्हणू नका मिळणे म्हणा वगैरे ... शुद्ध मराठी शिकवायचा आग्रह असतो जगाला...
हु केयर्स...
मुंबईकर सर्रास भेटलो म्हणतात.. दुकान भेटले.. लोकल भेटली....

लेखक तुम्ही पटापट पुढचा भाग टाका...

विदर्भातील लोकं निर्जीवाला सजिवासारखेच मानतात>>>>
हो हे मी पण ऐकले आहे. आपण म्हणू कि "ते दोन खडे उचल."
ते काय म्हणतात " भाऊ ते दोघे खडे उचल."

बईकर नाही हो.. हे पुण्याचेअसतात भेटणे म्हणू नका मिळणे म्हणा वगैरे ... शुद्ध मराठी शिकवायचा आग्रह असतो जगाला...
हु केयर्स...
मुंबईकर सर्रास भेटलो म्हणतात.. दुकान भेटले.. लोकल भेटली.... >>>>>> +१

शुद्ध = प्रमाण ; बाकी सहमत. Happy
वैदर्भिय भाषेचे व्याकरण हिंदी प्रमाणे चालते. मिला क्या ? = भेटलं का? वगैरे

वैदर्भिय भाषेचे व्याकरण हिंदी प्रमाणे चालते. मिला क्या ? = भेटलं का? वगैरे>>>
हो न .
"अकोला यहासे कितना लंबा गिरता है?"
"मी ताला खुल्लाच सोडला."

@kotwalsk, तुम्ही स्वतःच्या लिखाणावर समाधानी असाल तर अवश्य लिहा.
लिहून लिहून च लेखणीला पैलू पडतात..
इथले प्रतिसाद काही वेळा पैलू पाडायचं काम करतात, त्यामुळे सकारात्मक घ्या..
शुभेच्छा!