वापरा आणि फेकून द्या

Submitted by दिनेशG on 10 June, 2021 - 14:21

तुम्ही नवा मोबाईल विकत घेता तो किती वर्षे वापरता? नवा टीव्ही, गाडी, फ्रिज , लॅपटॉप , फूड प्रोसेसर, वॉशिंग मशिन विकत घेताना पुढे किती वर्षे ती गोष्ट आपण वापरणार आहोत याचा विचार टिपिकल मध्यमवर्गीय माणूस तर नक्कीच करतो. एके काळी, मोठ्या मुलाचे कपडे छोट्याला वापरायचे आणि नंतर त्यालाही तोकडे पडायला लागल्यावर त्याचे पायपुसणे नाहीतर भानशीरे ( या शब्दाची उत्पत्ती कुणास ठावूक असल्यास सांगावी!) बनवायचे आणि तेही पार फाटून वाट लागल्यावर काही नाही तर पाणी तापवण्याच्या चुलीत विस्तव पेटविण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा!

थोडे मागे जाऊन विचार केला तर असे आढळून येईल की या साऱ्या गोष्टींचे आयुष्य कमी कमी होत आहे. 'वापरा आणि फेकून द्या' तत्वावरच बनविलेल्या वस्तूंचे प्रस्थ वाढत चालले आहे किंबहुना उत्पादक या गोष्टी एकदा वापरून फेकून देण्यासाठीच असतात अशी विचारसरणी ग्राहकांच्या गळी उतरण्यात यशस्वी झाल्या आहेत.

मागे २०१७ ला एक मोबाईल कंपनी मुद्दामहून अपडेट द्वारे मोबाईल स्लो करण्याचा करतेय हे उघडकीस आले होते. नंतर कंपनीने सारवासारव केली की जुनी बॅटरी पुरेसा करंट देऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा फोन पुन्हा पुन्हा अचानक बंद पडून खराब होऊ नये म्हणून त्यांनी हे काम केले होते! या सर्व प्रकारासाठी कंपनीला दंड भरावा लागला होता.

मोबाईल, लॅपटॉप म्हटल्यावर त्यांचे आयुष्य जास्तीत जास्त ३ वर्षांचे असणार हे आपण गृहीत धरतो. ऑपरेटिंग सिस्टिम आणि अपग्रेड होणारे अँप्लिकेशन्स जुने हार्डवेअर सपोर्ट करू शकत नाही हे मान्य आहे, तरीसुद्धा हे प्रॉडक्ट्स डिझाईन करत असताना हार्डवेअर अपग्रेड ची सोय करून देणे करणे शक्य आहे असे एक एम्बेडेड सिस्टीम इंजिनिअर म्हणून मला वाटते. परंतु त्यामुळे त्या कंपनीचे अर्थकारण बिघडेल हा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे. असे केल्यास दर तीन महिन्यांनी मार्केट मध्ये येणारे नवीन मॉडेल कोण खरेदी करणार हा मोठा प्रश्न असेल.

खरे तर हळू हळू "Use and Throw' ही आपली वृत्तीच बनत चालली आहे. आजकाल दुरुस्त करून एखादी गोष्ट वापरण्याच्या फंदात कुणी पडत नाही आणि कुणी हट्टाने पेटून दुरुस्त करायला गेला तर एवढा भाव सांगितला जातो की त्यापेक्षा ती वस्तू नवीन विकत घेणे सोयीस्कर ठरते. काही वर्षांपूर्वी मी केरळ मध्ये असताना माझ्या गाडीचा वायपर बिघडला. मी गॅरेज मध्ये घेऊन गेल्यावर त्या मेकॅनिक ने वायपरची जी मोटर असेंम्बली असते त्यातील गिअर मोडले आहेत म्हणून सांगितले. हाच प्रॉब्लेम मला मुंबईत आला असता तर पूर्ण असेंम्बली नवीन घालायला लागली असती पण त्या केरळ मधल्या मेकॅनिक ने पूर्ण असेंम्बली खोलून त्यातला गिअर बदलला आणि वायपर दुरुस्त करून दिला! त्यानंतर त्या वायपर ने बरीच वर्षे काही त्रास दिला नाही. प्रश्न नुसत्या पैशाचा नाही पण या 'वापरा आणि फेकून द्या' वृत्ती मुळे कार्बन फुटप्रिंट किती वाढली जातेय याचा विचार उत्पादकांनी जरूर करावा. खरंतर या साऱ्या गोष्टीशी सध्या कुणाला देणे घेणे नाही. प्रत्येक कंपनीची आणि पर्यायी देशाची एकमेकांशी स्पर्धा आहे जास्तीत जास्त मार्केट काबीज करण्याची.

बरे, या सगळ्याचा विचार डोक्यात का आला? माझ्याकडे Wonderchef कंपनीचा जवळ जवळ तीन वर्षे जुना Nutri Blend ब्लेंडर होता. त्यातला एक जार हा एका वर्षात लीक व्हायला लागला तर दुसऱ्या जार चे ब्लेड्स गेल्या महिन्यात तुटले! कंपनी मला माझ्याकडे असलेल्या मॉडेल चे ब्लेड किंवा पूर्ण जार उपलब्ध करून देऊ शकत नाही आहे. याचा अर्थ मी साडेतीन हजाराचा ब्लेंडर त्याची मोटर व्यवस्थित चालू असताना फेकून द्यायचा ते फक्त त्याचे शंभर दोनशे रुपयाचे ब्लेड नाही म्हणून! बरे, मिक्सर सारखे वेगळे करता येणारे ब्लेड असणारे डिझाईन असते तर जसे कुठल्याही इतर घरगुती उपकरणांचे दुसऱ्या कंपनींनी बनवलेले पार्टस उपलब्ध असतात तसे कुठे ना कुठे ते ब्लेड उपलब्ध झाले असते.

त्यामुळे सध्या तरी, या ब्लेंडर मध्ये smoothie वगैरे बनविणे शक्य नसल्याने त्याचा उपयोग कसा करायचा यावर गहन विचार सुरू आहे! जार चा उपयोग कोथींबीर ठेवायला होऊ शकतो असे तूर्तास लक्षात आलेले आहे! मोटर असलेला त्याच्या खालच्या भागाचा उपयोग मी कसा करू शकतो ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा!!

Group content visibility: 
Use group defaults

आपण घेतलेली वस्तू कमीतकमी 20 वर्षे टिकवली पाहिजे. या वीस वर्षांत जर ती बिघडली तर तिला दुरुस्त कशी करायची हे शिकलं पाहिजे. जेणेकरूनपिढ्यानपिढ्या ती वस्तू वापरात यावी. आपण सोनं घेतलं की ते कसं पिढ्यानपिढ्या चालतं मग वस्तू चालायला अडचण नसावी.

आणि सेकंड हँड वस्तू कधीच घेऊ नका. त्या वस्तूसोबत त्या माणसाची एनर्जी पण घरात येते. ती चांगली असली तर ठीक नाहीतर विचित्र अनुभव यायला सुरुवात होते. आमच्या शेजारी काका राहतात त्यांनी सेकंड हँड टीव्ही घेतला होता. तेव्हापासून त्यांच्या घरी आजारपण, छोट्या गोष्टींवरून भांडण होण्याचे प्रकार वाढले.

त्या वस्तूसोबत त्या माणसाची एनर्जी पण घरात येते....... - - -बोकलत .
फुकट घेतलेल्या वस्तूंतून होऊ शकते हा ब्ल्याक म्याजिकचा नियम आहे. विकतच्या नाही. नाही तर शेअर्सनाही लागू होईल ना?

@ उपाशी बोका.
त्या माननिय राज यांचेशी तात्विक चर्चा करायचा प्रयत्न करत जाउ नका. ते देसी अमेरिकन राईट विंगर आहेत.
****
@ जिज्ञासा.
तुमच्या अन माझ्या बेसिक मधे फरक आहे.
>>जर ती जबाबदारी कंपनीकडेच दिली तर एक ग्राहक म्हणून तुमची चिंता कमीच होते आहे.<<
हो. पण जर कंपनी १०० रुपयांची वस्तू रिपेअर करायला ११० रुपये लावते आहे, अन त्या रिपेयरची अ‍ॅक्चुअल कॉस्ट लेबर प्लस स्पेअर्स धरून ११ पैसेही नाही, तर ग्राहक म्हणून तुमची चिंता कमी झाली की लूट झाली?

अन कंपनीतच रिपेअर करायची 'जबरदस्ती' कशाला? वस्तू मी विकत घेतली आहे. मी रिपेअर करणार. ते करताना मोडली तर फेकून देईन. मी मालक आहे. पण मी रिपेअर करू की नको हे सांगणारी कंपनी कोण?

प्लस तिचे स्पेअर पार्ट लपवून मोनोपली करणारे हे कोण? ऑफ मार्केट स्पेअर बनवले तर हे "कॉपीराईट" च्या नावाखाली साधी सिंपल इलेक्ट्रॉनिक सर्किट्स मोनोपोलाईज करणार?

प्रश्न मोनोपली चा आहे. तुम्ही रिझनेबल सर्विस द्या अम्ही घेऊ. आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वस्तू वापरायचा हक्क हवा. अन्यथा ही ग्राहकाची लूट आहे, अन तुम्ही त्या लूटीला सहमती देत आहात असा अर्थ आहे.
***

वस्तुंची विल्हेवाट लावायची जबाबदारी कंपन्ञांवर आहे. भारतात उदाहरणार्थ फेविकॉलची १० रुपयांची बाटली मुलांच्या प्रोजेक्ट साठी आणलेली असेल तर त्याचं लेबल वाचा. रिकाम्या बाटल्या ६ रुपये किलोने परत विकत घेण्याची जबाबदारी कंपनीची आहे. व तसे तिथे स्पष्ट लिहिलेले आहे.

आमच्या प्रिय मित्र 'राज' यांच्या शब्दात,

अभ्यास वाढवा, मंडळी.

डु यु बाय एम५ ऑर मर्सेडिज एएमजी, अँड रिपेर योरसेल्फ? इफ यु डु, नो वन इज गोइंग टु स्टॉप यु, नॉट इवन बिएम्डब्लु, मर्सेडिज ऑर अ‍ॅपल फॉर दॅट मॅटर. हौएवर, फ्रॉम दॅट पॉइंट ऑनवर्ड - यु आर ऑन योर ओन...
<<
हे वाचन वाढवा म्हणणारे महोदय, मर्सिडीझ लीज का करायला हवी याबद्दल मी केलेले विवेचन वाचणारच नाहीत. कारण काये नं, "सर्वज्ञ" आहेत. त्यांच्या सध्याच्या देशाच्या भाषेत "ऑल क्नोइंङ" भौतेक ती मागावाली लाल ह्याट, घरात पाच-पंचवीस बंदुका अन टेक्स्सस मधे रहात असावेत.

तुम्ही लिंक दिली तरी, "वाचायची गरज नाही" म्हणणार.

देव यांचे भजे करो.

(हे वाचणार नाहीत याची ग्यार्‍ंटी म्हणून मुद्दाम टायपो मारलाय)

raj.jpg

अन याच्या त्याच्या वाटेला जाऊच नये म्हणे. हिरवा माज? हसू पण येत नाही मला असल्यांचं.

आय क्नो आय अ‍ॅम ऑन माय ओन, अँड आय कॅन अ‍ॅफोर्ड इट, अँड आय अल्सो हॅव दे क्नोहाऊ ऑफ हाऊ टू रिपेअर. नाऊ, इफ आय रिपेअर इट सक्सेसफुली, लाईक एनी गल्ली बॉय मोबाईल रिपेअर्वाला रिपेयर्स आय्फोन्स, , योर कंपनी ट्राईज टू स्टॉप मी अन्डर कॉपीराईट लॉ. अन म्हणे कुणी थांबवणार नाही. हास्यास्पद.

जर मी अमुक गोष्ट घरी रिपेअर केली, किंवा ती चालू करण्यासाठी सोपा स्वस्त मार्ग शोधून काढला.
हे 'इनोव्हेशन' नव्हे काय? व्हॉट डू द कंपनीज एक्स्पेक्ट?
फ्री लंच?
मी काय यांच्या घरी माधुकरी मागायला जातोय का? माझ्या कष्टाने करून खातोय. त्यातले पैसे देऊन विकत घेतली वस्तू. तिचा मी "संपूर्ण" स्वामी असायला हवा.

हातरुमालाएवढी जमीन विकत घेतली तरीही तिच्या मुळाशी खणून निघालेल्या सर्व बाबी प्लस तिच्यावरील आस्मानाचाही मालकी अधिकार मजकडे अन माझ्या वारसांकडेही अनंत काळापर्यंत (पुन्हा विकत नाही तोवर) आहे असे भारतात तरी स्टँप पेपरवर लिहून मिळते ब्वा.

अन व्हाय्बरंट इकानामी म्हणे. पैसे खेळायचा नियम केला कुणी नक्की? माझा खायचा अन खेळायचा पैसा वेगवेगळा असतो. त्या व्हायब्रन्ट गुजरातच्या नावाखाली माझे जेवणाचे पैसे खेळायला हिसकवायचे धंदे बस झाले.

आ. रा. रा., दहा वर्षांच्या आत जर उपकरण बिघडले तर ते रिपेअर करण्याची "संपूर्ण जबाबदारी" कंपनीची with no additional cost to the consumer असा नियम असावा.
कायद्यात लाख लिहीले आहे की वस्तूचे आयुष्य संपल्यावर तिची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंपनीची आहे पण प्रत्यक्षात असे घडते का? तुम्ही वापरलेली प्रत्येक फेव्हिकॉलची ट्युब कंपनीला परत केली आहे का? का नाही केली तर ते परवडत नाही!
अशाप्रकारे आज तयार होणाऱ्या बहुतेक वस्तू कंपनीला आणि ग्राहकांना "परवडतात" कारण त्यातल्या environmental costs externalize केलेल्या असतात. पण पृथ्वी हे माणसाचे डंपिंग ग्राउंड नाही. ही असली बिझनेस मॉडेल्स ज्यात निसर्गाचा विचार शून्य होतो शेवटी माणसाच्या अस्तित्वाच्या मूळावर येणार आहेत.
बाकी आता यापुढे काही बोलायचे असल्यास माझ्या पर्यावरणाची अवांतरे या धाग्यावर बोलू. लिंक- https://www.maayboli.com/node/79221

आ. रा. रा., दहा वर्षांच्या आत जर उपकरण बिघडले तर ते रिपेअर करण्याची "संपूर्ण जबाबदारी" कंपनीची with no additional cost to the consumer असा नियम असावा. >>>

हे म्हणजे प्रॉडक्ट विकत घेऊन त्याचा दहा वर्षाचा कॉम्प्रिहेंसिव्ह मेंटेनन्स काँट्रॅक्ट घेण्याची सक्ती ग्राहकास करणे झाले. कीती महाग असेल ते. परवडणार आहे का ग्राहकाला हे?

आणि कंपनीला फोन केला त्यांचा मेकॅनिक यायला अठ्ठेचाळीस तास लागतात. मध्ये लागून सुट्ट्या असेल तर राम राम करत बसा.
लॅपटॉपची हार्ड डिस्क खराब झाली तर कंपनीचा माणूस येऊन हार्ड डिस्क तेवढी बदलून जातो. त्यावर परत OS इनस्टॉल करण्या पासून आपल्याला सुरवात करावी लागते, ज्यांना येत नाही त्यांना आउटसोर्स करावे लागते. बाजारात हार्ड डिस्क मिळते म्हणून लगेच विकत घेऊन स्वतः बदलून बॅकअप रिस्टोअर करून होई पर्यंत कंपनी कडून त्यांचा माणुस असाइन झाल्याचा मेसेज येतो आणि दुसऱ्या दिवशी फोन करून तो आदल्या दिवशी तक्रार नोंदवली तेव्हा विचारलेले सगळे प्रश्न परत आपल्याला विचारून, स्टोअरमध्ये आज स्टॉक नाही उद्या येतो असे सांगतो. स्पेअर पार्ट्सवर मोनोपोली ठेवली की सगळ्यांना यातून सक्तीने जावे लागेल.

लॅपटॉपचा की बोर्ड कंपनीकडून बदलायला ३५००. ऑनलाइन १४००, मागवून रात्री जेवण झाल्यावर आपल्याला हवा तेव्हा बदलता येतो, कामाच्या वेळी शटडाऊन करून मेकॅनिकच्या हाती सुपूर्द करण्याची गरज नाही.

इतर उपकरणे, वाहने यांच्या छोट्या मोठया तक्रारी याबद्दलही असे बरेच सांगता येईल.

प्प्रश्न डिस्पोज करण्याचा / डंप करण्याचा आहे तर त्याचे योग्य ते कायदे आणि त्यांची अंमलबजावणी, हँडलींग सीस्टीम, जनजागृती करावे, आणि करावेच लागेल. केवळ कंपनींवर डिस्पोज करण्याची जबाबदारी टाकून होणार नाही.

वर मर्सिडिझ कारला झिरो रीसेल व्हॅल्यु वाचले. हे कुठे आहे? भारतात?
नवीन Submitted by सुनिधी on 17 June, 2021 - 05:24
<<

होय. तुमच्या खरेदीनंतर, विकायच्या दिवसापर्यंत टॅक्स डेप्रिसिएशन घेऊन तयार झालेल्या किमतीपेक्षाही कमी किमतीत विकावे लागणे याला मी झीरो रिसेल व्हॅल्यू म्हणतो.

कोणतीही लक्झरी कार सेकंड हँड विकून बरी किंमत मिळवून दाखवा, भारतात. एक कप चहा स्वतः बनवून पाजेन.

अशी कार परवडते ते सेकंड हँड घेत नाहीत, अन जे सेकंड हँड घेतात, त्यांना अश्या कारचा मेन्टेनन्स परवडत नाही.

तुम्ही वापरलेली प्रत्येक फेव्हिकॉलची ट्युब कंपनीला परत केली आहे का? का नाही केली तर ते परवडत नाही!
<<
कंपन्यांनी तयार केलेला प्लास्टिक इत्यादी कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी जी हे लोक ग्राहकावर ढकलून मोकळे होत आहेत, त्याला चाप लावण्याच्या कायदेशीर प्रयत्नांचे ते एक छोटे उदाहरण म्हणून लिहिले आहे. Think absolute waste segregation and recycling by city. If a whole city collects all fevicol tins, the Pidilite industries is bound to buy it @ 6rs/kg. That is what the waste recycle 'भंगार वाले' in third world countries do. They sort the waste and sell it at higher prices. णot to original company, but they still do it, that is how their shops and business model survives in India.
Remember, the 'bhangarwala' will BUY "bhangar" from you. You are not charged by the city or anybody to recycle it, THAT is a scam.

दूध प्लॅस्टिकच्या पिशवीत येणे अन माझ्या लहानपणी काचेच्या बाटलीत अ‍ॅल्युमिनियम बुच लावून येणे यात फरक आहे नक्कीच. उगाच सोयीच्या नावाखाली कुठे कुठे कचरा वाढतो त्याचे हे एक उदाहरण आहे. त्याकाळी देखिल १०० कोटींच्यावर लोकसंख्या होतीच भारताची, तरीही दूध सुरक्षित रित्या घरोघरी पोहोचत होतेच.

"वापरा आणि फेकून द्या" या वाक्याची / कल्पनेचीच मला मुळात घृणा आहे. कोणत्याही काँटेक्स्ट मधे धिस इस राँग इन सो मेनी वेज्..

NOTHING should be disposable, except maybe things like syringes and similar equipment/things that is easier and safer to use new, rather than re-sterilize and re-use.

युज अँड थ्रो या वाक्प्रचाराचा उगम, इतिहास जरा शोधून वाचला तर खूपच रंजक आहे. वाचला तर शेवटी मी म्हणतो/मांडतो आहे त्या परिप्रेक्ष्यात पोहोचाल असे मला खात्रीने वाटते.

एक कप चहा स्वतः बनवून पाजेन. >>>. कार विकायलाच हवी का? इतकं सगळं करता, फोटो टाकता तरी चहावरच बोळवण करणार का? Proud

मोड्युलर स्टँडर्ड वस्तू बनवणे प्रत्येक कंपनीने सुरू करावे. म्हणजे की त्या व्यवसायातल्या सर्व कंपन्यांनी एकत्र येऊन एक तरी स्टँडर्ड मॉडेल नक्की करावे. आणखी वेगळी मॉडेल्स बनवावीतच पण एक तरी हवे.
( ओडीओसाठी .aac फाइल .wav आहे.)

फोनची स्क्रीन,ब्याटरी, साईज. स्वस्त होईल.

मग समाजवाद आणावा लागेल.

वस्तु मोडलि तर विल्हेवाट कम्पनीने लावावी, मग सेकण्ड हन्ड वस्तु कशा ट्रेस करायच्या ?

आणि मग माणूस मेला तर तो कुणाक्डे पाठवायचा , ज्याने डिलिव्हरी केलि त्या डॉक्टरकडे / त्या हॉस्पिटलात पोत्यात घालून पाठवायचा का ?

एन्ड युजरने विल्हेवाट लावणे कमि कटकटिचे व जास्ती अकाउण्टेबल राहील असे वाटते, त्यासाठी सरकारी कलेक्शन यन्त्रणा व खाजगी पार्टनरशिप असे दोन्हि राहील,

पण प्लास्तिकचे दुश्परिणाम आता जाणवत आहेत, न्द्या घाण आहेत, पाउस कमी पडूनहि शहरात पुर येतो, काल विरारला नाल्यात ४ म्हशी वाहुन गेल्या

>>मग समाजवाद आणावा लागेल.<<
काळीमाऊ, समाजवाद वाटतो तितका सोप्पा नाहि. हल्ली झालंय काय, तर "कूल" दिसण्याकरता काहिजण समाजवादाची कास धरतात, पण तो कितपत आचरणात आणतात, हा संशोधनाचा विषय आहे. असो, तो या धाग्याचा विषय नाहि म्हणुन त्याला इथेच पूर्णविराम देउया.

आता माझे स्नेहि आरारा यांच्या वरच्या टिप्पणी बाबत बोलुया. नेहेमी प्रमाणे त्यांचे मुद्दे अपुर्‍या माहितीवर उभारलेले असल्याने खोडायला अगदि सोप्पे आहेत. हियर यु गो -

>> मर्सिडीझ लीज का करायला हवी याबद्दल मी केलेले विवेचन वाचणारच नाहीत.<<
यावर विवेचन काय करणार कप्पाळ! लीज वर्सेस बाय, वर एकदा वाचन करा, आणि हा ऑप्शन नोकरदारांकरता वाजवी आहे का ते तपासा. व्यावसायिक लीज पेंमेंट्स टॅक्स ब्रेक करता वापरु शकतात; नोकरदार नाहि. कुठलिहि कॅपिटल इन्वेस्टमेंट करण्यापुर्वि त्या वस्तुची टिसिओ (टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप) काय आहे, याची माहिती सूज्ञ करुन घेतात. बिएम्ड्ब्ल्यु, मर्सेडिज चार वर्षं अथवा ५०,००० माइल्स पर्यंत बंपर-टु-बंपर वॉरंटि देतात. मर्सेडिजचं माहित नाहि पण बिएम्ड्ब्लु वॉरंटि मधे रुटिन मेंटेनंस (ऑयल चेंज, टायर ऱोटेशन, ३० पॉइंट इन्स्पेक्शन आणि त्यात काहि तृटी आढळली तर रिपेर करुन देते, अगदि ट्रांस्मिशन सकट - झिरो आउट-ऑफ-पॉकेट) पण कवर करते. अशा परिस्थितीत, मेंटेनंस कॉस्ट झिरो असताना, कोण मुर्खासारखं कार लीज करेल? तीन वर्षात केलेलं पेमेंट + कारची रेसिड्युअल वॅल्यु कारच्या ओरिजिनल किंमतीपेक्षा हजारोंनी जास्त असते. हा आतबट्ट्याचा व्यवहार कशाला? दर तीन वर्षांनी नविन गाडी चालवण्या करता? डझंट मेक सेंस, अन्लेस यु आर ए बिझनेस्मन. शिवाय मायलेज वर रेस्ट्रिक्शन्स असतात ती गोष्ट वेगळी...

>>हे 'इनोव्हेशन' नव्हे काय?<<
याला आमच्या मुंबईत "जुगाड" म्हणतात; इनोवेशन नाहि. आणि मी वर सुरुवातीला लिहिल्या नुसार, अ‍ॅपल कोणावरहि रिपेर करण्याला बंधनं घालत नाहि. त्यांचं म्हणणं हेच आहे कि, रिपेर करण्याकरता जो नोहौ लागतो तो तुम्ही आधी मिळवा. ऑथराय्ज्ड रिपेर शॉप्स मधे सर्टिफाय्ड लोकं असतात. स्पेअर पार्ट्स मिळायला त्यांना काहिहि अडचण येत नाहि. पण उद्या एखादा आरारा उठला आणि म्हणाला, मी सर्वज्ञ आहे, मला पार्ट्स द्या, मी रिपेर करतो. आणि एकदा पार्ट्स सेकंडरी मार्केट मधे मिळायला लागले, कि बाकिचे आरारा दुकानं टाकणार. मग काहि भोळे, पैसे वाचवायला आरारांच्या दुकानात रिपेर करता जाणार. तिथे लाखाचे बारा हजार करणार, आणि वर दोष अ‍ॅपलला देणार. हे चक्र पुढे वाढु नये, त्याकरता ती प्रोविजन आहे. उद्या राइट-टु-रिपेर च्या नांवाखाली हा प्रकार सुरु होइलहि कदाचित. असं झालं तर, आय्फोन रिपेर ऑथराय्ज्ड शॉप मधे होण्याऐवजी आरारांच्या टपरीवर जाउन त्याचा महागडा पेपरवेट झालेला पहावा लागेल... Proud

आमचं नाव बदनाम होईल या नावाखालीही काहीही चालत असतं.

मी आधी ज्या कंपनीत होतो, तिचं इथंच आमचं सर्व्हिस सेंटर आणि पूर्ण भारतात सर्व्हिस द्यायला सर्व्हिस टीम होती. आमच्या प्रॉडक्ट्सचे असंख्य ऍप्लिकेशन्स आहेत. आम्ही भारतात आमचे प्रॉडक्ट्स एन्ड युजर्स आणि इथल्या OEMs ना विकतो आणि हा आमचा भारतातला मुख्य टर्न ओव्हर. सर्व्हीस टर्नओव्हर पूर्ण टर्न ओव्हरच्या १०-१२%.
प्रॉडक्ट्स जर्मनीमध्ये तयार होतात.

तर भारतातील आणि बाहेरील बरेच OEMs हे आमचं प्रॉडक्ट त्यांच्या equipment मध्ये वापरण्यापूर्वी आमचे इथे पूर्ण रिपेअर करणारे सर्व्हिस सेंटर आहे ना, किती जण आहेत सर्व्हिस सेंटरमध्ये आणि फिल्ड सर्व्हिस टीम मध्ये, त्यांच्या एन्ड कस्टमरच्या जागी किती लौकर सर्व्हिस मिळेल, रिपेअर्सला वेळ लागत असेल तर एक्सचेंज प्रॉडक्टचा इनफ स्टॉक असतो ना इत्यादि खातरजमा करुन, मग आमचे प्रॉडक्ट्स विकत घेतात. त्यांच्या एन्ड कस्टमरकडे आमचे कॉन्टॅक्ट डीटेल्स, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर जातो.

पण काही OEMs चे उलट असते. हे ब्रँड नेम कमावलेले OEM असतात. हे म्हणतात भारतात (आणि इतर कुठल्याही देशात) तुमचे सर्व्हिस सेंटर आहे त्यांना सांगायचं आमच्या एन्ड कस्टमरला अजिबात कॉन्टॅक्ट करायचा नाही. हे आमचे प्रॉडक्ट्स घेऊन त्यावर स्वतःचे लेबल लावतात. आता एखाद्या एन्ड कस्टमरला माहीत आहे की त्या equipment मध्ये तर आमचं प्रॉडक्ट आहे, त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही ते रिपेअर करू शकत नाही की रिप्लेसही करू शकत नाही. त्यांनी त्या OEM कंपनीशीच डील केले पाहिजे अशी योजना केली असते.
OEM कंपनी त्यांना सांगते की हे आमच्या साठी स्पेशली डेव्हलप्ड प्रॉडक्ट आहे, त्यात आमच्या प्रोसेस साठी आम्ही अमुक तमुक टेस्टस करून घेतो वगैरे वगैरे. (असं अर्थात काहीही नसतं.) त्याला आमचीच रिप्लेसमेंट घ्यावी लागेल, हे स्टँडर्ड सर्व्हिस सेंटरमध्ये रिपेअर नाही होऊ शकत, आमच्या फॅक्टरीत रिपेअर होईल, परत सगळ्या टेस्टस होतील. तेव्हा आमचं रिप्लेसमेंट हेच सोल्युशन आहे.
आम्ही प्रॉडक्ट रिपेअर / रिप्लेसमेंटला नकार दिल्याने कस्टमरला मग झक मारत त्यांच्या कडून घ्यावेच लागते. OEM मग आमच्या जर्मन HQ शी केलेल्या काँट्रॅक्ट नुसार स्पेशल डिस्काउंटेड कमी किमतीत आमच्या कडचे एक्सचेंज प्रॉडक्ट उचलते, त्यावर लेबल बदलुन, टेस्टस पास्ड अमुक तारीख (या स्टँडर्ड टेस्ट आम्हीच करून त्यांना टेस्ट रिपोर्ट दिलेला असतो), एक्सचेंज प्रॉडक्टच्या छापिल किमतीच्या चारपट भावात कस्टमरला विकते. नादुरुस्त प्रॉडक्ट आमच्याकडे येते आणि ते रिपेअर करून आम्ही एक्सचेंज प्रॉडक्ट स्टॉक मध्ये घेतो.
काही OEM त्यांना विकेलेले आमचे प्रॉडक्ट्स वेगळे दिसावेत म्हणून बाह्य भागात थोडे जुजबी बदलही करून घेतात, जेणे करून फिक्स करताना जागा/स्क्रू बोल्ट लोकेशन मॅच होणार नाही, इंटरफेस पोर्ट्स कनेकटर्स वेगळे ठेवणार, फर्मवेअर जरा बदलून घेणार वगैरे. पण मूळ प्रॉडक्ट, त्यावर होणाऱ्या क्वालिटी टेस्टस सगळं सारखच असतं.

मोठ्या ब्रॅण्ड्सचे आपल्या वेंडर्स सोबत असे कॉन्ट्रॅक्चुअल संगनमत करून असे धंदे पण चालत असतात. वेंडरने ब्रीच केले की त्या ब्रँड सोबत एवढा मोठा काँट्रॅक्ट जायची भीती.

मी ब्लॅकबेरीचा प्लेबुक टॅबलेट घेतला होता २०११मध्ये. तो अजुनही उत्तम चालतो/असावा. पण काही सॉफ्टवेअर सपोर्ट नसल्याने घेतल्यानंतर दोन वर्षांतच बिनकामी झाला होता. मी त्याला व्यवस्थित त्याच्या सर्व ऍक्सेसरी आणि पॅम्प्लेटसकट त्याच्या बॉक्समध्ये ठेवला आहे. वंशविस्तार होईल असे गृहीत धरून ३०-३५ वर्षांनी लहानपोरांनी उघडून पाहिलाच तर तेवढाच त्यांना अँटिकपीस मिळाल्याचा आनंद होईल.

आ. रा. रा., जर कंपनीने प्रॉडक्ट बनवले आहे आणि ग्राहकाने प्रॉडक्ट खरेदी केले आहे तर मग त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी शहराची कशी? कचरा म्हणून जमा होणाऱ्या प्रत्येक वस्तूची पर्यावरणाला हानी न पोहोचता विल्हेवाट लावायची किंमत शहर प्रशासन कंपनी आणि ग्राहक यांच्याकडून वसूल करू लागले तर कोणाला काहीही विकणे किंवा खरेदी करणे मुश्किल होऊन बसेल!
भंगारवाले आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार ज्या पद्धतीने काम करतात ते पाहून त्यांच्या आरोग्याला किती धोका आहे असं कधी वाटत नाही का तुम्हाला? They deal with hazardous waste containing heavy metals without any PPE. त्यातून बाहेर पडणारे सांडपाणी काहीही प्रक्रिया न करता नदीला मिळत असते. शेवटी त्या नदीत मिसळलेली सर्व घातक रसायने आपल्या शरीरात अन्नावाटे, पाण्यावाटे येतात. दृष्टीआड सृष्टी म्हणून आपण दुर्लक्ष करतो पण त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत.
राज, कंपनीने स्वतःचे सर्विस सेंटर चालवावे किंवा त्याचे कॉन्ट्रॅक्ट द्यावे यावर माझे काही म्हणणे नाही. पण product design इतके complicated बनवून ठेवायचे की त्याच्या दुरुस्तीच्या खर्चापेक्षा नवीन प्रॉडक्ट घेणे ग्राहकाला परवडेल हे अत्यंत चुकीचे आहे. शिवाय मानव म्हणतात तसे त्या प्रॉडक्ट्सचे सुटे भाग विकायला तुमच्या व्हेंडर कंपन्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये अन्याय्य अटी घालून त्यांची अडवणूक करायची. हे पर्यावरणाला अत्यंत घातक असे पायंडे अनेक कंपन्या पाडत आहेत. Marques Brownlee चा Right to repair विषयीचा युट्युब व्हिडीओ नक्की पहा - https://www.youtube.com/watch?v=RTbrXiIzUt4
You want to own the services and repairs division then own it completely. Don’t charge a dime to the customer for at least 5 years. Mercedes or Tesla should do this for at least 10 to 15 years considering the initial environmental footprint of their products. हे कंपनीला कसे परवडणार नाही, यातून innovation ला कशी बाधा पोहोचेल असे प्रश्न विचारण्याआधी हवा, पाणी, आणि अन्न याशिवाय एक दिवस जगून दाखवा. Are you really ready to sacrifice your life for company profits? Because survival of human species is at stake. Ignorance is not an option anymore.

आणि मग माणूस मेला तर तो कुणाक्डे पाठवायचा , ज्याने डिलिव्हरी केलि त्या डॉक्टरकडे / त्या हॉस्पिटलात पोत्यात घालून पाठवायचा का ? >> Blackcat, best प्रश्न आहे हा! विचार करा कसलं परफेक्ट मशीन आहे आपलं शरीर! निसर्गाने विल्हेवाट लावण्याची सर्व व्यवस्था ठेवली आहे. मेल्यावर कुठल्याही डॉक्टरची गरज नाही. जंगलात राहत नाही म्हणून आपल्याला मृतदेहावर काही संस्कार करावे लागतात पण जर पशुपक्षांनी भरलेल्या जंगलात राहत असू तर निसर्ग आपलं काम चोख करेल. करतोच आहे - जंगलात किंवा कोणत्याच इकोसिस्टिम मध्ये कचरा ही संकल्पना नाही. सगळं चक्राकार चालतं! आपण नुसता कचरा करायला शिकलो आहोत! Let’s learn this circularity from nature.

जिज्ञासा, कंपन्यांचे सर्व्हीस इनकमचे टार्गेट वर्षा नु वर्षे वाढत आहे. प्रॉडक्ट्स विकणे या सोबतीला सर्व्हीस इनकम हा एक मोठा बिझिनेस म्हणुन पाहिल्या जाते.
काही प्रॉडक्ट्स मध्ये एवढी जीवघेणी कॉम्पिटिशन असते किमतीमध्ये, मग प्रॉडक्ट्सवरचा नफा खूपच कमी करून स्पेअर पार्ट्स आणि सर्व्हिस मधून तो वसूल करणे चालते.

आता जर का कम्पन्यांना प्रॉडक्ट्स सोबत दहा वर्षाची फ्री सर्व्हिस द्यायची सक्ती केली की प्रॉडक्ट्स विकताना त्याची सगळी कॉस्ट आणि नफा त्यात ऍड करून विकणार. जेव्हा आपल्याला दहा वर्षांपर्यँत सर्व्हिस द्यायची असते तेव्हा कॉस्ट एस्टीमेशन हे जास्तच गृहीत धरावे लागते.

जर ग्राहक एवढ्या प्रचंड किमतीत प्रॉडक्ट विकत घ्यायला तयार असतील तर कम्पन्या आनंदाने तयार होतील.
प्रश्न असा आहे की किती ग्राहक तयार होतील?
रोल्स रॉईस, फेरारीने असे केले तर त्यांच्या ग्राहकांना हे नक्कीच परवडेल. पण सरसरकट टेस्ला, फोर्ड, ह्युंदाई, फोक्स वॅगन, टाटा, महेंद्रा यांच्या ग्राहकांना ते परवडेल का?

तेव्हा दहा वर्षे फ्री सर्व्हिस सक्तीपेक्षा एखादे प्रॉडक्ट/मॉडेल डीसकंटिन्यू झाले तेव्हापासून त्याच्या स्टॅंडर्ड एक्स्पेक्टेड लाईफ पर्यन्त स्पेअर पार्ट्स आणि सर्व्हिस पुरवणे बंधनकारक असावे. (त्या रिपेरला वेगळा चार्ज लावून). वाहने दहा ते पंधरा वर्षे, टीव्ही ७ - १० वर्षे वगैरे.
पण स्मार्टफोन्स, लॅपटॉप वगैरे बदलत्या टेक्निलॉजीमुळे काम करत असूनही आउटडेटेड होतात. तेव्हा हा स्क्रॅप कसा हाताळावा हे चॅलेंज आहेच.

मानव पृथ्वीकर, तीच तर गम्मत आहे ना! जर हे सगळे धरून जर किंमत लावली तर फार कमी लोकांना दर वर्ष /दोन वर्षांनी नवीन वस्तू घेत राहणे परवडेल. खरंतर तेच योग्य आणि शाश्वत आहे. सध्या जो चालू आहे तो पर्यावरणाच्या दृष्टीने आतबट्ट्याचा व्यवहार आहे. मोबाईल वगैरेंच्या बाबतीत तर आपण तलवारीने भेंडी कापतो आहोत असंच वाटत राहतं मला अनेकदा. ग्राहकाला गरज असो वा नसो त्याच्या माथी सर्व नवीन अनेकदा अनावश्यक features मारत राहणे या पलीकडे नवीन मॉडेलच्या फोनमध्ये काय नवीन असतं? कृत्रिम गरजा निर्माण करून त्या पुरवीत राहणे या पलीकडे बहुतांश कंपन्या काहीही innovation करत नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे.

थोडक्यात सामान्यांना एकदाही घेणे परवडणार नाही.
एकूण खप कमी होईल म्हणुन उत्पादन किंमत वाढेल म्हणुन अजून महाग, म्हणजे ठराविक श्रीमंत वर्गालाच घायला परवडेल.
हीच जर आयडिया असेल तर ठीक.

मग गरिबांना परवडेल आणि निसर्गाला हानी पोहोचणार नाही अशा प्रकारे वस्तू तयार व्हायला किंवा त्यांचा वापर व्हायला सुरुवात होईल. Then that will be a win win! याच्यात innovation ला भरपूर वाव आहे. सध्याचे innovation हे केवळ कंपनीचा फायदा या एकाच हेतूने होते.

हरचंद पालव, हे तर आहेच आहे ना! It is easier to imagine the end of our species than to imagine the end of capitalism! If we can prove this wrong, we will survive.

Innovation साठी पैसे कंपनीकडून येतात. त्यामुळे ते त्यांच्या फायद्याचे नसेल तर ते पैसेच देणार नाहीत. पैश्याविना innovation होतच नाही असं नाही, पण जे होतं ते अगदी नगण्य. शिवाय ते कंपनीच्या तोट्याचं असेल तर पैशाच्या बळावर अगदी सहज दाबून टाकलं जातं. ही वस्तुस्थिती आहे, नाकारण्यात काय अर्थ आहे?

मग गरिबांना परवडेल आणि निसर्गाला हानी पोहोचणार नाही >> ह्यात 'व्यवसायांच्याही फायद्याचे असेल' तरच सत्यात येऊ शकते. पण ह्या तीन गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत म्हणून तर समस्या आहेत ना!

>>तेव्हा दहा वर्षे फ्री सर्व्हिस सक्तीपेक्षा एखादे प्रॉडक्ट/मॉडेल डीसकंटिन्यू झाले तेव्हापासून त्याच्या स्टॅंडर्ड एक्स्पेक्टेड लाईफ पर्यन्त स्पेअर पार्ट्स आणि सर्व्हिस पुरवणे बंधनकारक असावे.<<
हे स्टँडर्ड कोण ठरवणार, ग्राहक? टिपिकली स्मार्ट्फोन्सचं आयुष्य ४-५ वर्षं असतं. (काहिंची तो १०-१५ वर्षं विनातक्रार चालावा अशी अपेक्षा, नव्हे तर ठाम मागणी असते. असो.) या ४-५ वर्षात तरी कुठलाहि वेंडर सपोर्ट द्यायचं बंद करत नाहि; यात फ्री सॉफ्टवेर अपग्रेड्सहि आले. अर्थात, "त्या" चौकटित राहुन...

आणि हे खास जिज्ञासा करता. पर्यावरणाच्या र्‍हासाला केवळ कॅपिटलिस्ट अ‍ॅप्रोच जबाबदार असेल तर त्याच्या पुर्नजीवनात कॅपिटलिझ्मचाच सिंहाचा वाटा असेल याची नोंद करुन ठेवा...

हे स्टँडर्ड कोण ठरवणार, ग्राहक? >>

ग्राहकांच्या अपेक्षा, उत्पादकांच्या मर्यादा, त्या त्या प्रॉडक्ट निर्मिती, वापर आणि डिस्पोज करण्याचा पर्यावरणावर परिमाण वगैरे फॅक्टर्स पाहून सरकार ठरवणार.
काही उदाहरणे मी दिली आहेत.

स्मार्टफोन आणि तत्सम गॅजेट्स बद्दलही मी लिहिलंय की खराब व्हायच्या आधी आउटडेटेड होईल. माझे गॅजेट मी अत्यंत काळजीपूर्वक वापरले दहा वर्षेही खराब होणार नाही, पण तीन चार वर्षात आऊटडेटेड होईल, तेव्हा अशा प्रॉडक्ट्स साठी प्रॉडक्ट लाईफ पेक्षा त्या टेक्निलॉजीची वापरातली लाईफ धरावी लागेल, जी साधारण चार पाच वर्षे आहे सध्या.
पण यामुळे निर्माण होणारा जुन्या फोनचा स्क्रॅप कसा हाताळावा हा प्रश्न मात्र राहीलच.

सर्व्हिसिंग मध्ये कुठला पार्ट कुठे किती प्रमाणात लागतो हे कसे ठरवणार ?

म्हणजे कुर्डुवाडी खुर्द पाचव्या गल्लीत मिक्सरची वर्षाला 2 भांडी बाद होतील , आणि किहिंकहवहडीमध्ये 3 टोपणे बाद होतील असे काही आधी भविष्य समजते का ?

मग कम्पनी किंवा लोकल दुकानदार दुकानात काय काय म्हणून ठेवेल ?

>>पण यामुळे निर्माण होणारा जुन्या फोनचा स्क्रॅप कसा हाताळावा हा प्रश्न मात्र राहीलच.<<
नॉट रियली. पण एखाद्याला जुना फोन हट्टाने वापरायचाच असेल तर त्याचे सगळे हट्ट पुरवले जाउ शकत नाहि. हा कळीचा मुद्दा आहे...

Pages