तुम्ही नवा मोबाईल विकत घेता तो किती वर्षे वापरता? नवा टीव्ही, गाडी, फ्रिज , लॅपटॉप , फूड प्रोसेसर, वॉशिंग मशिन विकत घेताना पुढे किती वर्षे ती गोष्ट आपण वापरणार आहोत याचा विचार टिपिकल मध्यमवर्गीय माणूस तर नक्कीच करतो. एके काळी, मोठ्या मुलाचे कपडे छोट्याला वापरायचे आणि नंतर त्यालाही तोकडे पडायला लागल्यावर त्याचे पायपुसणे नाहीतर भानशीरे ( या शब्दाची उत्पत्ती कुणास ठावूक असल्यास सांगावी!) बनवायचे आणि तेही पार फाटून वाट लागल्यावर काही नाही तर पाणी तापवण्याच्या चुलीत विस्तव पेटविण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा!
थोडे मागे जाऊन विचार केला तर असे आढळून येईल की या साऱ्या गोष्टींचे आयुष्य कमी कमी होत आहे. 'वापरा आणि फेकून द्या' तत्वावरच बनविलेल्या वस्तूंचे प्रस्थ वाढत चालले आहे किंबहुना उत्पादक या गोष्टी एकदा वापरून फेकून देण्यासाठीच असतात अशी विचारसरणी ग्राहकांच्या गळी उतरण्यात यशस्वी झाल्या आहेत.
मागे २०१७ ला एक मोबाईल कंपनी मुद्दामहून अपडेट द्वारे मोबाईल स्लो करण्याचा करतेय हे उघडकीस आले होते. नंतर कंपनीने सारवासारव केली की जुनी बॅटरी पुरेसा करंट देऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा फोन पुन्हा पुन्हा अचानक बंद पडून खराब होऊ नये म्हणून त्यांनी हे काम केले होते! या सर्व प्रकारासाठी कंपनीला दंड भरावा लागला होता.
मोबाईल, लॅपटॉप म्हटल्यावर त्यांचे आयुष्य जास्तीत जास्त ३ वर्षांचे असणार हे आपण गृहीत धरतो. ऑपरेटिंग सिस्टिम आणि अपग्रेड होणारे अँप्लिकेशन्स जुने हार्डवेअर सपोर्ट करू शकत नाही हे मान्य आहे, तरीसुद्धा हे प्रॉडक्ट्स डिझाईन करत असताना हार्डवेअर अपग्रेड ची सोय करून देणे करणे शक्य आहे असे एक एम्बेडेड सिस्टीम इंजिनिअर म्हणून मला वाटते. परंतु त्यामुळे त्या कंपनीचे अर्थकारण बिघडेल हा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे. असे केल्यास दर तीन महिन्यांनी मार्केट मध्ये येणारे नवीन मॉडेल कोण खरेदी करणार हा मोठा प्रश्न असेल.
खरे तर हळू हळू "Use and Throw' ही आपली वृत्तीच बनत चालली आहे. आजकाल दुरुस्त करून एखादी गोष्ट वापरण्याच्या फंदात कुणी पडत नाही आणि कुणी हट्टाने पेटून दुरुस्त करायला गेला तर एवढा भाव सांगितला जातो की त्यापेक्षा ती वस्तू नवीन विकत घेणे सोयीस्कर ठरते. काही वर्षांपूर्वी मी केरळ मध्ये असताना माझ्या गाडीचा वायपर बिघडला. मी गॅरेज मध्ये घेऊन गेल्यावर त्या मेकॅनिक ने वायपरची जी मोटर असेंम्बली असते त्यातील गिअर मोडले आहेत म्हणून सांगितले. हाच प्रॉब्लेम मला मुंबईत आला असता तर पूर्ण असेंम्बली नवीन घालायला लागली असती पण त्या केरळ मधल्या मेकॅनिक ने पूर्ण असेंम्बली खोलून त्यातला गिअर बदलला आणि वायपर दुरुस्त करून दिला! त्यानंतर त्या वायपर ने बरीच वर्षे काही त्रास दिला नाही. प्रश्न नुसत्या पैशाचा नाही पण या 'वापरा आणि फेकून द्या' वृत्ती मुळे कार्बन फुटप्रिंट किती वाढली जातेय याचा विचार उत्पादकांनी जरूर करावा. खरंतर या साऱ्या गोष्टीशी सध्या कुणाला देणे घेणे नाही. प्रत्येक कंपनीची आणि पर्यायी देशाची एकमेकांशी स्पर्धा आहे जास्तीत जास्त मार्केट काबीज करण्याची.
बरे, या सगळ्याचा विचार डोक्यात का आला? माझ्याकडे Wonderchef कंपनीचा जवळ जवळ तीन वर्षे जुना Nutri Blend ब्लेंडर होता. त्यातला एक जार हा एका वर्षात लीक व्हायला लागला तर दुसऱ्या जार चे ब्लेड्स गेल्या महिन्यात तुटले! कंपनी मला माझ्याकडे असलेल्या मॉडेल चे ब्लेड किंवा पूर्ण जार उपलब्ध करून देऊ शकत नाही आहे. याचा अर्थ मी साडेतीन हजाराचा ब्लेंडर त्याची मोटर व्यवस्थित चालू असताना फेकून द्यायचा ते फक्त त्याचे शंभर दोनशे रुपयाचे ब्लेड नाही म्हणून! बरे, मिक्सर सारखे वेगळे करता येणारे ब्लेड असणारे डिझाईन असते तर जसे कुठल्याही इतर घरगुती उपकरणांचे दुसऱ्या कंपनींनी बनवलेले पार्टस उपलब्ध असतात तसे कुठे ना कुठे ते ब्लेड उपलब्ध झाले असते.
त्यामुळे सध्या तरी, या ब्लेंडर मध्ये smoothie वगैरे बनविणे शक्य नसल्याने त्याचा उपयोग कसा करायचा यावर गहन विचार सुरू आहे! जार चा उपयोग कोथींबीर ठेवायला होऊ शकतो असे तूर्तास लक्षात आलेले आहे! मोटर असलेला त्याच्या खालच्या भागाचा उपयोग मी कसा करू शकतो ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा!!
Submitted by मानव पृथ्वीकर on
Submitted by मानव पृथ्वीकर on 13 June, 2021 - 01:30
<<
झक्कास!
रच्याकने. एक डीआय्वाय चा धागा काढला पाहिजे इथे.
अवश्य.
अवश्य.
जेव्हा मी सातवी आठवीत होतो
जेव्हा मी सातवी आठवीत होतो तेव्हा मला विज्ञान विषयाची गोडी लागली. मी अनेक वस्तू रिपेअर करायला सुरवात केली. कितीही किचकट वस्तू असू दे मी ती लीलया रिपेअर करत असे. बघणारे आश्चर्याने तोंडात बोटे घालत असत. माझी कीर्ती हळूहळू दूरवर पसरली आणि मी रिसायकल बाबा या नावाने प्रसिद्ध झालो. अनेक लोक्स मला वस्तू दुरुस्त करण्यासाठी आमंत्रण देतात. श्रीखंड पुरी, आमरस पुरी, मटण असं पंचपक्वान असलेलं जेवण खाऊ घालतात. मी आमच्या स्वतःच्या घरातील एकही वस्तू टाकाऊ होऊन नाही दिली.
रिसायकल बाबा या नावाने
रिसायकल बाबा या नावाने प्रसिद्ध झालो.
🙄
🙂
रियुज किती करायचे याला पण एक
रियुज किती करायचे याला पण एक मर्यादा हवी ना!
माझे वॉशिंग मशीन 3 महिन्यानंतर 28 वर्षांचे होईल.
मागच्या लॉक डाऊनमध्ये 3000/-(कशासाठी आठवत नाही)
हया लॉक डाऊन मध्ये4500/-(motherbord गेला होता) घालून तेच वापरतोय.ऐन मार्चमध्ये मशीनने असहकार पत्करल्यामुळे नवीन घेता आले नाही.ऑनलाईन मागवते म्हंटले तर त्यावर विश्वास नाही.आता तर चालतेy na nantar बघू हा पवित्रा. मशीनने एकदम राम म्हटले तरंच नवीन येईल.
इतका खर्च करून चालू ठेवणे
इतका खर्च करून चालू ठेवणे बरोबर नाही.
स्वत: दुरुस्त करण्याबाबत मानव
स्वत: दुरुस्त करण्याबाबत मानव, आ.रा.रा. यांच्या प्रतिसादांशी सहमत. रिपेअर वाले नेहमीच भरोशाचे नसतात. आपण स्वत: दुरुस्त करू शकलो तर खूपच उत्तम. फक्त त्यासाठी लागणारा वेळ/साधने आणि कसब या गोष्टी उपलब्ध असणे आणि सर्वाचा एकूण विचार करता ते दुरुस्त करणे आपल्याला परवडणे महत्त्वाचे. सगळ्याची सांगड घालून दुरुस्त झालेच नाही तर निदान काय समस्या आहे इतके कळले तरी रिपेअरवाल्याशी बोलताना ते बरे पडते.
इतका खर्च करून चालू ठेवणे
इतका खर्च करून चालू ठेवणे बरोबर नाही..... नक्कीच.
जर end to end जबाबदारी
जर end to end जबाबदारी कंपन्यांवर दिली तरी कंपन्या फायदा मिळवू शकतील. फक्त त्यांचे बिझिनेस मॉडेल बदलेल. Non consumable goods विकत घेताना ग्राहकाला खरं काय हवं असतं? म्हणजे मी एसी विकत घेतला आणि तो बंद पडला तर त्या बंद पडलेल्या धुडातून माझे मोजलेले पैसे वसूल होतात का? तर नाही. म्हणजे मी जेव्हा पैसे देऊन एसी विकत घेते तेव्हा मी खरंतर माझ्या खोलीतली हवा गार करण्याची सर्व्हिस विकत घेते. आता हे प्रत्येक उपकरणाविषयी म्हणता येईल. उद्या जर मला एखादी कंपनी १० वर्षाच्या गॅरंटी सकट एसी विकायला तयार झाली - म्हणजे दहा वर्षे हे यंत्र नादुरुस्त झाले तर कंपनी दुरुस्त करेल आणि दहा वर्षांनी माझ्याकडून जुनं यंत्र घेऊन जाईल आणि नवीन अधिक सुधारित यंत्र पुढच्या दहा वर्षांच्या करारावर ऑफर करेल तर मी कदाचित बाजारभावापेक्षा थोडी जास्ती किंमत मोजायला तयार होईन. आणि जर सरकारने कायद्याने हे बंधनकारक केलं असेल तर मग कंपनीला देखील सतत मोडणारं यंत्र बनवण्यापेक्षा चांगली दहा वर्षं चालणारं यंत्र बनवता येईल. आणि त्यांनी स्वतःला पूर्ण दहा वर्षे उत्तम संशोधन आणि innovation साठी मिळतील. कदाचित मग कंपनी आपलं product अशा रीतीने design करेल ज्यात अधिकाधिक वस्तूंचा पुनर्वापर कंपनीला करता येईल. शिवाय कंपनीची दरवर्षी टाचकुला बदल करून नवीन मॉडेल आणण्याची गरज संपेल. कदाचित पुढच्या व्हर्जनसाठी कंपनीला केवळ एक भाग बदलून पुरेल. यात मग कंपनी right to repair नाकारू शकेल आणि ग्राहकाला देखील यात काही गैर वाटणार नाही. या प्रकारे होणारं innovation अधिक शाश्वत आणि पर्यावरणाच्या हिताचं असेल. अशा प्रकारचा product तो services प्रवास streaming platforms मुळे झालेला दिसतो. प्रत्येकाने सीडी किंवा डीव्हीडी घेण्यापेक्षा आपण सगळे आता streaming platforms वर सिनेमे पाहणं पसंद करतो. एकदा का हे असे मॉडेल घेण्यावाचून पर्याय नाही हे स्पष्ट झाले की कंपन्या त्या दिशेने स्वतःला बदलतील. एका रात्रीत हा बदल होणार नाही पण कोणीतरी अशी disruptive कल्पना आणली की झटकन बदल होईलही. ओला उबरने गाडीची गरज जवळपास संपुष्टात आणली होती काही शहरांमध्ये.
सरकार स्वतः 4 दिवसात पडेल की
सरकार स्वतः 4 दिवसात पडेल की 5 वर्षे टिकेल हे स्वतही सांगू शकत नाही
मग 10 वर्षांची गरेनती द्या व पुन्हा घ्या हे कसे सांगू शकेल ?
शिवाय , सतत वस्तू मोडणे व जनतेने नवीन विकत घेणे हे सरकारलाही फायद्याचे आहे कारण त्यातून जास्त कर गोळा होतो
-----
हॉटेल ताज मध्ये केळे 200 रुला विकले , थेटरात पॉप कॉर्न 100 रु ला विकले म्हणून किती कोर्ट केसेस झाल्या आहेत , पण निकाल जनतेच्या विरोधात लागले आहेत
कारण किंमत अधिक तर कर अधिक , सरकारही त्यात सामील असतेच
ब्लॅककॅट, तुमचा मुद्दा कळला
ब्लॅककॅट, तुमचा मुद्दा कळला नाही आजिबातच.
तुमचा मिक्सर मोडला
तुमचा मिक्सर मोडला
तुम्ही 4000 रु देऊन नवीन मिक्सर खरेदी केला , तर 4000 रु वर 10% जीएसटी पकडला तर सरकारला 400 रु कर मिळेल
तुम्ही 4000 चा मिक्सर नवीन न घेता , 200 रु चा पार्ट नवीन घेऊन बसवला तर फक्त 200 रु च्या वस्तूचा व्यवहार झाल्याने सरकारला फक्त 20 रु कर मिळेल
<< दहा वर्षे हे यंत्र
<< दहा वर्षे हे यंत्र नादुरुस्त झाले तर कंपनी दुरुस्त करेल आणि दहा वर्षांनी माझ्याकडून जुनं यंत्र घेऊन जाईल >>
भाड्याने घेतलेली वस्तू मला ग्राहक या नात्याने महाग पडते. शिवाय ती वस्तू जर मला दुरुस्त करता आली तर मी ती वस्तू १० वर्षांऐवजी कदाचित २०-२५ वर्षे पण वापरू शकतो, हा फायदा आहे.
कोणी मुद्दाम खराब पार्ट
कोणी मुद्दाम खराब पार्ट वापरून उपकरण २ वर्षांत खराब होईल म्हणजे ग्राहक परत खरेदी करेल हा बेसिक मोटिव्ह ठेवून डिझाईन करत नाही. किमान माझ्या पाहण्यात तरी नाही. किंमत, स्पर्धक कंपनीच्या आधी आणण्याची शर्यत, फायदा, वॉल स्ट्रीट .. आणि किंमत राहिलीच. या सगळ्यात स्वस्त पार्ट निवडले जातात.
७२०पी, १०८०p, ४के, ८ के यात फक्त रेझोल्यूषन नाही तर आणखी अनेक गोष्टी गेल्या १० वर्षांत बदलल्या. ३२ इंचा वरून ८५ इंच+, स्क्रीन टाइप, कनेक्टिव्हिटी, बेझल, एकूण जाडी ह्या बाह्य. अंतरंगातील तर अनेक. टीव्ही राहुद्या. फोन, घड्याळ, वायफाय... यादी बरीच वाढेल.
वायफाय चा पहिला आयट्रिपलई सर्टिफाईड स्टँडर्ड फक्त २० वर्षापूर्वीचा आहे. विश्वास नाही बसत. यात हार्डवेअर अपग्रेड करायचं म्हटलं तरी काय आणि किती आणि कसं करणार. स्पर्धेत टिकून राहायचं आहेच. तरी कंपन्या आणि स्टँडर्ड बराच प्रयत्न करतात. कारण ग्राहकाला नवीन घ्यायला सांगितलं तर तो परत बाजारात जातो आणि स्पर्धकांचे उपकरण निवडू शकतो. आजकाल saas च्या काळात हे दीर्घकालीन तोट्याचे होते.
हल्ली कंपन्या दोनतीन
हल्ली कंपन्या दोनतीन वर्षानंतर काही मॉडेलचे स्पेअर पार्ट्स बनवतच नसतील. स्वत: करणारा माणूस मग काय करणार? जुगाड. तो करून त्याची अपेक्षा वस्तू चालू ठेवणे असते. पण रिपेर सर्विसवाल्याकडे जाणारे गिऱ्हाइक ग्यारंटी मागते ती तो कसा देणार?
हल्ली रिपेरवाले गायबच झालेत.
म्हणजे मी जेव्हा पैसे देऊन
म्हणजे मी जेव्हा पैसे देऊन एसी विकत घेते तेव्हा मी खरंतर माझ्या खोलीतली हवा गार करण्याची सर्व्हिस विकत घेते.
<
नाही. तुम्ही सर्विस नव्हे तर ती सर्विस देणारी वस्तू विकत घेतली आहे. तो एसी तुम्ही लीजवर्/भाड्याने आणलेला नाही. (या प्रकारे देखिल ए.सी. मिळतो. कन्येच्या होस्टेल रूममधे भाडे तत्वावर घेतलेला एसी आहे.)
काही अती महाग बाबी उदा. मर्सिडिझ कार. ही विकत घेण्यापेक्शा लीजवर घेतलेली परवडते. (कारण झिरो रीसेल व्हॅल्यु. प्लस काही खराब झाले तर कंपनी दुरुस्ती करते. लीज सम्पली की गाडी कंपनी घेऊन जाते, लाईक रीसेल. अॅग्रीमेंट जसे असेल तश्यप्रमाणे. )
पण.
माझ्या "मालकीची" वस्तू खराब झाली तर मला रिपेयर करायचा अधिकार असलाच पाहिजे. लीज करताना मी त्या वस्तूच्या बाजारातील किमतीच्या एका फ्रॅक्शन इतकी किंमत मोजत असतो. त्याची रिपेअरिंग करायची माझी गरज/जबाबदारी नाही, अन मी तितके पैसेही मोजलेले नाहीत. इथे मी सर्विस विकत घेतली आहे. वस्तू नव्हे.
सोपी सिमिली घर भाड्याने घेणे ही आहे.
भाड्याच्या घरात मी फक्त वापर करण्याबद्दल पैसे देतो आहे. भाड्याने देणारा टोटल घराच्या किमती इतके पैसे वसूल करायच्या प्रयत्नात असेल, हे मान्य. पण त्या घराची 'जबाबदारी' माझ्यावर नाही. व कोणत्याही क्षणी मी त्या घराचा वापर थांबवून दुसरे घर शोधू शकतो.
उदा. अॅपल कंपनीचे घर मात्र पूर्ण किंमत, तीही इतर घरांच्या बाजारभावापेक्षा जास्त देऊन मी 'विकत' घ्यायचे, अन ते खराब झाले तर मात्र रिपेयर करायचा मला अधिकार नाही. रिपेयर स्पेअर्स देखिल तेच मोनोपली करून महागात विकणार.
याला माझे १००% ऑब्जेक्शन आहे.
पण रिपेर सर्विसवाल्याकडे
पण रिपेर सर्विसवाल्याकडे जाणारे गिऱ्हाइक ग्यारंटी मागते ती तो कसा देणार?
हल्ली रिपेरवाले गायबच झालेत.
<<
नाही.
जुगाड करून देणारा अन करून घेणारा या दोघांना यातील गाजराची पुंगी माहिती असते. अगदी आयुष डॉक्टरकडे जाणार्या पेशंटसारखे ते आहे. दोघांनाही गम्मत माहिती असते.
भरपूर रिपेयर वाले आहेत. रस्तोरस्ती. शोधा म्हणजे सापडेल.
कोणी मुद्दाम खराब पार्ट
कोणी मुद्दाम खराब पार्ट वापरून उपकरण २ वर्षांत खराब होईल म्हणजे ग्राहक परत खरेदी करेल हा बेसिक मोटिव्ह ठेवून डिझाईन करत नाही.
<<
एक्स्पीचा सपोर्ट बंद. विन्डोज ७ चा बंद.
मला सांगा, असे कोणते नवे सॉफ्टवेअर आहेत, जे वापरले नाहीत तर जीव जाईल, अन त्यांच्यासाठी या काँप्य्युटरची प्रोसेसिंग पॉवर/ऑपरेटिंग सिस्टीम तोकडी पडेल? ५१२ केबी रॅम जगाला पुरेल असे एकेकाळी म्हणत असत. ३८६ कॉम्प्युटर पेक्षा चंद्रावर माणूस पाठवणारा नासाचा सुपरकॉम्प्युटर कमी ताकतवान होता.
पार्ट सगळे उत्तम आहेत, मशीन चालू आहे, पण त्याचा वापरच करता येणार नाही अशी सोय जबरदस्तीने केलेली आहे. खराब पार्ट वापरून वगैरे पेडगावी जाउ नका :फिदि:
आता OS चे सुद्धा OEM लायसन्स
आता OS चे सुद्धा OEM लायसन्स ऐवजी Office 365 सारखे वार्षिक सबस्क्रिप्शन करतील की काय?
मी मस्त पैकी ऊबंटू वापरू लागलो होतो. पण काही गव्हर्नमेंट टेंडर्स पोर्टलसाठी विंडोज घ्यावे लागले.
>>एक्स्पीचा सपोर्ट बंद.
>>एक्स्पीचा सपोर्ट बंद. विन्डोज ७ चा बंद. >> बॅकवर्ड कंपॅटिबल कोड लिहिण्याला मर्यादा असतात. जुनं बॅगेज सांभाळत त्यात नवा कोड घालत सगळ्या शक्यतांचा विचार करुन नव्या गोष्टी करत राहिलं की हातही लावू नये अशी स्पगेटी बनते. जितकं क्लिष्ट तितके बग जास्त. अर्थात त्या टाईम कॅप्सुल मधली सगळ्या प्रणाल्या चालत राहिल्याच पाहिजेत, रिपेअर तुम्हाला करायचं असेल तर करता आलंच पाहिजे. सपोर्ट काढून घेऊन बंद करणे हा शुद्ध हलकटपणा आहे.
आणि यात ते त्यांच्याच पायावर धोंडा मारुन घेत आहेत. वर तुम्हीच लिहिले आहे, की या अशा हलकट प्रकाराला कंटाळून तुम्ही ओपन सोर्सच्या मागे गेलात. सारखं हार्डवेअर अपग्रेड करायला लावणे, ते ही तुमची इकोसिस्टिम स्टाँग नसेल तर (रीडः तुम्ही अॅपल नसाल तर)... अत्यंत धोकादायक आहे. एकदा का कस्टमर मार्केट मध्ये गेला की तो तुमचंच नवं प्रॉडक्ट घेईल याची शक्यता कमी कमी होत जाते.
तसंही हार्डवेअर आणि ओएस विकुन (जवळपास) शून्य पैसे मिळतात, अनेकदा कंपन्यांचे पैसे खर्चच जास्त होतात. विंडोज हे प्रॉडक्ट नसून ग्राहक हेच प्रॉडक्ट आहे, आणि त्याला जास्तत जास्त वेळ खिळवुन आपल्याला हवं ते दाखवता येणे (उदा. जाहिराती) यातच पैसे मिळतात. तोच निघुन गेला की बसतील बोंबलत.
आ. रा. रा. , let me rephrase
आ. रा. रा. , let me rephrase म्हणजे मी जेव्हा पैसे देऊन एसी विकत घेते तेव्हा त्या यंत्रापेक्षा मला त्या यंत्राच्या function मध्ये इंटरेस्ट असतो. म्हणजे उद्या जर एसीमधून गार हवा येईनाशी झाली तर त्या यंत्राचा मला काहीही उपयोग राहत नाही. एक ग्राहक म्हणून मला त्या यंत्राची उपयोगिता जास्त महत्त्वाची आहे त्या यंत्रापेक्षा. बंद पडलेल्या एसी किंवा वॉशिंग मशीनची मालकी फार सुखाची नसावी! आता गॅरण्टी म्हणजे एका प्रकारचा बंद पडलेलं मशीन दुरुस्त करवून घ्यायचा हक्कच नाही का? जर ती जबाबदारी कंपनीकडेच दिली तर एक ग्राहक म्हणून तुमची चिंता कमीच होते आहे. यात अजून एक गोष्ट म्हणजे जरी तुम्ही कितीही right to repair बजावलात आणि वस्तू दुरुस्त करून दीर्घकाळ वापरलीत तरी एक ग्राहक म्हणून तुम्ही त्या वस्तूचे जास्तीत जास्त recycling वा upcycling करू शकणार नाही आणि उरलेल्या यंत्राच्या भागांची निर्धोक विल्हेवाट ही लावू शकत नाही. मग ती जबाबदारी कोणी घ्यायची? आज ही जबाबदारी कोणाचीच नाहीये. This is the cost that we all externalize to the environment. जोवर आपण कोणत्याही वस्तूची एन्ड टू एन्ड जबाबदारी कोण घेणार हे आखून घेत नाही तोवर आपण आपले रिसोर्स असेच exploit आणि pollute करत राहणार. आणि ऍपल सारख्या कंपन्या मनमानी करत राहणार. जर ही जबाबदारी उत्पादन करणाऱ्या कंपनीवर असेल तर त्यांचा नफा कमावण्याचा मार्ग अधिकाधिक दुरुस्तीला सोपे आणि टिकावू यंत्र बनवण्याकडे झुकेल. यातून ग्राहकाला उत्पादकांच्या स्पर्धेचा फायदा मिळेल. शिवाय जेव्हा गॅरंटीचा कालावधी संपल्यावर कंपनी ते यंत्र परत घेऊन जाईल तेव्हा कंपनीला त्यातले बरेचसे भाग परत वापरता आल्याने त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि निसर्गावरचा ताणही.
आपल्याकडे आता या क्षणी तरी ही कल्पना आहे. पण युरोपमध्ये याला काही प्रमाणात सुरुवात झालेली आहे. https://www.euronews.com/2021/03/01/eu-law-requires-companies-to-fix-ele...
कार टायर्स नवीन लावताना
कार टायर्स नवीन लावताना एनव्हायर्न्मेंट फी/ टॅक्स घेतात हे एक मॉडेल आठवलं. तो पैसा लोकल सीटीला जात असावा आणि ते विल्हेवाट लावत असावेत (जस्ट एक स्पेक्युलेशन. नक्की माहित नाही)
यंत्रातले भाग परत वापरण्याची इलेक्टॉनिक उपकरणांत काही उदाहरणं देऊ शकेल का कोणी?
उदा. कंप्युटर मधले असे किती भाग जसेच्या तसे पुनर्वापर करणार? प्रोसेसरला थंड ठेवणारा फॅन किंवा प्लॅस्टिकची केस, पेरिफेरलचे कनेक्टर्स आणि त्याची सर्किट्स फारतर. चार दोन कपॅसिटर्स. मेमरीला कितीवेळा खोडून परत लिहायचं याची एक्सपायरी डेट असते. असं रेटिंग प्रत्येक पार्टला असतेच. प्रोसेसर बदलायचा म्हणून तर नवा कम्प्युटर घेतोय.... बरं हे पार्ट वेगळे करुन, परत टेस्ट करुन, साठवून हवे तेव्हा वापरायचे. म्हणजे कारचे पार्ट जसे जंकयार्ड मधुन आणून लावतात तसे काहीतरी करायचे. आज इलेक्टॉनिक व्यवसाय सगळा चीन, मलेशिआ, तैवान, थायलंडला का आहे? कंझ्युमरच्या जवळ का नाही? ही जुनी यंत्रे शिप करुन तैवानला घेऊन जाऊन त्यातील पार्ट ऑटोमेशनने वेगळे करणे. आणि त्याचं टेस्टींग करुन त्याची लाईफ किती उरली आहे ते बघुन वर्गीकरण करुन पुढच्या पॉडक्ट मध्ये वापरणे. त्या प्रॉडक्टला वर्षाची वॉरंटी देणे. हे एनफोर्स करणे. टू अँबिशस!
टिकाऊ माल प्रत्येकाला बनवायचा असतो. ग्राहकाला मात्र स्वस्त माल खरेदी करायचा असतो. इतने पैसेमे इतनाईच मिलेगा.
आणि मग सेकंड हॅन्ड वस्तू
आणि मग सेकंड हॅन्ड वस्तू ट्रेस कशा करणार ? ना त्याची पावती असते , ना देण्या घेण्याचे धड रेकॉर्ड ?
<< उपकरण २ वर्षांत खराब होईल
<< उपकरण २ वर्षांत खराब होईल म्हणजे ग्राहक परत खरेदी करेल हा बेसिक मोटिव्ह ठेवून डिझाईन करत नाही. किमान माझ्या पाहण्यात तरी नाही. >>
तुम्ही पाहण्याचं क्षेत्र अजून व्यापक करायची गरज आहे, इतकंच म्हणू शकतो. आत्ता लिंक शोधायचा कंटाळा आला आहे, पण शोधले तर तुम्हाला पण सापडेल. तूर्तास हे बघा.
विंडोज १० शेवटचीच सांगत आता
विंडोज १० शेवटचीच सांगत आता त्याची जाण्याची पाटी लागलीसुद्धा २०२५.
मोठ्या उत्साहाने विंडोज फोन घेतले ( अधिकृत ओफिस सूट फुकटात आणि अपडेट्स दर महिन्याला.)२०१५मध्ये.
मग २०१८ मध्ये बंद केली ओएस. स्टोरही बंद केले. बोंबला.
ओफिस सूट फुकट होता तो विकत केला, परत मागच्या वर्षी थोड्या फीचरसह फुकट केला. तर क्लाउड आधारित गूगल डॉक्स,शीटस वगैरेसाठी इंटरनेट खर्च अधिक स्टोरेज लिमिट टाकले मे महिन्यात. म्हणजे बिजनेस प्लान आला. गिऱ्हाइक वस्तू विकत घेऊन परतपरत खरेदीला यावा हीच इच्छा. शिवाय मोनोपॉली किंवा प्रतिस्पर्धी नसले की वाईटच.
----------------------------------------
बकेटमध्ये राहणारा संगणक आता कॉफी कपात ठेवण्याची स्वस्तात सोय दिली 'रास्पबेरी पाय' ने. घरचाच टीवी स्क्रीनम्हणून वापरला तर खर्च कमी. लिनक्स शिकू. pdf आणि epub पुस्तकं वाचता आली मोठ्या स्क्रीनवर तर मजा येईल. ( ओनलाइन शिक्षणासाठी जमेल का?)
एकदा विकत घेतलेलं प्रॉडक्ट,
एकदा विकत घेतलेलं प्रॉडक्ट, सॉफ्टवेर इटर्निटी पर्यंत टिकावं, रिपेर करता यावं, त्याला अन्कंडिशनल वेंडर सपोर्ट मिळावा अशी अपेक्षा करणार्यांनी अर्थव्यवस्था, बिझनेस मॉडेल, इनोवेशन इ. बाबतचं वाचन वाढवावं अशी सूचना करतो. एखाद्या वस्तुची वॉरंटि लाइफटाइम असणे म्हणजे ती तुमच्या लाइफटाइमशी संबंधीत नसुन त्या वस्तुच्या लाइफटाइमशी असते...
<< अर्थव्यवस्था, बिझनेस मॉडेल
<< अर्थव्यवस्था, बिझनेस मॉडेल, इनोवेशन इ. बाबतचं वाचन वाढवावं अशी सूचना करतो. >> You made my day.
हे बघा. यात तुमचं इनोव्हेशन, अर्थव्यवस्था कुठे बसतंय, ते सांगा. बिझनेस मॉडेलबद्दल मी बोलतो मग.
right-to-repair नुसार ग्राहक म्हणून मी विकत घेतलेला एखादा प्रॉडक्ट मला दुरुस्त करता आला पाहिजे, हे म्हणणे आहे. वेंडर सपोर्ट मिळावा, कायम सॉफ्टवेअर अपडेट्स मिळावे, अशी अपेक्षाच नाही. यात वॉरंटी रद्द होत असेल तर ती रिस्क घ्यायला ग्राहक तयार आहे आणि त्याला ते मान्य आहे. मग तो प्रॉडक्ट $१,००० चा ऍपल फोन असू दे किंवा $४००,००० चा जॉन डिअरचा ट्रॅक्टर असू दे.
खालच्या लिंक वर तुमचे मॉडेल
खालच्या लिंक वर तुमचे मॉडेल बघून निवडा, सर्व पार्टस दिसतील
https://www.wonderchef.com/collections/nutriblend-mixer-grinder-spare-parts
>>यात तुमचं इनोव्हेशन,
>>यात तुमचं इनोव्हेशन, अर्थव्यवस्था कुठे बसतंय, ते सांगा. बिझनेस मॉडेलबद्दल मी बोलतो मग.<<
आर यु किडिंग योरसेल्फ? ती लिंक बघायची गरजंच नाहि. इनोवेशन इज नॉट फ्री. इट कम्स विथ ए कॉस्ट. व्हॉट डु यु एक्स्पेक्ट? फ्री लंच?
अर्थव्यवस्था - बेसीक रुल आहे व्हायब्रंट इकानमीचा. पैसा सतत खेळत (सर्क्युलेशन) रहायला हवा. तुम्ही एक प्रॉडक्ट विकत घेणार, आणि वर असा आव आणणार कि मी ती कंपनीच विकत घेतली आहे. इट डझंट वर्क दॅट वे. म्हणुन मी वर म्हणालो - वाचन वाढवा...
>>right-to-repair नुसार ग्राहक म्हणून मी विकत घेतलेला एखादा प्रॉडक्ट मला दुरुस्त करता आला पाहिजे, हे म्हणणे आहे<<
धिस इज अनदर बिग बिएस. डु यु बाय एम५ ऑर मर्सेडिज एएमजी, अँड रिपेर योरसेल्फ? इफ यु डु, नो वन इज गोइंग टु स्टॉप यु, नॉट इवन बिएम्डब्लु, मर्सेडिज ऑर अॅपल फॉर दॅट मॅटर. हौएवर, फ्रॉम दॅट पॉइंट ऑनवर्ड - यु आर ऑन योर ओन...
आता हे कोणाला पटत (परवडत) नसेल, तर त्यांनी एम, एएमजी कार्स, अॅपलच्या वाटेला जाउ नये. अॅज सिंपल अॅज दॅट...
<< त्यांनी एम, एएमजी कार्स, अ
<< त्यांनी एम, एएमजी कार्स, अॅपलच्या वाटेला जाउ नये. >>
यू आर राईट. I am not gonna waste my time with people who drank Kool-Aid from Apple, John Deere etc. Mercedes-Benz (or any other car manufacturer) is another story because, by law, they have to make spare parts, required tools, schematic drawings available to consumers and they can't prevent a consumer from doing the repair himself/herself or getting it performed from other mechanic of their choice who is unaffiliated with car dealership. This is exactly what is expected from Right-to-repair legislation.
Pages